खुंटीवरच्या कविता
वाढलेल्या दाढीचे खुंट घेऊन तो बराच वेळ बसला
भादरायला कोणीच नसल्याने जरा उदासच वाटला
उठून मग त्याने हातात वाटी वस्तरा घेतला
ब्रश नसल्याने हातानेच तोंडाला साबण फासला
आरशात बघून जेव्हा त्याने वस्तरा फिरवला
कवीमहाशयांच्या मनात काव्यबीज संचारला
उत्तररात्रीच्या उन्मत्त धुक्यात मग तो लिहीतच राहिला
रात्रभर जागून लेखणीला जीवाच्या आकांताने छळतच राहिला
सकाळी घोटभर दूध पिऊन पुन्हा पाने फाडतच राहिला
संध्याकाळी पेन बदलून नव्या वह्या काढतच राहिला.
दिवसांमागून दिवस गेले, पुनव जाऊन आवस आली
कविमहाशयांची म्हैस, एकदा नव्हे दोनदा व्याली
एकदा ऑफिसला बसलो असता सहाय्यक मला म्हणाला
साहेब तो कवी आलाय या कविता छापायला
उद्वेगानंच मी त्याला म्हटलं
असल्या भिकारड्या कविता मला पुन्हा नको देऊ वाचायला
ऑफिसमधून घरी जाताना कवीमहाशय मला बसस्टँडवर दिसले
कवितांच गाठोडं उरावर घेऊन प्रयोग करत होते कसले?
वाढलेल्या दाढीचे खुंट घेऊन मग ते कविताच पाडत सुटले
पण भादरायला कोणीच नसल्याने जरा उदासच वाटले
-जव्हेरगंज
[कळंबा जेलमधून थेट ....]
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
2176
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता फंटी वरच्या कविता येऊ
काय ? कविता सप्ताह चालू आहे
ये जव्हेरभौका श्टाईल है! ;)
In reply to काय ? कविता सप्ताह चालू आहे by उगा काहितरीच
ही जरा बरी पाडलीयं.
अरे रे! :)
टोचणार्या