Skip to main content

ओवेसिंचा गळा

लेखक साहना यांनी गुरुवार, 17/03/2016 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही. जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे. कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे. त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच. माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे. उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.

वाचने 43366
प्रतिक्रिया 251

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

बाकी काही म्हणा. भाजपच्या महाराष्ट्रातल्या आजवरच्या यशामागे सेनेने केलेले ग्राउंडवर्क भाजप जर नाकारत असेल तर हा कृतघ्नपणा आहे. हे ग्राउंडवर्क कोणत्याही आकडेवारीत येणे शक्य नाही.

In reply to by तर्राट जोकर

भाजपच्या महाराष्ट्रातल्या आजवरच्या यशामागे सेनेने केलेले ग्राउंडवर्क भाजप जर नाकारत असेल तर हा कृतघ्नपणा आहे. डांगे अण्णा शीं सहमती.

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

महोदय, मला वारंवार डांगे असे संबोधून आपण जे काय करत आहात ते मिपाधोरणात बसतं का हे एकदा तपासा.

In reply to by तर्राट जोकर

सेनेने केलेले ग्राऊंडवर्क? कसले ग्राऊंडवर्क आणि कधी केले सेनेने ग्राऊंडवर्क? ठाणे व मुंबईत सुद्धा सेनेला सर्व भागात पाठिंबा नव्हता. उर्वरीत महाराष्ट्रात सेनेला हिंग लावून कोणी विचारत नव्हते. अगदी १९७८ मध्ये सुद्धा शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत ३५ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यातला एकही निवडून आला नव्हता (मुंबई/ठाण्यात सुद्धा) व २% पेक्षा कमी मते होती. १९९० पासून भाजपमुळे शिवसेना ठाणे/मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राला माहिती झाली. भाजपने वर्षानुवर्षे बांधलेले काही मतदारसंघ सेनेने आयते घशात घातले होते (उदा. शिवाजीनगर). खरं तर सेनेच्या यशामागे भाजपने केलेले ग्राऊंडवर्क आहे.

In reply to by श्रीगुरुजी

१९९० पासून भाजपमुळे शिवसेना ठाणे/मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राला माहिती झाली.
श्रीगुरुजी, अत्यंत खेदपूर्वक नमूद करतो. तुमच्यावरचा विश्वास उडाला. :(

In reply to by श्रीगुरुजी

उद्धव ह्यांनी राष्ट्रवादीच्या बालेकील्याला खिंडार पाडले हे उभ्या हयातीत कोन्ग्रेज ला आणि मुंडे महाजन बालासाहेब ह्यांना जमले नव्हते महाजन अडवाणी बाळासाहेब असते तर विरोधकांना त्यांना धर्मांध ठरवून कॉर्नर करणे सहजशक्य झाले असते ह्या लोकांच्या जीवावर नाकर्ते आघाडी सरकार सत्ता टिकवून होते जनतेला दुसरा समर्थ पर्याय नव्हता मंदिर वही बनायेंगे पार डेट नही बतायेंगे सततचे सोपान चढायला ह्याची राजकीय समज व मजल एवढीच होती म्हणूनच जनतेने एकदा संधी दिल्यावर मग परत दिली नाहि ती येण्यास मोदीपर्वाची वाट पहावी लागली. उद्धव ह्यांनी एकहाती ६० आमदार निवडणून आणले हे कौतुकास्पद आहे त्यासाठी त्यांनी जसे सेनेने सुरवातीच्या काळात कोन्ग्रेज व मुस्लिम लीग शी युती केली तशी इतराशी केली नाहि मात्र यंदाच्या मुंबई महानगर पालिकेत सेनेच्या मदतीने भाजपचा महापौर होणार हे नक्की मनसे चे वादळ मागच्या निवडणुकीत सेनेने भाजपच्या मदतीने थोपवले , सध्या मनसे जरी थंड पडलेली असली तरी ते सेनेला पर्याय नक्कीच आहेत अमराठी मते एकगठ्ठा भाजपला मिळणार हे उघड गुपित आहे समाजवादी व दोन्ही कोन्ग्रेज ची पुंगी वाजवायला ओविसी आहे

माझ्या ह्या rambling ला इतका प्रतिसाद मिळत आहे ते पाहून मन प्रसन्न झाले. इथे काही प्रगल्भ वगैरे विचार करण्याचा प्रयत्न नव्हता, लेखनात अनेक त्रुटी आहेत. Ignore कराव्यात

अजून समान नागरी कायद्यावर विषय आला नाही वाटत? मग या कार्यक्रमाला जरुर या! समान नागरी कायदा अपेक्षा आणि वास्तव या प्रा. शमशुद्दिन तांबोळी. मुस्लिम सत्यशोधक मंडळ लिखित पुस्तकाचे प्रकाशन दि.२० मार्च २०१६ स्थळ- राष्ट्रसेवा साने गुरुजी स्मारक पर्वती पायथा पुणे वेळ- सायं ५.०० प्रमुख पाहुणे- निखिल वागळे

त्यांच्या बद्दल इतरांना काय माहित नसले पाहिजे असे त्यांना वाटते हा फर्स्ट पोस्ट मधील अजाझ अश्रफ यांचा एमाआयएम आणि ओवेसींबद्दलचा लेख दखल घेण्या जोगा आहे. यांच्या वाढी मागे काँग्रेसचे राजकीय तात्विक अपयश कारणीभूत नाही हे कसे म्हणावे ?

तर्राट जोकर, तुम्ही दिलेल्या गुहांच्या वक्तव्याच्या दुव्याबद्दल आभार. वरवर चाळला. त्यातल्या काही निरीक्षणांशी मी सहमत आहे. त्यांवर टिपणी करेन म्हणतो. १. >> ... demonisation of those Indians who had the misfortune of not being born into the Hindu fold. यात काय चुकीचं आहे? पाकिस्तानी सत्ताधारी बलुची मुस्लिमांना ज्या रीतीने वागवतात त्यास demonic हे विशेषण फारंच सपक ठरेल. २. >> He identifies three major "Internal Threats: I: The Muslims; II: The Christians; III: The Communists". यात काय चुकीचं आहे? ईशान्येत ख्रिश्चन तालिबान माजलेत. त्यांनी तिथल्या स्थानिकांना कसं वेठीस धरलंय ते सांगायला नको. मुस्लिमांनी अकीस्तान मागून घेतला पण सांभाळायची अक्कल आहे का? कम्युनिस्टांविषयी बोलायलाच नको. १९७० पासून फक्त केरळात संघाच्या कार्याकार्यांच्या २५०+ हत्या झाल्या आहेत. कम्युनिस्ट साम्यवादी आणि नक्षल्यांच्या गळ्यात गळे घालून हिंडतात. हे दिवटे देशाच्या स्थैर्यास धोका नाही तर दुसरं काय आहेत? ३. >> .... extols the code of Manu, whom Golwalkar salutes as "the first, the greatest, and the >> wisest lawgiver of mankind". आंबेडकरांचे मनुबद्दल असेच मत होते (संदर्भ : https://www.facebook.com/AntiSambhajiBriged/photos/a.378785998832203.95…) असो. एकंदरीत, गोळवलकर द्रष्टे होते यात शंकाच नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

यात काय चुकीचं आहे? पाकिस्तानी सत्ताधारी बलुची मुस्लिमांना ज्या रीतीने वागवतात त्यास demonic हे विशेषण फारंच सपक ठरेल. काय बोलून गेला आहात ह्याची जाण असेल अशी अपेक्षा आहे!! :D :D यात काय चुकीचं आहे? ईशान्येत ख्रिश्चन तालिबान माजलेत. त्यांनी तिथल्या स्थानिकांना कसं वेठीस धरलंय ते सांगायला नको. मुस्लिमांनी अकीस्तान मागून घेतला पण सांभाळायची अक्कल आहे का? ईशान्य भारतात स्त्री जननदर हा सर्वाधिक हेल्दी आहे, शिक्षण प्रचंड जास्त आहे ! इतके सगळे असूनही त्यांच्यावरचा आदिम पगडा मात्र कमी झालेला नाहीये, सेमिटिक धर्माचा भारतात आल्यावर होतो तसला खेळ झालाय त्यांचा, आजही नागा लग्ने करतात तेव्हा (समक्ष पाहिले आहे) त्यांच्या निसर्गपूजक विधी वापरुन करतात नंतर फ़क्त ब्लॅक ब्लेजर व्हाइट गाउन घालुन फ़ोटो सेशन करतात, मग नेमके कसे अन कुठे माजले आहेत क्रिस्चियन तालिबानी?? उगाच काहीतरी अर्धवट ऐकून मते ठोकुन द्यायची? पाकिस्तान सांभाळायची अक्कल आहे का अहो आत्ताच तर पाकिस्तानी नेते बलूची नेत्यांशी कसे वागतात ते पहा वगैरे वेलिडेशन केले की हो तुम्ही वरच्या वाक्यांत , म्हणजे ते तसे वागू शकतात तर आम्ही (पक्षी गोळवलकर) का नाही, हा सुर, सीरियसली आपण काय बोलतोय ह्याचे भानच नाही ठेवायचंय का आपणाला? श्री गुरूजी (इथले नाही मुळचे) ह्यांची वाक्यं सार्थ ठरवायला पाकिस्तानी इंस्टान्सेस वापरणे अन इतके करून त्यांना सांभाळायची अक्कल आहे का हे विचारायचे म्हणजे कमाल आहे. १९७० पासून फक्त केरळात संघाच्या कार्याकार्यांच्या २५०+ हत्या झाल्या आहेत. कम्युनिस्ट साम्यवादी आणि नक्षल्यांच्या गळ्यात गळे घालून हिंडतात हे खरे आहे एकंदरित, पण एक सांगा 1970 मधे कम्युनिस्ट शासन जेव्हा केरळ मधे आले तेव्हा ते "वर्ल्डस फर्स्ट डेमोक्रेटिकली एलेक्टेड कम्युनिस्ट गवर्नमेंट" का म्हणवले गेले होते बुआ?? आजही सर्वोत्तम जीवनमान, सरासरी आयुष्य, शिक्षण, वैद्यकीय सेवा, मानवी विकसन गुणांक (ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स), फॉरेन रेमिटेंस, पोषण, अत्यंत कमी नागरी भ्रष्टाचार वगैरे मधे हे "कम्युनिस्ट राज्य" सगळ्यांच्या नाकावर टिच्चून का नंबर वन वर आहे?? का हे सगळे पाहून लक्ष फ़क्त संघ कार्यकर्त्यांचे खून इतक्याकडेच ??? हेच सगळे ऐकवेळ बंगाल बद्दल बोलले असते तर मान्यही केले असते कारण त्यात सत्यांश आहे पण मानवी आयुष्य सुकर करणारे अन केरळ ला नंबर वन वर नेणारे वेगळ्या धाटणीचे लोक आहेत इतके लक्षात घ्या! आंबेडकरांचे मनुबद्दल असेच मत होते (संदर्भ : https://www.facebook.com/AntiSambhajiBriged/photos/a.378785998832203.954...) ठ्ठोssssssssssss अहो फेसबुक पेज चे "दाखले" देताय!! किती हसे करून घेणार अजून स्वतःचे!!!!

ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही. ड्वाळे पाणावले आन पुढच नाय वाचल्या गेल.

ओवैसीच्या धाग्यावर संघ आणि श्री गुरुजींच्या बाबतीत वादावादी??? नक्कीच संघाचा हात असावा.... :प

तजो तुमचे प्रतिसाद आवडले. दगडावर कितीही डोके आपटले तरी तुमचे मत इथे अनेकांना मान्य होणार नाही. संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. संघाच्या संकेतस्थळावर अधिकृत भूमिका वेगळी असली तरी खरी भूमिका ही सरसंघचालक आणि स्वयंसेवक यांच्याशी चर्चेतून किंवा त्यांच्या पुस्तकांतून कळते. वर कुणालातरी संघाच्या मुसलमानविषयक भूमिकेचा विदा हवा होते तिथे मी संघस्वयंसेवकाने लिहिलेल्या (आणि संघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख असलेल्या लेखकाच्या) 'स्मरणशिल्पे'चा संदर्भ दिला आहे. त्यात देवरस यांचे आणखी एक वाक्य आहे. "संघाचे फक्त एकच तत्त्व आहे; हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे, म्हणजेच हे हिंदू राष्ट्र आहे. एकदा हे झाले, की मग ‘भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज हे आपोआपच समोर येते. " गोळवलकर, करंदीकर, देवरस यांच्या भूमिकांमध्ये संपूर्ण सुसंगतपणा आहे. कुणीही आधीच्या संघचालकापेक्षा वेगळी भूमिका खाजगीत मांडलेली नाही. त्यामुळे संघाची ती खरी भूमिका आहे असे मानण्यास हरकत नाही. 'भारतमाता की जय' हे न म्हणणारा देशद्रोही हे सगळ्यांना लगेच मान्य असते. मात्र तिरंग्याऐवजी भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज आहे अशी सुप्त इच्छा बाळगणारे देशभक्त मानले जातात ही आपल्या देशाची शोकांतिका आहे. संघाची आर्थिक धोरणांसंदर्भात भूमिका तर अत्यंत हास्यास्पद आहे. त्यामुळे सामाजिक दुही आणि आर्थिक दिवाळखोरी ह्या दोन्ही कारणांसाठी संघाचा प्राणपणाने विरोध करणे अतिशय आवश्यक आहे.

In reply to by आजानुकर्ण

संघाची ती भूमिका कधीच बदललेली आहे. आहात कुठे?
संघाचे फक्त एकच तत्त्व आहे; हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे, म्हणजेच हे हिंदू राष्ट्र आहे.
ते त्याला हिंदू संस्कृती असे म्हणतात,अन त्यामध्ये मुसलमान सुद्धा येतात.

In reply to by प्रदीप साळुंखे

ते त्याला हिंदू संस्कृती असे म्हणतात,अन त्यामध्ये मुसलमान सुद्धा येतात.
काय सांगता!! मग सरळ भारतीय संस्कृतीच म्हणायचं ना!

In reply to by आजानुकर्ण

तेवढं हुणार की राव! बादवे हिंदू या शब्दाबद्दल काय आक्षेप?ती देण त्यांचीच हाय कि! भारतात राहणारे सगळे हिंदूच. हिंदू=सिंधूच्या पलीकडे राहणारे, त्यात सगळेच येतात.

In reply to by अभ्या..

एकदम बरोबर! भारतातल्या हिंदू मुस्लिम दंगलींना आता हिंदूंच्याच दोन गटांतील दंगली असं म्हणायचं. राम मंदीर आणि बाबरी मशीद या देखील हिंदूंच्याच.

In reply to by आजानुकर्ण

दंगल म्हणजे भावनांचा विस्फोट नुस्ता. भांडणं तर पिता-पुत्रांची पण होतात,पार खून करण्यापर्यंत भावनांची मजल पोहचते. आणि भावना ही धर्म,जात,प्रांत यांच्या दावणीला बांधलेली असते. -------------------------------------- हिंदू,मुसलमान,ख्रिश्चन हे शब्द आहेत नुस्ते. माणसाच्या दोनच जाती नर आणि मादी.

आजानआजानु, >> हिंदूंमध्ये आहे का राष्ट्र ही संकल्पना? असल्यास ती कुठं धर्मग्रंथात, भगवद्गीतेत, पुराणात, उपनिषदात, >> वेदात लिहिली आहे ते सांगा. ऋषींच्या त्याग व तपातून जे ओज उत्पन्न झालं त्यातून राष्ट्राची निर्मिती झाली असं अथर्ववेदात सांगितलं आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आजानुकर्ण, वरील प्रतिसादात तुमचं नाव चुकीचं पडलं आहे. त्याबद्दल क्षमा असावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कुणीतरी त्याग व तप केला की राष्ट्र बनते ? बाकी १५० राष्ट्रांच्या निर्मितीसाठी कोण तपाला बसले होते ? राष्ट्र हे कर्मवादी बहु-जनांमुळे बनते. विमानातून उडणार्‍या एका ब्रह्मचार्यामुळे नव्हे !

In reply to by hmangeshrao

एच्चमंगेशराव, १. >> राष्ट्र हे कर्मवादी बहु-जनांमुळे बनते. विमानातून उडणार्‍या एका ब्रह्मचार्यामुळे नव्हे ! ही अक्कल जपान्यांना शिकवा. त्यांच्या मते स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्याने जपान राष्ट्राची निर्मिती केली. २. >> बाकी १५० राष्ट्रांच्या निर्मितीसाठी कोण तपाला बसले होते ? कोणती राष्ट्रे? नावे कळतील का? आ.न., -गा.पै.

सत्ते साठी हपापलेले तर आताचे कोंग्रेसी वाटताहेत जसे त्यांचे युवा कोंग्रेस चे अध्यक्ष कोणीही मोदींना विरोध केला की हे त्याला समर्थन द्यायला जातात त्यावरून तरी असा निष्कर्ष निघु शकतो।

हा प्रतिसाद दुसर्या धाग्यावर दिला असला तरी तो खरा येथे योग्य आहे माझ्यामते लेखकाला आपली बाजू मांडता आली नाही मात्र त्या मूळ मुद्दा विचार करण्यासारखा आहे. खुद अमित शहा ह्यांनी ओविसी ला देशद्रोही मानले नाही मात्र त्यांना समजवायची गरज आहे. हे नक्की मूळ प्रतिसाद भाजपने समर्थन देओ अगर न देओ ओविसी आपले राजकारण करणार त्याने कोन्ग्रेज चे नुकसान होणार असेल तर भाजपने त्याचा का उपयोग करू नये भ्रष्टाचार न करणारा ओविसी कोन्ग्रेज हून अधिक वाईट आहे का त्याने मुस्लिमांचे ध्रुवीकरण केले व संघाचा तो कट्टर विरोधक आहे म्हणून मी त्याला देशद्रोही मनात नाही मुस्लिम समाजाला पूर्वी पर्याय नव्हते आता ओविसी ची कट्टर विचारसरणी व मोदींच्या विकासाचे राजकारण असे दोन नवीन पर्याय आहेत. नुकतेच संपन्न झालेले सुफी संमेलन त्यात मोदींचा सहभाग त्याला मिळणारा प्रतिसाद नक्कीच आशादायक आहे. मात्र ओविसी पेक्ष्या धर्मनिरपेक्ष राजकारणी खरे धोकादायक आहेत, ओविसी चा इतिहास पहिला तर लोकशाही पद्धतीने तो त्याचे वडील पिढ्यानपिढ्या त्याच्या मतदारसंघातून निवडणून येतात. तेव्हा जसे समाजातील एक गट संघ म्हणजे गोडसे संघ म्हणजे कट्टर पंथीय असा पूर्वग्रह बाळगतात तसा मी ओविसी बद्दल बाळगत नाही. त्यांच्या विचारधरेशी मी असहमत असलो तरी तो येचुरी हून खूप बरा येचुरी देशहित धाब्यावर बसवून चीनी निष्ठा राबवतो एका कार्यक्रमात भारत अमेरिकेसोबत चीनशी उगाच पंगा घेत आहे चीन भारताचा शत्रू नाही चीन पासून भारताला धोका नाही अशी मुक्ताफळे उधळत होता, राष्ट्रवादाच्या संकल्पना अनेक असू शकतात मात्र राष्टीय हिताची एकच असते , चीन च्या विरोधात विएतनाम जपान अमेरिका फिलिपिन्स सोबत भारत संयुक्त लष्करी सराव करतो हे आपले राष्ट्रीय धोरण आहे जे युपिए ने सुद्धा पाळले , येचुरी ची चीनी निष्ठा भारताच्या मुळावर येणार हे नक्की त्यामानाने ओविसी पाकिस्तान मध्ये पाकिस्तानी मुसलमानांना सुनावतो. कार्यक्रमाची पूर्ण लिंक येथे आहे व तो नक्कीच पाहण्याजोगी आहे. अय्यर व कीर्ती पेक्ष्या ओविसी उजवा व सरस आहे. येथे एक आवर्जून सांगितले पाहिजे आपल्या भारतीय उपखंडात पाकिस्तान बांगलादेश येथील राजकीय परिस्थिती बाबत त्याची माहिती व समज भारतातील बहुतांशी राजकारणी नेत्याहून जास्त आहे, सदर कार्यक्रमात भाजपाने कीर्ती आझाद ला पाठवले होते ह्या गुळाच्या गणपतीला पाठीशी घालून ओविसी ने भारतीय किल्ला लढवला पाकिस्तान शी बोलती बंद केली गुजरात आमचा अंतर्गत प्रश्न आहे तुम्ही तुमचे पहा असे सांगणारा ओविसी टिपिकल राजकारणी नाही आहे, त्याच्या विचारधारेला भाजपने किंवा इतर राजकारणी लोकांनी विकासाचे राजकारण करूनच लढा दिला पाहिजे आणि एकदा मोदी ह्यांनी सबका साथ सबका विकास म्हंटले आहे मग ओविसी ला त्याच्या पाठीराख्यांना अस्पृश्य का ठरवावे. त्याने जाहीररीत्या म्हटले आहे हज ची सबसिडी बंद करा तो पैसा मुस्लिम मुलींच्या शिक्षणावर खर्च करा एवढे बोलून सुद्धा हैद्राबादी व काही मुसलमान त्याला पाठिंबा देतात ते का ह्याचे कारण शोधले पाहिजे

तावातावाने सगळे राजकाराणावर अन समाजावर काथ्या कूटत बसतात आज "शहीद दिवस आहे" सगळेच विसरले??? अरेरे असो!, माझ्यातर्फे तरी मी शहीद भगतसिंह , शहीद सुखदेव थापर अन शहीद शिवराम हरी राजगुरु ह्या तीन शहीदांना आदरांजली वाहतो ____/\____ . चित्र जालावरून साभार

In reply to by नाना स्कॉच

या महान देशभक्तांना आदरांजली! यांच्यासारख्या हुतात्म्यांमुळेच आपण स्वतंत्र झालो.

In reply to by नाना स्कॉच

थोड्या काळाने कन्हैयाचा फ़ोटो टाकून उद्याचे क्रांतिकारी असा काही सन्देश टाकू नका. नाय त्याला भगतसिंगच्या कैटेगरित बसवायचा प्रयत्न चालला आहे म्हणुन म्हटले!

In reply to by भंकस बाबा

आसाममधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रोहित वेमुला व ककु यांची चित्रे पक्षाच्या फलकांवर चितारली आहेत.

स्कॉचनाना, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं उशीराने मांडतोय त्याबद्दल क्षमस्व. १. >> काय बोलून गेला आहात ह्याची जाण असेल अशी अपेक्षा आहे!! :D :D जरा स्पष्ट करून सांगतो. पाकिस्तानचे सत्ताधारी लोकं बलुचीस्थानातल्या मुस्लिम लोकांना ज्या भयंकर रीतीने वागवतात त्यास demonic हे विशेषण फारंच सपक ठरेल. २. >> मग नेमके कसे अन कुठे माजले आहेत क्रिस्चियन तालिबानी?? उगाच काहीतरी अर्धवट ऐकून मते ठोकुन द्यायची? हे काय आहे मग ? : https://en.wikipedia.org/wiki/Christian_terrorism#India ३. >> पण एक सांगा 1970 मधे कम्युनिस्ट शासन जेव्हा केरळ मधे आले तेव्हा ते "वर्ल्डस फर्स्ट डेमोक्रेटिकली >> एलेक्टेड कम्युनिस्ट गवर्नमेंट" का म्हणवले गेले होते बुआ?? हे फक्त भारतातच घडू शकते. हिंदू सोशिक आहेत. ४. >> आजही सर्वोत्तम जीवनमान, सरासरी आयुष्य, शिक्षण, वैद्यकीय सेवा, मानवी विकसन गुणांक (ह्यूमन डेवलपमेंट >> इंडेक्स), फॉरेन रेमिटेंस, पोषण, अत्यंत कमी नागरी भ्रष्टाचार वगैरे मधे हे "कम्युनिस्ट राज्य" सगळ्यांच्या >> नाकावर टिच्चून का नंबर वन वर आहे?? का हे सगळे पाहून लक्ष फ़क्त संघ कार्यकर्त्यांचे खून इतक्याकडेच ??? संघाच्या कार्यकर्त्यांचे खून पाडल्याची कबुली कम्युनिस्ट नेते जाहीर सभेत देतात. याला मोगलाई म्हणतात. कायदा आणि सुव्यवस्था हवी ना? नसेल तर मग इतकी आकडेप्रगती काय कामाची? शिवाय केरळची अर्थव्यवस्था बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आखाती पैशावर अवलंबून आहे, ज्यात कम्युनिस्टांचे काहीच योगदान नाही. ५. >> ठ्ठोssssssssssss अहो फेसबुक पेज चे "दाखले" देताय!! किती हसे करून घेणार अजून स्वतःचे!!!! तुम्ही जर तो लेख वाचला तर त्यात ठिकठिकाणी दिलेले संदर्भ सापडतील. अन्यथा ignorence is bliss. आ.न., -गा.पै.