तसा मी कधीच फोटो जेनिक नव्हतो. जन्मा नंतर शक्यतो सगळे जण फोटो काढतात . पण माझ्यावेळी आमच्याकडे काळा पांढरा फ्लाष नसलेला कामेरा असल्यामुळे तो पण काढला नसावा. म्हणजे तो नाही आहे , अणि त्याचे करण तसे असावे असे वाटते .
लहानपणी माझी संभावना "तेल्या मारुती" अशी झाली होती ते मला पक्के आठवते . मी मारुती सारखा केवळ त्या एका गोष्टी साठीच दिसायचो . तसे मला टुमदार पोट होते. मारुतीला मोठे पोट होते का नाही ते आठवत नाही. आमच्या वर्गातल्या मारुतीला भरपूर मोठे पोट होते. पण ह्या मारुतीचा त्या मारुतीशी नावापालीकडे काहीच संबंध नव्हता. ते काहीही असो पण , तेल्या असल्यामुळे फोटो कमीच! लहानपण चे चार दोन फोटो आहेत. त्यातल्याच एखाद्या काळ्या कभी न्न, आणि पिवळसर दात विचकून हसणाऱ्या पोराकडे बोट दाखवून, हाच तो मी, असे मी बरेचदा सांगितले आहे.
तसा माझा फोटो हिमालयात चांगला येतो. काय आहे न, पांढर्या पार्श्वभूमी वर काळ्या गोष्टी चांगल्या दिसतात. पण हिमालयात तेवढ्या करता जाणे पण परवडत नाही.
महा विद्यालयात शिकताना मी ठीक दिसत असावा. बाबा म्हणायचे कि पंचविशीत गाढव पण छान दिसते. तेव्हां चे फोटो मित्रांकडून कधी कधी दिसत राहतात. पण जीव ओवाळावा असा एकाही नाही . नोकरी लागल्यावर एकप्रकारचा सुखवस्तुपण आला तो जाता जाईना . त्यामुळे नंतरचे फोटो हे पोट लपवण्या करिता रोखलेला श्वास स्पष्ट दाखवणारे असे होते . पुढे पुढे तर मी लोकांना केवळ चेहर्याचे फोटो काढत जा असे अडून अडून सांगत आलो . पण लोकांची खोडच अशी असते कि गाफील क्षणी भरल्या पोटाचा (आता आपल्याच पोटाला फुगल्या पोटाचा कसे बरे म्हणणार ) फोटो काढतात .
पुढे पुढे तर , सेकंड चिन हा प्रकार आला. मान पण थबथबुन भरून आली . मग ईतर लोकांपेक्षा फोटोमध्ये मला जास्त रिअल एस्टेट मिळु लागली . त्यामुळे फोटो काधाणार्यांचाच हिरमोड झाला . माझा फोटो पाहून कोणी वत्राट पोराने "गणपती बाप्पा" अशी आरोळी पण ठोकली होती . केवढा पेटलो होतो मी तेव्हां .
आता मी तसा मापात आहे. पण आता फोटोची इच्छाच गेली . घरात दहा पेक्षा जास्त कॅंमेरे आहेत. मुलीचे स्वतःचे , मोबिले मधले वेगळे, कॅम कॉर्डेर आणी काय काय . गो प्रो पण घेणार अहोत. पण त्यांचा उपयोग हा इतरांचे फोटो काढण्यासाठीच होइल. माझ्या रागीट चेहर्याचा फोटो काढून तरी काय मिळणार आहे.
मला आता वाटते की माझा फोटो नकोच. मी गेल्यावर सुद्धा उगाच कोणी फोटो पाहून डोळे भरू नयेत . त्यापेक्षा माझ्या आठवणीने खळखळ हसून डोळे भरावेत . अर्थात ते पाहायला मी मात्र नसेन…
वाचने
2481
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेरे!
छान लिहिलंय.. :)
भारी लिहिलेय. काही पंचेस खास
आवडलं
खर आहे.मलासुद्धा वजनदार
मस्त लिहिलय !!
कडक, कुरकुरीत, शेवफरसाण> ;-)
आवडलं
:)
शेवट चांगला केलाय!
मस्त