राजकिय धागे आणि वाचक
बरेच लोक राजकिय चर्चांच्या नावाने बोटे मोडतात, मेगाबायटी प्रतिसादांबद्दल नाकं मुरडतात. त्यांना ते वाचल्याशिवाय समजत असेल काय? जर वाचण्याची आवड व गरज वाटते तर मग इथे अशा राजकिय चर्चा-प्रतिसादांबद्दल नाकं का मुरडतात? मला तर हा प्रकार म्हणजे कोंबड्यांच्या झुंजींची मजाही घ्यायची आणि मुक्या प्राण्यांवर अत्याचार म्हणून आरडओरडा करायचा, असा वाटतो. ;-)
टु एवरी अॅक्शन, देअर इज अल्वेज इक्वल अॅण्ड अपोजिट रिअॅक्शन. कितीही चुकीचे असले तरी आपलेच म्हणणे रेटणार्यांबद्दल कुणी बोललेलं दिसत नव्हतं. त्यांना जशास तसा विरोध व्हायला लागल्यावर मिपा राजकिय आखाडा झाल्यासारखा वाटायला लागला. काही आयडी केवळ काही राजकीय पक्ष व संघटनांच्या भूमिकांना कसंही करून योग्य ठरवण्यासाठी मिपावर येतात. हे जेव्हा बंद होईल तेव्हा काही सदस्यांना बोचणार्या गोष्टीही मिपावर होणं बंद होईल.
मिसळपाव संस्थळावर सगळ्याच प्रकारच्या अभिव्यक्तिला प्रकटनाचे स्वातंत्र्य आहे असे वाटते. आपल्याला हवे तसे होत नाही हा विचार बाजूला ठेवला तर प्रत्येकाला आपल्या अभिरुचीप्रमाणे व्यक्त होण्याचे, वाचण्याचे स्वातंत्र्य असायलाच हवे. मला पाकविभाग बोअरिंग वाटतो, बर्याच कविता अगदी बालिश वाटतात. भटकंती विभागात दोन-तीन सदस्य सोडले तर फक्त फोटो (पक्षी पाट्या) टाकणारे असतात. काही धागे मला अजिबात आवडत नाहीत. पण अशा कुठल्याही धाग्यांवर कवितांवर पाककृतींवर भटकंतीवर जाऊन मी किंवा माझ्यासारखा विचार करणारे विरोधात लिहित नाहीत. कारण मी ते वाचतच नाही. अहो रुपम् अहो ध्वनिम् प्रकारच्या लेख, धागे, प्रतिसादांवर जाऊन तसे लिहित नाही. त्यांना त्यात धन्यता वाटते, आनंद मिळतो तर असू देत.
मिपा हे हजार चॅनेल असलेला टीवी आहे. उगा टाइम्स नाऊ लावायचं, बघायचं मग तो अरणव किती ओरडतो बघा बघा असं बोलायचं ह्याला काही अर्थ नाही. एकूणच राजकिय चर्चांच्या वातावरणात विचारसरणीपेक्षा व्यक्तिगत होण्याकडे चर्चा करणारे झुकले आहेत. मिपावरही तेच वातावरण झाले असेल तर नवल नाही.
सगळे राजकिय धागे तात्पुरते बंद करुन हा "मिपावरील राजकिय चर्चा" विषय काथ्याकूटास घ्यावा का? ह्या चर्चांच्या उपयोगितेबद्द्ल, दर्जाबद्दल, गरजेबद्दल सर्व सदस्यांच्या प्रतिक्रिया, मते जाणून घेण्याच एखादा पोल घेता येईल काय?
प्रतिक्रिया
सहमत आणि असहमत
आरे दादा इथे डु आयडींच्या
:)
शिवाजी महाराज किंवा हिंदू धर्म यांना मुद्दाम शिव्या देतात
तुकाराम महाराज
पण ते संत होते राहीजी.
एक अर्थ
"तुकाराम महारांजांनी म्हणले
राजकीय चर्चा
मूळ मुद्दा काय लोक बोलतात काय .
होस्टेल मधील मुलीचा विनयभंग आणि मिसळपाव.कॉम
संयत चर्चेबद्दल आणि आपआपले
1+ TJ
?
..
चर्चा राजकीय ते व्यक्तीगत
Pagination