राजकिय धागे आणि वाचक
बरेच लोक राजकिय चर्चांच्या नावाने बोटे मोडतात, मेगाबायटी प्रतिसादांबद्दल नाकं मुरडतात. त्यांना ते वाचल्याशिवाय समजत असेल काय? जर वाचण्याची आवड व गरज वाटते तर मग इथे अशा राजकिय चर्चा-प्रतिसादांबद्दल नाकं का मुरडतात? मला तर हा प्रकार म्हणजे कोंबड्यांच्या झुंजींची मजाही घ्यायची आणि मुक्या प्राण्यांवर अत्याचार म्हणून आरडओरडा करायचा, असा वाटतो. ;-)
टु एवरी अॅक्शन, देअर इज अल्वेज इक्वल अॅण्ड अपोजिट रिअॅक्शन. कितीही चुकीचे असले तरी आपलेच म्हणणे रेटणार्यांबद्दल कुणी बोललेलं दिसत नव्हतं. त्यांना जशास तसा विरोध व्हायला लागल्यावर मिपा राजकिय आखाडा झाल्यासारखा वाटायला लागला. काही आयडी केवळ काही राजकीय पक्ष व संघटनांच्या भूमिकांना कसंही करून योग्य ठरवण्यासाठी मिपावर येतात. हे जेव्हा बंद होईल तेव्हा काही सदस्यांना बोचणार्या गोष्टीही मिपावर होणं बंद होईल.
मिसळपाव संस्थळावर सगळ्याच प्रकारच्या अभिव्यक्तिला प्रकटनाचे स्वातंत्र्य आहे असे वाटते. आपल्याला हवे तसे होत नाही हा विचार बाजूला ठेवला तर प्रत्येकाला आपल्या अभिरुचीप्रमाणे व्यक्त होण्याचे, वाचण्याचे स्वातंत्र्य असायलाच हवे. मला पाकविभाग बोअरिंग वाटतो, बर्याच कविता अगदी बालिश वाटतात. भटकंती विभागात दोन-तीन सदस्य सोडले तर फक्त फोटो (पक्षी पाट्या) टाकणारे असतात. काही धागे मला अजिबात आवडत नाहीत. पण अशा कुठल्याही धाग्यांवर कवितांवर पाककृतींवर भटकंतीवर जाऊन मी किंवा माझ्यासारखा विचार करणारे विरोधात लिहित नाहीत. कारण मी ते वाचतच नाही. अहो रुपम् अहो ध्वनिम् प्रकारच्या लेख, धागे, प्रतिसादांवर जाऊन तसे लिहित नाही. त्यांना त्यात धन्यता वाटते, आनंद मिळतो तर असू देत.
मिपा हे हजार चॅनेल असलेला टीवी आहे. उगा टाइम्स नाऊ लावायचं, बघायचं मग तो अरणव किती ओरडतो बघा बघा असं बोलायचं ह्याला काही अर्थ नाही. एकूणच राजकिय चर्चांच्या वातावरणात विचारसरणीपेक्षा व्यक्तिगत होण्याकडे चर्चा करणारे झुकले आहेत. मिपावरही तेच वातावरण झाले असेल तर नवल नाही.
सगळे राजकिय धागे तात्पुरते बंद करुन हा "मिपावरील राजकिय चर्चा" विषय काथ्याकूटास घ्यावा का? ह्या चर्चांच्या उपयोगितेबद्द्ल, दर्जाबद्दल, गरजेबद्दल सर्व सदस्यांच्या प्रतिक्रिया, मते जाणून घेण्याच एखादा पोल घेता येईल काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
टीआरपी हो, दुसरे काय
यू आर अ मायनॉरिटी ;-)
:)
सहमत आहे.
खफ़वरील चित्रांबाबत सहमत.
असहमत
असहमतीशी सहमत.
+१
राजकारणी धागे खूप आवडतात. त
Intolerance...!
भटकंती विभागात भरपूर वाचण्यासारखे आहे
.
खर आहे !
मला पाकविभाग बोअरिंग वाटतो,
टु एवरी अॅक्शन, देअर इज
काही आयडी केवळ काही राजकीय पक्ष व संघटनांच्या भूमिकांना कसंही करून योग्य ठरवण्यासाठी मिपावर येतात
. हे जेव्हा बंद होईल तेव्हा काही सदस्यांना बोचणार्या गोष्टीही मिपावर होणं बंद होईल. हे निरिक्षण अतिशय जास्त पटलेले आहे ! ठळक अन मोठा केलेला भाग वाचनमात्र असल्यापासुन जाणवत आलेला आहे. विरोध व्हायला आला की काही आयडी चवताळतात , गटाने शिकारी होतात , असो आता हां प्रतिसाद देऊन मी सुद्धा संबंधितांच्या निशान्यावर येईल हे मला नीट माहित आहे तरीही निरिक्षण मांडतो आहे. असो! सगळ्यांचे भले होवो हीच प्रार्थना बाकी, अभ्या ह्यांनी +1 ची काढलेली घाऊक लाज अन विश्लेषण मनातल्या विचारांचा आरसा आहे! म्हणून त्यांची माफ़ी मागून परत एकदा +1सहमत
अप्रतिम धागा!
आक्षेप राजकीय चर्चांना नाही
ओ असं नाही करायचं!
सहमत
स्वातंत्र्य
मुद्दा असा आहे की काही लोकं
अतिशयोक्ति ची परिसीमा! असो.
ज्याचं त्याचं मत असतं ते. एक
चिमणराव.. मूळ मुद्द
मोदका, डुआयडी हा अन्डिफाइन्ड
ट्रोल करणारे डुआयडी ओळखतातच
सहमत
म्हणजे
लेखाशी सहमत
अनेकांनी इथे 'राजकीय चर्चा
आदर, ध्रुवीकरण वगैरे
+१
चित्रपटाप्रमाणे
चित्रपट आणि चर्चा
फिर तेरी कहानी याद आयी
इथे चर्चा व्यक्तिगत होऊ नयेत असं अनेकवेळा म्हटलं जातंय.
लॉजिक पटले पण लाइन अन शब्द
सारखी मते
माझे उलट मत आहे. भांडखोरपणा,
माझे उलट मत आहे. भांडखोरपणा, आक्रस्ताळा उद्द्दामपणा यालाही शेवटपर्यंत सौजन्याने तोंड देणे हेच खरे धैर्य असे मला वाटते,हे मत योग्य आहे याला कोणताही प्रत्यवाय नाही. मात्र डुआयडींची फौज किंवा सो कॉल्ड विचारवंत आयडी येताजाता शिवाजी महाराज किंवा हिंदू धर्म यांना मुद्दाम शिव्या देतात त्यांच्याशीही सौजन्याने वागावे का?अर्थात
मोदका
काकानु.. तुमचा प्रतिसाद
तुझ्या इमारतीतला एक रहिवासी खाली तर्र्र होऊन रात्री २ वाजता बोलू लागला "या सोसायटीतील लोक हरामखोर आहेत मला शिव्या देतात !@!@$%^^ सगळे माजलेत #$%^& आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अगदी एखाद्या माय-भगीनीने अरे बेवड्या-नालायका असा शब्द जरी वापरला तर तो लगेच म्हणणार बघा मी म्हणत होतो ना हे मला शिव्या देतात ते !!!"यालाच सोयीस्कर दुटप्पीपणा / दांभीकपणा म्हणतात. गिरे तो भी टांग लाल वाली प्रवृत्ती. या लोकांचा किंवा निदान जे डुआयडी वाटत नाहीयेत त्यांचा प्रतिवाद (कोणतेही सौजन्य न ठेवता) केलाच पाहिजे, आणि त्यात पण जर ते विचारवंत माओवादी, कम्युनीस्ट वगैरे असतील तर त्याबाबत गणामास्तर किंवा क्लिंटनशी हजारवेळा सहमत आहे.+११
@ मोदक
त्याबद्दल आपले मत काय आहे ?
त्याबद्दल आपले मत काय आहे ?श्रीगुरूजींबद्दल यापूर्वीच मत व्यक्त केले आहे. किंबहुना त्यांनी विचारलेले नसतानाही सल्लाही देवून झाला आहे. अगदी एकदा क्लिंटनलाही टोचेल असा प्रतिसाद दिला होता.( राजकीय चर्चा नको असाच वाटत, पण चिखलाचा सगळा दोष पुरोगामी / सो कॉल्ड सेक्युलर यांचाच नाही. माझाच प्रतिसाद शेवटचा अशा उजव्या आयडींचा आहे. त्या विरोधात कोणीही बोलत नाहीये. )येथे मी चिखलाचा दोष डुआयडींना देत आहे, ते डुआयडी व्यक्त करत असलेल्या मतांना तुम्ही पुरोगामी किंवा सो कॉल्ड सेक्युलर समजत असाल तर माझ्याकडून मुद्दे खुंटल्याने पास. (तुम्हाला नक्की हेच म्हणायचे आहे ना? हा पुरोगामी चळवळीचा अपमान आहे असे माझे स्पष्ट मत आहे.) ..आणि असे कितीसे उजवे आयडी शेवटच्या प्रतिसादासाठी अट्टहास धरून बसतात? माझ्या पाहण्यात फक्त गुरूजी आहेत आणि त्यांना बर्याच लोकांनी बर्याच कानपिचक्याही दिल्या आहेत.मुद्दलावरचे व्याज
संबंध
पाकिस्तानी एजंट म्हणणं चुकीचं आहे हे १००% मान्य. पण
AK 47 शी तुलना