Skip to main content

तारा वर्तक..व तीचे बाळ

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 26/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तारा वर्तक..व तीचे बाळ ..................................... धनंजय जोशी ब्यांकेत ऑफिसर होता.. गावात वडलोपार्जीत राहता बंगला. पत्नी शकुंतला... तो प्रेमाने तिला शकू म्हणायचा व ती जय... शकूच पहिले मूल गेले होते..गर्भाशय व नलिकेत काही कोम्पिकेशन्स झाली होती... डॉक्टरांनी औषधे दिली होती.. शकू पुन्हा गर्वार्शी होती ७ महिन्याची...रिपोर्ट्स नॉर्मल होते ..जय काळजी घेत होता.. जय ला जवळच कुणीच नव्हत..आई बाबा पण देवाघरी नुकतेच गेले होते.. लग्नात देणी घेणी..मानापनावरुन शकुच्या घरच्या शि बिनसले होते..त्या मुळे शकू व जय ने शकुच्या माहेरच्या शी संबंध तोडलेले होते.. जय ची दूरची आत्या होती.तीच पण वय झालं होत.."राधाक्का" ति बाळंतपणा साठी येणार होती.. आठवा महिना लागला अन राधाक्का जय कडे राहायला आल्या..तश्या थकल्या होत्या पण कसबस काम ढकलत होत्या..त्यांना हृदय विकार होता.. या वेळी बाळंतपण सुखरूप पार पडले..शकू ला पुत्ररत्न झाले..पण एक प्रॉब्लेम आला... डॉ नी गर्भाशयाची पिशवी काढून टाका असा सल्ला दिला..ऑपरेशन झाले. शकूस खूपं थकवा वाटत होता १०-१५ दिवस ति हॉस्पिटल मध्येच होती..डॉ च्या सल्ल्यानं तिला डिस्चार्ज मिळाला... शकू घरी आली पण तिला पहिल्या सारखा उत्साह वाटत नव्हता..मात्र बाळाकडे पाहताच तीच्या अंगात उत्साह संचारू लागे..बाळ खुपा गोड होते..राधाक्का बाळ बाळंतिणीच जमेल तसे करत असायच्या मात्र तोंडाने "जया थकले रे बाबा आता" चा जप चालू असे. . ...... सुटीचा दिवस होता, राधाक्का जेवण करून विश्रांती घेत होत्या.. जय बाळाशी खेळत होता.. शकू बेड वर पडून मजा बघत होती... अन घरात एका ३६-४० च्या वयाच्या बाई ने प्रवेश केला.. "नमस्कार साहेब" जय कडे बघत तिने नमस्कार केला.जय ने तिच्या कडे पाहिले..बाई काळी सावळी पण नाकी डोळे तरतरीत होती.."आपण?" असे नजरेने विचारताच ति म्हणाली..मी तारा वर्तक..मींड वाइफ व नर्स चा कोर्स केला आहे..आपल्या घरी बाई साहेबांना मदतीची गरज आहे म्हणून आले आहे..साहेब मला सर्व कामे माहीत आहेत..मी बाळाची चांगली काळजी घेईन..बाई साहेब पण आजारी असतात त्याची शुश्रूषा व्यवस्थित करेन...मला नोकरीची गरज आहे साहेब..ती म्हणाली.. जय क्षणभर अवाक झाला..त्याने शकू कडे बघितले.तिच्या नजरेत त्याला होकार दिसेना.. "ते ठीक आहे ताराबाई..पण माझी आत्या आहे ति घेत असते काळजी दोधांची" पण त्या आजारी व वृद्ध आहेत असे मला समजले" तारा म्हणाली हो ते पण खरे आहे ..असे बोलत असतानाच आतल्या खोलीतून राधाक्क्काने जया" अरे बघ मला श्वास घेता ..."अशी हाक आली.. जय तातडीने आतल्या खोलीत गेला..राधाक्का मुश्किलीनं श्वास घेत होत्या.. त्यांची छाती मंदपणे उडत होती..ते पहाताच जय घाबरला.."जय मला दवाखान्यात ने रे..असे म्हणत राधाक्का बेशुद्ध झाल्या.. जय घाबरला होता पण मदतीला तारा आली..ति म्हणाली साहेब आधी गडी काढा न आत्यांना दवाखान्यात घेऊन चला.. जय ने गाडी काढली..ताराच्या मदतीने राधाक्काला गाडीत बसवले एक मित्र मदतीला घेतला अन गाडी दवाखान्याच्या दिशेने हाकली.. दवाखान्यात तातडीने राधाक्काना ऍडमिट केले पण तो पर्यंत राधाकांची प्राणज्योत मालवली होती.. "हृदय विकाराने निधन" . इकडे घरात चाललेल्या गडबडी मुळे बाळ जागे झाले होते.व त्याने रडायला सुरवात केली.. तारा तातडीने बाळाजवळ गेली व बाळाला घेतले..बाळ पण तिने घेतल्यावर हसू लागले..ताराने दूध गरम केले बाळाला पाजले...व ती बाळाला खळेवत बसली... . राधाक्काच्या मृत्यूचा धक्का शकूस सहन झाला नाही..आधीच प्रकृती ठीक नव्हती..त्यात हा प्रकार मुळे ति मनाने खचली.. जय शकुन तारास नोकरीस ठेवण्याचा निर्णय घेतला.. . ताराच आगमन..तिला घरातली खडान खडा असलेली माहिती..राधाक्कांच निधन या घटनेचा कसा अर्थ लावावा? हे जय ला कळत नव्हते.. जय ने तारा ची माहिती घेतली फोन नंबर.पत्ता आदी लिहून घेतला..तारा कामाला लागली..बाजूंच्या गेस्ट रुम मध्ये ताराची सोय करण्यात आली... . तारा रुळली होती घरात.. बाळाचा तिला लळा व बाळाला तिचा लागला होता.. . ताराच वागणे गूढ होते.. फारशी कुणाशी बोलायची नाही, नजरेत एक उदास पण क्रूर भाव असे. . दुपारची वेळ होती..बाळाला भूक लागली म्हणून तारान दूध गरम केले व पिण्याइतपत गार व्हावे म्हणून पसरट डीश मध्ये ओतून ठेवले.."बाळाला भूक लागली..पाजते हँ दूध असे ति बाळाशी बोलत होती..शकू पलंगावर तर बाजूच्या खुर्चीत जय वाचत बसला होता..अचानक मनी माऊ रूममध्ये आली..व दुधाकडे येऊ लागली..ते पाहताच तारा "हट मेल्या..बाळाच्या दुधावर तुझी नजर आहे काय?.मर मेल्या बाहेर जाऊन असे जोरात म्हणाली....जय ने पहिले तिच्या डोळ्यात क्रूर भाव दिसत होते.ते पाहून जय घाबरला... . दुस-या दिवशी बागेत फेरफटका मारताना त्याला ति मांजर बागेत मेलेली आढळली.. त्याने तारास विचारताच ती म्हणाली" मरु देत त्याच लायकीची होती..बाळाच्या दुधावर नजर ठेवते? असे म्हणत ति भयानक हसली.. तिचे ते रुप पाहून जय हादरला.. . दुपारचा ४ चा सुमार असेल..शकुचा लागलेला डोळा उघडला.पाहते तो बाळ पाळण्यात नव्हते..ति कष्टाने पलंगावरून खाली उतरली..बाजूच्या खोलीच दार किलकिलं उघड होते.तिने पाहिले अन ति हादरली.. तारा बाळा ला मांडीवर घेऊन पाजत होती..बाळ पण चुरू चुरू स्तनपान करत होते..त्याचे तोंड रक्ताने माखले होते.. ते दृश्य पाहताच शकू भय कंपित झाली कोण आहे हि तारा..अमानवी? ति हॉल मध्ये आली अन जय ला फोन लावला..तारा तारा..तीच्या तोंडातून शब्द फुटेना.. काय झाले शकू? जय विचारत होता.. जय ..तारा बघ ना बाळाला काय करते आहे??ती म्हणाली.. कोण तारा? अग ति तर माझ्या समोर उभी आहे तू तिला वाणीसामान अन भाजी आणायला सांगितले होते थोडे पैसे कमी पडतात म्हणून ते घेण्यासाठी ति ऑफिस मध्ये आलेली आहे..माझ्या समोरच उभी आहे..तुला बोलायचं आहे का??जय म्हणाला... नको..शकू ने फोन ठेवला..ति खोलीत आली पाहिले.. बाळ पाळण्यात शांतपणे झोपलेले होते..बाजूच्या खोलीत पण कुणीच नव्हते.. शकू चक्रावली तिला कळेना काय करावे???... . घरी आल्यावर शकुन साद्यंत हकीगत जय ला सांगितली.आपल्या बाळाला हि कृत्या तर काही करणार नाही ना?या चिंतेत शकू होती...जय पण आतून भेदरलेला होता..थोडा वेळ दे असे म्हणत त्याने शकुला शांत केले.. . जय आज दमलेला होता ऑफिसच्या कामानं..व जेवण केले अन लवकर झोपी गेला. रात्री त्याला जाग आली ति एका बर्फासारख्या थंडगार स्पर्शाने..त्याने पाहिलं अन तो धाबरला.जवळ तारा झोपलेली त्याला दिसली..बर्फा सारखे गार शरीर..तो हडबडून पलंगावरून उठला व त्याने दिवा लावला..चकित झाला बेडवर कुणीच नव्हत..स्वप्न?? पण गार स्पर्शाची अनुभूती तर त्यानं घेतली होती... त्याच सार शरीर घामाने डबडबले.. . दुस-या दिवशी त्याने रजा टाकली..शकू बरोबर गप्पा मारताना दोघां च एक मत झाल...तारा एक गूढ आहे..आपल्या बाळाला धोका आहे..तिच्यापासून..व तिला उद्याच सेवामुक्त करण्याचा निर्णय दोघाने घेतला. . दुस-या दिवशी जय चा डोळा उघडला तेव्हा १० वाजत होते..इतक्या उशीर उठणे?? जय उठला व शकुच्या खोलीत गेला..पाळण्यात बाळ नव्हते..शकू अर्धवट झोपेत होती..त्याने शकुला उठवले..बाळ नाही पाळण्यात पाहताच तिच्या काळजात धस्स झाले.. "बघा ना तारा ला..कुठे तडमडली आहे ती बया...जय ने तारा तारा हाका मारल्या..पण ओ आली नाही.. तो तिच्या खोलीत गेला खोली मोकळी होती..ताराच सामान दिसतं नव्हत..तारा बाळाला घेऊन पळाली??? विचारानेच त्याच्या काळजात धस्स झाले.. तारा नाही म्हणताच शकू रडू लागली माझे बाळ..असे म्हणत तिने आकांत केला..जय ला एकदम आठवले..तिचा पत्ता होता त्याच्या कडे..फोन पण होता..त्याने तो कागद काढला..फोन लावला पण "नंबर अस्तित्वात नाही" असे उत्तर आले... जय शकुला म्हणाला मी ताराच्या गावी जात आहे तिकडेच तिने बाळाला नेले असणार.." त्याने ड्रायव्हर ला फोन केला अन तो आल्यावर जय ताराच्या गावाच्या दिशेने निघाला.. . रायगड जिल्ह्यातील एका मोठ्या शहरात बापुसाहेब कांदळगावकर यांच्या चाळीति ३ नंबरच्या खोतित तारा रहात होती... चाळ शोधायला फारसा त्रास पडला नाही..जय तातडीने गाडीतून उतरला व रूम कडे त्याने धाव घेतली.. रूम चे दार बंद होते दारावर थाप मारली..दार उघडून एक माणूस बाहेर आला.. तारा वर्तक इथे राहतात का?..जय नाही मी सोपान चव्हाण गेली १.१/२ वर्षे इथे राहत आहे ह्या खोलीत...चव्हाण म्हणाले व त्याने दार बंद केले..पण निमिषार्धात त्याने दार उघडले व म्हणाला..."तुम्ही असे करा तळ मजल्यावर मालक बापुसाहेब राहतात..ते माहिती देऊ शकतील.. . धन्यवाद म्हणत जय तातडीने बापुसाहेबांच्या घराजवळ आला दारावरील बेल दाबली...एका मध्यम वयिन माणसाने दार उघडले.. आपण बापुसाहेब? हो...उत्तर आले.. जरा आपल्याशी काम आहे...जय आत या ना..जय आत गेला सोफ्यावर बसल्यावर त्याने विचारले "आपल्या चाळीत कुणी "तारा वर्तक" भाडेकरू होती का??? बापौसाहेब विचारात पडले "हो होती पण तिने ४ वर्षापूर्वीच घर सोडले..म्हणजे असे झाले तारा नर्स होती..इथल्याच डॉ देवदत्त दैठणकर यांच्या हॉस्पिटल मध्ये काम करत होती..पण आता ति या जगात नाही..." काय? हे कसे शक्य आहे? जय म्हणाला. त्याचे असे झाले..बापुसाहेब सांगत होते.." तारा नर्स होती दिसायला छान होती..देवदत्त जरी निष्णात डॉक्टर असला तरी बायकांच्या बाबतीत तो जरा "असाच" होता..त्याने ताराला भुरळ घातली.. तारा त्याच्या जाळ्यात फसली.प्रेमसंबंध जमले.व तारा ला दिवस गेले..बातमी कळताच डॉ ने मूल पाडण्याचा सल्ला दिला.पण ताराला मूल हवे होते..ताराने नकार दिला.. ४-५ महिने वाद चालू होता पण तारा ठाम होती..लहान गाव बभ्रा झाला..डॉ घाबरला. व त्याने विश्वामित्र पवित्रा घेतला..तारा मनातून खचली..त्यांतून डॉ ने तिला कामावरून कमी केले.. समाजाच्या नजरा..टोमणे त्यांतून आर्थिक तंगी.. तारा कोलमडली. व तिने गळफास घेऊन जीवन संपवले.. सारे ऐकताच जय सुन्न झाला दैठणकर नाव त्याला खुपू लागले..त्याने निरोप घेतला. . घराकडे निघताना सर्व घटनांचा मेळ लागल्यावर तो हादरला...त्याला शकुची आठवण झाली.. "जरा गाडी भराभर चालवा.." असे म्हणताच ड्रायव्हर ने मागे बघितले. तो चकित झाला तारा ड्रायव्हिंग करत होती..ति भेसूर हसली. समोरून भरधाव ट्रक येत होती..जय ची गाडी त्यावर आदळली.. रक्ताच्या थारोळ्यात जय गतप्राण होऊन रस्त्यावर पडला होता.. . इकडे शकू जय ची काळजी करत होती..फोन लागत नव्हता.. बाळाच्या काळजीनं तिचा जीव वर खाली होत होता.. तेव्हढ्यात समोर तारा आली..तिच्या हातात बाळ होते..ति भेसूर दिसत होती..केस मोकळे.. डोळे लाल... "अग चांडाळीण का माझ्या बाळाच्या मागे लागली आहे? कोण आहेस तू चेटके?..शकू तिला म्हणाली.. मी कोण आहे??/ देवदत्त दैठणकर कोण आहे?? नाव ऐकताच शकू चमकली.."माझा मोठा भाऊ.." पण माझा त्याच्याशी संबंध नाही... पण माझा आहे त्या नराधमामुळे मला आयुष्य संपवावे लागले असे म्हणत तारा ने आपली कर्म कहाणी तिला सांगितली. "ते मला माहीत नाही..मला माझ बाळ हव आहे..शकू म्हणाली.. ते तुझं नाही ..माझं झाल आहे.. माझ खेळणं...ते माझ्या जगात आलेले आहे.." विकटपणे हसत तारा म्हणाली... जय जय..अरे कुठे आहेस तू? बघ ना इकडे काय होऊन बसलं आहे? शकू ने रडत रडत जय ला साद घातली.. जय.. अग तो ह्या जगात नाही तुझ्या बाळासारखा..त्याचा अपघात झाला..बघ बघ रक्ताच्या थारोळ्यात तो मरून पडला आहे..पोलिस पंचनामा करत आहेत..." अन क्षणार्धात तारा व बाळाच्या अनेक प्रतिमा खोलीत उभ्या राहिल्या..व तिच्या कडे येऊ लागल्या. पुत्र व पती वियोगाने शकूच हृदय फाटलं व ति गतप्राण होऊन पलंगावर कोसळली.. . बंगला मोकळा पडला..बेवारशी म्हटल्यावर चोरट्यांनी पार लुटून नेला .भुरट्यांनी दारे खिडकीची दारे सारे काढले व बंगला भयाण पणे उभा राहिला. बेवारशी कुत्रं डुकरे यांचे निवासस्थान बंगला झाल.. . मात्र काही वेळा अमावास्या पौर्णिमेला लोकांना एक बाई बाळाला जोजवताना दिसते... गावगप्पा रंगतात... अवि
लेखनविषय:

वाचने 9080
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

अगागागा ... जबरदस्त! डायरेक प्रतिक्रिया वाचायला आलेल्यांसाठी सूचना: नक्की वाचा. पण वाचताना पांढरी विजार वापरू नका.

In reply to by आदूबाळ

च्यायला, मी पहीला सोडून हे असं काहीतरी नवीन काय?

मात्र काही वेळा अमावास्या पौर्णिमेला लोकांना एक बाई बाळाला जोजवताना दिसते... गावगप्पा रंगतात...
पांडूSssssssss... हे बघ काय! तुझ्या साठी नव(भय)कथेच बीज

In reply to by स्रुजा

येस. यु सेड इट. भुताने घेतलेला बदला तो ही एका निष्पाप फॅमिलीवर असे एकतर्फी कथानक झाले आहे.

In reply to by योगी९००

योगी अरे अक्कुकाकाची कथा ओळणाओळ नव्हे तर शब्दनशब्द विरामनविराम स्पेसनास्पेस वाचायची असते तर खरी मजा. मोजी अक्कू दमामी राकू साक म्हणून तर आपले फेव्हरेट हैत.

In reply to by आदूबाळ

शतशब्द कथेत नुरा कुस्ती केल्याने ते आमच्या नजरेतून उतरलेत. नाहीतर या मंडळाचे ते संस्थापक सदस्य आहेत.

खलनायीक चित्रपटाच्या कथेने अचानक वळण घेतले आणि साऊथच्या देवी मां टैपच्या चित्रपटाकडे वळाली.
ताराने दूध गरम केले बाळाला पाजले..
दहा पंधरा दिवसाच्या मुलाला? ए ना चोल्बे!!!

मायला मानल बुआ.... जब्राट. येक लंभर.

ज्याने देशोधडीला लावले त्या डॉ. देवदत्त दैठणकरला 'धडा' न शिकविता ताराने त्याच्या बहिणीच्या नवर्‍याला का निवडले?

लोक उगाच खुस्पट काढतात झालं इतकी तोलामोलाची कथा, काय नाही त्या कथेत सुत्र, माल, मसाला, करुणा, नाते, बाल्प्रेम, रोमांस ( थंड का असेना), सस्पेन्स, खुन, अपघात, बदला, भुत, वगैरे वगैरे......

In reply to by इरसाल

काय आम्चे साहीत्य सूर्य भयकथा-चमत्कृती-विस्मय-गूढ-अच्याट कथा कर्ते जी मो असते तर बिना पुलाची आणि विना जीपची कथा रस्त्यातच सोडली नसती, शिवाय याचकांचा जीव टांगणीला लावण्यासाठी किमान तीन भागात मावशी/जय्/शकु यांना फिरवले असते आणि मांजरीला अश्या किरकोळीत मारले नसते. एका हुच्च कथाबीजाचा अशी भ्रूणहत्या पाहण्याचे आमच्या नशीबी आले हे मिपाकरांचे दुर्दैव म्हणायचे दुसरे काय?

दैनीक "सोकावलेला काळ" मधील मिपा भयकथा,युगांडातील कोरडवाहू शेती आणी चेचन्यातील दारीद्र्य-आंतरीक संबंध या माहीतीपूर्ण लेखातून संपादीत अंश..


कथा खरच छान उभी रहाते पण शेवट पटला नाही. जय आणि शकुला कुठल्या चुकीची शिक्षा. काल्पनिक जग असेल तरी असे नको. आणि तो देवदत्त का सुटला? हुरहुर लागली हे माञ खरे.

तुमच्या कथेत तुम्ही मोठ्या लोकांना मारले तसेच लहान बाळालाही मारले ते वाचुन खुप वाईट वाटले . ते कथेतही लहान मुल मारणे म्हणजे पाप की हो ..

ओमेन चित्रपटाची आठवण झाली.

मी ही कथा अशीच सेम कुठेतरी वाचली आहे अगोदर. नक्की आठवत नाही कुठे पण वाचली आहे हे नक्की... आणि तसे काही केले असेल तर मग नाही आवडली ही कथा.

नुस्ताच एक्शिडेंट झाला आणि गाडी नदीत कोसळली नाही त्यावरून कळले की मोजी नाहीत.. बाकी तारा वर्तक तुमची कोण? धागा काढून तुम्ही अस्सेच गायब होता. फरक एवढाच, की ती दुसऱ्यांचं बाळ घेऊन पळाली, तुम्ही आपलं धागारूपी बाळ मिपाकरांच्या पदरात टाकून जाता..

वाह! जबरदस्त जमलिये कथा! ही तारा आज रात्री स्वप्नात बाळाला जोजवताना दिसली नाही म्हणजे झालं.... .. आयुष्य खूप सुंदर आहे... फक्त तारा वर्तक स्वप्नात बाळाला जोजवताना दिसली नाही पाहीजे....