Skip to main content

(आयडी ब्यान झाल्यावर काय करावे ?)

लेखक नीलमोहर
Published on शुक्रवार, 11/03/2016
आयडी ब्यान झाल्यावर काय करावे ?? मिपावरील आयडी ब्यान झाल्यावर काय करावे हा एक चिंतनिय प्रश्न आहे. अशा वेळेस डूआयडीने प्रवेश करणे धोकादायक ठरु शकते. (डूआयडी आजवर कसा बॅन झाला नाही हेच आश्चर्य आहे.) शिवाय सारखे सारखे Access denied पाहुन मनाला त्रास होतो. मग मा य _ _ मधे गेलो तरी तिथेही डोक्याची मंडई होते, फुकटच ४ बॉटल वोडका वेस्ट जाते, त्यातून एक्स्ट्रा किक बसून विमान टेकऑफ करते ते वेगळेच. संमं ला मस्का मारला तर राँग इम्प्रेशन पडते. मेन मालकाला हात जोडले तरी 'काय होपलेस आहे हा' या अविर्भावात बघत रहातो. बरं मिपातून बाहेर पडून इतरत्र कुठे सदस्य व्हावे तर बाहेर आपली कीर्ती सुदूर पसरलेली म्हणजे पुन्हा बुडावर .. तुम्हीच सांगा आयडी ब्यान झाल्यावर काय करावे ? ---- अवांतरः जास्त फेकत नाही, मिपाकरांना झेलायचाही कंटाळा यायचा ;) प्रे

वाचन संख्या 4273
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

हिला इडंबनाची इंगळी डसली :-) ... विडंबन नेहमीप्रमाणेच फर्मास!!

In reply to by श्रीरंग_जोशी

तुमच्या विनयशील स्वभावाचे नेहमीच कॊतुक वाटत आलेले आहे चला एखादे भुभुचे किंवा बिंग पेज होऊन जाउदे - स्पारंग गोडबोले

In reply to by स्पा

तुम्हाला इतरांसारखा अनुभव नाही आला म्हणजे मिळवली.

In reply to by अभ्या..

सध्याच्या काळात श्रीरंगाची गरज आहे, पण हल्लीचे जग श्रीरंग सारख्या साध्यासरळ लोकांसाठी नाही. अरेरावी आणि दमबाजीच्या जमान्यात चांगुलपणा अन साधेपणा वरही आक्षेप असावा यात नवल नाही.

In reply to by नीलमोहर

लैच हसू येत आहे. लुटूपुटूचे वाद घालत बसत नाही. बाकी जेव्हा गरज असेल तेव्हा एक घाव दोन तुकडे हे धोरण राबवतो.

दादा/मोगा/फुजि/टाॅफि/नाना नेफळे/काका केंजळे - हे सध्या गरीब चिमणा म्हणून वावरताहेत. त्यांचा गायडन्स घ्या असं सुचवतो!

हे व्यक्तिस्वातंत्रावर घाला आहे. ताबडतोब कन्हैयाला भेटणे. राहुल गांधी, तीस्ता सेतलवाड, केजरीवाल यांना पत्र टाकणे. याने होईल काय की संपादक मंडळाला पश्चाताप होईल व् सन्मानाने आयडी बहाल करण्यात येईल. मी तर अस ऐकतो आहे की नुकसानभरपाई देखिल मिळेल. मिपावर सध्या काही विवेकशून्य लोकांचे बरळणं चालु आहे, त्यांचा सल्ला घेऊ शकता. आमची वरात निघणार बहुतेक!

आयडी अॅप्रूवल होण्यासाठी इमेलमध्ये ठराविक प्रकारची आडनावं असावी लागतात का?? (आमच्या एका मित्राची रिक्वेस्ट अॅप्रूवल झाली नाही)

In reply to by नीलमोहर

शंकराच्या पिंडीचा, ज्यावर सिलिंडर शेप्ड भाग बसवलेला असतो त्याला शाळुंखा म्हणतात असं कुठेतरी वाचलेलं आहे. जाणकारानी प्रकाश टाकावा.

In reply to by सूड

होय. शिवलिंग ज्यावर स्थापित करतात तो खोलगट भाग. शाळुंखा ही योनीनिदर्शक असते. शाळुंखेशिवाय जेव्हा नुसतेच शिवलिंग असते तेव्हा त्यास अयोनिज शिवलिंग म्हणतेत. अशी अयोनिज शिवलिंगे पाटेश्वरात पुष्कळ आहेत. ( बाकी मी जाणकार नाही बरं का)

In reply to by सूड

दुधाळ पांडू काय ? आता पुढचे व्हर्जन आले आहे , ते तुम्हाला ठाऊक नाही काय ? पुचुपुचूदुग्धओढनाथपांडुब्बाय नम: | =))))

कंटाळा आला म्हून बळचकर काढलेल्या, चार वाक्यांच्या जिल्बीला पन पोरं सोडेनात बघा, दंगा करतेत, काढा वर्गाबाहेर नाहीतर कोंबडा बनवून उभे करा :p