✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता?

व
वरदा यांनी
Fri, 01/18/2008 - 22:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22838 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

च
चतुरंग Fri, 01/18/2008 - 22:25 नवीन

मी बाकी सगळी कामं करुन झाल्यावर

ऑफिसच्या कामाचं बघतो, त्यामुळे मला हा प्रश्न कधीच पडत नाही!! :))) ह.घ्या. चतुरंग
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 01/18/2008 - 22:27 नवीन

आवघड आहे प्रश्न..

वरदाताई खर तर मिपा आणि नमोगतावर काम नसेल तेव्हा मी हपिसातली कामे करतो..;) त्यामुळे मी काही आयडिया देऊ शकत नाही बा.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 01/18/2008 - 22:32 नवीन

हे हे हे

सहिचे के.सु. तुमची आयडिया. ऑफिसने काम दिलं तर मीही कामचंच बघते हो...पण कामंच नाहीये....
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/18/2008 - 22:36 नवीन

माझे

माझे शब्द.... पाहतो, काही बदल करता येतील का ह्याचा शोध घेतो. गुगलबाबाला त्रास देत बसतो, व खुपच वेळ असेल तर जुन्या मित्रांना ईमेल अथावा खरोखरंच एकादे पत्र लिहीत बसतो, ह्या पेक्षा जास्त वेळ असेल तर नवीन काय काम चालू करा येऊ शकते ह्याचा शोध घेतो व त्या कामाची माहीती शोधतो, सोर्स पाहतो, किती फायदा होऊ शकतो ह्याचे आराखडे बांधतो. व संपुर्ण दिवसच मोकळा असेल तर मित्रांना बोलावतो व गाडी घेऊन जवळपास कोठे ही भटकंती करतो. व ह्या पेक्षा जास्त वेळ माझ्या कडे असेल तर मनोगत वरील काही रेसेपी वाचत वाचत झोपी जातो......... झोप आपल्याला जाम आवडते.... व खास करुन मनोगत वरील निसर लेखन वाचल्यावर तर जरा अंमंळ जास्तच झोप येते मला.... ;) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Wed, 07/21/2010 - 21:03 नवीन

काय आहे हे

काय आहे हे माझे शब्द? एका युवतिचा फोटो आणि ढीगभर जाहिरातीच्या लिंक्स सोडून काहीच दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजे
स
सूर्यपुत्र Wed, 07/21/2010 - 21:45 नवीन

एका युवतिचा फोटो .....

एका युवतिचा फोटो ???? मला तर तोही दिसला नाही.... :? :? :( :( ;) -ध्येयहीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
व
वरदा Fri, 01/18/2008 - 22:45 नवीन

वाव

मला छान आयडिया दिल्यात Thank You... नवीन कामाची माहीती कालच जमवून झालेय आणि आधी हेच काम करत असल्याने बरचसं माहीतेय. पण माझे शब्द मस्त आहे.. भरपूर वाचायला मिळालं....खरच Thank You. आता मिपा वरच्या लोकाना त्रास देत नाही बसणार चाल्ले वाचायला...
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 01/18/2008 - 23:37 नवीन

मजा आहे बॉ ..

चतुरंग / केशवसुमार, तुमची हपिसं कोणती हो? मी ही resume टाकून बघीन म्हणतो!! (कामचुकार) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 01/19/2008 - 00:08 नवीन

जरुर!

पण सुनील, कामचुकार पणाचा काही अनुभव नसेल तर तुला नोकरी मिळणे अवघड आहे, आणि तुला सध्याच्या हपिसात बरेच काम असावे असे दिसते!! ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Sat, 01/19/2008 - 00:30 नवीन

मग कठीण आहे बॉ

कामचुकार पणाचा काही अनुभव नसेल तर तुला नोकरी मिळणे अवघड आहे अरेरे !! तुला सध्याच्या हपिसात बरेच काम असावे असे दिसते!! ;)) आता काय सांगू? वझ्यानं वाकलेल्या गाढवागत गत झालीयं :(( Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर Sat, 01/19/2008 - 00:47 नवीन

आम्हीच मालक, आम्हीच नौकर! :)

कुणाची चाकरी करणं स्वभावात नसल्यामुळे फार काळ दुसर्‍याच्या हापिसात काम केलं नाही. सध्या स्वत:चंच ऑफीस आहे त्यामुळे मालकही आम्ही, आणि नौकरही आम्हीच! जेव्हा नोकराच्या भूमिकेत असतो तेव्हा 'मिसळपावचं पुढे काय होणार?' अशी घटका दोन घटका चिंता करून तो नाद सोडून देतो आणि कोकणी हलकटपणा करत मराठी आंतरजालावर चकाट्या पिटत फिरत असतो. आणि जेव्हा मालकाच्या भूमिकेत असतो तेव्हा मात्र इमानदारीत कामच करतो. नायतर, दोन वेळच्या आमटीभाताचेच वांधे व्हायचे तिच्यायला! मग बाईबाटलीचा शौक तर दूरच राहिला!! :) अवांतर - अगो वरदा, तुझा पत्ता काय? बरी आहेस ना? :) मायबोलीनंतर बर्‍याच दिवसांनी भेटते आहेस. असो, मिपावर तुझी हजेरी आणि लेखन पाहून संतोष जाहला! तुझा, (मायबोलीकर मित्र) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा Sat, 01/19/2008 - 01:21 नवीन

अरे आता पहाच

तात्या, कंटाळा आला ग म्हणेपर्यंत येईन मी आणि सगळिकडे नाक खुपसत बसेन अजुन १-२ आठवडे..मग होईल नेहेंमीसारखं काम सुरु...मग आधीसारखं अधुन मधुन.....आता मलाच कसंतरी वाट्टंय काय फालतु प्रश्ण टाकलाय मी...पण पुरती कंटाळले होते...सगळ्यांना पकवल्यावर बरं वाटंलं...:)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 01/19/2008 - 01:58 नवीन

काय???

हापिसात काम नाही? च्यामारी जेव्हापासून आम्ही किडे शोधण्याची हमाली सुरू केलीये तेव्हापासून एकही दिवस काम नाही असं झाल नाही...... सालं आमचं नशीबच XX. -छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
व
वरदा Sat, 01/19/2008 - 07:24 नवीन

अगं टिंगी

तुझ्या नशिबाला नको ग बोलूस...मी सोमवारी सुरूवात केली आणि माझी बॉस इथे नाहीये म्हणून मला काम नाहीये....मग येईल गं काम १-२ आठवड्यात....
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 01/19/2008 - 13:02 नवीन

अगं...?

तुझ्या नशिबाला नको ग बोलूस...मी सोमवारी सुरूवात केली आणि माझी बॉस इथे नाहीये म्हणून मला काम नाहीये....मग येईल गं काम १-२ आठवड्यात.... हा हा हा.....टिंग्या ह्या वरदाबाई काय बोलल्या बघ.... वरदाबाई टिंगी 'अरे' आहे 'अगं' नव्हे :) आमचाही आधी असाच गोंधळ झाला होता हो! (टिंग्याचा इनायकभौ) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
विकि Sat, 01/19/2008 - 12:50 नवीन

हल्ली मिपावर

कोणत्याही विषयावर चर्चा होतात आश्चर्य आहे. ऑफीसात काम नसेल तर वृत्तपत्रे वाचा. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
ल
लबाड मुलगा Sat, 01/19/2008 - 13:49 नवीन

कोणत्याही

कोणत्याही विषयावर चर्चा होतात आश्चर्य आहे. ऑफीसात काम नसेल तर वृत्तपत्रे वाचा. मग तुम्ही कशाला घेतलात भाग? जा तिकडे मास्कोत पाउस पडत आहे तुम्ही भारतात छत्री उघडुन बसाः) साम्यवादी पण नाव मात्र अमेरीकी विकी पक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विसोबा खेचर Sat, 01/19/2008 - 14:10 नवीन

हेच,

मग तुम्ही कशाला घेतलात भाग? मीही पक्याप्रमाणेच विचारतो. विकि, एवढंच जर असेल तर तू बस ना वृत्तपत्र वाचत. या चर्चेत भाग कशाला घेतलास? हे मिसळपाव आहे हे असं आहे! परवडलं तर इथे या नायतर बसा वृत्तपत्र वाचत! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड मुलगा
व
विकि Sat, 01/19/2008 - 14:30 नवीन

काय तात्या

रागावलास की काय? डायरेक्ट हाकलायला निघालास की मला . आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विकि Sat, 01/19/2008 - 14:38 नवीन

तुझ नाव काय आहे रे

पक्या डेंजर हे कोणते नाव छपरी माणसाचच ना . आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड मुलगा
ल
लबाड मुलगा Sat, 01/19/2008 - 19:06 नवीन

पक्या

पक्या डेंजर हे कोणते नाव छपरी माणसाचच ना . नाव छपरी असले तरी मी भारतीय आहे बरका साम्यवादी माणसा (?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विकि Sat, 01/19/2008 - 21:11 नवीन

पक्या भाय देखले ................

क्या बोलरे है भिडू. अभी तेरे को क्या बताऊ भाय .देख अभ तेरे वास्ते मेरेको छपरी भाषा बात कारेनेकू पडा. समझा क्या आपला(समानतेवर विश्वास ठेवणारा) कॉ.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लबाड मुलगा
ल
लबाड मुलगा Sat, 01/19/2008 - 12:58 नवीन

एक चांगली

एक चांगली काड्यापेटीतील काडी घ्या.... . डोळे मिटा............... .. .कान कोरा............ .. .आधी उजवा ... मग डावा....परत उजवा मग डावा ऽ दहा पाच वेळा झाले की मग हातात हात गुंफुन सरळ वर न्या .... अग आइ ग म्हणुन जोरदार आरोळी द्या ऽऽ हाताचा तळवा नाका वर घासा जोरदार नाक दुखेपर्यत ऽऽ खुर्चीवर उभे राहा तोल संभाळुन ऽऽ परत बसा माण मोडा बोटे मोडा ऽऽ छ्या असे जोरात म्हणुन कागद उडवा परत गोळा करा ऽऽ शांत बसा एक चांगली काड्यापेटीतील काडी घ्या.... . डोळे मिटा............... ..
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sat, 01/19/2008 - 13:15 नवीन

पक्या एकदम जबरा रे...

;) ! नीलकांत
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 01/19/2008 - 13:23 नवीन

हेच म्हणतो

हेच म्हणतो मी नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
ल
लबाड मुलगा Mon, 01/21/2008 - 18:58 नवीन

नाना

नाना निलकांत धन्य वाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 01/19/2008 - 14:41 नवीन

पक्या डेंजर....

पक्या डेंजर, खरंच डेंजर !!!! मस्तच आहे. हा एक गहन प्रश्न आहे आणि जर कोणी म्हणत असेल की त्यांना हा प्रश्न भेडसावत नसेल तर ते खोटं बोलत आहेत. काही लोकांना चर्चा आवडली नाही पण मला आवडली बाबा... ते 'जीवनस्पर्शी' का काय म्हणतात ना तसा विषय आहे हा... लगे रहो पक्याभाय... बिपिन.
  • Log in or register to post comments
ल
लबाड मुलगा Mon, 01/21/2008 - 18:59 नवीन

पक्या

पक्या डेंजर, खरंच डेंजर !!!! मस्तच आहे धन्य वाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विकि Sat, 01/19/2008 - 14:45 नवीन

बिपिन भाऊ

नाव घेऊन बोला .काही लोक काही लोक करत बसू नका. कार्यकर्ता असा नसतो.\ आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
क
किशोरी Sat, 01/19/2008 - 17:29 नवीन

मजा करा!!

ऑफीसात काम नसेल तर सरळ कल्टी मारा ऑफीस मधुन मग काय पाहीजे ते करायला मोकळे, कल्टी मारायचा चान्स नसेल तर लावा लावी करा,म्हणजे त्यांची भांडण-मारामारी बघण्यात वेळ छान जाईल (हे जरा अतीच आहे),बर मग बॉसला दुसरा किती कामचुकार आहे हे दाखवुन द्या(नको नाहीतर आपल्या कामचुकारपणाबद्द्लचे सत्य बाहेर येण्याचा धोका) सोपा मार्ग आपल्या आवडत्या व्यक्तीला फोन करा म्हणजे दोघांचाही वेळ सत्कारणी लागेल!! मजा करा!!
  • Log in or register to post comments
व
विकि Sat, 01/19/2008 - 17:37 नवीन

ही हा हा ....................

कल्टी मारायचा चान्स नसेल तर लावा लावी करा,म्हणजे त्यांची भांडण-मारामारी बघण्यात वेळ छान जाईल प्रतिसाद आपल्याला आवडला बुवा. आम्हीही या चर्चेवर तेच केले . आपला(फुकटात मनोरजंन करणारा) कॉ.विकि
  • Log in or register to post comments
ल
लबाड मुलगा Sat, 01/19/2008 - 19:07 नवीन

मजा आली एक

मजा आली एक काडी वाचली:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
स
सुनील Tue, 01/22/2008 - 01:41 नवीन

आज बिझी वाटतं?

आज शुक्रवार आहे म्हणून काम नाही आणि त्यात हा नवा जॉब्...खूप बोर होतय म्हणून मी मिपा वर लोकांना सल्ले देत बसलेय. सगळे लेख आणि कविता वाचुन झाल्यात्.. वरदा, आज फिरकली नाहीस? काम आलेलं दिसतयं? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 01/22/2008 - 07:09 नवीन

आले

आले होते मी पण खूप वाचायला होतं, पहिले रोशनी मग इथले जोक आणि मग थोडी शेजारच्या बाईला फाईलींगला मदत करत बसले....पण इथले जोक्स खतरनाक आहेत एकदम...आणि खरच टिंगी नाव मुलीचंच वाट्लं सॉरी मिस्टर टिंगी......
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 01/22/2008 - 10:58 नवीन

वरदा

तुझी खरडवही वाच बघु :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 01/22/2008 - 15:53 नवीन

:)

इट्स ओके ;) बाकी या आठवड्यात आमच्या हपिसात प्रचंड लेऑफ झाल्याने काम नसतानाही खुप काम करत असल्याची ऍक्टिंग करावी लागत आहे....नाहीतर साला आमचा पण पत्या कट व्हायाचा. असो. कलोअ, आपला, (मिश्टर) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
छ
छोटा डॉन Tue, 01/22/2008 - 15:36 नवीन

काही अवांतर "टाईमपास"

मिपावरच्या रथी-महारथी कामसू लोकांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीपण लोकांना मेल पाठवणे, ओर्कुट नावाच्या महाटाईमपास माहितीजालावर व्यस्त राहणे [ यात मित्रांच्या / मैत्रिणींच्या मैत्रिणींच्या मैत्रिणींच्या मैत्रिणींच्या मैत्रीणेंचे व्यक्तीचित्र पहात बसणे, ऊगाच आपल्यासारख्या समव्यसनी लोकांना भंगार पाठवणे हे सगळे आले.....] , गूगलबाबाला त्रास देणे या गोष्टी करतो ..... पण याशिवाय अवांतर काही .......... १. आमची कंपनी "आय टी पि एल " या बैगलोरच्या अतिप्रसिध्द ठिकाणी असल्यामुळे ईथे मॉल, कॉफी डे, गेम, भरपूर हॉटेल्स, बोंबलत हिंडायला भरपूर मोकळी जागा या गोष्टींची वानवा नाही. त्यात काही "अतिप्रसिध्द कंपनीच्या" पण सध्या "ऑन बेंच" म्हणवल्या जाणार्‍या काही सुस्वरूप कन्यांचा वावर या ठिकाणी असल्याने काळ-अपव्याय अगदी सूखद होतो...... २. आमच्या "क्युबिकलच्या" पलीकडेच आमच्या बॉसची अतिआगाऊ "पी ए " बसते. दिसायला "काटा " आहे पण एकंदरित वागणे, बोलणे, चालण्याच्या नावाने चक्क माठ आहे. तर सांगायचा मुद्दा असा की, दर ५-५ मिनिटाला ऊठून तिच्यावर टप्पे टाकणे हा सुध्धा आमचा अति आवडता छंद आहे. या प्रकारामुळे आमचा व तिझा [ हो सांगणे गरजेचे आहे, नाहीतर लगेच आमच्या नावाने खडे फोडायला रिकामे..... ] सुध्धा ऊत्तम काळ्-अपव्याय होतो.... ३. काही ईतर कंपन्यातिल आमच्या समव्यसनी दोस्तांनी विपत्रातून पुढे ढकललेल्या "कॅरम, चेस, कार पार्कींग, पूल ...." सारख्या खेळात सुध्धा वेळ कसा कटतो याची जाणीव होत नाही......
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 01/22/2008 - 18:48 नवीन

छोट्या,

तुझा बॉस मराठी नाही ना? नाही म्हटलं, मि.पा.चा सदस्य निघायचा!! :))(( चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Wed, 01/23/2008 - 19:46 नवीन

च्यायला, हे माझ्या लक्क्षातच आले नाही राव ..........

"तुझा बॉस मराठी नाही ना? नाही म्हटलं, मि.पा.चा सदस्य निघायचा!! :))("" च्यायला हा लोचा माझ्या लक्क्षातच आला नाही. खरच माझा बॉस "मराठी"च आहे.... झाले ते झाले, जो होगा देखा जायेगा ......... "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कूणाची भिती ?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
वरदा Tue, 01/22/2008 - 21:17 नवीन

धन्य..

मला आधी वाट्लं काय मुर्खासारखा प्रश्न टाकला मी पण आता सॉलीड मजा आली.....माझ्यासारखे खूप आहेत म्हणायचे...ह्सून हसून पोट दुखलं....छोटा डॉन नी तर कहरच केला...मुलगी "काटा" असणे हा नवीन वाक्प्रचार कळला मला.....माझ्या कंपनी ची बैगलोरला ब्रांच आहे....तिथे यायचं असेल तेव्हा बैगलोरलाच ट्रांसफर घ्यावी म्हणते...म्हणजे हा प्रश्न विचारायची वेळच येणार नाही....:)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 01:49 नवीन

ऑफिसात काम नसतांना?

ऑफिसात काम नसतांना कोणीही चकाट्या पिटेल, वरदाताई! आम्ही ऑफिसात कामं असतांना ती हाताखालच्या वा टीममधील इतर माणसांवर सोपवून "मिसळपावाचा" आस्वाद घेतो. आणि आमचे नांव सार्थ करतो! (डामरट) पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
स
सागर Fri, 01/25/2008 - 14:50 नवीन

लेखन करा की...

वरदा, तुम्ही एवढ्या प्रतिभावान आहात. ऑफिसात वेळ मिळत असेल तर लेखन करा की... तेवढेच आमच्यासारख्या वाचकांना चांगली मेजवानीही मिळेल आणि आमच्या ज्ञानात भरही पडेल कसे?.... एक पर्याय : तुम्ही कविता ट्राय करुन पहा... नक्की येतील... (तुमच्या लेखनाचा चाहता) सागर
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 16:55 नवीन

तुझा हेवा वाटतो. वाचन, संगीत ......

पिकनिकला जाणे, फोटो पाहाणे, नवीन गाणी (सीडी/डिव्हीडी) वर लिहून मित्र मैत्रिणींना वाटणे, जालावर विहार करणे, राहिलेच तर नोकरी करणे यातून मला दिवसाला २४ तास पुरे पडत नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अघळ पघळ Mon, 01/28/2008 - 08:28 नवीन

एका दिवसात

एका दिवसात तुम्ही काय काय करता ते वाचून अवाक झालो. तुम्हाला २४च काय ४८ तास देखिल अपुरे आहेत. (अचंबीत) अघळ पघळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
व
वरदा Wed, 01/30/2008 - 22:35 नवीन

प्रतिभावान??????

सागर माझी शाळेत निबंध लिहिताना पण वाट लागायची हो..तुम्ही कुणी दुसर्‍या वरदाचं लेखंन वाचलं असेल.... वा सुधीर आयडीया छान आहेत्..पण इथे बाहेर १ डिग्री टेंपरेचर आहे हो बाहेर पडायलाही नको वाट्टं.... पिवळा डांबिस्.... बापरे हे नाव कसं सुचंलं तुम्हाला..तुमचाही बॉस मराठी नाही ना नक्की? आता खूप काम आलंय्..एकदम ३ प्रोजेक्टस.... येता का कुणी मदतीला?
  • Log in or register to post comments
स
सागर Fri, 02/01/2008 - 12:22 नवीन

मग ती वरदा कोण?

वरदा.... माझा गैरसमज झाला असेल. कारण मागे मी एकदा दुसर्‍या एका संकेतस्थळावर वरदा या नावाने काही लेखन वाचले होते. मला वाटले तुम्हीच त्या... असो ... हरकत नाही तुमच्या मदतीला यायला आवडेल मला... पण माझा उपयोग होईन का ? हा पण मोठा प्रश्न आहे..... हा हा ..... मला फावला वेळ फार कमी मिळतो ऑफिसात नाहीतर लेखन करायला खरेच खूप आवडते असो... चांगले वाटले.... धन्यवाद सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
प
पिवळा डांबिस Wed, 01/30/2008 - 23:03 नवीन

काळजी नसावी!

पिवळा डांबिस्......तुमचाही बॉस मराठी नाही ना नक्की? .. आमच्या साह्यबाला मराठी तर सोडाच पण देवनागरी लिपीही वाचता येत नाही. आमच्या टेबलावर पु. लं. चे पुस्तक मिळाले तरी आम्ही "इंडियातले लेटेस्ट रिसर्च" वाचतोय असे सांगून वेळ मारुन नेऊ शकतो.:) आपला, (पार पोचलेला) पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 00:02 नवीन

तरीही जपून,

नाही तर उद्या आपला साहेब टेबलावर मस्त पाय वैगेरे टाकून "पुलं एक साठवण" वाचताना दिसायचा! :}} ह्या जगात कोणाला काय येत असेल काही सांगता येत नाही. अवांतर - मी नववीत असतानाचा एक अनुभव. आम्ही ५-६ मित्र अहमदनगरच्या जवळच्या एका गावात, "अवतार मेहेरबाबा" नामक एका पारशी बाबाच्या समाधी स्थळी सहल म्हणून गेलो होतो. त्याकाळात त्यांचं बरच प्रस्थ असावं कारण परदेशातूनही बरेच भक्त वैगेरे येत. असाच एक गोरा माणूस बघून आमच्यातल्या एकाने त्याला टाटा करण्याचा आविर्भाव करुन दोन-चार इरसाल शिव्या घातल्या. आम्ही ही फिदिफिदि हसून घेतलं. झालं, तो शांतपणे चालत आमच्याजवळ आला. आमची चांगलीच तंतरली. त्या साडेसहा फूट उंच, तगड्या माणसाने आपल्या राक्षसी हातात, ज्याने शिव्या दिल्या त्याची मानगूट पकडली. आणि अस्खलित मराठीत म्हणाला, "मला मराठी चांगलं येतं. तुम्ही आत्ता वापरलेले शब्द वाईट आहेत. तुम्हाला पोलिसांकडे नेऊ का?" आम्ही गयावया करुन त्याची माफी मागितली आणि सुटका करुन घेतली आणि कसली सहल आणि कसलं काय सायकलींवर टांगा टाकून तराट घरी!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
शानबा५१२ गुरुवार, 07/22/2010 - 09:44 नवीन

बर

बर झाल............... :D :D काल एक्सप्रेस मधुन येताना एक वडापाव वाला आला त्याला 'श्युश्युक' करुन कोणीतरी बोलवयचा व नंतर त्याने बघुतल की गप्प बसायचा. वडापाववाल्याला कोण बोलवतय ते समजत नव्हत व तो खुप चिडला होता.जाता जाता खुप घाण शिव्या देउन गेला. अश्या चरब्या करायला ह्यांना काय मजा येते काय माहीत्,चांगल फोडल पाहीजे साल्यांना!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
वरदा गुरुवार, 01/31/2008 - 22:31 नवीन

हे हे हे

सॉलीड हे अगदी खरं. गेल्या वर्षी एका आफ्रिकन बाईने मला हिंदीत रामायण महाभारत ऐकवलं..ती केनियाची आहे..तिथे दर शनिवार रविवार लोक रामायण महाभारत इथल्या फुट्बॉल मॅचइतक्या उत्साहाने पहातात म्हणे.....आता बोला...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा