लेखकनीधपयांनी सोमवार, 12/01/2009 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
हंस उडू पाही अवघड इरादे
अशी दरी खोल असे उंच कडे
आभाळापल्याड झेपावती झाडे
वारा सैरभैर, वेडी लाट फुटे
धिटाईने घुसे कुणी एकटे एकटे
लावले कुलुप, बंद केली दारे
आतला हुंकार तरीही थरारे
जाण्याबद्दलच्या वेगवेगळ्या उपमा प्रभावी आहेत.
(पण कुलुपबंद हुंकाराचे केवळ थरारणे पहिल्या तीन कडव्यांमधल्या धीट सीमोल्लंघनापुढे... तीन पायर्या वरती-वरती चढल्यानंतर चौथी पायरी खाली असून पाऊल चुकते तसे भासले. त्या थरार्यातही मोठे धैर्य आहे - मान्य आहे. पण तसे सांगणारा कुठलातरी सशक्त शब्द हवा होता, असे राहूनराहून वाटते.)
पहिल्या तीन कडव्यांनी उभ्या केलेल्या प्रतिमांनंतर चौथे कडवे कवितेच्या धैर्याच्या सुरात जराशी हतबलता आणते.
>>'त्या थरार्यातही मोठे धैर्य आहे - मान्य आहे. पण तसे सांगणारा कुठलातरी सशक्त शब्द हवा होता, असे राहूनराहून वाटते'
या धनंजयांच्या मताशी सहमत. जेणेकरून कवितेच्या प्रवाहाचा आलेख पडल्यासारखा वाटणार नाही.
धनंजयशी सहमत.
आत्म्याला (जीवाला) हंसाची उपमा देतात- जसे उड जायेगा हंस अकेला या सारख्या काव्यात. तो अर्थ घेतला तर पहिल्या तीन कडव्यात वातावरण आणि इच्छ्आ प्रबळ होताना दिसते आणि चौथ्या कडव्यात उडून जाण्यासाठी योग्य परिस्थितीची वाट पाहत बसलेला हंस दिसतो.
कविता आवडली.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
असं समजून घेता आलं. त्यानुसार कविता चांगली, कारण वाचायलाही एक लय मिळते आहेच. शिवाय 'लावले कुलूप, बंद केली दारे; आतला हुंकार तरीही थरारे' यातून ती एक अर्थ कन्व्हे करते (बिपिनने हे नेमके टिपले आहे).
प्रतिमेचे योजन तसेच आहे का, हे मात्र कवयित्रीनेच सांगावे.
नी....
एकदम महत्वाचं बोललीयस....
एकदा कविता लिहून झाल्यावर ती वाचकांची...... उलगडून सांगू नये.
कुसुमाग्रजांनी त्यांच्या 'अहि-नकुल' कवितेबद्दल असंच म्हटलंय की रूपकात्मक कवितेचा अर्थ वाचकाने त्याच्या परीने लावायचा असतो... शोधायचा असतो.
जो अर्थ मिळेल तो त्या वाचकापुरता खरा असतो.
---------------------------
माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
पहिल्यांदा वाचल्यावर नाही समजली. पण पुन्हा वाचल्यावर भरारी घेण्याच्या इच्छाशक्ती किती प्रबळ आहे हे जाणवले.
दार बंद आहे तरीही जो हुंकार आहे त्यात एक थर थर आहे.. उडून, पळून जाण्याची. मस्तच.
व्वा! निरजा.... जियो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)मंगळवार, 13/01/2009 05:36
देशभक्तीपर कविता आवडली. सत्यमने केलेल्या घोटाळ्यानंतरही भारतीय समभाग बाजारात विश्वास कायम ठेवायला कवितेचा उपयोग झाला. पण,
लावले कुलुप, बंद केली दारे
आतला हुंकार तरीही थरारे
ह्यात कसाब चा हुंकार असा उल्लेख खटकला.
-- सर्किट
>>तुम्हाला देशभक्ती, सत्यम आणि कसाब हे नसलेले शब्द आठवले म्हणजे कविता फसली असं जाहीर करायला हवं नाही का?
अहो, उलट आपली कविता वाचकांना वेगवेगळा अनुभव देत आहे असे म्हणायचे.
काही वाचकांना ( सर्किटला उद्देशून नव्हे ) अद्भूत, अलौकिक, नसलेला अर्थ शोधायची लै हौस असते :) असो,
आपली कविता आवडली !!!
कविता वाचणार्याची झाली असे खुद्द कवयत्रीनेच म्हण्टले आहे. "जिसका जितना आँचल था उतनी सौगा़त उसे मिली" , नाही का ? सर्कीटरावांना जे पिंडी नाही ते ब्रह्मांडी दिसले. शेवटी
चित्तैक्यास्तव सर्वथा फुकट का हेका धरावा मग ?
एका जगी शून्य दिसे , तर दिसे , शून्यात अन्या जग ! :-)
>>चित्तैक्यास्तव सर्वथा फुकट का हेका धरावा मग ?
असं काही म्हणणं नाही हो. माझी कविता कमी पडली एवढंच माझं म्हणणं.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)मंगळवार, 13/01/2009 06:06
आम्ही आपले 'शिंगे रंगवीली, बाशिंगे (?) बांधीली, चढवील्या झूली, ऐनेदार' या बाळबोध कवितेच्या चालीवर म्हणून पाहिले. काही कडवी जमली, काही जमली नाहीत. असो.
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
प्रतिक्रिया
छान...
छान
मलाही
In reply to छान by बट्टू
सीमा उल्लंघून
+१
In reply to सीमा उल्लंघून by धनंजय
धनंजयशी
In reply to सीमा उल्लंघून by धनंजय
ह्म्म्म!!
In reply to सीमा उल्लंघून by धनंजय
हंस = मन!
मी काय
हे सगळ्यात महत्वाचं
In reply to मी काय by नीधप
मस्त..
आवडली
तुम्हाला
In reply to आवडली by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
उलट
In reply to तुम्हाला by नीधप
(अनाहूत) सल्ला
In reply to तुम्हाला by नीधप
>>चित्तैक्य
In reply to (अनाहूत) सल्ला by मुक्तसुनीत
वृत्त जमले नाहीसे वाटते...
चंद्राचा
धन्यवाद
In reply to चंद्राचा by विसोबा खेचर
भरपूर
ह्म्म्म..