चिकन मसाला माझा ऑलटाइम फेवरेट पदार्थ आहे. नेहमीचाच कांदा-टोमाटो पेस्ट मधला चिकन मसाला खायचा कंटाळा आला की त्यावर माझे निरनिराळे प्रयोग चालूच असतात. त्यापैकी हा एक साधलेला प्रकार. यात मसाला बेस म्हणून कांदा-टोमाटो पेस्ट न वापरता ओले नारळ वापरले आहे. पहा करून कसे वाटते ते.
काजू- 50 ग्राम
मगज(टरबुजाच्या बिया)- एक टेबलस्पून
तेल- दोन टेबलस्पून
काश्मिरी लाल मिरची पावडर- दीड टेबलस्पून
गरम मसाला- अर्धा टेबलस्पून
धने पावडर- अर्धा टेबलस्पून
हळद- एक टीस्पून
चिकन (स्किनलेस, करी कट्स)- 250 ग्राम
दही- एक टेबलस्पून
कृती:
प्रथम दीड टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर अर्धी वाटी पाण्यात मिसळून तिचे मिश्रण बनवावे.
काजू व मगज एकत्र करून त्याची बारीक पूड करून घ्यावी
नारळाचे पाणी व तुकडे एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी
कढइत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा
कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झाल्यावर आले-लसुन पेस्ट टाकून कच्चा वास जाई पर्यंत तळावे
कांदा व आले-लसुन पेस्ट भाजल्यावर त्यात हळद, धने पावडर व मीठ टाकून मिक्स करावे.
मिश्रणात चिकन घालून त्यात कोथिंबीर व दीड कप पाणी ओतून किमान दहा मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावे.
दहा मिनिटानंतर हे चिकन उतरून वेगळ्या भांड्यात काढून ठेवावे.
आता परत एकदा कढइत तेल गरम करून त्यात टोमाटो व मिरच्या टाकाव्यात.
दोन मिनितंतर यात आपण तयार केलेली नारळ व नाराळाच्या पाण्याची पेस्ट घालून चांगली मिसळून घ्यावी व हे मिश्रण पूर्ण कोरडे होऊन रंग बदलेपर्यंत भाजावे
आता यात काजू व टरबुजाच्या बियांची पूड घालून किमान दोन मिनिटे आणखीन भाजावे
दोन मिनिटानंतर यात एक टेबलस्पून दही, अर्धा टेबलस्पून गरम मसाला व आपले काश्मिरी मिरचीचे मिश्रण घालून मसाले या मिश्रणात चांगले मिसळेपर्यंत हलवावे.
आता, या मिश्रणात आपण शिजवून ठेवलेले चिकन घालून त्यात दीड कप पाणी ओतावे.
आता हे मिश्रण 15-20 मिनिटे मध्यम आचेवर शिजवावे (पाणी आटून अर्धे होई पर्यंत)
बस्स, तयार आहे आपला कोकोनट चिकन मसाला. चपाती, तंदूर रोटी, नान किंवा राइस सोबत सर्व करा. खाव खिलाओ मज्जा करो!

कोकोनट चिकन मसाला
साहित्य: नारळ- एक मोठी वाटी(100 ग्राम) नारळपाणी- 1 कप (200 मिली) एक मध्यम आकाराचा कांदा, बारीक चिरलेला. एक लहान टोमाटो, बारीक चिरलेला. आलं-लसुन पेस्ट- एक टेबलस्पून कोथिंबीर- गरजेप्रमाणे 3 हिरव्या मिरच्या, देठ काढून अर्ध्यात कापलेल्या
काजू- 50 ग्राम
मगज(टरबुजाच्या बिया)- एक टेबलस्पून
तेल- दोन टेबलस्पून
काश्मिरी लाल मिरची पावडर- दीड टेबलस्पून
गरम मसाला- अर्धा टेबलस्पून
धने पावडर- अर्धा टेबलस्पून
हळद- एक टीस्पून
चिकन (स्किनलेस, करी कट्स)- 250 ग्राम
दही- एक टेबलस्पून
कृती:
प्रथम दीड टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर अर्धी वाटी पाण्यात मिसळून तिचे मिश्रण बनवावे.
काजू व मगज एकत्र करून त्याची बारीक पूड करून घ्यावी
नारळाचे पाणी व तुकडे एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी
कढइत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा
कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झाल्यावर आले-लसुन पेस्ट टाकून कच्चा वास जाई पर्यंत तळावे
कांदा व आले-लसुन पेस्ट भाजल्यावर त्यात हळद, धने पावडर व मीठ टाकून मिक्स करावे.
मिश्रणात चिकन घालून त्यात कोथिंबीर व दीड कप पाणी ओतून किमान दहा मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावे.
दहा मिनिटानंतर हे चिकन उतरून वेगळ्या भांड्यात काढून ठेवावे.
आता परत एकदा कढइत तेल गरम करून त्यात टोमाटो व मिरच्या टाकाव्यात.
दोन मिनितंतर यात आपण तयार केलेली नारळ व नाराळाच्या पाण्याची पेस्ट घालून चांगली मिसळून घ्यावी व हे मिश्रण पूर्ण कोरडे होऊन रंग बदलेपर्यंत भाजावे
आता यात काजू व टरबुजाच्या बियांची पूड घालून किमान दोन मिनिटे आणखीन भाजावे
दोन मिनिटानंतर यात एक टेबलस्पून दही, अर्धा टेबलस्पून गरम मसाला व आपले काश्मिरी मिरचीचे मिश्रण घालून मसाले या मिश्रणात चांगले मिसळेपर्यंत हलवावे.
आता, या मिश्रणात आपण शिजवून ठेवलेले चिकन घालून त्यात दीड कप पाणी ओतावे.
आता हे मिश्रण 15-20 मिनिटे मध्यम आचेवर शिजवावे (पाणी आटून अर्धे होई पर्यंत)
बस्स, तयार आहे आपला कोकोनट चिकन मसाला. चपाती, तंदूर रोटी, नान किंवा राइस सोबत सर्व करा. खाव खिलाओ मज्जा करो!

वाचने
10427
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.... या रविवारी पक्का....
कळवा
In reply to मस्त.... या रविवारी पक्का.... by जयंत कुलकर्णी
मस्त रे निशांत.
..
In reply to मस्त रे निशांत. by अभ्या..
व्वा!! फोटो बघूनच तोंडाला
हा लैच जब्राट अन उच्च आइटम
थांकू..
In reply to हा लैच जब्राट अन उच्च आइटम by नाना स्कॉच
१ नंबर पाककृती
धन्यवाद
In reply to १ नंबर पाककृती by उमेश पाटील
नक्की कळवतो
In reply to धन्यवाद by निशांत_खाडे
वॉव कसलं टेम्टींग दिसतय....
केल्यास कळवा..
In reply to वॉव कसलं टेम्टींग दिसतय.... by दिपक.कुवेत
अहा!
धन्यवाद!
In reply to अहा! by अन्नू
मग तुम्ही ते निषान्तरावांना
In reply to धन्यवाद! by तुषार काळभोर
आवं ,
In reply to मग तुम्ही ते निषान्तरावांना by अभ्या..
बघितलाय बघितलाय
In reply to आवं , by तुषार काळभोर
एकदम टेम्पटींग दिसते आहे चिकन
अरे वा !
सुरेख दिसतेय कोंबडी.
बाब्बोव !!! एकदम टस्सल पाकृ
dhanyavaad
In reply to बाब्बोव !!! एकदम टस्सल पाकृ by पियुशा