✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नारायण

अ
अभ्या.. यांनी
Mon, 03/07/2016 - 17:15  ·  लेख
लेख
वॉट्सपवर सकाळी सकाळी निलेशचा गुडमॉर्निंगचा मेसेज. च्यायला लावतय आता कामाला. सकाळपासून आहेस का? आहेस का? असे चारदा विचारुन साहेबांची स्वारी संध्याकाळी ऑफिसात अवतरते. फॉर्मलपणाचा कळस असे कपडे, एका हातात डायरी कव्हर चढवलेले आयपॅड, दुसर्‍या हातात रेबॅनचे डबडे अन अजून एक आयफोन घेऊन शूज कसे काढावे हा विचार करीत नुसताच उभा. "अरे ये की तसाच" म्हणेपर्यंत साहेब खुर्चीवर बसलेले असतात. हा निलेश. इव्हेंट मॅनेजर. हा फक्त कंपन्याच्या साहेबांना मॅनेज करतो असे आम्हा सर्व अ‍ॅडव्हर्टायझर लोकांचे मत. "येर्टेलचे प्रिमीयम लाँच आहे. करतोस का?" "काय काय घेतलास?" मी मुद्द्यावर "सगळाच आहे इव्हेंट, अ‍ॅक्चुअली आरेम नव्हता तयार पण वरुनच बसवलाय दट्ट्या. तुला तर म्हैतेच आपली पहुंच" ह्याच्यावरच तडकतो आम्ही जास्त. कायम सेल्फरेड हे बेणं. "माझ्याकडे काय?" अगेन मुद्दा "फ्लेक्स आहे. बॅकड्रॉप आहे, नाष्टा, गिफ्ट न वेल्कम असं अजून बरच आहे. मी केलेय सगळं प्लान. " कधीच क्रमाने सांगणार नाही. "कुठे अन कधीय?" मुद्दा "परवा सकाळी. म्हणून तर आलो तुझ्याकडे. क्रियेटिव्ह आलेत. फॉर्वर्ड करतो लगेच. म्हणजे लाग लगेच कामाला. वाटल्यास मी आहेच इथे." ह्यो शाणा आता नुसते कंपनीचे मेल फॉर्वर्ड करणार. स्वतः डाऊनलोडसुध्दा करायचं जीवावर येते याला. "अबे आधी प्लान दाखव. माझी कामे सांग. अन मला लोड आहे उद्या. जमणार नाही बहुतेक" "सिंपल आहे रे. मी केलेय मॅनेज." तिथल्या तिथे मेल फोर्वर्ड केले जातात. माझ्या पीसीवर माझेच ब्रॉडबॅन्ड वापरुन पाहिले जातात. मध्येच ऑफिसच्या वायफायचा पासवर्ड विचारुन स्वतःचे अ‍ॅप अपडेट केले जातात. त्या एक्सेलशीटच्या प्लानवरुन मला काहीही कळलेले नसते. त्याचा माझ्या परीने अंदाज घेत अस्तानाच निलेशने कंपनीच्या साहेबाला फोनवर घोळात घेतलेले असते. "हो जायेगा सरजी, बस बिंदास रहो आप. सब संभाल लेंगे मेरे बंदे. अभी तो फिलहाल बॅकड्रोप रेडी है. बाकी बचे भी है लाइनमे." अबे अजून कामाचा पत्ता नाहीये. "अभ्या जरा बोलून घे की साहेबाशी. नोर्मल सांग होतेय सगळे म्हणून" "तो साहेब त्याच्या ऑफिसात बे. माझा काय संबध?" माझा मराठी बाणा. "अबे बोल नुसते. काय नसते एवढे" :हां जी सर. बोलिये" "देखो भई, नाम क्या तुम्हारा" "अभिजीत" " हा अभिशेक सुनो, कोई प्रोब्लम नही आना चाहिये. कोई जरुरत लगेगी मेरी? कोई हेल्प?" "अभि ठिक है सर, निलेशसे बात करके बोलुंगा" "ओके गो ऑन." ............................................................................ काम पाहिले जाते. वेळेत होण्यासारखे वाटत नसतेच. काय करणार पैसा बहुत कुत्ती चीज है. घेतो गळ्यात. कंपनीचे क्रियेटीव्ह हा संशोधनाचा विषय. त्यांनी पाठवलेले फॉर्मॅट कळत नसतात. साईज हमखास चुकीच्या येतात. कसेबसे आर्टवर्क तयार होऊन प्रिंटिंगला जाईपर्यंत संध्याकाळ झालेली असते. ज्या हॉटेलमध्ये इव्हेंट असतो त्याची मापे येतात. ब्रेकफस्ट अन लंचची मेनु लिस्ट येते. तुतारी वाल्यासह बँडवाला येऊन अ‍ॅडव्हान्स घेऊन जातो. काय करणार येर्टेलच्या झेडेमला तुतारी वाजल्याशिवाय कारमधुन उतरता येत नसावे. लाईटवाला अन साऊंडवाला मध्येच तासभर डोके खाणारच असतो. रात्री उशीरा प्रिंटिंग सुरु झालेले असते. दोन तीन वाजेपर्यंत फ्रेम्स आणि स्ट्रक्चर तयार होते. चार वाजता झोपलेला मी साडेपाचच्या अलार्मने उठतो. कसेबसे ग्राऊंडवर जायचे कपडे चढवून फ्लेक्स युनिटला. तोपर्यंत तीस पस्तीस फोन करुन काम करणार्‍या पोरांना ऊठवलेले असते. एकेक स्टार जमा होतो. रिक्षा, टेम्पो येतो. सगळे सामान अर्ध्या तासात इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचते. .............................................................................. हॉटेलच्या हॉलमध्ये अनेक जण नटून ठटून नुसतेच मोबाईलात डोसके घालून उभे असतात. लढाई के दिन खाडे ह्या तत्त्वाला जागून निलेशराव गायब असतात. शेजारी एक येर्टेल बया आपण सुपरमॉम की कॉलेजगर्ल हे कन्फ्युजन निस्तरत आणि वाढवत असते. "हां तो अभिलाष पहुंच गये स्पॉटपर. सुनो मेरी बात. वो जो है येर्टेलवाली निशा. उसको सुन ले जरा. पूना का इव्हेंट भी उसी ने मॅनेज किया था. च्यायला हायेत कीती इवेंट मॅनेजर? आणि मग मी काय करतोय कालपासून. . (क्रमशः)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध

प्रतिक्रिया द्या
13188 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

=))

एस
Mon, 03/07/2016 - 17:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments

हाहाहा!

बोका-ए-आझम
Mon, 03/07/2016 - 17:28 नवीन
पुभाप्र!
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/07/2016 - 17:34 नवीन
वाचतोय पुभाप्र. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

:)

अजया
Mon, 03/07/2016 - 17:37 नवीन
:) पुभाप्र रायटर्स ब्लाॅक निघालेला दिसतोय!
  • Log in or register to post comments

=)) पटापटा लिही पुढचं.

यशोधरा
Mon, 03/07/2016 - 17:45 नवीन
=)) पटापटा लिही पुढचं.
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात.

प्रचेतस
Mon, 03/07/2016 - 17:59 नवीन
मस्त सुरुवात. येर्टेलचं कव्हरेज कसं हाय बे सोलापूरात? इकडं लै कॉल ड्राप होतात म्हन्तेत.
  • Log in or register to post comments

त्येंचा इव्हेंट घेतला म्हणजे

अभ्या..
Mon, 03/07/2016 - 18:05 नवीन
त्येंचा इव्हेंट घेतला म्हणजे सिम थोडीच घेतो. ;) बहुधा त्यांचे म्यानेजर सुध्दा एक वडाफोनचे सिम वापरत असले पायजेत. आम्हीबी वडाफोन सीयुजी. दणकून भारी सर्व्हिस, दणकून भारी बिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हीहीही.

प्रचेतस
Mon, 03/07/2016 - 18:15 नवीन
हीहीही. आम्ही आयडियेची कल्पनावाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हाहाहाहा

अद्द्या
Mon, 03/07/2016 - 18:08 नवीन
हाहाहाहा भारी .. लवकर टाक पुढला भाग
  • Log in or register to post comments

जबरदस्त, नारायणराव! एकच नंबर.

आदूबाळ
Mon, 03/07/2016 - 18:11 नवीन
जबरदस्त, नारायणराव! एकच नंबर. पुभाप्र!
  • Log in or register to post comments

उत्तम सुरूवात.

आतिवास
Mon, 03/07/2016 - 18:13 नवीन
पुढच्या भागाची वाट पाहते.
  • Log in or register to post comments

जब्बरदस्त बे अभ्या. लयच

बॅटमॅन
Mon, 03/07/2016 - 18:15 नवीन
जब्बरदस्त बे अभ्या. लयच जब्राट. फुडचा भाग येउंद्यात अता लौकरात लौकर!!!!!
  • Log in or register to post comments

छान... पुभाप्र

पीके
Mon, 03/07/2016 - 18:31 नवीन
छान... पुभाप्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वाह वाह!! पुभाप्र

सूड
Mon, 03/07/2016 - 18:53 नवीन
वाह वाह!! पुभाप्र
  • Log in or register to post comments

अभिजित, चान चान!

हेमंत लाटकर
Mon, 03/07/2016 - 19:19 नवीन
अभिजित, चान चान!
  • Log in or register to post comments

हे..हे..हे...

चांदणे संदीप
Mon, 03/07/2016 - 19:21 नवीन
वॉट्सपवर सकाळी सकाळी निलेशचा गुडमॉर्निंगचा मेसेज. च्यायला लावतय आता कामाला.
पहिल्याच बॉलवर सिक्स!! लेखाचे नावही अगदी समर्पक! लगे रहो अभ्यादादा! \o/ \o/ \o/ Sandy
  • Log in or register to post comments

जोरदार अभ्याप्पा...आपलं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 03/07/2016 - 19:26 नवीन
जोरदार अभ्याप्पा...आपलं नारायणाप्पा... रच्याकने पहिल्या बॉलवर सिक्सर रे.
  • Log in or register to post comments

:)

नाव आडनाव
Mon, 03/07/2016 - 19:30 नवीन
:) "अभिजीत" " हा अभिशेक सुनो, ... "हां तो अभिलाष पहुंच ... एकदा खरडफळ्यावर "अभय" नाव दिलं होतं एका सदस्याने ... त्यानंतरंच कार्यकर्त्यांचं कंफ्यूजन होऊ नये म्हणून प्रोफाइल मधे नाव टाकलेलं दिसतंय :):):)
  • Log in or register to post comments

भारी!

विवेक ठाकूर
Mon, 03/07/2016 - 19:40 नवीन
लवकर लिही पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

अरे धमाल !!!

जव्हेरगंज
Mon, 03/07/2016 - 20:47 नवीन
अरे धमाल !!! वाचतोय !! पुभाप्र!!
  • Log in or register to post comments

नाद खुळा रे फ्लेक्साभ्या.

प्रमोद देर्देकर
Mon, 03/07/2016 - 21:00 नवीन
नाद खुळा रे फ्लेक्साभ्या. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

वाचायला मजा येतेय. पण तुझी

शलभ
Mon, 03/07/2016 - 21:30 नवीन
वाचायला मजा येतेय. पण तुझी वाट लागली असेल.
  • Log in or register to post comments

जोरदार सुरुवात

श्रीरंग_जोशी
Mon, 03/07/2016 - 21:35 नवीन
जोरदार सुरुवात झाली आहे. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

अभ्या.. मस्त लिहिलंयस.

वैभव जाधव
Mon, 03/07/2016 - 22:20 नवीन
अभ्या.. मस्त लिहिलंयस.
  • Log in or register to post comments

शानदार! जबरदस्त! जिंदाबाद !

भरत्_पलुसकर
Tue, 03/08/2016 - 06:56 नवीन
शानदार! जबरदस्त! जिंदाबाद !
  • Log in or register to post comments

च्यायला...

अर्धवटराव
Tue, 03/08/2016 - 07:02 नवीन
इथे मिपाकर्स मस्त वेन्जोय करताहेत ष्टोरी... आणि मला काहिच टोटल लागेना झालिये :(
  • Log in or register to post comments

अगदी अगदी. मलातर टायटल वाचुन

भाऊंचे भाऊ
Tue, 03/08/2016 - 08:34 नवीन
अगदी अगदी. मलातर टायटल वाचुन अडला नारायण गाढवाचे पाय धरी प्रकरण भासत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

छान..

संजय पाटिल
Tue, 03/08/2016 - 08:02 नवीन
वाचतोय..
  • Log in or register to post comments

अभ्या शांत हो

नाखु
Tue, 03/08/2016 - 08:27 नवीन
परत नीट सांग पहिल्यापासून काय झालं ते !!! (प्रकट) स्वगतः काय लिहितोय हा भावड्या एक लंबर आणि लाईनीत घेतोय एकेकाची,अता पुढच्या भागाची वाट बघण्याखेरीज दुसरं काय करणार !! घंटा !!! अभुड्याचा मैतर नाखु
  • Log in or register to post comments

आवडले. पुभाप्र.

प्राची अश्विनी
Tue, 03/08/2016 - 09:15 नवीन
आवडले. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

मस्तच.. वाचतेय ..

स्मिता चौगुले
Tue, 03/08/2016 - 10:36 नवीन
मस्तच.. वाचतेय ..
  • Log in or register to post comments

हायला त्या दाभोळकर,अवचटला

कंजूस
Tue, 03/08/2016 - 11:30 नवीन
हायला त्या दाभोळकर,अवचटला मागे टाकलेस की. आता तुळतुळीत करून एक कळा चष्मा लाव. चार ड्रोन घेऊन टाक.
  • Log in or register to post comments

हिहिहि..... मज्जा आली !!!

जेनी...
Tue, 03/08/2016 - 11:39 नवीन
हिहिहि..... मज्जा आली !!!
  • Log in or register to post comments

हम्म! इव्हेंट मॅनेजमेंट हा

किसन शिंदे
Tue, 03/08/2016 - 15:51 नवीन
हम्म! इव्हेंट मॅनेजमेंट हा खूप किचकट प्रकार. झाला सक्सेस तर अॅप्रिसियेशन, नाही झाला तर फायर.
  • Log in or register to post comments

वाचतोय. पुभाप्र

मृत्युन्जय
Tue, 03/08/2016 - 15:56 नवीन
वाचतोय. पुभाप्र
  • Log in or register to post comments

छान सुरुवात!

अनुप ढेरे
Tue, 03/08/2016 - 16:07 नवीन
छान सुरुवात!
  • Log in or register to post comments

मस्ताय

भीडस्त
Tue, 03/08/2016 - 17:28 नवीन
आन्देव
  • Log in or register to post comments

मस्ताय

भीडस्त
Tue, 03/08/2016 - 17:28 नवीन
आन्देव
  • Log in or register to post comments

नंबर एक.. येउद्या पुढचा भाग.

निशांत_खाडे
Tue, 03/08/2016 - 17:35 नवीन
नंबर एक.. येउद्या पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

:)

पैसा
Tue, 03/08/2016 - 18:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments

किती प्रतिसाद मिळाले तर

तर्राट जोकर
Fri, 03/18/2016 - 14:05 नवीन
किती प्रतिसाद मिळाले तर तुम्ही पुढचा भाग लिहणार?
  • Log in or register to post comments

छान !!अभिजीत की अभिषेक की

बाळ सप्रे
Fri, 03/18/2016 - 14:27 नवीन
छान !!अभिजीत की अभिषेक की अभिलाष?? अभिमान.. हे पुढच्या भागात वापरता येइल :-)
  • Log in or register to post comments

अच्छा.. येर्टेल म्हणजे एअरटेल

पिलीयन रायडर
Fri, 03/18/2016 - 14:32 नवीन
अच्छा.. येर्टेल म्हणजे एअरटेल होय!!!! आणि अभिजीत... अभिषेक.. अभिलाष...अभ्या... भारीच!
  • Log in or register to post comments

अरे काय ?? एवढी जबरा सुरवात

शित्रेउमेश
Fri, 03/18/2016 - 14:40 नवीन
अरे काय ?? एवढी जबरा सुरवात असते का कुठे?? येवुदे पुढचे भाग लवकर लवकर...
  • Log in or register to post comments

खिक्क

टवाळ कार्टा
Fri, 03/18/2016 - 15:53 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments

भारी रे अभीलाश

रघुनाथ.केरकर
Mon, 07/10/2017 - 16:09 नवीन
भारी रे अभीलाश
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा