✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

या चोरांचे काय करायचे?

व
विजुभाऊ यांनी
Fri, 03/04/2016 - 16:43  ·  लेख
लेख
मंडळी आपण सर्व मिपाकर येथे अतिशय प्रामाणीकपणे लिखाण करतो. काहिवेळा इथले लिखान दुसर्‍या संस्थळावर प्रकाशित करतो. इतर कोणाचे लिखाण इथे प्रकाशित केले तर त्याखाली मूळ लेखकाचे नाव लिहायला विसरत नाही. आपण सर्वजण हे असे करतो कारन आपण सर्वजण सभ्य आहोत. मात्र गेले काही दिवस एक विचित्र गोष्ट अनुभवास येत आहे. मिपावरील काही लेखनांचे इतरत्र प्रकाशन होत आहे. यात त्या लेखकाची परवानगी तर जाऊद्या पण साधे लेखकाचे नाव देखील दिले जात नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर मी परवा तात्या अभ्यंकरांच्या रौषनी बद्दल एक लेख वाचला. तसेच छो डॉन ने पुणेरी आयपील च्या अटी तर आंतरजालावर व्हायरल झाल्या होत्या. आपल्या मित्रांचे लिखाण लोक एकमेकाना फॉर्वर्ड करतात हे कौतुकास्पद आहे मात्र ते तसे करताना मूळ लेखकाचे नाव दिले जात नाही हा संतापजनक प्रकार आहे. अशा वांङ्मय चोरीला आळा घालणे कठीण आहे. टेक्नीकली मिपा संपादकीय मंडळाने यावर काही विचार केला तर हे जमू शकेल. ( उदा : कॉपी पेस्ट डिसेबल करणे वगैरे) तोपर्यन्त तरी अशा चोरांना आळा कसा घलाता येईल यावर कोणीतरी काही सुचवा. तुम्हाला एखादा असा लेख आढळला तर तो ज्याने पाठवला त्याला मूळ लेखकाचे नाव सांगा तसेच आपणही असा लेख फॉर्वर्ड करताना मूळ लेखकाचे नाव त्या खाली अ‍ॅड करून पाठवूया.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4345 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

www.bedhundlahari.com

जव्हेरगंज
Fri, 03/04/2016 - 16:47 नवीन
www.bedhundlahari.com येथेही बरेच चोरीचे लेख आहेत !!
  • Log in or register to post comments

ही एक माझी कथा तिकडे चोरली

जव्हेरगंज
Fri, 03/04/2016 - 19:29 नवीन
ही एक माझी कथा तिकडे चोरली आहे ! www.bedhundlahari.com/literature-read?story-vetole अजून भरपूर आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

तुमचे नाव तर आहे खाली. तरी

आनन्दा
Sat, 03/05/2016 - 19:53 नवीन
तुमचे नाव तर आहे खाली. तरी देखील तुमची परवानगी घ्यायला हवी होती हे मात्र खरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

औघड आहे !

सस्नेह
Fri, 03/04/2016 - 17:10 नवीन
औघड आहे ! याला आळा घालणे कठीण आहे. कॉपीराईट अ‍ॅक्टचा काही उपयोग होईल ?
  • Log in or register to post comments

तात्यांची रौशनी सिरीज एका

जेपी
Fri, 03/04/2016 - 17:27 नवीन
तात्यांची रौशनी सिरीज एका ठिकाणी चोरली आहे.रामदास काकांच्या कविता दुसरीकडे पाहिल्या आहेत..छोट्या मोठ्या लेखन चोर्या चलतच राहतात..
  • Log in or register to post comments

ऊपाय

मी-सौरभ
Fri, 03/04/2016 - 18:17 नवीन
बघुया एखादा तंत्रज्ञ काही ऊपाय काढतो का ते? चोप्य्पस्ते बंद करणे हा तेवढा सोपा ऊपाय वाटत नाही.
  • Log in or register to post comments

जालावरची

कपिलमुनी
Fri, 03/04/2016 - 18:30 नवीन
जालावरची कोणतीही गोष्ट सेफ नाही. फोटो , लेख ईतर काही. एकदा जालावर आले की ते कोणीही सहज कॉपी करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

चोप्य्पस्ते बंद करणे हे

सतिश गावडे
Sat, 03/05/2016 - 14:01 नवीन
चोप्य्पस्ते बंद करणे हे तांत्रिकदृष्टया तितकेसे अवघड नसावे. ड्रुपलचे Copy Prevention मोडयुल उपलब्ध आहे त्यासाठी. वाङ्मयचौर्याचा "चोप्य्पस्ते" हा अतिशय सोपा मार्ग असला तरी एकमेव मार्ग नाही.
जालावरची कोणतीही गोष्ट सेफ नाही. फोटो , लेख ईतर काही. एकदा जालावर आले की ते कोणीही सहज कॉपी करू शकतो.
सहमत. वरील Copy Prevention मोडयुलच्या दुव्यात म्हटल्याप्रमाणे:
Anything you put out there in the Internet (public pages) is available for anyone else to copy and save/re-use. So if you really want your content to be safe and protected - do not put it online.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

गावडे सर, ते राईटक्लिक

बॅटमॅन
Mon, 03/07/2016 - 16:03 नवीन
गावडे सर, ते राईटक्लिक प्रिव्हेंट केले तरी स्क्रीनशॉट घेण्यापासून कुणाचीच सुटका नाय बगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

चोप्यपस्ते बंद करणे इथे

बाळ सप्रे
Mon, 03/07/2016 - 16:18 नवीन
चोप्यपस्ते बंद करणे इथे लिखाण करणार्‍यांना जास्त त्रासदायक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

प्रत्येक चोरिवर कारवाई करता

भाऊंचे भाऊ
Fri, 03/04/2016 - 19:36 नवीन
प्रत्येक चोरिवर कारवाई करता येइल पण त्या कोर्ट कचेरिसाठी वेळ अन पैसा कुठून आणनार ? मोठे खेळाडु दमले पायरसीपुढे तिथे तुम्ही आम्ही किती खर्च करणार ?
  • Log in or register to post comments

माझ्या काही लेख/ गोष्टी चोरी

विवेकपटाईत
Fri, 03/04/2016 - 19:51 नवीन
माझ्या काही लेख/ गोष्टी चोरी झाल्या होत्या. काहींचे ई मेल शोधून जाब विचारला. काहींनी माफी हि मागितली. काहींनी नाव खाली दिले, काहींनी कुठलेच औदार्य दाखविले नाही. काय करणार. ओळख - उचलगिरी करणाऱ्यांची http://www.misalpav.com/node/31899 या लेखात काहींची नावे दिली आहे.
  • Log in or register to post comments

अपुर्व ओकची कविता पण अशीच

प्रणवजोशी
Fri, 03/04/2016 - 20:16 नवीन
अपुर्व ओकची कविता पण अशीच सगळीकडे पसरली हौती
  • Log in or register to post comments

काळजीशी सहमत

श्रीरंग_जोशी
Fri, 03/04/2016 - 20:45 नवीन
धाग्यात व्यक्त केलेल्या काळजीशी सहमत.
कॉपी पेस्ट डिसेबल करणे
याने फारसा फरक पडत नाही. वेब पेज सेव्ह करून सगळा मजकूर सहजपणे मिळवता येतो. मागे मिपाकर गणेशाने अशाच एका धाग्यावर पूर्वी व्यक्त केलेले विचार आठवतात.
"तुम्ही माझी रचना स्वतःच्या नावावर खपवू शकता. परंतु ती लिहिताना मला मिळणारा नवनिर्मितीचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही".
शब्द थोडे फार वेगळे असतील पण विचार हाच होता.
  • Log in or register to post comments

सभासदा शिवाय लेख वाचायला

श्री गावसेना प्रमुख
Sat, 03/05/2016 - 14:15 नवीन
सभासदा शिवाय लेख वाचायला परवानगी नसावी आणि सर्व सभासदांचे वैयक्तिक व्हेरिफिकेशन केल्या शिवाय अकाउंट क्रिएट करू नये,अशाने डुप्लिकेट id हि सहज बॅन होतील,आणि जे हि लेख आहेत ते सर्व jpg (इमेज)फॉरमॅट मध्ये प्रकाशित व्हावेत ।
  • Log in or register to post comments

बंदी पेक्षा

उपयोजक
Sat, 03/05/2016 - 19:06 नवीन
बंदीपेक्षा प्रबोधन जास्त चांगला परिणाम करते.
  • Log in or register to post comments

या चोरट्यांच्या मायला,!!!!

भीमराव
Sat, 03/05/2016 - 21:10 नवीन
या चोरट्यांच्या मायला,!!!! कॉलेज मधे असतानाची गोष्ट आहे, खुप सारी नरसाळी पोरं पोरी नेटवरनं ढापलेल्या कविता द्याची म्यागझीनात छापायला, तवा आमी संपादक मंडळात विद्यार्थी संपादक हुतो, तर लय वैताग याचा कॉपी आयटम न खर्या अभिव्यक्ती शोधायला. १सो१ कॉपी बहाद्दर भेटायचे, आमी मरायचो कि पहिल्या ३ मदी बसावं आपलं म्यागझीन आन हे खुशाल चोर्या करायचे आन आनुन द्याचे
  • Log in or register to post comments

www.bedhundlahari.com/

विजुभाऊ
Mon, 03/07/2016 - 15:52 नवीन
www.bedhundlahari.com/ ही लिंक चालत नाहिय्ये. पण अशा चोरीसाठी काय करावे हे कळत नाही. जालावर लिखाण बंद करावे तर ते शक्य नाही.
  • Log in or register to post comments

शक्य तितक्या संस्थळावर एकाच

तर्राट जोकर
Mon, 03/07/2016 - 16:13 नवीन
शक्य तितक्या संस्थळावर एकाच वेळी प्रसिद्ध करावे. एकट-दुकट संस्थळावर लिहित राहल्यास लेखनकंडू शमतो पण अनेक संस्थळावर सातत्याने लिहित राहल्यास दोन फायदे होतात. एक, आपसूक पोहोच वाढते. चोराला प्रसिद्धीसाठी प्लेटफॉर्म मिळत नाही. सर्व संस्थलांवर नेहमी एकाच, खर्‍या नावाने लिहावे. तुमचे टोपणनाव कोणीही माझेच आहे म्हणून खपवू शकतो. चोर विनाकष्टाच्या प्रसिद्धीस हपापलेले असतात. त्या गरजेस आपले साहित्य उपयोगी पडणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच जिथे जिथे व्यापक जनसमुदाय आहे अशा सर्व संस्थळावर प्रसिद्धी करणे. थोडे कष्टाचे आहे पण नंतर येणारी उद्विग्नता टाळता येते, रसिकांचे प्रेमही मिळते, त्या प्रेमापोटी संरक्षणही. ज्यांनी वाचलंय ते अशी चोरी पटकन पकडतात.
  • Log in or register to post comments

बाकी तंत्रज्ञानाच्या मदतीने

तर्राट जोकर
Mon, 03/07/2016 - 16:15 नवीन
बाकी तंत्रज्ञानाच्या मदतीने काहीही होण्यासारखे दिसत नाही.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा