या चोरांचे काय करायचे?
मंडळी आपण सर्व मिपाकर येथे अतिशय प्रामाणीकपणे लिखाण करतो.
काहिवेळा इथले लिखान दुसर्या संस्थळावर प्रकाशित करतो. इतर कोणाचे लिखाण इथे प्रकाशित केले तर त्याखाली मूळ लेखकाचे नाव लिहायला विसरत नाही. आपण सर्वजण हे असे करतो कारन आपण सर्वजण सभ्य आहोत.
मात्र गेले काही दिवस एक विचित्र गोष्ट अनुभवास येत आहे. मिपावरील काही लेखनांचे इतरत्र प्रकाशन होत आहे.
यात त्या लेखकाची परवानगी तर जाऊद्या पण साधे लेखकाचे नाव देखील दिले जात नाही.
व्हॉट्सअॅपवर मी परवा तात्या अभ्यंकरांच्या रौषनी बद्दल एक लेख वाचला. तसेच छो डॉन ने पुणेरी आयपील च्या अटी तर आंतरजालावर व्हायरल झाल्या होत्या.
आपल्या मित्रांचे लिखाण लोक एकमेकाना फॉर्वर्ड करतात हे कौतुकास्पद आहे मात्र ते तसे करताना मूळ लेखकाचे नाव दिले जात नाही हा संतापजनक प्रकार आहे.
अशा वांङ्मय चोरीला आळा घालणे कठीण आहे. टेक्नीकली मिपा संपादकीय मंडळाने यावर काही विचार केला तर हे जमू शकेल. ( उदा : कॉपी पेस्ट डिसेबल करणे वगैरे)
तोपर्यन्त तरी अशा चोरांना आळा कसा घलाता येईल यावर कोणीतरी काही सुचवा.
तुम्हाला एखादा असा लेख आढळला तर तो ज्याने पाठवला त्याला मूळ लेखकाचे नाव सांगा तसेच आपणही असा लेख फॉर्वर्ड करताना मूळ लेखकाचे नाव त्या खाली अॅड करून पाठवूया.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
www.bedhundlahari.com
ही एक माझी कथा तिकडे चोरली
तुमचे नाव तर आहे खाली. तरी
औघड आहे !
तात्यांची रौशनी सिरीज एका
ऊपाय
जालावरची
चोप्य्पस्ते बंद करणे हे
गावडे सर, ते राईटक्लिक
चोप्यपस्ते बंद करणे इथे
प्रत्येक चोरिवर कारवाई करता
माझ्या काही लेख/ गोष्टी चोरी
अपुर्व ओकची कविता पण अशीच
काळजीशी सहमत
सभासदा शिवाय लेख वाचायला
बंदी पेक्षा
या चोरट्यांच्या मायला,!!!!
www.bedhundlahari.com/
शक्य तितक्या संस्थळावर एकाच
बाकी तंत्रज्ञानाच्या मदतीने