Skip to main content

अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/03/2016 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवादाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. Afzal Guru’s last interview यापूर्वी त्याचा आजतक वर डिसेंबर २००१ मध्ये घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.

वाचने 66086
प्रतिक्रिया 339

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

जोकर बुवा मी कायद्याचे तत्वच सांगितले आहे आणी ते न्यायालयाला पूर्ण मान्य असतेच. तेंव्हा "तुम्ही ते न्यायालयाला का सांगत नाही" या म्हणण्याला काय अर्थ आहे? न्यायालयाने टूण्डाला सज्जड पुरावा नसल्याने संशयाचा फायदा देऊन सोडले आहे. आपल्याला टूण्डाचा एवढा पुळका आहे ("करिम टूंडाला निकालाआधीच गुन्हेगार ठरवले गेल्याने ज्या मानहानीला आतापर्यंत सामोरे जावे लागले त्याची भरपाई कशी करु शकाल ते सांगाल काय?") तर टूण्डाने एवढे बॉम्ब स्फोट केले त्यात दगावलेल्या माणसांच्या निष्पाप कुटुंबियांना वा आयुष्यभरासाठी जायबंदी झालेल्या निष्पाप माणसाना झालेल्या कष्टाची किंमत काहीच नाही? ते तर कुठल्याही संशयाच्या भोवर्यात नव्हते किंवा नाहीत. टूण्डा चार केसेस मध्ये "पुरेशा"पुराव्याभावी सुटला पण अजून अनेक केसेस बाकी आहेत. आपण फक्त कायद्याच्या तत्वांचा कीस पाडला आहे त्याला फारसे कष्ट लागत नाहित. हे मी लष्करात असताना तस्कर किंवा दहशतवादी यांच्या विरुद्ध खटला दाखल करण्यासाठी काय काय करावे लागते ते स्वतः पाहिलेले आहे म्हणून फक्त बोलत नाहीये तर त्यात हुतात्मा झालेल्यानच्या कुटुंबाची आणि बळी पडलेल्या निष्पाप माणसांची आणी त्यांच्या कुटुंबियांची काय वाताहत होते हे स्वतः पाहत आलो आहे. आपले विधान म्हणजे सलमान खानला केवढी मानहानी आणी कष्ट भोगायला लागले असे आहे पण त्याच्या गाडीखाली मेलेल्या माणसानचे काय या बद्दल आपले काहीच म्हणणे नाही. ARMCHAIR ACTIVIST म्हणजे मला हेच म्हणायचे आहे. सलमानला न्याय "मिळालाच" पाहिजे पण त्याच्या गाडीखाली आलेल्या लोकांचे काय किंवा रवींद्र पाटील यांन न्याय मिळण्याबाबत काय तर ते "सरकारचे काम" आहे. असो आपण चष्मा लाव्लेलाच आहे तेंव्हा माझ्या कडून तुमच्या विचारसरणीमध्ये काही बदल होईल अशी अपेक्षा नाहीच.

In reply to by सुबोध खरे

आणि आज आपण वातानुकुलीत खोलीत बसून अब्दुल करिम तुन्दाच्या निर्दोषीपणाची ग्वाही देत आहात. त्याचा इतिहास वाचा. >> खरेसाहेब, निर्दोषपणाची ग्वाही मी नाही भारतीय न्यायालय देत आहे. मी न्यायालयाचा निर्णय इथे सांगितला, माझ्या मनचं नाही. आता बरोब्बर ह्याच खटल्यातला न्यायालयाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही हेच ना? पण कन्हयाच्या जामिनावरचं न्यायालयाचं भाष्य उड्या मार मारुन इथं लोक टाकतायत ते कसं मान्य होतं? एक काहीतरी ठरवा की. राहता राहिला वातानुकुलीत खोलीचा प्रश्न. तो असेल तर इथे बाकी कोणी काहीच मत देऊ नये असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? तुम्हीही वातानुकुलीत खोलीत बसूनच लो़कांना जाण आहे की नाही ह्याचे सर्टीफिकेट मागत आहात. बाकी, माझी जाण वैगरे काढायची तुम्हाला गरज नाही हो.

In reply to by तर्राट जोकर

अब्दुल टुंडा चा इतिहास एकदा वाचा अशी विनंती आहे.नैदान त्याला कन्हैयाच्या रांगेत बसवण्याच्या अगोदर

In reply to by सुबोध खरे

हेच न्यायालयाला सांगत का नाही खरे साहेब? एक भारतीय नागरिक म्हणून तुमची जबाबदारी नाही का? बिचार्‍या न्यायालयाला हे तत्त्व माहितच नाही बघा. वातानुकुलित खोलीत बसून हे जाणून घ्या ते जाणून घ्याचे उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा हे आवश्यक आहे, नै का?

In reply to by सुबोध खरे

टूंडाचा इतिहास जाऊ देत. मला न्यायालयाच्या निर्णयाशी असहमत व्हायचं नाही. कारण मला काय वाटतं ह्याने त्याला कोर्ट काय शिक्षा देईल हे ठरत नसतं. न्यायालयाचाचा निर्णय एका परिस्थितीत मान्य, दुसर्‍यात नाही असे करणारेही अफझलची फाशी जुडीशियल किलींग मानणार्‍यांच्या रांगेत बसतात. काहीही फरक नाही. निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.

In reply to by तर्राट जोकर

मी न्यायालयाचा निर्णय इथे सांगितला, माझ्या मनचं नाही. एकदाचं ठरवून टाका बरं, न्यायालयांचे निर्णय म्हणजे न्याय असतो का ज्युडीशिअल किलींग ते! आणि हो, अब्दुल तुंदा वरील फक्त दिल्ली पोलीसांनी केलेली फिर्याद रद्द झाली आहे. अजून त्याच्यावरील हरीयाणा, गाझियाबाद, अजमेर आणि हैदराबाद मधे खटले चालूच असल्याने, त्याला सोडलेले नाही.

In reply to by विकास

न्यायालयाचाचा निर्णय एका परिस्थितीत मान्य, दुसर्‍यात नाही असे करणारेही अफझलची फाशी जुडीशियल किलींग मानणार्‍यांच्या रांगेत बसतात. काहीही फरक नाही. निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.

In reply to by सुबोध खरे

अब्दुल करीम टुंडा - स्त्त्रोत विकि - He came under the police radar after the Mumbai serial bombings in 1993. He got the moniker Tunda – Hindi/ Bengali (Bangla) for without a hand or physically handicapped- after his left hand got severed in an accident while preparing a bomb in 1985 in Mumbai. His younger brother Abdul Malik, who still is a carpenter, is reportedly the only immediate family member alive in India. He also stayed in Pakistan where he is known to have imparted training on fabrication of IED and other explosives to mujahids who were sent to India from Pakistan for jehad.[6] During his stay in Pakistan, he had been in touch with organisations like ISI, LeT, Jaish-e-Mohammed, Indian Mujahideen and Babbar Khalsa and had been meeting people like Hafiz Saeed, Maulana Masood Azhar, Zaki-ur-Rehman Lakhvi, Dawood Ibrahim and several others wanted by India. He was using an elaborate network of human traffickers and fake currency suppliers active in Bangladesh. Tunda was also been associated with Rohingya operatives in the past. His association with LeT commanders Rehan alias Zafar and Azam Cheema alias Babajee is well known.[7][not in citation given]

In reply to by तर्राट जोकर

महिषासुर शहीद दिवस साजरा करताना जी पत्रक छापुन वाटली होती त्यातील एक ईराणी बाईंनी संसदेत वाचून दाखवले होते. जी भाषा त्यात होती ती मी इथे लिहित नाही. तुम्हीच गुगलुन वाचा. मी 100% नास्तिक आहे पण जी भाषा त्या पत्रकात होती त्या भाषेला प्रत्युत्तर म्हणुन कन्हैयाचे चपलेने तोंड फोडले पाहिजे या मताचा मी आहे. याला बाळासाहेबच पाहिजे होते. जे डावे याला समर्थन करत आहेत त्यांनी कम्युनिस्ट असलेला सर्वात मोठा देश रशिया, इथे असे केले तर काय होईल याचा विचार करावा. कदाचित् कान्हा सायबेरियात बर्फ फोडत असता आणि पप्पू घमेंले भरत असता. साला कुटुंबाचे मासिक उत्प्नन 3000 आहे सांगतो मग गाढ़वा अभ्यास कर ना, त्या गरीबीत रुतलेल्या आईबापाला बाहेर काढ ना. या लष्कराच्या भाकऱ्या कशाला भाजतो आहे? हे असले थेरं पप्पूने करावी , त्याच्या बापजाद्यानि तोंडाच्या तोफा चालवून बक्कळ पैसा कमवला आहे

In reply to by भंकस बाबा

भंकसबाबा, अर्धवट माहिती पसरवल्याने जे घातक विष मनात तयार होते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. महिषासुर शहिद दिवस कन्हयाने साजरा केलेला नाही. कन्हया अध्यक्ष झाला तो २०१५ मधे. हा दिवस २०११ पासूनतरी जे एन यु त साजरा केला जात आहे, त्याबद्दल अभाविपने वेळोवेळी विरोधही केलेला आहे. त्यासंदर्भात एक बातमी http://www.thehindu.com/news/cities/Delhi/student-groups-come-to-blows-… खरेतर जे एन यु त अनेक विद्यार्थी संघटना वेगवेगले कार्यक्रम करत असतात, त्या प्रत्येक कार्यक्रमाला जबाबदार विद्यापिठ प्रशासन असते, युनियन प्रेसिडेंट नाही. तसेच आता तो अध्यक्ष आहे म्हणून जे एन यु तल्या अठरापगड वेगवेगळ्या विद्यार्थी संघांनी केलेल्या २०१५च्याही आधीच्या सगळ्या कार्यक्रमांना तोच जबाबदार कसा? ह्या लॉजिक ने तर दुसरे महायुद्ध कन्हयानेच प्लान केले असेही म्हटले पाहिजे. साला कुटुंबाचे मासिक उत्प्नन 3000 आहे सांगतो मग गाढ़वा अभ्यास कर ना, त्या गरीबीत रुतलेल्या आईबापाला बाहेर काढ ना. >> गरिबांनी राजकारणात उतरू नये असे तुम्हाला म्हणायचे आहे बहुतेक. टिळकांचेही असेच काहीसे वाक्य आहे, अमका संसदेत जाऊन काय हे करणार का वैगेरे, नेमकं आठवत नाही पण भावार्थ तोच आहे. राजकारण हे पोटभरलेल्यांची मक्तेदारी असावी असं तुमचं मत आहे काय? असं असेल तर अभ्यास वाढवा आणि कोणाच्या गरिबीची खिल्ली उडवू नका. मीही गरिब होतो, विद्यार्थीदशेत मीही आंदोलनं केली आहेत, ती लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यासाठी नसतात ह्याची मला जाण आहे. स्वार्थी, आप्पलपोट्या, झापडबंद, आपण बरे आपला काम बरे टैप विद्यार्थ्यांना ती नसते. ह्या लष्कराच्या भाकर्‍या कुणीतरी भाजतो म्हणून हे अप्पलपोटे विद्यार्थी सुखनैव फायदे भोगू शकतात. असे फायदे भोगून पोट भरले की कुणालाही उपदेश करायला मोकळे. कन्हया स्वत:ची गरिबी सांगतोय ते त्याच साठी.

In reply to by तर्राट जोकर

कोण म्हणे गरीब राजकारणात नाही,भुजबळांनी त्यांच्या पक्षाच्या एका झोपडीत राहणाऱ्या बाईला निवडून आणून नाशिक zp अध्यक्ष केले होते राव।सोता भुजबळ भाजी विकायचे आणि आता बघा समतेचा किती धूर निघू ऱ्हायला ।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

बरोबर. असे धूर फक्त काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते, नेते काढतात. डॉन्टटेल्मी! गरिब कन्हयाला घर सांभाळण्याचा शानपणा शिकवणार्‍यांना गरिब चहावाला पंतप्रधान होतो तेव्हा काय प्रॉब्लेम नसतोय.

In reply to by तर्राट जोकर

गरिब कन्हयाला घर सांभाळण्याचा शानपणा शिकवणार्‍यांना गरिब चहावाला पंतप्रधान होतो तेव्हा काय प्रॉब्लेम नसतोय. लै वेळा सहमत!!!

In reply to by बोका-ए-आझम

मजाच आहे बुआ!! आमची सगळी श्रद्धास्थाने एक एक करत ढासळत आहेत!, काही बोललो असतो पण मग ते दूसरी धूणी इकडे धूणे झाले असते त्यापरी आम्ही आवरतो स्वतःला

In reply to by नाना स्कॉच

उदाहरणार्थ एखादा माणूस खोटं बोलला, तुम्ही सोडून द्याल. देशाचा पंतप्रधान खोटं बोलला तर त्यावरून गदारोळ माजेल की नाही? कोणी याला नेहमीच महत्व होतं, आहे आणि राहील. जेव्हा जे बोललं जातंय ते अगदी त्रिकालाबाधित सत्य असेल - एखाद्या शास्त्रीय नियमासारखं - तेव्हाच कोण बोललंय हे गौण ठरेल आणि काय बोललेत त्याला महत्त्व मिळेल.

In reply to by बोका-ए-आझम

हा हा हा. फक्त गरजेपुरता तिरपागडा अर्थ काढून 'तुम्हाला हेच म्हणायचं आहे' ही आता टिपीकल भक्त शैली म्हणून प्रसिद्ध झाली आहे. इथे चहावाला पंतप्रधान झाला हे मला सहन होत नाही असा अर्थ काढलात, वा वा वा! अहो नमोभक्तीत इतके आंधळे होऊ नका की सरळ लिहिलं ते समजत नाहीये. नमोची गरिबी डोक्यावर घेऊन नाचायचं आणि कन्हयाला म्हणाय्चं घर सांभाळ. दांभिकपणा बघा आधी मग बघा कोणाला काय सहन होत नाहीये ते. तसेही गरिबीतून पुढे आलेले नमो एकमेव नेते नाहीत भारतातले. तरी मी चहावाल्याचा मुलगा, मी चहावाल्याचा मुलगा असे स्वतःची टिमकी वाजवत स्वतःच फिरत असतात.

In reply to by तर्राट जोकर

इथे चहावाला पंतप्रधान झाला हे मला सहन होत नाही असा अर्थ काढलात
हे वाक्य खरे तर तुम्हाला उद्देशून नव्हते.. ते एक सर्वसामान्य विधान होते. पण असो, तुम्ही ते तुमच्यावर ओढवून घेतलेत. मर्जी तुमची. आम्ही काय बोलणार?

In reply to by तर्राट जोकर

हो बरोबर आहे. दोन मोठी माणसे बोलत असताना लहानांनी तोंड बंद ठेवायचे असते.. चुकले बर का. स्वारी.

In reply to by तर्राट जोकर

यालाच bias म्हणतात. आणि दुसरी गोष्ट - त्यांचं चहावाला किंवा त्याचा मुलगा असणं जेवढेवेळा मिडियाने काढलंय त्याच्या एक शतांशानेही त्यांनी स्वतः काढलं नसेल. भक्तही त्यात आलेच. आणि जशी टिपिकल भक्त शैली आहे तशी टिपिकल विरोधी शैलीही आहेच. तसं पाहिलं तर भक्तांच्या आणि विरोधकांच्या arguments मध्ये काहीही फरक नाही - कोक आणि पेप्सी जसे डोळ्यांवर पट्टी बांधून प्यायल्यावर सारखेच लागतात (हा त्यांच्यातल्या blindfold test चा निष्कर्ष आहे. गूगलून पाहू शकता.) तसंच आहे. त्यामुळे तुम्ही भक्तांकडे एक बोट केलंत तर तीन बोटं तुमच्याकडेही रोखलेली आहेत हे लक्षात ठेवा.

In reply to by बोका-ए-आझम

कसं आहे बोकाशेठ, ज्या लेवलचं आर्गुमेंट असेल त्या लेवलवर यायला लागतं. बाकी कट्टर भाजपसमर्थकांची (लक्षात घ्या इथे भक्त नाही म्हटलंय) एक ठराविक मानसिक बैठक आहे. एक टिपिकल स्टाईल आहे. त्यांच्यासाठी स्वतःची मतं हीच सत्य असतात. कुठे अडचण आली की हळूच भावनिक मुद्दे घुसडतात. हे फक्त मिपावर नाही तर जालावर अनेक ठिकाणी चर्चांमधे बघितलंय. उदा: तुमचं वरील वाक्य. भक्तांकडे बोट दाखवणारेच तिप्पट भक्त आहेत असे तुम्ही खुबीने सांगत आहात. त्यामुळे आपसूकच भक्तांकडे असलेलं एक बोट फारसं महत्त्वाचं नाही हे सूचित होतं. यावर बोलण्यासारखं भरपूर आहे पण असो. आता ब्रेक घ्यावा म्हणतो. जमलं तर लिहिन भक्तांची लक्षणे. धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

तुमच्यासारखा ज्ञानी माणूस मिपावर आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. जरा ज्ञानाच्या पुढे जाऊन बघा. कन्हैया विद्यार्थी आहे. त्याने जेएनयू मधे प्रवेश विद्यार्थी म्हणुन घेतला आहे, जर हे चुकीचे असेल तर मग त्याला राजकारण करायला डाव्यानीच पाठवले असा तर्क निघतो. घरची स्थिति हलाकीची असताना हां फ़क्त अभाविपला जेएनयू पासून लांब ठेवायचे म्हणुन राजकारण करत आहे. त्याने प्रथम आपली पीएचडी पूर्ण करावी ज्यासाठी तो भारत सरकारचे पैसे घेत आहे. एकदा डॉक्टरेट हातात आलि की मग पाहिजे तेवढे उकिरडे फुंक ना! काश्मीर हां नेहमीच ज्वलंत मुद्दा राहिला आहे. जिथे आपण हजारो जवान गमावले आहेत. काश्मिर फुटिरतावाद्याना समर्थन हे मी देशद्रोह समजतो, तुम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र समजत असाल. अशा फुटिरतावाद्याच्या खांद्याला ख़ान्दा लावुन हां आजादीच्या गोष्टी करतो. मग या देशातल्या 70% बहुसंख्य हिंदुच्या श्रद्धेशि खेळणाऱ्या महिषासुर शहीद दिवसाचा तो एका शब्दाने विरोध करु शकत नाही. प्रश्न महिषासुर शहीद दिवस साजरा करण्याचा नाही, साजरा करायला तुम्ही कुंभकर्ण, दुर्योधन, शकुनि, मारीच हे सगळे दिवस साजरे करा पण जी भाषा पत्रकात दुर्गेविषयी वापरली आहे ती घाणेरडी आहे. हेच जर दुसऱ्या धर्माच्या आस्थेबरोबर हिन्दुनि केले असते तर असहीष्णुतेचा पुर वाहला असता. कन्हैयाचे तोंड आतापर्यन्त फुटले असते. तो भलेही 2015 साली आला असेल पण चुकीच्या गोष्टीचे उदात्तीकरण करण्यार्या पवृत्तिला तो खतपाणि पण घालत आहे. ढ

In reply to by भंकस बाबा

या देशातल्या 70% बहुसंख्य हिंदुच्या श्रद्धेशि खेळणाऱ्या महिषासुर शहीद दिवसाचा तो एका शब्दाने विरोध करु शकत नाही. सत्तर फत्तर काही नाही!! त्या 70% हिंदुं मधले बहुतांशी भाकरी ,नोकरी ,लोकल च्या वेळा ,बॉस चा उद्धार वगैरे करत जगत असतात माफक प्रकारे धर्म फॉलो करत असतात (वर्षात एकदा कुलदेवतेला नारळ वगैरे), त्यांना उगाच तुमच्या दुखावलेल्या भावनाना वजन प्राप्त व्हावे म्हणून जोडून घेऊ नका अन गृहीत ही धरु नका, अन इतकेच ठाम असेल तर ते पुराव्याने शाबित करा की "70% हिंदूंच्या" भावना दुखावल्या आहेत, मिपावरची 4 भड़क टाळकी म्हणजे 70 % हिंदु नव्हेत.

In reply to by नाना स्कॉच

या देशातल्या 70% बहुसंख्य हिंदुच्या श्रद्धेशि खेळणाऱ्या महिषासुर शहीद दिवसाचा तो एका शब्दाने विरोध करु शकत नाही.
या वाक्याचा मला जाणवलेला अर्थ हा आहे - जी बहुसंख्य हिंदूंचं श्रद्धास्थान आहे -दुर्गा - त्यावर जो हेतुपुरस्सर हल्ला केला गेला (२०११ पासून साजरा केला जातोय महिषासुर शहीद दिवस आणि त्याच्याशी कन्हैयाचा संबंध नसेल किंवा तो त्यात सहभागीही नसेल) त्याचा तो विरोध करु शकला असता. तो त्याने केला नाही. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून तो आपला विरोध दाखवू शकला असता पण त्याने तसं केलं नाही. कदाचित त्यामुळे तो आपल्या बाजूचा आहे असा निष्कर्ष त्या महिषासुर शहीद दिवस साजरा करणाऱ्यांनी काढला असेल, पण त्याने त्यांचा गैरसमज दूर करण्याचाही प्रयत्न केला नाही. बाकी ७०% वगैरे राहू दे. जेवढं ते विधान अतिशयोक्त आहे तेवढंच तुमचं
त्या 70% हिंदुं मधले बहुतांशी भाकरी ,नोकरी ,लोकल च्या वेळा ,बॉस चा उद्धार वगैरे करत जगत असतात माफक प्रकारे धर्म फॉलो करत असतात (वर्षात एकदा कुलदेवतेला नारळ वगैरे),
हे विधान अतिशयोक्त आहे. अजिबात कर्मकांड न करणारा हिंदू हा कट्टर असू शकतो आणि दररोज दोन तास पूजा करणारा हिंदू हा liberal असू शकतो. किती टक्क्यांच्या भावना आणि कशा दुखावतात हे आपण निश्चितपणे कधीच सांगू शकत नाही. तस्मात राहू द्या.

In reply to by तर्राट जोकर

इकडे निर्दोष मुक्तता (जामिनावर नाही) तरी - "पुराव्या अभावी सुटका आहे हो! माणूसच हुशार तो कि त्याने पुरावा मागे सोडला नाही. पण हाच खरा सूत्रधार" असा प्रचार होतो. तुम्ही काय हे बंडल जामिनावर सुटलेल्या लोकांचे समर्थन करताय !? जोपर्यंत मिडिया (यात सोशल मिडीयापण आला) आणि विचारवंत या सर्वोच्च न्यायाधिकरणाने निर्दोष ठरवत नाहीत तोपर्यंत सगळे जण दोषीच! उल्टा बील्टा सब झूट.

In reply to by विवेक ठाकूर

विडंबन टाकुन कन्हैया देशद्रोही नाही सिद्ध करत आहेत.. भरमसाठ मोठे मोठे प्रतिसाद आलेत ना त्याच्या "भारत" विरोधी नार्‍यांवर.. पुन्हा ती चर्चा कशाला? पण तुम्ही लिहीलेले वाक्य कन्हैया विषयी आहे का? नाही ना? अफजल गुरु विषयी आहे ना? तुम्ही एवढंच सांगा की मोदींना विरोध हे अफजल गुरुला देशद्रोही ठरवण्याचे कारण कसे होते?

In reply to by पिलीयन रायडर

पिरातै, तुम्ही फारच अपेक्षा ठेवताय असं नाही वाटत? डोक्यावर पडायला मुळात डोकं असावं लागतं. आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त काही Amnesty Plan आहे का?

मधील (आगामी ) खणखणीत संवाद मिपाकर संपादक: ठाकुर ये विवेक मुझे दे !!! समीक्षक विचारवंत :नही, नही ,कभी नही (अगर होता तो देता ना!) शोले प्रेमी नाखुस सिनेमावाला.

मला मोदीभक्तांच कायम कौतुक वाटतं ते ह्याच कारणासाठी. जो त्यांच्या विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल गुरु!). >> ह्या वाक्याचा मला समजलेला अर्थ. जो त्यांच्या (मोदीभक्तांच्या) विरोधी तो देशद्रोही (इथे अफजल) पार्ट वन अफझल = देशद्रोही. मोदीभक्त = देशभक्त (स्वयंघोषित) कन्हय्या = मोदीविरोधी कन्हय्या = अफजल समर्थक (संशयित) मोदीभक्तांसाठी >> कन्हया (अफझल समर्थक) = अफझल समकक्ष. म्हणजे कन्हया= अफझल. म्हणजे जो जो मोदीविरोधात आहे तो अफझल गुरुसारखाच कट्टर देशद्रोही ठरवला जातो. अफझल गुरु हे एक विशेषण म्हणून घेतलंय काय ठाकूर साहेब? क्या मै सही समझ रहा हुं?

In reply to by विवेक ठाकूर

मला समजले पण भक्तांना कोलित मिळालंय तुम्हाला छळायला. आता गावलात, स्वस्तात नाय सुटणार तुम्ही. ;-)

In reply to by मोदक

सरसकट शब्द फार आवडीचा दिसतो तुमच्या? (अर्थात ह्या प्रश्नात सरसकटीकरण आहे हे मान्य. ;-) )

In reply to by तर्राट जोकर

हो आहे आवडीचा. आणि तुमच्याशी बोलताना वारंवार वापरावा लागतो. (हे सरसकटीकरण नाहीये हा!) :)

In reply to by तर्राट जोकर

अफझल समर्थक = मोदीविरोधी हे बाकी लाखात एक बोललात.. मुळात कन्हैयाने मोदींच्या विरुद्ध चकार शब्द देखील काढला नव्हता. तरी पण त्याला मोदीविरोधक म्हणून लेबल लावण्याचा तुमचा प्रयत्न तुमच्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर हळूहळू कमी करत चालला आहे. विठा बोलता बोलता त्यांची लेखणी सरकली. आता त्या सरकलेल्या लेखणीबद्दल मोकळ्यामनाने माफी मागतील की नाही? पण त्याचे ते निलाजरेपणे समर्थन करत सुटलेत आणि तुम्ही पण त्या चिखलात पडून आपले तोंड बरबटवून घेताय? असो, मी काय लिहिणार? किमान तुम्ही ज्या वाक्याचे समर्थन करायला उतरला आहात त्याचा वाच्यार्थ तरी बघा. लेखणी सरकलीय वो.. लेखकाने प्रांजळपणे ती सरकलीय हे कबूल केले की झाले. पण काय करणार, गिरे तो भी टांग उपर. त्यांचा पूर्वजन्म पाहता हे साहजिकच आहे.. तुम्ही तरी बहकू नका म्हणजे झाले. बाकी तुमचा पण पूर्वजन्म तसाच असेल तर मग काय बोलणार?

In reply to by आनन्दा

अफझल समर्थक = मोदीविरोधी असे नाही ते. मोदिविरोधी ते अफझल समर्थकच असे भक्तांचे लॉजिक. समिकरणं कशीही मांडली तर बरोबरच येत नाहीत. कोणी लिहलंय ह्ह्यापेक्षा काय लिहलंय हे बघितलं तर जास्त बरं होईल. मी कोणाच्याही वाक्याचं समर्थ्न करत नाही. ठाकूरांनी लेखणी सरकली हे मान्य केलं तर मला काही समस्या नाही. पण ती सरकली नसावी व त्यातून सरळ जो अर्थ निघतोय तो तसा नसावा हे माझं मत. त्यांनी सरकल्याचं मान्य केलं तर माझं मत मागे घेईल. मुळात कन्हैयाने मोदींच्या विरुद्ध चकार शब्द देखील काढला नव्हता. तरी पण त्याला मोदीविरोधक म्हणून लेबल लावण्याचा तुमचा प्रयत्न.... >> कन्हयाने मोदींच्या विरोधात नाही? जामिनावर सुटल्यानंतरचे भाषण ऐकले नाही काय? मी कशाला कोणाला लेबल लावण्याचा प्रयत्न करु? बाकी कशाचे काय अर्थ काढायचे हे ज्याने त्याने ठरवावे.

In reply to by तर्राट जोकर

ते सुटल्यानंतर.. त्याला तुरुंगात टाकण्याचे कारण त्याने मोदींचा विरोध केला हे नव्हते..

In reply to by आनन्दा

कुणी टाइमलाईन ऑफ इवेन्ट्स बघत नसेल तर तो माझा दोष नाही. कन्हयाचे संघाच्या (संघ, भाजप, अभाविप, मोदी, इत्यादी) विरोधात असणे अफझलगुरु प्रकरणाच्या आधीपासून आहे. त्याचे प्रेसिडेन्शियल इलेक्शनसाठीचे भाषण ऐका. त्यानेच भारतविरोधी घोषणा दिल्यात हे अजून सिद्ध झालेले नाही हे लक्षात असू द्यावे.

In reply to by तर्राट जोकर

जर मोदींना विरोध केला म्हणून त्याला तुरूंगात टाकायचं असतं तर जेएनयु मधील निवडणुकीतील भाषणानंतरच लगेच त्याला आत टाकलं असतं. ती निवडणुक होऊन बरेच महिने लोटले. त्यात कोण निवडून आले, त्यांनी काय भाषणे केली इ. ची जवळपास कोणत्याच माध्यमातून चर्चा झाली नाही. ९ फेब्रुवारीला हुतात्मा अफझल गुरूच्या तिसर्‍या महानिर्वाणपर्वाच्या दिवशी जो कार्यक्रम जेएनयुत झाला, त्या कार्यक्रमामुळेच त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मोदींवर टीका केल्याने नव्हे.

In reply to by तर्राट जोकर

मोदी,भाजप यांना विरोध हा तुमचा एककलमी कार्यक्रम आहे हे मान्य,पण राबवताना त्यांच्या विरोधात जी व्यक्ती,संघटना कुठल्याही मुद्द्यावर विरोध का करेना. अश्या व्यक्ती,संघटना तुमच्या मित्र असल्यासारखे का वागतंय हे खरच कळत नाही ? दुश्मन का दुश्मन याने मेरा दोस्त हि वृत्ती का दाखवत आहात ?

In reply to by lakhu risbud

तुम्ही कसं बघता यावर सगळं डिपेन्ड करतं. जे एन यु प्रकरण फक्त देशविरोधी घोषणांपुरतं मर्यादित नाही. बडी लंबी और मोटी कहानी है, बहुत सारे साइडट्रॅक्सभी है. असो.

In reply to by तर्राट जोकर

तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असलेला तुमचा डायहार्ड फैन. जरा आम्हा निर्बुद्ध लोकांना पण कळू दे राजकारण.

In reply to by तर्राट जोकर

तुमची मते हेच अंतिम सत्य आहेत. तुम्ही जिंकले. अभिनंदन!
मी जे लिहिले आहे त्या घडलेल्या घटना आहेत. आणि इतक्या लगेच तलवार म्यान करू नका हो.

In reply to by तर्राट जोकर

माझी काहीच अपेक्षा नाही. इतक्या लवकर शस्त्रे म्यान केलीत म्हणून आश्चर्य वाटले. असो.

In reply to by तर्राट जोकर

जे मोदीविरोधी ते अफझल समर्थकच असं कुठेही म्हटलेलं नाहीये. लोकसभेतले विरोधी पक्षाचे खासदार, डावे, मोदींचे त्यांच्या स्वतःच्या पक्षात असलेले विरोधक हे सगळे मोदींचे विरोधक आहेत आणि त्यांना मोदींना आणि त्यांच्या धोरणांना विरोध करायचा पूर्ण अधिकार आहे. घटनेने दिलेला. त्यांना by default अफझल समर्थक कोणीही म्हटलेलं नाहीये. उगाचच वाट्टेल ते अर्थ इतरांवर लादू नका.

In reply to by बोका-ए-आझम

साहेब, हा अर्थ मी नाही तर श्रीमान श्रीगुरुजींनी हा धागा टाकून काढलाय. अन्यथा कन्हयाच्या धाग्याचे अफझलचा धागा काढून शब्दटूशब्द विडंबन करणे ह्याचा अर्थ तुम्ही सांगा. तुम्ही सांगितलेला अर्थ योग्य असेल तर बिनशर्त माफी मागेन. प्रॉमिस. आणि हे माझे प्रॉमिस आहे, भाजपाच्या जुमला सर्कारचे नाही.

In reply to by तर्राट जोकर

खुद्द लेखकानं त्याचा हेतू स्पष्ट केलायं : मग "कन्हैय्या कुमार: वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!" असले फालतू धागे काढून देशद्रोह्यांचा उदोउदो करणे बरोबर आहे का? पण हे स्वतःच्या पिताश्रींचं संकेतस्थळ असल्याच्या थाटात वावरणार्‍या भ्रमिष्टांना ते दिसण्याची सुद्धा शक्यता नाही. कळण्याची तर गोष्टच दूर.

In reply to by विवेक ठाकूर

हे आमच्या पिताश्रींचं संकेतस्थळ नसूनपण जर आम्ही असे वावरतो, तर खरोखर आमच्या पिताश्रींनी संकेतस्थळ काढलं, तर तुमचं काय होईल!

In reply to by विवेक ठाकूर

पण हे स्वतःच्या पिताश्रींचं संकेतस्थळ असल्याच्या थाटात वावरणार्‍या भ्रमिष्टांना ते दिसण्याची सुद्धा शक्यता नाही. कळण्याची तर गोष्टच दूर.
प्रथम दर्शनी या वाक्याचे स्वरुप व्यक्तिलक्ष तर्कदोषाचे आहे. मी या धाग्यावरची संपूर्ण चर्चा वाचलेली नाही, व्यक्तिगत टिकेतून आपल्या बाजूचे समर्थन होते का या बद्दल साशंकता वाटते.

In reply to by माहितगार

मी या धाग्यावरची संपूर्ण चर्चा वाचलेली नाही, व्यक्तिगत टिकेतून आपल्या बाजूचे समर्थन होते का या बद्दल साशंकता वाटते. >> सिलेक्टीव प्रतिसाद वाचून मत देणे हेही व्यक्तिलक्ष तर्कदोषाचे लक्षण असावे काय?

In reply to by तर्राट जोकर

कमाल आहे. तुम्हाला आता नसलेलही दिसायला लागलंय.
जे मोदीविरोधी ते अफझल समर्थकच असं कुठेही म्हटलेलं नाहीये. लोकसभेतले विरोधी पक्षाचे खासदार, डावे, मोदींचे त्यांच्या स्वतःच्या पक्षात असलेले विरोधक हे सगळे मोदींचे विरोधक आहेत आणि त्यांना मोदींना आणि त्यांच्या धोरणांना विरोध करायचा पूर्ण अधिकार आहे. घटनेने दिलेला. त्यांना by default अफझल समर्थक कोणीही म्हटलेलं नाहीये. उगाचच वाट्टेल ते अर्थ इतरांवर लादू नका.
हा अर्थ मी धाग्यात कोठे काढलाय ते दाखवता का जरा?

In reply to by श्रीगुरुजी

कन्हयाच्या धाग्याचे अफझलचा धागा काढून शब्दटूशब्द विडंबन करणे ह्याचा अर्थ तुम्ही सांगा.

हा धागा म्हणजे "एखादा वराहासारखी घाण करतो" हे सांगण्यासाठी "स्वतः वराहासारखे ****त लोळून दाखवणे."

http://www.newindianexpress.com/thesundaystandard/Kanhaiya-was-Aware-of…
Kanhaiya was Aware of 'Anti-India' Event: JNU Registrar
University registrar Bupinder Zutshi, diposing before the high-power enquiry committee constituted by Vice-Chancellor Jagadesh Kumar, has said that Kumar was against the authorities’ decision to cancel the ‘anti-India’ programme. “At around 16:42 hours (on February 9), I got a call from the mobile number 9********7. The caller said, ‘Sir, I am Kanhaiya Kumar speaking, why did you withdraw the permission for the cultural event as the organisers are the same who have got requisite permission for organising the event?’” The registrar’s deposition, accessed by The Sunday Standard, indicates that the student union president was aware of the ‘anti-national event’ beforehand. Zutshi further stated that he told Kumar that he had not given any permission to organise any event. “It is the DSW who gives permission. So I handed the mobile to DSW and asked him to talk to students,” said Zutshi. Before the interrogators, Kumar had said that he was in his room till 5 pm and was not aware of any such ‘anti-national’ activities on the campus. The interrogation report of Kumar states that he only came to know about the event through some of his friends sitting outside the Brahmaputra Hostel at around 5 pm when he woke up and went outside to have snacks and tea. Contrary to it, Zutshi told the enquiry committee, “I had called a meeting of JNSU in my office at 3 pm on February 9 to discuss the route for the new bus acquired by JNU for disabled students. Mr Kumar and Mr Rama Naga reached first. Around 3 pm and we had a discussion on the bus route. After 10 minutes, Mr Saurav Sharma (ABVP member and JNSU joint secretary) also came.We all discussed the bus route for 10 minutes.” Zutshi said Sharma told him that he wanted to talk about some serious issues which were about to happen on the campus. Both Kumar and Naga were sitting there. “Sharma showed me a pamphlet regarding the ‘cultural event’ on ‘judicial killing of Afzal Guru’ and said some of the students are organising this event today (February 9, 2016) at 5 pm at Sabarmati Dhaba,” Zutshi told the committee.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी मी दीपक चौरीसिया च्या लाइव डिबेट ची लिंक दिली आहे त्यात तुम्ही वरती जे दिले आहे ते कनैह्या स्वतः काबुल केले आहे , त्याच्या मुलाखती मधून थोडक्यात आशय असा निघतो कि उमर चा एका प्रश्न लक्षात घेण्या जोगा आहे त्याने आपले पोस्टर विद्यापीठात लावले होते व प्रशासनाला हा कार्यक्रम काय आहे हे सांगितले होते तरीही प्रशासनाने आधी परवानगी दिली मग कार्यक्रमच्या आधी १ तास ती रद्द का केली मुळात रोहित च्या पार्श्वभूमीवर अश्या वादग्रस्त कार्याक्रमाल्ला परवानगी सुरवातीला देणे ही प्रशासनाची चूक ह्या कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मिडिया वर होते अभाविप ने ह्याचा विरोध केला व ह्या कार्यक्रमाला आम्ही विरोध करणार हे प्रशासनाला सांगितले ह्यामुळे कायदा सुव्यवस्था थोडक्यात प्रकरणातील गंभीरता पाहून हा कार्यक्रम आयत्यावेळी रद्द झाला चेकाळलेले उमर व कनैह्या ह्यापैकी अध्यक्ष कनैह्या ने प्रशासनाला जाब विचारला समाधान कारक उत्तर कानैह्याला मिळाले न्हाई म्हणून प्रशासनाला फाट्यावर मारून कनैह्या उमर ह्यांनी संयुक्तीपणे कार्यक्रम सुरु केला. ह्यात कानैह्याने आपल्या पक्षाचे गीत म्हटले ,भारत विरोधी नारे दिले न्हाई मात्र उमर तेव्हा गप्पा बाजूला उभा होता पुढे जेव्हा उमर चा कार्यक्रम सुरु झाला भारत विरोधी घोषणा सुरु झाल्या तेव्हा अभाविप आली व प्रतुत्तर देण्यास सुरवात झाली तेव्हा कनैह्या चा समूह उमरचे कवच कुंडल बनून अभाविप ला थांबविण्याचे काम करत होता ,केंद्र सरकर ने अत्यंत हुशारीने सुरवातीचे काही दिवस काहीही न करता पुरावे गोळा करायला सुरवात केली जे कोर्टात येतीलच पण ह्या चार दिवसात कनैह्या व उमर हे बेफाम झाले , प्रत्येक टीव्ही चेनेल मध्ये येउन लाइव डिबेट मध्ये बडबड केली हीच बडबड कानैह्याला नडणार आहे उदा मी दिलेल्या लिंक मधून स्पष्ट अर्थ निघतो कि केवळ अभाविप मुळे हा कार्यक्रम थांबला म्हणून कनैह्या ने उमर ला मदत करायचे ठरवले माझ्यामते उमर चा कार्यक्रम सुरवातीला प्रशासनाने रद्द केला असता तर कनैह्या ने एवढे सक्रिय सहभाग घेतला नसता कदाचित कनैह्या चे अटक होण्याच्या पूर्वी अनार्ब , सरदाना ते दीपक चौरसिया ह्यांच्या कार्यक्रमात मुलाखतीत चीड आणणारी गोष्ट अशी कि माझ्या उमरच्या विचारांना पाठिंबा नाही मात्र त्यांना त्यान्ह्चे विचार मांड्यांची मोकळीक आहे ही त्यांची भूमिका आणि अभाविप चे गुंड मध्ये येउन हा कार्यक्रम कसा थांबतात हा सवाल , थोडक्यात उमर काय वाट्टेल ते बोलो मला काय त्यांचे सोयरसुतक नाही पण अभाविप विद्यापीठात सोकाळता कामा नये हा मुलगा जेल मधून बाहेर आला व भाषणबाजी केली करण थापर ने अनुपम फेम प्रसिद्ध जस्टीस गांगुली व इतर लोकांना बोलावून कनैह्या साठी कार्यक्रम केला. त्यात सुरवातीला कनैह्या च्या कार्यक्रमात काही लोक अध्यापक गिलानी साठी बोर्ड घेऊन होते ह्य्मुळे कानैह्याला काही त्रास होईल का अशी विचारणा केली त्यांनतर पध्धतशीर पणे कनैह्या साठी जस्टीस राणी ने कसा चुकीचा निर्णय अंतरीम जमीन देतांना दिला ह्यावर आख्यान सुरु झाले , ह्यात सगळ्यात दुर्दैवी गोष्ट जस्टीस गांगुली ह्यांना आपल्या सहकार्यांनी अफजल ला दिलेली फाशी चुकीची वाटली तिथे त्यांना कनिष्ठ न्यायाधीशांचा निर्णय कसा पटेल , त्यांनी जे करण दिले ते मला अंतर्मुख करून केले ह्या देशात देशद्रोहाची कायद्यात उल्लेख नाही व्याख्या नाही म्हंणून पूर्वी जे अश्या संधर्भात निर्णय देतांना कोर्टाने निरीक्षणे नोंदवली त्याचा दाखला त्यांनी दिला ह्यासाठी देशविरोधी नारे हा देशद्रोह नाही हा लाडका सिद्धांत देखील मांडला , अमेरिकन petrioat सारख्या कायद्याची भारताला किती नितांत गरज आहे ह्याची जाणीव झाली

In reply to by श्री गावसेना प्रमुख

कन्हैय्या च्या प्रकरणात समर्थन करणाऱ्यांची संख्या जर बघितली तर मला मोदींची काळजी वाटायला लागते,पुढच्या इलेकशन ला मोदी पक्के हरणार आणि मूलनिवासी हे प्रचंड बहुमताने निवडणार आणिमोदींना जेल मध्ये टाकतील।