Skip to main content

डाक्टर डाक्टर-2

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 06/03/2016 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपला भारत देस लैच झक्कास. इथलचि लोकं (मजी मह्या गावातलीच) सगळ्यात भारी. त्याहीचे इच्चार, वागणूक- बिगनुक, कामं-धंदे एकदम जबरदस्त. अपुन त्याहीचे एक नंबर फॅन. बिचारी दावखान्या मोहरुण जाताना आदबीनि वाकुन 'राम-राम' घालत्यात. वाटात कुढं भेटली की लग्गीच् "काय डाक्टर साहेब? बरं हाय ना?" असं इच्चारतात. आपल्याला त् भौ त्यहिच्या कडून तपासायची फि घ्यायची बी इच्छा हूत नै. पर मनलं आपल्याला बी पोट हाय, मनुन आलं पेशंट की आपुण तेला पैलं सलायण लावतु अन सलायणचं अन त्यात सोलड्याल्या इंजकशनाचं तेवढं दोन अडीचसं रुपय घेतु बाकी भायेरच्या डाक्टरवानी तपासा बिपासाचा एक रूपा लावत नै. अन ती बिचारी देतात बी. खरच भारत लै मस्त देस हाय! एकदम प्रेमळ! आपुण त् भौ इथं एकदम सूट झालोत. मोठ्या लोकांत उठबस असल्यामुळं गावांत आपल्याला मानमरताब बी हाय अन कुणी आपल्या आड्यात बी जात नाय. वरून आपला धंदा बी जोरात चालतु. तेवढं सुगीच्या दिसात थोड़ा डिम असतुया पर पाउसकळयात सगळं भरून निघतं. अन त्यातली त्यात आंब्यानी साथ दिली त् पाउसकळयाच्या तोंडालाच, ढाळ-उलट्यात्, वरीसभराचा धंदा होऊन जातुया. पैलं, साळंत असताना, कुणी आवडता ऋतू इच्चारला की आपुण उन्हाळा सांगायचो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुळं. पर आता आपला सगळ्यात आवडता 'पाउसकळा' हाय. लय चानस मिळतो, पेशंट लोकायची शेवा करायचा. त्याचं होतं काय की पाउसकळयात उलशिक का होईना पर पाऊस पडतुच. मंग सगळीकडं चिकचिक होऊन जाते. सगळीकडं गवत उगतं. अन मंग, संडास बाथरूम बांधायला सरकारनी दिलेलं पैसं लगीनसराईत उडाल्यामुळं अख्ख्या गावातल्या बायायला, माणसायला, लेकरायला त्या गवतात हगायला जावं लागतं. खायला भेटल्यार गवतातल्या माश्या, कीड़े टनक हुतात अन वारं आलं कि गावात शिरतात. त्याहिचा मोर्चा पाण्याकड़ं वळला कि लोकायाला हगवनी लागतात मंग ते अजुन गवतात जातात अन माश्या-किड्यायला अजुन टनक करतात. हे असलं चक्र चालु झालं की मही परेशानी चालु व्हती. सलायणीच्या बाटल्या आणाव्या लागतात, खाटं वाढावी लागतात. त्यांच्यात अजुन कही गोळ्या इंजिकशनं कमी पलड़ी की मंग तालुक्याला पळावं लागतं. मंग अश्या टायमाला पेशंट लोकायचे हाल होउ नै मनुन अन त्याहिनी वरल्या आळीच्या डाक्टरकडं जाउ नै मनुन म्या मह्या सख्ख्या बायकुला दुकानात हे मजी आपलं दावखान्यात बसिवतो. तीसरीपोतच साळा शिकल्यामुळं तिला अजुन अक्षरं फूटत नैत तव्हां गावातल्याच् एखाद्या पाचवी सहवीच्या पोराला दहा इस रुपये दिउन तिच्याबर, गोळ्याच्या बरन्यावरची नावं वाचाया बसिवतो. पर पेशंटच्या शेवेत कसलीच कमी पडु देत नाय. तिला बी आता दावखाना चालाया जमतुया मनुन सगळा पाउसकळा आमी एक बी गीरायिक मजी आपलं पेशंट भाईर जाउ देत नै. तसं मागल्या एका पाऊसकळयात तिच्याकडून उलशिक गड़बड़ झालती पर म्या समदं निपटुन कालढं. त्याचं झालं असं की म्या गेलतु तालुक्याला. ति दावखाना उघडून बसलेली. तेवढ्यात एक हगवन मजी गैस्ट्रो होऊन हातघइला आलेलं पेशंट आलं. तिला बिचारीला वाटलं, हे पेशंट सलायन लाउन इथच तासभर ठुलं त् साऱ्या गादिवर हागुण ठुइन अन मंग आपल्यालाच धुइत बसावं लागन. मनुन त्या पेशंटला, आडमिट नै करता, तिना एक गिलासभर सलायन प्यायला दिली. आता ति बिचारी अडानी तिला काय कळतय! पर त्या पेशंटला अक्कल नवती का? त्यानं कश्याला प्यावी? ते गधाडं गटा गटा सलायन पेल्ं अन लागलं वकायला. डोळे गिळे पांढरं करुन पलडं. पर तेवढ्यात म्या आलु मनुन जमलं. सरपंचाच्या स्कारपीओत घालुन तेला अर्जेंट तालुक्याला नेला. मजी सांगायचं हेच की ति बी असल्या छोट्या छोट्या गोस्टीतुन चांगलीच हुशार झालीय. त् हेव असा पाउसकळा. आता तेच्यात बी कही शेहरात जाउन आलेली शेकड़ी लोकं हाइत. लै शिष्ट. सारखी ग्रामपंचयतीच्या मागं लागतात. आता पगारी जरी भेटत असल्या तरि त्याहिचा जनम काय लोकायाच्या नाल्या- मुताऱ्या काढायसटी आणि लोकायच्या हमाली करायसटी झालाय काय? माणुसच् माणसाच्या घाणी कामुन काढ़नार? पर ती शेकड़ी ऐकत नैत, नाल्या काढुनच घेतात. ही असली शेकड़ी सोलडी तर बाकी भारत ग्रेटच्! इथला हवामान बी ग्रेट! इथला पाउसकळा बी ग्रेट!
लेखनविषय:

वाचने 3130
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

:) माझ्या वडीलांच्या लहानपणी गावात एक भोंदू डॉक्टर म्हणजे मुन्नाभाई आले होते. ते आलेल्या प्रत्येकाला सलाईन लावायचे. शेवटी जागा कमी पडली म्हणून बाजा लिंबाच्या झाडाखाली लावून तिथेच सलाईन लावायचे. एकाला सलाईन गुडघ्याला लावलं. पेशंटचं आता काय खरं नाही हे कळल्यानंतर त्याला पुण्याला जायला सांगितलं. नंतर काय झालं माहित नाही. पण ते मुन्नाभाई एकदम तुमच्या कथेतल्या डॉक्टर सारखेच होते. त्यांना पण आपला देश लई भारी वाटत असणार :)

In reply to by नाव आडनाव

:-)

:) मस्तच. असे खरे भोंदू प्रतेक्षात बघितलेत!

हहपुवा. भारी लिहीलंय.

In reply to by चाणक्य

हे 'हहपूवा' म्हणजे काय?

=)) ग्रेट डाक्टर!