न्यू झीलंडचे माजी क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांचे आज वयाच्या ५३ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!!
मार्टिन क्रो हे नाव माझ्यासाठी माझ्या लहानपणाच्या क्रिकेटवेडाने भारलेल्या दिवसांच्या अनेक आठवणी जागृत करते.
१९८७ च्या विश्वचषकातील भारताचा साखळीतला शेवटचा सामना होता न्यू झीलंड विरूध्द नागपुरात.या सामन्यात न्यू झीलंडला मोठ्या फरकाने मात देऊन 'अ' गटात पहिले स्थान पटकावणे भारतासाठी अगत्याचे होते.त्याचे कारण काय्?तर भारताचे दुसरे स्थान आले असते तर उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तानविरूध्द लाहोरमध्ये खेळावा लागला असता. आणि अर्थातच हे भारतीय संघाला नको होते.या सामन्याच्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात वाचले होते की भारताविरूध्दचा हा सामना जिंकून न्यू झीलंडचा संघ साखळीतले ६ पैकी ३ सामने जिंकेल असे कर्णधार मार्टिन क्रो ने म्हटले होते.आणि अर्थातच माझ्यासारख्या कट्टर क्रिकेटवेड्याला ते पटले नव्हते. आणि झालेही तसेच. हा सामना एका अर्थी अगदीच ऐतिहासिक ठरला.या सामन्यात चेतन शर्माने विश्वचषकातील पहिली हॅट-ट्रीक घेतली.आणि सुनील गावसकर यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये जे एकमेव शतक झळकावले ते याच सामन्यात.न्यू झीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच पिसे गावसकरांनी काढली होती.त्यात इव्हान चॅटफील्डच्या एकाच षटकात २१ धावा गावसकरांनी पिटल्या होत्या.त्याकाळी ५० षटकात २५० ही सुध्दा खूप मोठी धावसंख्या वाटे. अशा परिस्थितीत एका षटकात २१ धावा पिटणे म्हणजे किती महत्वाचे होते हे समजून येईल.त्याकाळी नवज्योत सिध्दू हा बराच फॉर्मात होता.श्रीकांत बाद झाल्यानंतर वन डाऊन सिध्दू फलंदाजीला येईल आणि प्रेक्षकांना चौकार-षटकारांची आतषबाजी बघायला मिळेल असे वाटले होते.पण गावसकरांना शतक करायला संधी द्यायची या उद्देशाने म्हणा की अन्य काही कारणाने सिध्दू ऐवजी महंमद अझरूद्दिन फलंदाजीसाठी वन-डाऊन आला होता.हे सगळे लिहायचा उद्देश म्हणजे भारताने हा सामना दणदणीत जिंकल्यानंतर आम्ही मित्रमंडळींनी मार्टिन क्रोंच्या वक्त्यव्याची चांगलीच टर उडवली होती. बहुदा २ नोव्हेंबर १९८७ हा दिवस होता तो.
१९९२ च्या विश्वचषकामधील मार्टिन क्रो यांची कामगिरी म्हणजे अगदीच अफलातून.ख्राईस्टचर्चच्या शेवटच्या साखळी लढतीत मार्टिन क्रो यांना पाकिस्तानविरूध्द फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती.साखळीतला तो एकच सामना न्यू झीलंडने गमावला. भारताविरूध्दच्या साखळी लढतीत किरण मोरे अचूक चेंडू टाकून आपल्याला धावबाद करू शकेल ही अपेक्षा नसल्यामुळे क्रो आरामात क्रीझबाहेरच उभे होते आणि चेंडूने यष्टी भेदल्यावर थोडेसे अवाकही झाले होते.ऑकलंडला पाकिस्तानविरूध्द उपांत्य फेरीच्या लढतीत मार्टिन क्रो यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना यथेच्छ धुतले.पण हा सामना गाजवला इंझमाम-उल-हकने.त्याने हा सामना अगदी एकहाती जिंकून दिला.
पुढे नोव्हेंबर १९९५ मध्ये जमशेदपूर येथील एकदिवसीय लढतीत भारताविरूध्द झळकावलेले शतक अगदीच लाजबाब. जंगजंग पछाडूनही मार्टिन क्रो यांना भारतीय गोलंदाजांना शेवटपर्यंत बाद करता आले नाही.याच दौर्यादरम्यान नागपूर येथील लढतीत नॅथन अॅस्टल आणि स्टिफन फ्लेमिंगबरोबरच मार्टिन क्रो यांनीही भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेऊन ५० षटकात ३४८ धावांचा डोंगर उभारला!!
नंतरच्या काळात क्रिकेटमधील रस बराच कमी झाला.आणि मार्टिन क्रो हे नावही तसे विस्मृतीतच गेले.मी २०१५ च्या विश्वचषकातही अजिबात रस घेतला नव्हता.तरीही त्या दरम्यान एक बातमी आली आणि त्या बातमीने लक्ष वेधलेच. ती बातमी होती मार्टिन क्रो यांना कर्करोग झाला असून काही महिन्यातच वाईट बातमी येणार!! ही बातमी वाचून खरोखरच वाईट वाटले.पण काय करणार. ईश्वरेच्छा बलियसि. आपला काही इलाज नाही.
आजही मार्टिन क्रो म्हटले की १९९२ च्या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार म्हणून मिळालेल्या गाडीची चावी खुशीने स्विकारणारा पण त्याचवेळी न्यू झीलंड तो विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला याचा सल मनात असलेला एक उमदा क्रिकेटपटूच आठवतो.
मार्टिन क्रो यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

वाचने
4051
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
छोटेखानी लेख आवडला....
श्रद्धांजली
श्रद्धांजली
मला मार्टिन क्रो म्हटलं की
आदरार्थी
सहम्त
In reply to आदरार्थी by अत्रन्गि पाउस
मार्टिन क्रो यांना श्रद्धांजली.
१९९२ च्या
In reply to मार्टिन क्रो यांना श्रद्धांजली. by बेकार तरुण
धक्कादायक
मार्टिन क्रो जबरदस्त फलंदाज व
मार्टीन क्रो!
अरे हो
In reply to मार्टीन क्रो! by स्पार्टाकस
रिवर्स स्वीप
In reply to अरे हो by गॅरी ट्रुमन
रिव्हर्स स्वीपचा जनक
In reply to रिवर्स स्वीप by रॉजरमूर
काही उल्लेख चुकले आहेत...
हो
In reply to काही उल्लेख चुकले आहेत... by अभिदेश
वाईट वाटले
आर आय पी क्रो _/\_
श्रद्धांजली
१९९२ चा वर्ल्डकप..
श्रद्धांजली
मार्टिन क्रो ला विनम्र श्रद्धांजली!
मार्टिन क्रो च्या