Skip to main content

कणिक-नाचणी केक

लेखक इशा१२३ यांनी गुरुवार, 25/02/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
cake साहित्यः गव्हाचे पिठ : १ १/२ कप नाचणी पिठ : १/२ कप साखर : १ कप दुध : १ कप दहि : १ कप तुप : १/४ कप बेकिंग पावडर : १/२ चमचा केळ : २ व्हॅनिला इसेन्स : १/२ चमचा ट्रुटिफ्रुटि,सुकामेवा : २ चमचे sahity कृती : प्रथम गव्हाचे पीठ आणि नाचणी पीठ थोडे भाजुन घ्यावे.साखर दुधात विरघळुन घ्यावे.एका भांड्यात गहु पीठ,नाचणी पीठ,बेकिंग पावडर एकत्र करावे.त्यात तुप,दुध साखरेचे मिश्रण घालावे.हे सगळे साहित्य नीट एकत्र करून छान फेटुन घेणे.यात केळ बारिक कुस्करून नीट एकत्र करावे. p या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स व सुकामेवा मिसळुन छान एकत्र करावे.आता हे मिश्रण कपकेकच्या साच्यात वा तुप लावलेल्या केक भांड्यात ओतुन १८० डिग्री वर प्रिहिट केलेल्या ओवन मधे ३५ मि. ठेवावे. cup सुई केकमधे टोचुन पहावी.स्वच्छ सुई बाहेर आल्यास केक तयार!मस्त सुवास घरभर पसरलेला असेल. c आता हे कप केप खायला तयार.हवे असल्यास त्यावर क्रिम,चोकोचिप्स ई.लावुन सजवावे.मुलांना अतिशय आवडतात. cc * या केकमधे मैदा नाहि.कणिक,नाचणी अशी पौष्टिक पीठ असल्याने मनसोक्त खायला हरकत नाहि. *अंडे नाहि.त्यामुळे शाकाहारी लोक खावु शकतात. *दहि,दुध,तुप,केळ असे घरी सहजी उपलब्ध असणारे पौष्टीक पदार्थ वापरलेत. *सुकामेवा हवा तो वापरू शकता. न्याहारीसाठीहि असे गरमागरम कपकेक्स नक्किच आवडतात.

वाचने 15484
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

चला, मैद्याशिवायच्या केक ची पाकृ मिळाली, शिवाय नाचणीपीठ सुद्धा, सगळं हेल्दी. विकांताला करतेच.

अंडे लिहिता पण येईना

पहिल्या फोटोनेच गारद केलं. तुझ्या हातची रेसेपी चविष्ट असणारच,यात शंकाच नाही. मस्त!

पाहून तोंडाला पाणी सुटले

काय गोग्गोड रेशीपींचा पाऊसच पडलाय कि काय मिपावर? आता माणसानं किती ते जळायचं नुसतंच असं बघून? :(

पाकृ एकदम उपयुक्त आहे. सादरीकरण आवडले.

नाचणी + कणकेचे कपकेक्स फार मस्त दिसत आहेत, स्वाती

मस्त.. सुंदर सजावट केली आहे. ही पाकृ केळी न घालता कशी करावी? ;) बाकी, कपकेकला ३५ मिनिटे फार जास्त नाही होत का?

In reply to by रुपी

साधारण कपकेकला २५-३० मि.लागतात.पण यात कणिक असल्याने मी ५ मि.जास्त ठेवते.आणि छान होतात.(साधारण २५ मि. नी चेक करावे.आणि त्यानुसार ठरवावे.)केळ नसेल बापरायचे तर सुकामेवा जास्त घालुन करता येइल.वॅनिला इसेन्स आहेच.केळाची चव मात्र छान लागते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

नक्कि करुन पहिन, बिना मैद्या च्या केक पाकक्रुती साथि धन्यवाद!

यम्मी पाक्रु.

आता हे मिश्रण कपकेकच्या साच्यात वा तुप लावलेल्या केक भांड्यात ओतुन १८० डिग्री वर प्रिहिट केलेल्या ओवन मधे ३५ मि. ठेवावे.
ओव्हन किती वेळ प्री हीट करायचा असा प्रश्ण गृहमंत्रालयाकडुन विचारण्यात आलेला आहे.

हे मी नक्किच करणार. मफिन्स मोल्ड नाहियेत पण नुसता केक करीन....फोटो फारच तोंपासू आले आहेत.