साहित्यः
गव्हाचे पिठ : १ १/२ कप
नाचणी पिठ : १/२ कप
साखर : १ कप
दुध : १ कप
दहि : १ कप
तुप : १/४ कप
बेकिंग पावडर : १/२ चमचा
केळ : २
व्हॅनिला इसेन्स : १/२ चमचा
ट्रुटिफ्रुटि,सुकामेवा : २ चमचे
कृती : प्रथम गव्हाचे पीठ आणि नाचणी पीठ थोडे भाजुन घ्यावे.साखर दुधात विरघळुन घ्यावे.एका भांड्यात गहु पीठ,नाचणी पीठ,बेकिंग पावडर एकत्र करावे.त्यात तुप,दुध साखरेचे मिश्रण घालावे.हे सगळे साहित्य नीट एकत्र करून छान फेटुन घेणे.यात केळ बारिक कुस्करून नीट एकत्र करावे.
या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स व सुकामेवा मिसळुन छान एकत्र करावे.आता हे मिश्रण कपकेकच्या साच्यात वा तुप लावलेल्या केक भांड्यात ओतुन १८० डिग्री वर प्रिहिट केलेल्या ओवन मधे ३५ मि. ठेवावे.
सुई केकमधे टोचुन पहावी.स्वच्छ सुई बाहेर आल्यास केक तयार!मस्त सुवास घरभर पसरलेला असेल.
आता हे कप केप खायला तयार.हवे असल्यास त्यावर क्रिम,चोकोचिप्स ई.लावुन सजवावे.मुलांना अतिशय आवडतात.
* या केकमधे मैदा नाहि.कणिक,नाचणी अशी पौष्टिक पीठ असल्याने मनसोक्त खायला हरकत नाहि.
*अंडे नाहि.त्यामुळे शाकाहारी लोक खावु शकतात.
*दहि,दुध,तुप,केळ असे घरी सहजी उपलब्ध असणारे पौष्टीक पदार्थ वापरलेत.
*सुकामेवा हवा तो वापरू शकता.
न्याहारीसाठीहि असे गरमागरम कपकेक्स नक्किच आवडतात.
वाचने
15484
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा मस्त आहे पाकृ.
Aha....sahaj soppi kruti....
सहमत आहे
In reply to Aha....sahaj soppi kruti.... by Maharani
वॉव !!! यम्मी दिसतय :)
अ हा हा!!!!! भेटशील तेव्हा
+१००
In reply to अ हा हा!!!!! भेटशील तेव्हा by पिलीयन रायडर
मस्तच दिसताहेत केक्स...
मस्त
वाह सुगरण ईशा
केकू सजविलेकू मस्तकू!
मस्त दिसतोय केक
अरे देवा
जबरा आहे पाकृ आणि पौष्टिक.
यम्मी!
हायक्लास...!!!
वा!
मस्त!
क्लासी वन... मस्तच. आले की
पाकृ व फोटू आवडले.
रेसिपी आवडली.
केक
मस्तच... सोप्पी आहे पाककृती.
फारच मस्तं आहे पाककृती.
चच्..
उपयुक्त पाकृ
पाहून तोंडाला पाणी सुटले
वावा..
फोटो पाहून तोंपासु.
मस्त.. सुंदर सजावट केली आहे.
साधारण कपकेकला २५-३० मि
In reply to मस्त.. सुंदर सजावट केली आहे. by रुपी
जबरदस्त सुंदर!
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार!
धन्यवाद!
मस्त
आता हे मिश्रण कपकेकच्या
साधारण ५-७ मि .प्रिहिट करावा.
खल्लास
धन्यवादच_/\_