Skip to main content

"मान झुकव, परम ईश्वर आहे मी.."

लेखक नीलमोहर
Published on बुधवार, 02/03/2016
एक दिवस, फक्त एकच दिवस, सगळ्या तुझ्या जखमांचा हिशेब कर एक रात्र, फक्त एकच रात्र, कर विचार जरा, तुझ्यासोबत झाले काय स्वत:पासून लांब कुठवर धावशील, ती पहाटही आता निसटून चालली, कधी उठशील दुनियेने तुकडे केले तुझे, तुटत गेलास, स्वत:ला कुठवर तोडत राहशील.. घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला, मान झुकव, परम ईश्वर आहे मी, सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी.. देव आहे माझ्यात, देव आहे मीच. प्रत्येक स्पर्शामागे एक ओढ आहे, मैत्रीतही का तणाव आहे दुवा ही मीच, शाप मी, माझ्या जखमांत मला आराम आहे अर्धा उजेड, अर्धा अंधार, अर्धा जन्म नको असा राख करूस तू जे समजतोस तेच तू आहेस कर विचार जरा, हो जागा, सगळ्यांना जागे कर घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला, मान झुकव, परम ईश्वर आहे मी, सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी.. देव आहे माझ्यात, देव आहे मीच. हे चूक, ते बरोबर, ऐक माझे, नको विचार करूस हे नको घालू, ते नको बोलू, शक्य असेल तर तोंडच नको ना उघडू हे वाचू नको, ते ऐकू नको, मीच निवडेन, तुला तो हक्कच नको तुटत रहा, मिटत रहा, झुकायला शीक, झुकत रहा बास आता अजून नाही, आता अजून नाही, अजून नाही, आता अजून नाही बास अजून नाही, आता अजून नाही अजून नाही, आता अजून नाही, बास अजून नाही, आता अजून नाही अजून नाही, आता अजून नाही, बास अजून नाही घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला, मान झुकव, परम ईश्वर आहे मी, सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी.. देव आहे माझ्यात, देव आहे मीच. ** https://youtu.be/V-GWLZOVGvU बर्‍याच दिवसांनंतर हे गाणे पुन्हा बघण्यात आले.. पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाचा तोच इम्पॅक्ट पुन्हा एकदा अनुभवला.. अंगावर सरसरून काटा आला.. जबर तुफानी !! 'पाँच' या १९९९ साली तयार झालेल्या परंतु अद्यापी प्रदर्शित होण्याचे भाग्य न लाभलेल्या बॅन केलेल्या चित्रपटातील 'मैं खुदा' हे अफाट गाणे. अब्बास टायरवालाचे प्रभावी शब्द, विशाल भारद्वाजचे अविश्वसनीय संगीत, अनुराग कश्यपचे दिग्दर्शन, सगळा दारूगोळा खच्चून भरलेला, विस्फोट ठरलेलाच. हल्ली असहिष्णूतेच्या नावाने फार ओरड होत असते, आवाज उठत असतात,पण अनुराग कश्यपने सिस्टीम विरोधात लढण्याचं काम खूप आधीपासून सुरू केलंय, हे गाणंही त्याचाच एक भाग, अगदी आपल्या मनातलेच वाटावेत असे ते गाण्यातील विचार, काळाच्या कितीतरी पुढे असणारा हा एक माणूस आणि तसंच त्याचं कामही. अफलातून ! हा चित्रपट थिएटरमध्ये मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची खूप इच्छा होती परंतु ती शक्यता लांबपर्यंत दिसून येत नाही. सेन्सॉर बोर्डाने अतीव हिंसाचार, गुन्हेगारीचे समर्थन, अंमली पदार्थांचा वापर, द्वयर्थी संवाद, एकही सकारात्मक पात्र नसणे, कोणताही सामाजिक संदेश नसणे, या सर्व कारणांमुळे या चित्रपटावर बंदी घातली होती जी अजूनही उठलेली नाही. सेन्सॉर बोर्डाच्या स्पून फीडींग विरूध्द कायमच बोलले जाते आणि हे बोलणे अर्थातच वाया जाते, तो सारा मनमानी कारभार आहे. १८ वर्षांवरील सज्ञान व्यक्तिने काय पहावे, काय नाही, ती गोष्ट त्याच्यासाठी चांगली की वाईट हे ठरवण्यासाठी एक समिती असणे आणि या समितीने एका पूर्ण समाजाने काय पहावे काय नाही हे ठरवणे म्हणजे ... पणाचा कळस आहे. चित्रपट वाईटच असेल पण लोकांना ते बघू द्या, त्यांचे मत बनवू द्या, नाही पटला तर तेच बहिष्कार घालतील, चित्रपट थेटरात आठवडाही नाही काढणार, किंवा मग तुफान चालेल, कुणी सांगावे. असो. यावर कितीही रिकामा त्रागा करून काही उपयोग नाही. अर्थात चित्रपटातील काही सीन्स मी पाहिलेत त्यामध्ये प्रमाणाबाहेर हिंसाचार आहे, ड्र्ग्जचा अती वापर दाखवलाय, नैतिकता, नीतीमत्ता, माणूसकी या गोष्टींचा बेधडक चुराडा केलेला दाखवलेला आहे. ते ५-१० मिनिटांचे सीन्स पाहिल्यानंतर मला मळमळल्यासारखे होऊ लागले होते, पूर्ण चित्रपट पाहिल्यावर नक्की कसे वाटेल सांगणे कठीण. असे प्रकार लोकांना कितपत झेपतील हाही प्रश्न आहेच, तरी हॉलिवूडमुळे आपले प्रेक्षक बर्‍यापैकी निर्ढावलेत म्हणून बरं.शेवटी ज्याला झेपतं त्याने पहावे इतरांनी लांब रहावे. p1 हे गाणे नुसते ऐकतांना तेवढे प्रभावी वाटणार नाही कदाचित पण त्याचा दृश्य परिणाम जबरदस्त आहे, ते मोठ्या पडद्यावर पाहायला किती भारी वाटलं असतं याची आपण फक्त कल्पना करू शकतो. या गाण्यातील के.के.मेनन चा अभिनय निव्वळ जबरदस्त आहे. एक रॉक्स्टार देहबोलीतून, अभिनयातून तंतोतंत उभा केलाय त्याने, गाण्यातील त्याचा चेहरा, डोळे, आवेश, एक्स्प्रेशन्स.. कहर ! 'मैं खुदा' म्हणतांना त्याच्या डोळ्यांत आलेली विक्षिप्त, वेडसर झाक.. Awesome !! तो या गाण्यात फक्त अभिनय करत नाही तर त्यातील प्रत्येक शब्द अक्षरशः जगतो. सलाम या अवलिया कलाकाराला. एका गाण्यात त्याने एवढा जीव ओतलाय तर पूर्ण चित्रपटातील त्याचा अभिनय खतरनाकच असेल, असेल काय आहेच, आणि असा अभिनय जगासमोर येऊ नये ही फारच वाईट गोष्ट. गाण्यातील केकेचे नाट्यमय, नकारात्मक कॅरॅक्टर पाहून कोणलाही या माणसापासून कितीतरी हात लांबच रहावेसे वाटेल, मात्र त्याच वेळेस गाण्याच्या शेवटी शेवटी त्याने एक असा माणूसही उभा केलाय जो आयुष्यावर, समाजावर नाराज आहे.. तो हरलाय.. पूर्णपणे कोसळलाय आणि अशा या हरलेल्या, उदास, निराश माणसाला कोणीतरी जवळ घेण्याची, सावरण्याची खूप गरज आहे असेही आपल्याला वाटते. अशा दुहेरी भावनांचे द्वंद्व हा माणूस आपल्या मनात उठवतो.. हे अर्थातच केकेच्या उच्च कोटीच्या अभिनय कौशल्याचं यश. kk असे कलाकार म्हणजे केके मेनन, इरफान खान, रणदीप हूडा मला खूप आवडतात, त्यांच्या अभिनयातून, चित्रपटांतून खूप काही मिळतं, अभिनय म्हणजे काय ते कळतं. फक्त केके बद्दल बोलायचं तर त्याचे गुलाल, शौर्य, हैदर, लाईफ इन अ मेट्रो, मै मेरी पत्नी और वोह हे माझे काही आवडते चित्रपट. चित्रपटातील गाणी, दृश्यांतील रहस्यमय अंधारे वातावरण यामुळे सतत एक sense of doom जाणवत राहतो, अखेरीस यातील पात्रांप्रमाणे चित्रपटही तसाच destined to be doomed ठरावा हा फारच दुर्दैवी योगायोग. ** चित्रपट कोणी पाहिला असेल तर त्याबद्दलचे मत आणि विचार जाणून घ्यायची इच्छा आहे. चित्रपटाची टॅगलाइनः " Avoid life. It kills you in the end."

वाचन संख्या 10904
प्रतिक्रिया 67

प्रतिक्रिया

स्वगत : हिंदी सिनेमांत चालणा-या अर्थकारणाबाबत काही तर्क असल्याने....हिंदी सिनेमे बघणे आणि त्यावर चर्चा करणे कधीच सोडून दिलेले आहे. जितेंद्रच्या कवायती आणि साड्यांची, भांड्यांची, मडकेवाल्यांची दुकाने सुरु झाली आणि हिंदी सिनेमे बघायची हिंमत पण सोडली.

In reply to by होबासराव

मी चित्रहारपुरतेच जितेंद्रला सहन करायचो. सिनेमे बघायची हिंमत काही झाली नाही. जावूदे, धाग्याचे काश्मीर करायला आम्ही घाबरत नाही, पण ह्या धाग्याच्या बाबतीत, हे पातक नको.

केके, मनोज वाजपेयी,पियुष मिश्रा इत्यादी* "ॲक्टर" आहेत. बाकी तर केवळ "स्टार" आहेत. . . (*लिस्टमधे अजून बरीच नावं जोडता येतील.)

सगळ्यात मुख्य या गीताच्या गायकाबद्दल लिहायचेच राहिले. हा भन्नाट गायक म्हणजे परत केके अर्थात कृष्णकुमार. हा एक माणूस त्याला मिळेल त्या गाण्याचे सोने करतो, आणि अशा रॉक गाण्यांत तर त्याचा हातखंडा आहे. हे गाणे, लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा,इ.अनेक गाण्यांत त्याने जे वरचे स्वर लावलेत _/\_ हे तोच करू जाणे.

म्हणजे तोच ना जिस्म मुझे देके मिट्टि का शिशे सा दिल क्यो बनाया और उस पे फितरत कि वो करता है मोहोब्बत वाह रे वाह तीरि कुदरत. नाय वळखल ना गान ? अवो ह्म दिल दे चुके सनम

In reply to by होबासराव

तडप तडप के माहीत नाही असं कसं होईल, केके ची जवळपास सगळी गाणी माहीत आहेत आणि फेव्हरेट आहेत. तुम्ही पाँच पाहिलाय असं वाटतं, त्याबद्दल सांगा.

In reply to by होबासराव

हिंदीत लेटेस्ट nh१० पाहिला अर्थात तो फार व्हायोलेन्ट नव्हता, त्या आधीचे आठवावे लागतील. हॉलिवूडचे खंडीभर आहेत. तरी आठवून सांगते.

In reply to by होबासराव

मला एक सांगा आज पर्यंत तुम्हि सगळ्यात जास्त व्हायोलंट मुव्हि कुठला बघितला आहे.
१)शुटआऊट ॲट लोखंडवाला. २)फोर्स

In reply to by उगा काहितरीच

शाहरुख- माधुरीचा. त्यात mindless violence होता. मळमळलेलं तो बघून. रच्याकने violence साठी कुणी कुणावर हात उचलायलाच पाहिजे असं काही नाही. सारांश मध्ये एका फूटपाथवर अनुपम खेर, रोहिणी हट्टंगडी आणि सोनी राझदान आणि दुस-या फूटपाथवर उभे असलेले निळू फुलेंचे गुंड. त्यातला एक गुंड लाथेने एक पत्र्याचा डबा या तिघांकडे ढकलतो. रात्रीच्या शांततेत त्या डब्याचा आवाज सगळीकडे घुमतो. यातून जो violence व्यक्त होतो तो पाच लीटर रक्त वाहवूनही होणार नाही.

In reply to by उगा काहितरीच

हे फक्त बॉलीवुडच्या काही चित्रपटांपैकी बरं ! हॉलीवुडच्या काही चित्रपटांमधे तर फक्त हिंसाच असते. जसेकी रॉंग टर्न, वी आर लिगॉन, इत्यादी इत्यादी .

In reply to by उगा काहितरीच

३०० च्या सेकंड पार्टात जेवढे रक्त दाखवलेय तेवढ्या रक्तात आपल्या ५० ब्लड बँका वर्शभर चालल्या असत्या. ;)

In reply to by अभ्या..

तुम्ही कौतुक केलेला तेलुगू यवुडू पहिल्या पाच मिनिटातील थरकाप उडवणारी हिंसा न पाहवल्याने बंद केला.

In reply to by सतिश गावडे

मी आतापर्यंत अनेक हॉरर, हिंसक चित्रपट पाहिले. सॉ, फायनल डेस्तीनेशन , हिल्स हॅव आईज पण पॅथोलॉजी आणी कॅनिबल होलोकॉस्ट इतके भयाण , किळसवाणे चित्रपट दुसरे नाहीत. एक पॉश लॅबमधला तर दुसरा जंगलामधला पण क्रूरता दोन्हीकडे सारखीच ! हे दोन चित्रपट कोणी पूर्ण पाहिले आहेत का ?

In reply to by होबासराव

मी पाहिलेला सर्वात हिंसक चित्रपट 'रक्तचरित्र'. बाकी,आठवेल तशी भर घालतो.

In reply to by होबासराव

होस्टेल, द डेव्हिल्स रिजेक्ट्स, द हिल्स हॅव आईज.. अजुन बरेच आहेत.

मग तुम्हि पांच बघु शकता... ओरिजिनल लिक झालेलि कॉपि असेल तर जपुन कारण चित्रपटात पुष्कळ जागि संवाद सुद्धा ज्याला अश्लिल अश्लिल म्हणतात त्या भाषेत आहेत.

In reply to by विवेक ठाकूर

ते गाणं बरंच लाऊड आहे अगदी मान्य, कारण ते रॉक प्रकारातील आहे आणि या जॉनर मधील गाणी बऱ्यापैकी अशीच असतात. ते सर्वांना आवडेलच असं नाही, तसा डिस्क्लेमर टाकता टाकता राहिला. बाकी काव्य कोणते म्हणताय, वर गीताचा अनुवाद आहे तो का, तो एवढा जमलेला नाहीये, आणि गुंता होणे, डोक्यात केसांचा आणि विचारांचाही, नवीन नाही :) 'साँस लो दम भरो चिल्ला चिल्ला के सबसे कहो, सर झुका खुदा हूँ मैं आसमानों पे खडा हूँ मैं मैं खुदा हूँ खुदा' याचे छान मराठी रूपांतर वाचायला आवडेल. कर्कश्य गाणी ऐकण्यामागील माझे लॉजिक: 1. हापिसात बॉसचे, इतरत्र सर्वज्ञानी लोकांचे ज्ञान पाजळणे ऐकावे लागू नये म्हणून 2. आजूबाजूच्या लोकांच्या निरर्थक बडबडीतून सुटका म्हणून 3. आपल्या डोक्यातील विचारांचा गोंगाट अशा संगीतामुळे दबले जाऊन माईंड क्लिअर होते 4. ढीगभर कामे आणि अशक्य डेडलाइन्स पार पाडण्यासाठी असे संगीत डोक्याला चालना देते 5. डोक्यातील ताणतणाव, राग, वैताग, फ्रस्टेशन बाहेर काढण्याचा उत्तम मार्ग अजूनही बरेच आहेत. वरील सर्व प्रश्नांवर शांत गाणी ऐकणे हा सुद्धा उपाय आहेच, आणि त्या त्या वेळच्या मुडप्रमाणे आपण संगीत ऐकतो त्यातीलच हा प्रकार.

In reply to by नीलमोहर

मूळात ताण मनातल्या गोंगाटामुळे येतो आणि तो घालवण्याचा साधा उपाय म्हणजे शांत बसून , तो गोंगाट ऐकणं आहे . मनाला अवधानाचं इंधन न मिळाल्यानं तो काही वेळात थांबतो . पण तुमच्या प्रतिसादामुळे हल्ली कर्कश्य संगीताच्या लोकप्रियते मागचं कारण कळलं !

In reply to by विवेक ठाकूर

असे नाही आहे हो!!!! आमचे आजोबा ओ.पी.नैयरचे "सर पे टोपी" ऐकायचे...ते आमच्या वडीलांना "अय्यय्या सुकु सुकू" बद्दल शिव्या द्यायचे. आम्ही "दम मारो दम" किंवा "आप जैसा कोई" लावले की आमचे वडील बोंबा मारायचे. मुले जे काही ऐकतात ते समजत नाही...मुले हुषार आहेत, ती कानाला हेडफोन लावून ऐकतात. थोडक्यात काय? तर नविन संगीत आपल्याला आवडत नाहीसे झाले की, वय झाले असे मी ओळखतो आणि बाजूला होतो. लॅपटोपच्या जमान्यात, मण्यांची पाटी घेवून बसू नये. आपण आपली मण्यांची पाटी घ्यावी आणि एकांतात, "हरी ओम हरी,,," ऐकत बसावे.

In reply to by मुक्त विहारि

ते गाण्यांबद्दल म्हणत नसून त्यांनी "मनातला गोंगाट" आणि "मनाला (लागणारे) अवधानाचं इंधन" यावर भाष्य केले आहे. तुमचा आणि त्यांचा प्रतिसाद हे दोन वेगवेगळ्या पातळींवरचे प्रतिसाद आहेत.

In reply to by विवेक ठाकूर

'ताण मनातल्या गोंगाटामुळे येतो आणि तो घालवण्याचा साधा उपाय म्हणजे शांत बसून , तो गोंगाट ऐकणं आहे . मनाला अवधानाचं इंधन न मिळाल्यानं तो काही वेळात थांबतो.' - तुम्ही सांगताय ते मेडिटेशन, मनन चिंंतन या प्रकारांत मोडेल. मी सांगत आहे ते मनाला स्टिम्युलेट करण्या संबंधी आहे. मनाला पॅसिव्ह मोडमधून अ‍ॅक्टिव्ह मोड मध्ये आणायला स्टिम्युलेशन्ची गरज पडते, आणि ते जास्त अ‍ॅक्टिव्ह झाले तर त्याला शांत करण्यासाठी, पॅसिव्ह मोड मध्ये नेण्यासाठी मेडिटेशनची गरज पडते. तर जेव्हा अशा माईन्ड स्टिम्युलेशनची गरज असते तेव्हा मी (तुम्ही म्हणता तशी) कर्कश गाणी ऐकते आणि रात्रीच्या शांततेत, जुस्तजु जिसकी थी, रात हमारी तो चाँद की सहेली है, क्षितीजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, इ.ऐकते. 'तुमच्या प्रतिसादामुळे हल्ली कर्कश्य संगीताच्या लोकप्रियते मागचं कारण कळलं !' - मला 'हल्ली'च्या पिढीत ढकलल्याबद्दल धन्यवाद :) 'आवाज वाढव' चा श्रोतावर्ग वेगळा, 'मैं खुदा'चा वेगळा, ही दोन टोकाची दोन गाणी आहेत, कोणाला हे आवडेल कोणाला ते तर कोणाला दोन्ही. पण या दोन गाण्यांची तुलना होत नाही, हे म्हणजे हनी सिंगची तुलना केके शी केल्यासारखे होईल. it is like comparing oranges with apples :) वरील गाणं मला आवडतं, पण म्हणून ते सर्वांना आवडावं आणि सगळ्यांनी त्याला चान चान म्हणावं अशी अपेक्षा मुळीही नाही.

In reply to by नीलमोहर

हे भारीवाले इयरफोन्स घालून फुल्ल व्हॉल्युम वर ऐका आणि कसं वाटलं ते नक्की सांगा :) युट्यूबवर पूर्ण गाणे नाहीये, ते इथे ऐकायला मिळेल: http://gaana.com/song/bach-ke-bakshy

In reply to by विवेक ठाकूर

रच्याकने - 'आवाज वाढव डिजे तुला' गाणं मला मस्त वाटतं.. एकदम ढिन्चॅक.. अवांतर : 'पोष्टर गर्ल' हा चित्रपट आला का? 'पोष्टर बॉईज' धमाल होता..

In reply to by चिगो

"डीजेवाला बाबू मेरा गाना बजादो" असंही एक गाणं कुठल्याशा चित्रपटात आहे. पोष्टर गर्ल येऊन गेलाही असावा. 'पोष्टर बॉईज' धमाल होता याच्याशी लाख वेळा सहमत.

के के मेननसारख्या एका ताकदीच्या अभिनेत्याला असल्या "हिरो"च्या भुमिकेत पाहण्याची सवय नाही. :)

In reply to by सतिश गावडे

मग तुम्ही यूट्यूब वर केकेचा या सिनेमातील एन्ट्रीचा सीन अवश्य पहा, पूर्ण सिनेमाच जमल्यास पहा. तो हिरो ही आहे, अँटी हिरो ही आहे यात.

जरी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला नसला तरी इंटरनेटवरच्या सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असायला हरकत नाही. जोशी अभ्यंकर हत्याकांडासारखा विषय आहे. पण हिंदीतल्या सर्वात हिंसक चित्रपटांपैकी वगैरे मी म्हणणार नाही कारण यातली हिंसा कथेच्या ओघात येते आणि त्यामुळे प्रेक्षक गुंतून जातो. अनुराग कश्यप चांगला दिग्दर्शक आहेच, पण त्याहीपेक्षा चांगला लेखक आहे हे या चित्रपटातून समजतं. आपल्या प्रेक्षकांना त्यावेळी असे noir चित्रपट मानवले नसते. पण आता अशा चित्रपटांबद्दल दृष्टिकोन बदललेला आहे. त्यामुळे पांच आज आला तर चालेल असं वाटतं. रच्याकने अनुरागची निर्मिती असलेला बिजाॅय नंबियार दिग्दर्शित शैतान ब-यापैकी पांच च्या जवळ होता.

In reply to by बोका-ए-आझम

शैतानमधले खोया खोया चांद्चे बीटस मला आवडले होते. ह्या गाण्याला कुणी जुन्या खोया खोयाची सांगितिक हिंसा म्हणले तर म्हणू दे ब्वा. ;)

In reply to by अभ्या..

हे रीमिक्स तर भारीच होतं पण त्याचबरोबर त्याचं चित्रीकरण सुद्धा ग्रेट आहे. शुटआऊट चा सीन आणि पार्श्वभूमीवर हे गाणं :)

In reply to by बोका-ए-आझम

शैतान बराचसा psychlogical thriller आहे आणि तेवढा व्हायोलेन्ट ही नाही,पण मस्त वेगळाच सिनेमा आहे खोया खोया चांदचे स्लो मो चित्रीकरण अफलातून आहे, ती रिंगटोन असते अधून मधून माझी.

पांच पैकी एकहि करैक्टर पॉजिटिव नाही या निकशावर अत्यंत नकारात्मक चित्रपट म्हणून सेंसरबोर्डाने परवानगी नाकारालेला काहीसा रोचक व थोडासा रटाळ चित्रपट. बोर्डाच्या या कृतीने कश्यप फार दुखावला गेला होता व नशेच्या आहारी गेल्याची वदंता आहे. असो दुखावले जाणे त्याचा स्वभाव असावा बॉम्बे वेलवेट नंतर तर तो फ्रान्न्सला निघून गेला म्हणे जिथे व्यक्ती स्वातंत्र्यावर कोणी घाला घालू शकत नाही.... असो चित्रपट संथ, वरील गाणे मस्त, अन शैतान पांचचा रीमेक आहे

'आज पर्यंत तुम्ही सगळ्यात जास्त व्हायोलंट मुव्हि कुठला बघितला आहे.' - hostel, amusement. कोणी पाहिले नसतील तर पाहण्याचा प्रयत्न करूही नये, मी अजून पस्तावतेय. wrong turn वगैरे तर सुरूवात पाहूनच बंद केले, अर्जंट्मध्ये. हे चित्रपट हॉरर प्रकारात मोडतील खरे तर, हॉरर मध्ये ring आणि the grudge चे भाग, वाईट ! हे चित्रपट कधी पाहिले होते आठवतही नाही मात्र ते डोक्यात फिट बसले आहेत, अजूनही आठवून काटा येतो अंगावर. आणि अशा चित्रपटांची खासियत ही की एकदा पहायला सुरूवात केली की थांबणे नसते, शेवटपर्यंत पाहत राहणे भाग पडते. curiosity killed the cat :)

ह्या यादीत, फायनल डेस्टीनेशन, पण येईल का? मला हे असले टॉमॅटॉ सॉसवाले सिनेमे आवडत नसल्याने, आम्ही आपले साधे सरळ सिनेमे नघणेच जास्त पसंत करतो. ("सेव्हिंग प्रायव्हेट रायन" मध्ये पण हिंसाचार आहेच, पण तो कथेचा एक भाग ह्या पुरताच मर्यादित आहे.)

जोशी अभ्यंकर हत्याकांडावर आधारित चित्रपट आणि त्यातला खुनी हीरो???? गाणे रॉक किंवा लाऊड वगैरे असण्याबद्दल अजिबात आक्षेप नाही. पण विकृतीला खुदा म्हणून प्रोजेक्ट केलं असेल तर या सिनेमावर बंदी घातली हे सेन्सॉर बोर्डाचे एकमेव चांगले काम असू शकेल.

In reply to by पैसा

पैसाताई, अशा नकारात्मक व्यक्तिरेखेला जस्टिफाय किंवा ग्लोरिफाय करण्याचा हेतू अजिबातच नाही. मी फक्त वेगळ्या प्रवाहातील या चित्रपटाबद्दल,परिणामकारक शब्द असलेल्या त्या गाण्याबद्दल आणि केके मेननच्या अशक्य अभिनयाबद्दल लिहिले आहे. बाकी मैं खुदा हे त्या character च्या devil may care attitude आणि आक्रमक व्यक्तिरेखेला शोभेसे आहे, त्याच्यासारखा माणूस जो कोणालाही,कशालाही घाबरत नाही तो स्वतःला सर्वशक्तिमान परमेश्वर मानू लागला तर त्यात नवल ते काय.

In reply to by नीलमोहर

तू ग्लोरिफाय केलंस असं अजिबात म्हणत नाही. अशा समाजविघातक विकृतींना हीरो म्हणून सिनेमे काढणार्‍या लोकांचे भयंकर आश्चर्य वाटतंय.

In reply to by पैसा

समाजविघातक विकृतींना हीरो म्हणून सिनेमे >> असं आहे खरंच त्यात? म्हणजे जो कोणी मेन कॅरेक्टर आहे त्याच्या कृत्यांना ग्लोरिफाय केलंय कि डिटेलींग केलंय?

In reply to by तर्राट जोकर

इथे तर सगळ्यांनी त्याला हीरो म्हटलंय. मी सिनेमा बघितला नाही आणि असली घाण बघायची इच्छा पण नाही. उद्या हे असले बघून तेच नॉर्मल आहे असं वाटून गुन्हे करणारेही निघतील. काय नेम नाही.

In reply to by पैसा

तो हरलाय.. पूर्णपणे कोसळलाय आणि अशा या हरलेल्या, उदास, निराश माणसाला कोणीतरी जवळ घेण्याची, सावरण्याची खूप गरज आहे असेही आपल्याला वाटते.
ज्यांनी जोशी अभ्यंकर हत्याकांडाबद्दल वाचलंय त्यांना राजेंद्र जक्कल किती थंड डोक्याने वावरत होता आणि कसे निर्घृण खून केले गेलेत याबद्दल आठवत असेल. त्याच्याबद्दल दया किंवा कणव वाटण्याची सुतराम शक्यता नाही. तो उद्दाम होता. हरलेला वगैरे अजिबात नव्हता.

In reply to by पैसा

मी चित्रपट पाहिलेला नाही आणि जक्कल बद्दलही लिहिलेले नाही,'तो हरलाय' हे आणि लेखातील इतर विशेषणेही फक्त आणि फक्त गाण्यातील केकेच्या अभिनयासाठी.

In reply to by पैसा

जक्कल आणि कंपनी हा वेगळाच विषय आहे. ते फक्त मजा म्हणुन खून पाडत होते. क्रौर्याचीही नशा असते. काहींना असे सिनेमे पाहून तलफ भागते, काहींची तलफ उफाळून सिनेमांसाठी विषय बनून जाते. तो हरलाय.. पूर्णपणे कोसळलाय आणि अशा या हरलेल्या, उदास, निराश माणसाला कोणीतरी जवळ घेण्याची, सावरण्याची खूप गरज आहे असेही आपल्याला वाटते. >> ह्याबद्दल एक कथा-सत्यकथा-बोधकथा वाचलेली आठवते. परदेशातलीच आहे. एका लोकलमधे एक अतिशय हिंस्त्र दिसणारा, दारू प्यायलेला, गुरकावणारा माणूस शिरतो. इतर प्रवाशांवर उगाच डाफरतो, भांडणं उकरुन काढून मारामारी करायला बघतो. त्याला घाबरुन स्गळे डब्याच्या एका बाजूने होतात. हा दुसर्‍या बाजूला एकटाच हुंकार टाकत बसलेला. एक अतिशय कृश म्हातारा त्याच्या जवळ जातो. इतर प्रवाशी त्या आजोबाला सांगतात की नका करु असं, एका फटक्यात जीव जाईल तुमचा. तो ऐकत नाही. त्याच्याजवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय करुणेने त्याला विचारतो, कायरे बाळा, काय झालं तुला, काही त्रास होतोय का. मला सांग बघू. ते शब्द ऐकुन तो हिंस्त्र मनुष्य लहान बाळासारखा रडायला लागतो. म्हातार्‍याच्या कुशीत शिरत भोकांड पसरतो, अहो, मला असं प्रेमानं विचारणारं कुणीच भेटलं नाही हो कधीच. आतापर्यंत फक्त घृणा आणि अपमानच मिळाले. मार खाल्ला. पब्लिक आश्चर्यचकित होते. असो. ते वाक्य वाचून ही कथा आठवली इतकंच.

In reply to by पैसा

गुन्ह्यांसाठी सिनेमावरुन प्रेरणा घेणारे आहेतच म्हणा. किंवा सिनेमात दाखवलेलं थ्रिल प्रत्यक्षात अनुभवलं पाहिजे ह्याची तलफ लागत असणार. जशी सिगरेट, दारु, इत्यादींची तलफ येते तशी हिंसेचीही तलफ येत असेल काय? खरंतर म्ला अशा कथा लिहिणार्‍या, दिग्दर्शित करणार्‍या कलाकारांबद्दल विचार पडतो. होस्टेल, सॉ ह्यासारखे चित्रपट लिहणारे, काढणारे मानसिकरित्या कसे असतील? एवढा रक्तपात ते स्वत: आधी इमॅजिन करतात, तो दृश्य स्वरुपात मांडण्याइतका त्यांच्या पेशंस असतो म्हणजे कुठेतरी ते त्यात विश्वास ठेवतात काय? अशा कलाकारांबद्दल गावडेसर काय म्हणतील?

In reply to by तर्राट जोकर

अशा कलाकारांबद्दल गावडेसर काय म्हणतील?
मी हा विचार करतोय की मी प्रतिसाद दिल्यानंतर मिपावरील रथी महारथी तो कसा खोडून काढतील. =)) इथे माझे नांव का आठवले हे कळले नाही मात्र व्यक्तीशः मला हिंसाचार मुळीच पाहवत नाही. चित्रपट पाहताना असे वाटते की ती घटना माझ्या नजरेसमोर प्रत्यक्ष घडत आहे. त्यामुळे पुढच्या क्षणी मी तो चित्रपट पाहणे बंद करतो. जोशी अभ्यंकर हत्याकांडाबद्दल फारशी माहिती नाही.

In reply to by सतिश गावडे

तुमचे मानसशास्त्रावर चांगले प्रभुत्व आहे असे ऐकले आहे. म्हणून तुमचे नाव घेतले. तुम्ही लिहा हो. चांगली चर्चा होईल. : पिवळ्याप्रतिसादांना घाबरू नका. ;-)

In reply to by तर्राट जोकर

प्रभुत्व नाही हो. थोडे फार वाचन केले आहे. काहींच्या दृष्टीने वाचनाला काही अर्थ नसतो. अनुभूती महत्वाची असते. :)

In reply to by सतिश गावडे

मनातला गोंगाट कमि करायला अवधानाचं इंधन कुठल लागेल, व्हिस्कि का रम ? बर मला एक सांगा तुम्हाला कुठल्याहि गोष्टिकडे ३ dimensional पाहता येत का?

In reply to by होबासराव

Y अन Z डिमेंशन त्यांच्याकड़े नक्कीच आहे. फक्त उरला X फैक्टर तेवड़ाच काय तो कन्फर्म करून घ्या. - वाचनाची अनुभूती नाकारणारा निरागस भाउंचा भाऊ

In reply to by तर्राट जोकर

गावडेसर मनोवैज्ञानिक चिकित्सा करतीलच पण एक किंचित कलाकार म्हणून माझे चार पैसे. दिग्दर्शक म्हणा, गायक, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार, काही सायंटीस्ट हे व्हिज्युअलायझर असतात. प्रत्यक्षात आणण्यापूर्वी बरेचसे काम मेंदूच्या पातळीवर चाललेले असते. वर्शानुवर्शे पाहिलेले, अनुभवलेले हे कशा स्वरुपात व्हिज्युअलाइझ होइल सांगता येत नाही. सामान्यांना जी हिंसा, लैंगिकता किंवा अतिशयोक्ती वाटेल ते त्याला तसेच वाटेल नाही सांगता येत. आता परफोर्मिंन्ग आर्ट असल्यामुळे त्या दॄश्यांना काहीजण पार नाके मुरडतील, काही जण रिलेट सुध्दा करतील. त्या कलाकाराला मानसिक दृश्ट्या पेशंस असतोच. कधी कधी तो ताण असह्यही होतो. पण त्याची इच्छा अथवा स्वभाव तसेच काही करायचा असेल असे नसते. जीवनाचा एक अनुभव म्हणून त्याने ते व्हिज्युअलाइझ केलेले असते. काही अगदी बोधप्रद चित्रपट/देवादिकांची सोज्ज्वळ चित्रे साकारणारे कलावंत असतात. त्यांचे दिग्दर्शक अथवा चित्रकार त्या दृष्टीने व्हिज्युअलाइज करत असतील. आपण त्याचा अनुभव कशा पध्दतीने घ्यायचा हे आपण ठरवायचे. साध्या सोप्या भाषेत मी एखादे चित्र अथवा व्यक्ती ज्या पध्दतीने पाहतो/मला जाणवते त्या पध्दतीनेच तुम्ही पाहू शकत नाही, जाणवू शकत नाही. अवांतरः चित्रकला महाविद्यालयात शिकताना आम्हाला सर्रास विचारला जाणारा सवाल "ते न्यूड बिड असते कारे?" मुद्दा असते का नसते हा नाही. कुतुहल, फॅन्टसी आणि त्याचे प्रकटीकरण बर्‍याच स्वरुपात होते. किंबहुना ते तसे व्हावे ह्या मताचा मी आहे. हा एक सेफ्टी वॉल्व्ह म्हणू शकता. वल्लीने गधेगाळाचे जे व्हिज्युअल उदाहरणे दिलीत त्यामधे केवळ हाच हेतू असावा असे वाटते. केवळ शापवाणीच्या प्रकटीकरणासाठी अशी शिल्पे चितारण्यामागे शिल्पकारांची एक वेगळी 'वहीच्या शेवटच्या पानासारखी' मनोवृत्तीसुद्दा असू शकते. . खुलासा: मला जे वाटले ते मी लिहिले. ह्या विषयावर जास्त चर्चा करण्यास मात्र मी असमर्थ आहे. क्षमस्व.

In reply to by अभ्या..

मनातले विचार असे लिहिता आले पाहिजेत. मुद्देसूद आणि करेक्ट. 'चित्र अथवा व्यक्ती ज्या पध्दतीने पाहतो/मला जाणवते त्या पध्दतीनेच तुम्ही पाहू शकत नाही, जाणवू शकत नाही.' - अगदी हेच म्हणायचेय.

In reply to by पैसा

अशा घातक प्रवृत्तींचा अंतही तितक्याच वाईट प्रकारे होतो हा चित्रपटातील संदेश असण्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by नीलमोहर

चित्रपटाशेवटी "त्या बाईला तिचे गुन्हे पचले नाहीत. गुन्हे कधीच पचत नाहीत." असा संदेश टाकायला लावला होता सेंसर बोर्डाने. मूळ सिनेमात तो नव्हता म्हणे.

विशिष्ट वयात हॉरर चित्रपट आवडतात काय? मला गेल्या दहा वर्षापासुन भूताखेतांचे पिच्चर बघण्याची इच्छाच होत नाही. आपला वेळ घालवून आपणच घाबरायचं हे पकाउ वाटतं. तसंही आजकाल फार अ‍ॅन्टीसिपेटींग सीन असतात. किंवा अनपेक्षित असं काही राहिलं नाही. थ्रिलर, क्रुयेल्टी दाखवणारे पिच्चर ठिक आहेत. अ‍ॅक्शन, मारधाड, वेगवान स्टोरीज असलेले आवडतात.