Skip to main content

मिसल पाव आवडले

लेखक प्रा.डॉ.शिवाजी अंभोरे यांनी सोमवार, 29/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मिसल पाव बद्दल पेपर ला वाचले आणि सदस्य झालो मला अर्थशास्त्र या विषयावर लेख वाचायला आवडतील मी मिसल पाव चे लेखन वाचतो आहे मिसल पाव समजुन घेत आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6184
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

अरे वा! वाचुन आनंद झाला. ह्याच पेजच्या सगळ्यात खाली नव्या सदस्यांसाठी काही धागे आहेत. ते ही जरुर वाचा. लहान सहान शंकांसाठी एक स्वतंत्र धागा आहे, नवा धागा काढायची गरज पडणार नाही. आणि गप्पा मारायला "खरडफळा" आहे. तिथे तुम्ही सदस्यांशी संवाद साधु शकता. तुमचे लेख नक्की द्या. काही मदत हवी असल्यास साहित्य संपादकांना व्यनि करा. (व्यनि - व्यक्तिगत निरोप / संदेश)

तुम्हांला मिपा नक्कीच आवडेल.अर्थशास्त्रावरचे लेखदेखील शोधता येतील.अर्थशास्त्र misalpav.com असा सर्च देऊन बघा.

दुसरे प्राडाॅ आले! मिपावर स्वागत सर! आपण अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहात का?

मिपा हा एक प्रचंड मोठा पसारा आहे.... ह्या जगांत, माणसांची जितकी म्हणून स्वभाव-वैशिष्टे आहेत, ती सगळीच ह्या मिपावर भेटतील. ह्या कुटुबात, मतभेद आहेतच, पण उत्तम विचारांना इथे नेहमीच प्राधान्य दिले जाते. अर्थविषयक एक लेख देत आहे. http://www.misalpav.com/node/24115 मिपावरील दर्जेदार साहित्याची २ नमुने ====> http://www.misalpav.com/node/4488 http://www.misalpav.com/node/2254 बाद्वे, आपण राहता कुठे?

In reply to by कपिलमुनी

अहो, त्यांना इथे येवून धड २ दिवस पण झालेले नसतील. "मोकलाया दाही दिशा" तले प्रतिसाद वाचता-वाचता नविन आय.डी. , संभ्रमात पडण्यापेक्षा, ते इथे थोडे रुळले आणि मोकळे व्हायला लागले की आहेच आपले मिपागीत "मोकलाया...."

स्वागत आहे ! अर्थसंकल्पीय दिवशी आपण वर्दी दिल्यामुळे अर्थसंकल्पीय प्राडॉ सर असे आपल्याला आदराने म्हणू आणि आपल्या अर्थसंकलीय तसेच अर्थशास्त्रीय विश्लेषणांची वाट पाहूच. हम्म बाकी माझ्या सारखे बरेच जरण मॅक्रोच्या एवजी अल्ट्रामायक्रो अर्थशास्त्रात रस असलेले असतात म्हणजे आमच्या धागा लेखांची नावे किचन मॅनेजमेंट कसे करता/करावे ? , खेळतं भांडवल आणि खेळता पैसा (लेख क्रमांक १) अशी असतात, मॅक्रोवरुन अल्ट्रामायक्रोवर येणे म्हणजे बॉलीवूडच्या मोठ्या पडद्या नंतर रेडीओसाठी काम केल्यासारखे आहे, तरी सुद्धा रेडीओ ट्यून करणे आवडत असल्यास सवडीने आमच्या धागा लेखांना जुरुर भेट द्यावी.

२०१० पासून मिसळपाव मध्ये खाते बनविण्या साठी प्रयत्न चालू होते शेवटी आज पहिल्यांदा यश मिळाले. मिसळपाव चा आभारी आहे.

In reply to by उमेश पाटील

२०१० पासून मिसळपाव मध्ये खाते बनविण्या साठी प्रयत्न चालू होते शेवटी आज पहिल्यांदा यश मिळाले. पण तुमचा सदस्यकाळ तर ५ वर्षे २ महिने दखवतोय सदस्यकाळ 5 years 2 months

In reply to by होबासराव

माफ करा पण माझे सदस्य खाते चालू आहे कि नाही हे कळत नव्हते म्हणून आज प्रथमच सुरुवात केली आहे. पण मिसळपाव वाचन कधी चुकवले नाही

तुमचे मिपावर स्वागत. इथे तुम्हाला अनेक नमूने भेटतील, पण हो त्यातील काही खरोखरचे विद्वान आहेत. शब्दानी फाडून खायला कमी करणार नाही मिपावरील एक इरसाल नमुना!

In reply to by उमेश पाटील

मी पण खुप मानसिक तयारी करुन सदस्यत्व घेतलं होतं!! तरी पुष्कळच घाबरायचे मी आधी.. आता शक्यतो मला लोकांनी घाबरावं असा संकल्प सोडलाय २०१६ साठी!! ;)

In reply to by पिलीयन रायडर

तरी पुष्कळच घाबरायचे मी आधी
'बुली'यन रायडरने असे म्हणावे हा सर्वांत उच्चकोटीचा विनोद वगैरे....

In reply to by बॅटमॅन

ते आत्ता रे बॅटु!! आधी मी अशी नव्हते.. पहले मय बहुत डरपोक थि.. फिर मेरी जिंदगी मे एक अदभुत जडीबुटीने.... वगैरे वगैरे...

In reply to by स्वामी संकेतानंद

मला काय ठाउक घाबरतात की नाही? घाबरले तर का घाबरतात? मी माझा संकल्प सोडलाय की लोक चळाचळा कापले पाहिजेत! कारण आधी मी इथल्या काही सदस्यांना टरकुन असायचे. आता कुणी तरी मला टरकुन असावं अशी फार्फार इच्छा आहे!

In reply to by पिलीयन रायडर

कारण आधी मी इथल्या काही सदस्यांना टरकुन असायचे.
म्हणजे आहेत का गेलेत (मिपावरून फक्त इहलोकातून नाही) कुठेशीक हा शब्द सुट्टा कुठे शीक (इंग्रजी) असा वाचला तरी तपशीलात फरक नाही. वाचक नाखु

In reply to by पिलीयन रायडर

आम्हाला स्व गवसलाय, आपण तेव्हापासुन कोणालाच घाबरत नाहि. पण का कोण जाणे स्व गवसल्यापासुन लोक मला टाळायला लागलेत. खाजगित काहि बाहि बोलतात बघा माझ्याविषयि कि मला तात्काळ मानसोपचाराचि गरज आहे. ह्यांना असेच वाटणार पंगा घेतलाय ना माझ्याशि.

In reply to by सस्नेह

हो खरं.. कुणाचा स्व आहे तो? लॉस्ट & फाउंड बनवायला हवं.. असल्या मेजर गोष्टी पण लोक खफवर सोडुन येऊ लागले!

In reply to by चौकटराजा

मी घाबरतो आपल्याला बाईसाहेब ! (खरं सांगायचं तर सगळ्यात अनाहिताना) -मीही ;) 'पहले मय बहुत डरपोक थि.. फिर मेरी जिंदगी मे मिसळपाव.कॉम आया.. जोरोंका तुफान उठा.. आँधीयां चली.. हवाओंं ने जैसे रूख बदल दिया.. पलभर में जिंदगी तहस नहस हो गई.. और मैं क्या से क्या हो गई..' वगैरे वगैरे :)

मिपावर स्वागत. शक्य झाल्यास तुम्ही अर्थाशास्त्रावर जरूर लिहा.