नमस्कार,
काल तब्येत ठीक नसल्यामुळे पूर्ण वेळ लोकसभा आणि राज्यसभा channels पाहिले.
ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी आणि अनुराग ठाकूर यांची संसदिय भाषणे ऐकली.
स्मृती इराणी आणि ज्योतिरादित्य यांनी जे काही दाखले/पुरावे दिलेत, त्यावरून तरी काँग्रेस आणि भाजप JNU प्रकरणात राजकारण करत आहे असंच वाटतंय.
खरं-खोटं न्यायव्यवस्था बघून घेईल. मुद्दा तो नाहीये.
मुद्दा असा आहे, देशाच्या एकात्मतेविरोधात जर एखादी घटना घडत असेल (सिद्ध झालेले नाहीये, तरी पण गृहीत धरू कि घडलीये), तर सरकार म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून जी असंवेदनशीलता यांनी दाखवलेली आहे तो योग्य आहे का? कशामध्येही vote bank चे राजकारण करणार आहात तुम्ही? संपूर्ण देशाला गृहीत धरून चाललेत लेकाचे..! नुकतीच एक प्रतिक्रिया दिलीये पी. चिदंबरम यांनी - "अफझलला फाशी देऊन आम्ही चूकलोच त्यावेळी"...!!
म्हणजे तुम्ही सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती या कशाला पण नाही जुमानणार का? काहीही चाललंय खरंच.
या सर्वांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले पाहिजे आता. काय करता येईल? काही कल्पना?
Genuine responses will be appreciated.
वाचने
2446
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
सरल पुन्हा भाजपाला बहुमत
सामुहीक उत्तर दायकत्व
सहमत आहे
In reply to सामुहीक उत्तर दायकत्व by माहितगार
सगळ्यांच्या डैश डैश डैश वर
अफझल, अफसान, शौकत गुरू आणि गिलानी