Skip to main content

कथा ( भाग ३ )

लेखक अँन्ड्रोमेडा यांनी शनिवार, 20/02/2016 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज अमावस्या सुर्य मावळताच जंगलाने एकदम भेसूर रूप धारण केलं होतं . एक वेगळाच अपशकुन असल्यासारख वातावरण झालं होतं . त्या तशा वातावरणात एक आकृती हळूहळू निघाली होती . वारा वाहायचा थांबला होता आणि ती भयाण शांतता काळजाचा थरकाप उडवत होती . ==================================== "काय मग मॅडम काय मग कशी झाली म्हैशीची सवारी ? फार मजा आली असेल ना ." - सुरभि "मग काय फार मजा आली . अशी सवारी कधी केली नाही ." - निशा "ए चल ना मग आपण पण जाऊया मलाही करायची आहे अशी सवारी ." छे काय पण इच्छा म्हणे म्हैशीवर बसायचं आहे . " कुठे जायचं ? " " कुठे काय तू काल गेली होतीस तिथेच . आता तुला रस्ता असेल ना लक्षात . " " अग पण तिकडे कशाला ? " " अग ती म्हैस तिकडेच असेल ना ." " अग गावात काय तेवढीच एक म्हैस आहे का ? " " मग ओळखते का तु दुस-या कुठल्या म्हैशीला जी आपल्याला मारणार नाही . " " नाही . " " चल तर मग आपण जाऊ तिकडे . " " अग पण आईने सांगितलं आहे अनोळखी जागी जाऊ नये . " " अगं पण तू तर कालच जाऊन आली ना मग जागा अनोळखी कशी ? " " ठीक आहे तू काही ऐकणार नाही , आपण जाऊया तिकडे . " त्या शेतात पोहोचल्या तिकडे आसपास कोणीही नव्हतं आणि ती म्हैसही नव्हती . शेवटी थोडं इकडे तिकडे फिरून झाल्यावर त्यांनी माघारी जायचं ठरवलं . इतक्यात त्यांना शेजारी गवतात काहीतरी हालचाल जाणवली . काही स्पष्ट दिसत नव्हतं . पण तो परवाचाच कुत्रा असावा अशी निशाची खात्री झाली , मग काय दोघींनीही मागे वळून न बघता घराच्या दिशेने धूम ठोकली . ==================================== " तू पोळ्या करते ? तुला येतात बनवायला ? " - सुरभि " अग नाही गं मला अजिबात interest नाही पण आई ऐकतच नाही . " - निशा " मग तू का करतेस सरळ सांगायचं ना मला जमत नाही आहेत . मी नाही करत म्हणून . " " अगं पण काय करायचं आमच्या घरात दोन लाटणी आहेत ना . " " म्हणजे त्याचं काय मधेच ? " " अगं म्हणजे आई एक लाटण माझ्या हातात देते आणि दुसरं तिच्या हातात असत . " " मग तुम्ही त्यानी टिप-या खेळता ? " " ए बावळट लाटण्याणी कुणी टिप-या खेळत का ? टिप-या टिप-या असतात आणि लाटण लाटण . " " माहित आहे . " " तर मग अस का बोलली ? " " काय ? " " लाटण्यान टिप-या खेळता म्हणून ? " " मी कुठं बोलले तस ? " " अगं तूच तर बोलली ना तुम्ही टिप-या खेळता का ? " " अगं म्हणजे मला अस म्हणायचं होतं .. पण मला काय म्हणायचं होत ? बर ते जाऊदे तू सांग तुम्ही दोघी दोन लाटणी घेऊन काय करता ? " " अग एका लाटण्याने मी पोळ्या लाटण्याचा प्रयत्न करते आणि दुसरं लाटण हातात घेऊन आई उभी असते . " " कशाला ? " " अग मी सांगते आहे ना तू नको बोलू मधे मधे . तर बघ पोळी लाटताना एक लाटण माझ्या हातात असत आणि जर मी कंटाळा केला तर दोन्ही लाटणी माझ्या पाशीच असतात . " " कशी ? " " एक हातात आणि दुसरं पाठीत . " " अय्या !! " " अग अय्या काय पाठीत बसत ना लाटणं . लागत का नाही ? " " मला कस माहीत ? " " तू अस कर ये एकदा आमच्या घरी आईला सांगते एक लाटणं तुझ्याही पाठीत ठेऊन द्यायला . मग सांग लागत का नाही . " " हे गं काय ? लोक जेवायला बोलावतात , खेळायला बोलावतात मैत्रीणींना आणि तू मार खायला बोलावते आहेस मला . " " हो खायला आणि खेळायलाच बोलावते आहे . घर घर ... भातुकली खेळायचं. खोटा खोटा स्वयंपाक करतात तसा खराखुरा स्वयंपाक करायचा आणि खायलाही ... व्यवस्थित झाला स्वयंपाक , तर जेवण नाहीतर मार . " " असू दे मी नाही येत . पण मला सांग इतक्यात कशाला शिकायचा आहे स्वयंपाक ? " " अगं हो पण आई म्हणते आतापासून सुरूवात केली तर पुढे सगळं चांगलं होईल. नाहीतर लग्नानंतर काय आई येणार आहे का स्वयंपाक करायला ? " " कायपण एवढ्यातच कशाला अगदी लग्नापर्यंत पोहोचायच ? " " अग म्हणजे काय तू नाही करणार लग्न ? " " अग तस नाही पण एवढ्यातच . तू करणार आहेस का आताच लग्न ? " " हो मी करणार आहे लग्न . " " कधी आत्ताच ? " " अगदी आत्ताच अस काही नाही पण करेन . " " अग काय ? आत्ताच ठरवलं आहेस की काय कुणाशी करायचं लग्न ते ? " " हो . " " काय हो ? " " ठरवलं आहे . " " काय ठरवलं आहे ? " " कुणाशी करायचं लग्न . " " कुणाशी करणार आहेस ? " " अद्वेत बरोबर . " " अद्वेत ? लिहून दाखव बर नाव . " " त्यात काय हे बघ ... अद्वेत . " " ए बावळट अस नाही काही .... अद्वैत .. अस लिहितात . " " नाही माझचं बरोबर आहे . " " नाही माझच बरोबर आहे . " " राहू दे आपण त्यालाच विचारू मग तर ठिक आहे . " " हो ठिक आहे . " " बर पण मला एक सांग लग्न त्याच्याबरोबर का ? " " अग त्यांची द्राक्षांची बाग आहे ना आणि मला द्राक्षे फार आवडतात ना . " " ए यडपट द्राक्षं काय विकत मिळत नाहीत का बाजारात ? " " अय्या हो की मी विचारच केला नव्हता . पण बघ ना अशी झाडावर चढून खायला किती छान वाटतील ना द्राक्षं . " " झाडावर चढून ? द्राक्षाच्या ? तू गेली होती का त्या बागेत ? आणि त्या झाडावर चढली होती का ? आणि तिथून खाली जमिनीवर पडली होतीस का ? आणि तुझ्या डोक्याला मार वगैरे लागला होता का ? म्हणे झाडावर चढून . " " अग अगदी झाडावर चढून नाही म्हणत . मला माहित आहे ते . असे वेलच असतात आणि अशी ती द्राक्षं लागलेली असतात . वॉव किती मस्त वाटतात . डायरेक्ट वेलावरची तोडून खायला किती मजा येईल ना . मस्त . " " हो खा खा . " तेव्हढ्यात मंजू तिथे आली . " अग काय गं काय चालल आहे दोघींच . " " द्राक्षे खातोय . " " द्राक्षे कुठुन आणली ? " " अद्वेतच्या बागेतून . " " अग पण तुम्ही गेला कधी आणि आला कधी ? " " हे काय आत्ताच . " " पण आत्ता असतात द्राक्षं ? " " हो . काय सुरभि होती ना ? " " हो हो . " " आंबट होती ना ? " " गोड होती आणि तुला सगळी आंबट लागली ना ? " " मी टिप-या घेऊन येऊ ? " " जाऊ दे पोट भरलय माझं आणि आता भूक पण नाही . चला काकू येते मी . पोळ्या झाल्या का तुमच्या ? " " सुरभि .... " " काय चाललय या मुलींच काय मधेच पळत सुटल्यात दोघी . छे जाऊदे त्यांच चालू दे आपल काम आवराव . " ... क्रमशः भाग १ www.misalpav.com/node/34875 भाग २ www.misalpav.com/node/34929
लेखनविषय:

वाचने 3570
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

याच काय उत्तर द्याव ? तरीही पहिला प्रसंग जंगलात घडत आहे . दुसरा प्रसंग निशाच्या घराशेजारी आणि नंतर शेतात घडत आहे . नंतरचा प्रसंग निशाच्या घरी घडतो आहे