Skip to main content

राष्ट्रभक्ती, देशद्रोह आणि घोषणा

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 24/02/2016 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर मोरेकाकांच्या धाग्यावर मी हा प्रश्न उपस्थित केला आहे, पण या प्रश्नाचे धागामूल्य ध्यानात घेऊन वेगळा धागा काढत आहे.. १. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे. २. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे. ३. नुसत्या घोषणा म्हणजे देशद्रोह नाहीच. या दोन्ही वाक्यांबद्दल तुमचे मत जाणून घ्यावयास आवडेल. दोन वाक्यांमध्ये निसटता फरक आहे, पण अर्थ बर्‍यापैकी बदलतो माझ्या मते. माझे मत येईलच चर्चेमध्ये, पण मी संभ्रमित आहे. तुमचे मत काय?

वाचने 15078
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

१. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
सहमत. सरकारविरोधी मते ठेवणे आणि ती शांततेच्या मार्गाने मांडणे हा सर्व नागरिकांना लोकशाहीने आणि राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे.
२. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
असहमत.जो काही विरोध करायचा तो सरकारला करा. पण देशाविरूध्द बोलायचे काही काम नाही. देशाच्या विनाशाची इच्छा धरणे आणि तशा घोषणा धरणे हा देशद्रोहच आहे.
३. नुसत्या घोषणा म्हणजे देशद्रोह नाहीच.
असहमत. कुठल्याही प्रकारच्या घोषणांमध्ये (विशेषतः सार्वजनिक ठिकाणी दिलेल्या) इतरांना ती घोषणा अंमलात आणण्यासाठी उद्युक्त करायची क्षमता असते. त्यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली असले भलतेसलते प्रकार अजिबात सहन करता कामा नयेत. रच्याकने, जे डावे लोक घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नाही आणि असे केल्याबद्दल काही कारवाई करू नये वगैरे म्हणत असतात त्यांच्याच अंमलाखालच्या प्रदेशात कम्युनिस्ट पक्षाविरूध्द मते ठेवणार्‍या (देश वगैरे डावे मानत नाहीत आणि पक्षच त्यांना सगळे काही असतो) लोकांची रवानगी मात्र गुलागमध्ये होत होती याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. म्हणजे यांची सत्ता असेल तर इतरांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे गेले तेल लावत!! (कम्युनिस्टांचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाणारा) ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

यावरून एक विनोद आठवला. एकदा एक अमेरिकन, एक ब्रिटिश आणि एक रशियन गप्पा मारत असतात. अमेरिकन म्हणतो की आमच्या देशात किती स्वातंत्र्य आहे बघा. मी प्रेसिडेंट आयसेनहॉवरविरूध्द व्हाईट हाऊसच्या समोर उभा राहून काहीही बोललो तरी मला कोणी काही करणार नाही. ब्रिटिश म्हणतो की आमच्या देशातही किती स्वातंत्र्य आहे बघा. मी प्राईम मिनिस्टर हॅरॉल्ड मॅकमिलनविरूध्द १० डाऊनिंग स्ट्रीटसमोर उभा राहून काहीही बोललो तरी मला कोणी काही करणार नाही. त्यावर रशियन म्हणतो--- "आमच्या देशातही किती स्वातंत्र्य आहे बघा.मी प्रेसिडेंट आयसेनहॉवरविरूध्द किंवा प्राईम मिनिस्टर हॅरॉल्ड मॅकमिलनविरूध्द क्रेमलीनच्यासमोर उभा राहून काहीही बोललो तरी मला कोणी काही करणार नाही" !!

In reply to by गॅरी ट्रुमन

काँग्रेसने महाराष्ट्रात बाळासाहेब ठाक-यांविरुद्ध जनक्षोभ वाढवणारी भाषणं केली (डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ या दोन दंगलींच्या दरम्यानच्या काळात) असा आरोप ठेवला होता (जो नंतर मागे घेऊन त्यांनी खटला बंद केला). तेव्हा असाच नियम लावला गेला होता की लोकांना हिंसाचार करण्यासाठी उद्युक्त करण्याची क्षमता बाळासाहेबांच्या शब्दांत आहे. तेव्हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याला गुंडाळून ठेवलं गेलं. निखिल वागळे तेव्हा महानगरचे संपादक आणि तारा मराठी या वाहिनीचे राजकीय संपादकीय सल्लागार (Political Editorial Consultant आणि दुर्दैवाने माझे बाॅस) होते तेव्हा तेही तावातावानं शिवसेनेच्या नावाने बोटं मोडत होते.बाळासाहेबांवरचे आरोप कितपत राजकीय आणि कितपत सत्य ते सोडून द्या पण आता याच इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे. पण सत्ताधारी आणि विरोधक यांची अदलाबदल झालेली आहे. आता यांना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुळका आलेला आहे. ही double standards डोक्यात जातात!

In reply to by गॅरी ट्रुमन

देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा अजुन जास्त खटकते जेव्हा हे विद्यार्थी असतात आणि त्याच देशाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगत असतात. मला यांना कुत्रे बोलण्याचा हक्क् आहे कारण मी टॅक्स नियमित भरतो.माझ्याच पैशानी ही कुत्री माजली आहेत.

In reply to by भंकस बाबा

बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज आपल्याच करातून उद्योगपतींच्या घशात गुपचुप घातलेत. तेव्हा आपण आपल्या बोलण्याचा हक्क बजावला की नाही?

In reply to by तर्राट जोकर

तिथेही कायदा काय करतो असे आम्ही बोलतोच की.. पण दोन गोष्टींचा संदर्भ वेगळा आहे असे वाटत नाही का?

In reply to by आनन्दा

नाही. देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे.

In reply to by तर्राट जोकर

आपल्या दृष्टीने वगैरे ठीक आहे. पण कायद्याने या दोन गुन्ह्यांना वेगवेगळ्या शिक्षा ठरवून दिल्या आहेत. त्यामागे काय विचारमंथन झाले असे ते देखील शोधायला हवे.

In reply to by तर्राट जोकर

देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे. १०० % सहमत ! मात्र "अमुक गोष्ट राष्टद्रोह आहे, तर मग तमुक राष्ट्रद्रोह का नाही ?" असे एका चुकीचे समर्थन दुसरी चूक पुढे करून केले जाते, ते चूक आहे. त्याऐवजी "अमूक गोष्ट राष्ट्रद्रोह आहे आणि तिच्याबाबतीत कायदेशीर कारवाई होत आहे ती योग्यच आहे. पण, त्याबरोबर तमुक राष्ट्रद्रोही गोष्टीसंबंधीही योग्य ती कारावाई व्हायला हवी" असा विचार/लेखन समतोल होईल... राष्ट्रहिताच्या संबंधात एखादे कृत्य कोणी (पसंतीच्या/नापसंतीच्या, पक्षाने/नेत्याने/माणसाने) केले हे पाहण्यापेक्षा ते राष्ट्रद्रोही आहे की नाही हे पाहणे महत्वाचे, आणि ते कृत्य राष्ट्रद्रोही असल्यास ते कोणीही केले असले तरी त्यावर निष्ठूरपणे कारवाई होणे जरूरीचे आहे... तरच देशाला आणि पर्यायाने त्यातल्या नागरिकांना उज्ज्वल भवितव्याची आशा ठेवायला जागा राहील. क्ष ने माती खाल्ली तेव्हा त्याला काही केले नाही, म्हणुन आता य ने माती खाल्ली तर त्यालाही माफ करायला हवे हे राजकारण झाले... हे टाळायला हवे... निदान राष्ट्रद्रोहासारख्या कळीच्या मुद्द्यासंबंधात तरी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

असहमतीचा प्रश्नच नाही. शब्दाशब्दाशी सहमतच. पक्षसमर्थकांच्या सोयिस्कर प्राधान्यक्रमाबाबत आक्षेप आहे. क्ष ने माती खाल्ली तेव्हा त्याला काही केले नाही, म्हणुन आता य ने माती खाल्ली तर त्यालाही माफ करायला हवे हे >> राष्ट्रद्रोहच कशाला, हे तर प्रत्येक बाबतीत टाळायला हवे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आर्थिक अफरातफर आणि देशद्रोह या गोष्टींमध्ये बर्‍यापैकी फरक आहे. खाली कोणीतरी लिहिल्याप्रमाणे आर्थिक अफरातफर करणारा पैसा खाऊ शकत नाही. देशद्रोहाची व्याख्या थोडी वेगळी आहे. जर समान न्याय लावायचा झाला तर या न्यायाने चोरी आणि सदोष मनुष्यवध या दोघांनाही सारखीच शिक्षा झाली पाहिजे.

In reply to by आनन्दा

जर समान न्याय लावायचा झाला तर या न्यायाने चोरी आणि सदोष मनुष्यवध या दोघांनाही सारखीच शिक्षा झाली पाहिजे. हा तुमचा शब्दप्रयोग आहे... माझा (दूरान्वयानेही) नाही. मी जरूर त्या ठिकाणी "योग्य ती शिक्षा" असेच लिहिले आहे... आणि ते अनवधानाने नाही तर विचारपूर्वक लिहिले आहे. ****** अजून कोणी/कोणता शब्दच्छल (बाल की खाल) करू/होऊ नये यासाठी अ़जून एक... "योग्य शिक्षा" या शब्दांचा या संदर्भातला अर्थ = प्रचलित कायद्याने गुन्ह्याच्या स्वरूपाप्रमाणे योग्य असलेली शिक्षा :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझा प्रतिसाद तर्राट जोकर यांना होता. अनवधानाने तो तुमच्या प्रतिसादाखाली आला बहुधा. गैरसमज नसावा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

क्ष ने माती खाल्ली तेव्हा त्याला काही केले नाही, म्हणुन आता य ने माती खाल्ली तर त्यालाही माफ करायला हवे हे राजकारण झाले... हे टाळायला हवे... निदान राष्ट्रद्रोहासारख्या कळीच्या मुद्द्यासंबंधात तरी.
100% सहमत! Whatsapp वर काहीच्या काही मेसेजेस फिरत आहेत . म्हणे "कश्मिर मधे भारतविरोधी घोषणा देतात तर त्या चालतात अन् जेएनयु मधे दिल्या तर लगेच देशद्रोह वगैरे" अगदी डोक्यावर हात मारून घ्यावा असे फडतुस लॉजीक! पक्षावर , अगदी सरकार वरही टिका करायला हरकत नाही . आहे तेवढं व्यक्तीस्वातंत्र्य . पण म्हणून काय देशावर टिका ? का म्हणून ऐकून घ्यायचं ? याच देशात जन्मलो, वाढलो, कदाचित मरायचही इथेच तरी देशाचेच तुकडे व्हावेत वगैरे जरा जास्तच होतंय नाही का ? देश नसेल तर काय होते ? ते ना फक्त निर्वासीतच जाणु शकतात. कधी कधी विचार येतो "लोकशाही" एवढे आपण प्रघल्प आहोत का खरंच ?

In reply to by तर्राट जोकर

त जो साहेब देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे. मग भुजबळ साहेब किंवा लालू प्रसाद यादव हे पण आपल्या व्याख्येप्रमाणे देश द्रोहीच म्हणायला पाहिजेत. या न्यायाने मग पठाणकोटच्या दहशतवाद्याना आसरा देणारे "आतले"* आणी सहाराचे सुब्रतो रॉय दोघेही एकाच माळेचे मणी आहेत असे म्हणावे लागेल. * आतले कोण आहेत ते अजून उघड झालेले नाही पण ते आहेत याची बरीचशी खात्री आहे.

In reply to by सुबोध खरे

अगदी अगदी. देशाचं कुठलंही नुकसान करणारा आपला असो वा परका (दुसर्‍या देशाचा) कुणालाच सोडू नये. कायद्याने ठरवलेली शिक्षा झालीच पाहिजे. फक्त कोणीही मिडियाट्रायलचा बळी असू नये. रच्याकने प्रत्यक्ष देशद्रोही कृत्ये करणार्‍या आणि त्याबद्दल शिक्षा भोगणार्‍या संजय दत्तला आपण (जनता) कशी वागवते हे बघतोच आहोत. देशद्रोहाचे गुन्हे सिद्ध झालेल्या दत्तबद्दल एक भूमिका आणि एकही गुन्हा सिद्ध न झालेला कन्हय्याबद्दल दुसरी भूमिका ठेवणार्‍या भारतीय जनतेबद्दल आपले काय मत आहे?

In reply to by तर्राट जोकर

अगदि अगदि...मोदिंचि किति वर्ष मिडिया ट्रायल चाललि / अजुनहि चालते नाहि का ! माझ्या मते त्यांच्यावर तर कुठला गुन्हा हि दाखल नव्हता.

In reply to by होबासराव

अच्छा, त्यांच्यावर चालली/चालते म्हणून आता प्रत्येक विरोधकावर चालवली गेली पाहिजे असे वाटते का? म्हात्रेसाहेबांनी वरच्याच प्रतिसादात म्हटलंय एकाने केलंय म्हणून दुसर्‍याला तेच करण्याची मुभा नाही असे.

In reply to by तर्राट जोकर

अच्छा, त्यांच्यावर चालली/चालते म्हणून आता प्रत्येक विरोधकावर चालवली गेली पाहिजे असे वाटते का? म्हात्रेसाहेबांनी वरच्याच प्रतिसादात म्हटलंय एकाने केलंय म्हणून दुसर्‍याला तेच करण्याची मुभा नाही असे. अरे भौ मि सुद्द्धा तर तेच म्हणतोय्..तुमचाच तर मुद्दा उचलुन घेतला कि 'मिडिया ट्रायल' कोणाचिच व्हायला नकोय.

In reply to by तर्राट जोकर

व्यक्तिशः मी संजयदत्तचा चित्रपटदेखील बघत नाही.. दुसरी गोष्ट म्हणजे संजय दत्तला बहुधा बेकायदा शस्त्रे बाळगण्याबद्दल शिक्षा झाली होती.. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध झालेला नव्हता. आणि तुम्ही शिवसेनबद्दल बोलत असाल तर मग बाबा आपले मौनच. शिवसेनेचे हिंदुत्व हेच मुळात बेगडी आहे असे माझे मत आहे.

In reply to by आनन्दा

संजयदत्तला Terrorist and Disruptive Activities Act (TADA) आतंकवादी और विघटनकारी गतिविधियां अधिनियम अंतर्गत शिक्षा झाली. पण जनतेच्या दृष्टीने तो मुळीच आतंकवादी किंवा विघटनकारी नाही पण गुन्हे सिद्ध न झालेला कन्हय्या आहे व त्याला कोर्टाच्या आवारात तीन तास मारहाण करणारे वकिल देशभक्त. जनता कशी वापरली जाते याचे यापेक्षा मोठे उदाहरण आत्तातरी काय द्यावे.

In reply to by तर्राट जोकर

त्याला कोर्टाच्या आवारात तीन तास मारहाण करणारे वकिल तीन तास ?... रबर जरा जास्तच ताणले आहे असे वाटत नाही का ? ;) =)) ======= तो वकील चूक होता, त्याला योग्य ती शिक्षा व्हायला हवी हे अगोदरच लिहिले आहेच. त्या वकिलाने अतिरेकी वर्तनाने जी चूक केली तिच इथे शाब्दिक अतिरेकाने होत आहे ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्याचे स्वतःचे रबर आहे हो. मी नै ताणत. तो तीन सेकंद म्हणाला असता तर तसे लिहिले असते. स्टिंग मधे स्वतःच बोललाय.

In reply to by तर्राट जोकर

दर बातमी / अहवाल / विवरण / वचन यावर डोळे झाकून विश्वास न ठेवता त्याला सारासारविवेक आणि पार्श्वभूमीच्या चाळणीतून चाळून घ्यावे असे आम्ही नेहमी म्हणत असतो ते यामुळेच ! ;) :) लोकांच्या नजरेत, झेंड्याच्या मालकाइतकीच (किंवा किंचित जास्तच) तो फडकवणार्‍याची विश्वासार्हता/समज पणाला लागलेली असते ;) :)

In reply to by तर्राट जोकर

संजय दत्तला Arms Act खाली शिक्षा झाली. TADA लावला गेला असता पण सरकारी वकिलांकडे तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा पुरावा नव्हता म्हणून TADA लावला गेला नाही. TADA लावला गेला असता तर कमीतकमी १० वर्षांची शिक्षा झाली असती.

In reply to by बोका-ए-आझम

पुरावे नव्हते की दडवले हा भाग जाऊ द्या. कन्हया प्रकरण संजयदत्तप्रकरणाशी तुलना केली तर भारतीय जनमानस माध्यमांचा उपयोग करुन कसं भडकवलं जातं, शांत केलं जातं ह्याबद्दल मुद्दा होता.

In reply to by तर्राट जोकर

अरे वा.. मग हे कशाबद्दल होते?
देशद्रोहाचे गुन्हे सिद्ध झालेल्या दत्तबद्दल
या वाक्याबद्दल संजय दत्तने तुमच्यावर अब्रूनुकसानीचा खटला का दाखल करू नये? ह.घ्या हे वे सा न ल.

In reply to by तर्राट जोकर

देशद्रोह आणि गुन्हा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. त्यामुळे ज्या कृतींमुळे देशाच्या सुरक्षेला, सीमांना, एकात्मतेस (म्हणजे सार्वभौमत्वास) धक्का पोहचू शकतो तो मला वाटते देशद्रोह आहे. जर "देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे." असे सरसकट म्हणले तर लफडे होईल. रस्त्यावर कचरा फेकणे जर बेकायदेशीर केले आणि कोणी कचरा फेकला तर तो देखील राष्ट्रद्रोह होईल... तसे नाही. हे म्हणजे कम्युनिझमकडे पडणारे पाऊल ठरेल. तो निव्वळ गुन्हाच ठरेल. भ्रष्टाचार पण बर्‍यापैकी वेळेस गुन्हाच असतो. पण एक उदा. म्हणून त्याचा संबंध जेंव्हा परकीय पैशाशी अथवा परकीय चलनाच्या दळणवळणाशी होऊ शकतो आणि त्यामुळे जर कुठले प्रत्यक्ष नुकसान होऊ शकले तर हेरगिरी अथवा इंडस्ट्रीयल हेरगिरी म्हणून देशद्रोह ठरू शकेल कदाचीत.

In reply to by विकास

ज्या कृतींमुळे देशाच्या सुरक्षेला, सीमांना, एकात्मतेस (म्हणजे सार्वभौमत्वास) धक्का पोहचू शकतो तो मला वाटते देशद्रोह आहे >> आत्ता आला मुद्द्याचा प्रश्न. :-) ज्या कृतींमुळे असे होते त्या कृतींचा स्पष्ट उल्लेख संविधानात, भारतीय दंडविधानात असेलच. त्याबद्दल भारतीय दंडविधान, संविधान काय म्हणतं?

In reply to by तर्राट जोकर

Section 124-A- Sedition नुसार Whoever, by words, either spoken or written, or by signs, or by visible representation, or otherwise, brings or attempts to bring into hatred or contempt, or excites or attempts to excite disaffection towards. 2[* * *] the Government established by law in 3[India], 4[* * *] shall be punished with 5[imprisonment for life], to which fine may be added, or with imprisonment which may extend to three years, to which fine may be added, or with fine. Explanation 1-The expression "disaffection" includes disloyalty and all feelings of enmity. Explanation 2-Comments expressing disapprobation of the measures of the attempting to excite hatred, contempt or disaffection, do not constitute an offence under this section. Explanation 3-Comments expressing disapprobation of the administrative or other action of the Government without exciting or attempting to excite hatred, contempt or disaffection, do not constitute an offence under this section. जेएनयु मधे दिल्या गेलेल्या घोषणा उपरोक्त दंडविधानानुसार शिक्षेस पात्र ठरतात. फक्त त्या कोणी दिल्या हे शोधले की झाले.

In reply to by तर्राट जोकर

Sedition साठी हा आहे मी खाली दिलेला १२३ नाही... जेएनयु मधे दिल्या गेलेल्या घोषणा उपरोक्त दंडविधानानुसार शिक्षेस पात्र ठरतात. फक्त त्या कोणी दिल्या हे शोधले की झाले. हे तितके सोपे नाही...पण केवळ एका त्रयस्थ नजरेने कायदा कसा interpret केला जातो हे बघणे रोचक ठरणार आहे: अशा केसेस मधे केदारनाथ सिंग खटला या साठी ग्राह्य धरला जातो. आता गंमत अशी आहे. की या मधे जे आरोपी होते ते केदारनाथ सिंग हे मला वाटते कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. त्यांनी बिहारमधे भाषणे करताना त्यांच्या मागावर असलेल्या सिआयडींची तुलना कुत्र्यांशी केली, काँग्रेस गुंडा वगैरे शब्द वापरले. त्यासाठी त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता. अर्थातच तो कोर्टाने मानला नाही आणि कशाला मानावे हे सांगितले. नंतरच्या काळात तोगाडीयांवर असाच आरोप झाला पण ते सुटले. तोगाडीया तुम्हाला-मला झेपणार नाहीत पण ते देश के तुकडे करण्याची भाषा करतील असे वाटत नाही. अर्थात ते देखील सुटले. रॉय काकू कशा सुटल्या माहीत नाही. पण त्यांनी देखील अशी भाषा केली असेल असे वाटत नाही. असिम त्रिवेदीचे शब्द जरी भडक असले तरी त्यानी काढलेले कार्टून्स हे देशद्रोही कॅटॅगरीत बसणारे नव्हते. फारतर त्याला सत्ताधारी - तत्कालीन काँग्रेसविरोधी होते असे म्हणता येऊ शकेल. आत्ता मात्र जी भाषा वापरली गेली आहे आणि ते नंतर जादवपूरला पण पसरले त्यामुळे रंग किंचीत वेगळा आहे. पोलीस यात षड्यंत्र होते आणि जर अटक केली नसती तर सर्वत्र वाढू शकले असते असे म्हणू शकतात. त्यासाठी जाट आंदोलन प्रसंग पण पुढे करू शकतात. खरे-खोटे काय होते माहीत नाही. पण सिद्ध काय होते आणि न्यायालयास काय चालते ते पहाणे रोचक ठरणार आहे.

In reply to by विकास

बरोबर. उपरोक्त खटले आणि जेएनयु प्रकरण एकाच मापात नाही बसणार. तत्कालिन सरकार, सत्ताधारी पक्ष ह्याविरूद्ध थेट घोषणा आणि देशाविरुद्ध थेट घोषणा ह्यात फरक आहेच. पण अटक केली नसती तर सर्वत्र वाढू शकले अस्ते असा दावा टिकु शकणार नाही असे वाटते. पुढे काय होइल हे रोचक आहेच.आपल्या जनमतांच्या पलिकडे भावनारहित स्थितीत न्यायालय चालते. त्यात जनमताला पाहिजे तेच निर्णय लागू शकत नाहीत. लागले तरी शिक्षा कायद्यानुसार होते. पाणी फार गढूळलंय. लवकर गाळ खाली बसावा. न्यायालयाने तुरटी फिरवावी.

In reply to by तर्राट जोकर

त्याबद्दल भारतीय दंडविधान, संविधान काय म्हणतं? अहो जरा स्वतः पण घरकाम (आयमीन होमवर्क) करत जा की! Section 123 in The Indian Penal Code 123. Concealing with intent to facilitate design to wage war.—Whoever by any act, or by any illegal omission, conceals the existence of a design to wage war against the [Government of India], intending by such concealment to facilitate, or knowing it to be likely that such concealment will facilitate, the waging of such war, shall be punished with imprisonment of either de­scription for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine. आता पुढचा प्रश्न येण्याआधीच उत्तर देतो: भादंवि / आयपीसी च्या सुरवातीसच हे चाचानेहरूंच्या कृपेने स्पष्ट करण्यात आले आहे: except the State of Jammu and Kashmir त्यामुळे तेथे अमुक असा वागला तरी कसे काय चालले वगैरे प्रश्न नकोत.

In reply to by विकास

गरज नसतांना तुम्ही हा होमवर्कचा सल्ला द्याल हे लक्षात येऊन आधीच वरचा प्रतिसाद दिला. स्पून फिडींग फार लागतं आजकाल, काय करणार? बाकी, जेएनयुतल्या घोषणांना १२३ लागेल की १२४-अ हे आता न्यायालय ठरवेल. खरे आरोपी सापडले तर. अफझल गुरुच्या फाशीच्या निषेधार्थ, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमासाठी काही गुन्हा दाखल होणे शक्य आहे की नाही हे नाही सांगता येणार.

In reply to by तर्राट जोकर

चार्जशीट पोलिस (त्यांच्या वतीने सरकारी वकील) फाईल करतात. कोर्ट गुन्हा अमक्यातमक्या कलमानुसार फाईल केल्यास पुरावा दाखवा असं म्हणतं. कलम ठरवत नाही. संजय दत्तला टाडा न लावायचा निर्णय सरकारी वकिलांचा होता. कोर्टाचा नव्हे.

In reply to by बोका-ए-आझम

मी जे म्हणतोय तेच तुम्ही वेगळ्या शब्दात मांडलंय. स्पून फीडींगची गरज अधोरेखीत झाली. रच्याकने, मिसळपाववर काहीही लिहायचे असेल तर भाषा सरकारी, कायद्याची, काटेकोर, विज्ञानसंज्ञांच्या व्याख्येसारखी असली पाहिजेच काय? की अभिव्यक्ति स्वातंत्र्य फक्त जर्मनीकरांस मिळाले आहे?

In reply to by बोका-ए-आझम

न्यायालय ठरवेल म्हणजे न्यायालयीन कार्यवाहीत ठरेल असा अर्थ. कलमं लावायचं काम पोलिसांचं असलं तरी दंड देण्याचं न्यायालयाचं आहे. गुन्ह्याप्रमाणे पोलिस कलम लावतील, त्याला पुरावे सादर करतील पण शेवटी ह्या तिघांतही (गुन्हा, कलमं, पुरावा) सुसूत्रता आहे का ह्यावर निर्णय द्यायचं काम न्यायालयाचं आहे. माझ्यामते पोलिस यंत्रणा न्याय व्यवस्थेचाच एक भाग आहे. त्याअर्थाने न्यायालय ठरवेल असे म्हटले. कुणाला ज्यादा माय्क्रोस्कोपिक बघायचे असल्यास माझी हरकत नाही. असो.

In reply to by विकास

माझा वरचा प्रतिसाद मूळ धाग्याच्या अनुषंगाने असला तरी भंकसबाबा ह्यांनी उपस्थित केलेल्या टॅक्सच्या मुद्द्याच्या अनुषंगाने नाही, तो सोडून द्यावा. टॅक्सपेयर ह्या नात्याने सिलेक्टीव संताप योग्य आहे का हा माझा मूळ प्रश्न होता. (एक भारतीय म्हणून संताप असलाच पाहिजे ह्या अर्थाचा प्रतिसाद खालीच दिलाय)

In reply to by तर्राट जोकर

वरील दोन गोष्टीतला एक मुलभूत फरक आपण समजुन घेतलेला दिसत नाही. देशविरोधी घोषणा देणॅ. देशद्रोही कामे करणे आणि उद्योगधंदा करत असताना त्यात नुकसान होणे यात मूलभूत फरक आहे. उद्योगधंद्यात नुकसान होणारा प्रत्येक उद्योगपती हा पैसे घशात घालतो असा एकांगी समज करुन घेणे म्हणजे प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी असतो असे म्हणण्यासारखे आहे. धंदा म्हटल्यावर चढ उतार येणारच. कधी कधी काही गणीते चुकु शकतात. हे करताना नुकसान देखील होणारच. नुकसान सहन करणारा माणूस अजुन जास्त हातपाय मारुन गाळातुन वरती यायचा प्रयत्न करतो आणी या प्रयत्नात जास्त गाळात जातो. त्याने कितीही सचोटीने धंदा केला तरी काही समीकरणे बिघडुन कर्जे बुडीत जाऊ शकतात. शेतीमध्ये वेगळे काय होते? तिथेही शेती गाळात जाते, बॅ़कांची कर्जे बुडवली जातातच की. त्यामुळे केवळ नुकसान झाल्याने धंदा बुडाला आणि कर्जे परत करु शकले नाहित तर उद्योगपती चोर ठरत नाहित. देशद्रोही तर नाहिच नाही. ज्या उद्योगपतींनी पैसा घशात घातला ते चोर ठरु शकतात. मल्याचे उदाहरण घ्यायचे तर त्याने किंगफिशर एयरलाइन मध्ये पैसा गुंतवला आणि तो डुबला. त्याने बँकांनाही डुबवले. ही धंद्यातली खोट झाली. जोपर्यंत असे सिद्ध होत नाही की मल्याने एयरलाइनच्या नावाने पैसा घेउन स्वतःचे बंगले बांधले तोवर तो चोर ठरत नाही. आपल्याला मल्याची लॅविश लाइफस्टाइअल दिसते आणि त्याने बँकांची बुडवलेली कर्जे दिसतात पण त्याने कर्जे एयरलाइनची बुडबली. त्याने बुडवली म्हणजे त्याच्या कंपनीने बुडवली कारण ती कंपनी गाळात गेली आणि पार्ट्या तो त्याच्या इतर उत्पन्न स्त्रोतातुन करतो. त्यामुळे तो चोर ठरत नाही. अर्थात यातुन माणसाची नियत दिसते. त्याने कर्मचार्‍यांचे पैसे देखील थकवले. आपल्या इतर उद्योगांतुन स्वतःचे पैसे अय्रलाइन मध्ये लावुन तो काही देणी चुकवु शकला असता. त्याने जे केले ते मनाला रुचत नसले तरी त्यात बेकायदेशीर काही नसल्याने तो अजुन बाहेर आहे ( त्याने कंपनीच्या पैशावर स्वतःचे इमले बांधले असतील तर गोष्ट वेगळी) थोडक्यात धंद्यातली खोट हा देशद्रोह काय साधी चोरी पण ठरत नाही पण खोटेपणाचा धंदा ही चोरीच झाली.

जिथंतिथं 'विचावंत' लोकांकडून सध्या आळवलं जाणारं धृपद 'Dissent is not anti-national' हे जितकं खरं आहे तितकाच सोयीस्कर रित्त्या विसरलेला त्याचा व्यत्यासही खरा आहे .

काश्मिरी आतंकवादी मकबूल भट याची विकीपिडियावरची माहिती संतुलित नाही. त्याचे उदात्तीकरण करुन त्याला हिरो बनवणारी वाटते. संबंधित लक्ष देतील काय? https://en.wikipedia.org/wiki/Maqbool_Bhat

आपल्या नेहमीच्या आयुष्यातही आपण चटकन बोलून जातो " ते... अमुक ना कोणालाही दुखवीत नाहीत अर्थात ते फार सद्ग्रूहस्थ आहेत. " माझ्या मते त्यांच्या या गोडव्या पेक्षा ते किती सरळ वा वाकडे वर्तणुकीत आहेत हे मला महत्वाचे वाटते. मी राष्ट्रध्वजाला वंदन करतो पण आयकर बुडवितो. भारत्माताकी जय म्हणतो पण रांगेत घुसतो तर मी एक देशद्रोहीच आहे. जला दो जला दो जला दो ये दुनिया...... असे वैतागाने म्हणणारा॑ कवि मग मानवाचा एक नंबरचा शत्रू म्हणावयास हवा. आपण आपली घटना आपल्यासाठी बनविली आहे ती आपल्यासाठी आहे आपण तिच्यासाठी नाही. सबब ती बदलू असे सुचविणे हा देखील देशद्रोह मानू लागलो तर वरती अस्मानातच वस्ती करून रहावे लागेल. थोडक्यात देश, धर्म राष्ट्र,संस्कृति भाषा राज्यघटना या समूहासाठी आहेत. मानवाने त्याचा अतिरेकी अभिमान बाळगू नये. पण कृति करताना आपण काही इतरांच्या जगण्यातच उपद्रव ठरणार असू तर खुद्ध एखादा शास्ता देखील देश्द्रोही म्हणावा लागेल. नव्हे आज देखील जर्मनीतील लोक॑ हिटलरला देशद्रोहीच मानतात.

तर्राटजी जोकर, माझं एक सुक्ष्म निरीक्षण सांगतो, असल्या विषयांच्या धाग्यावर तुम्ही असंबंधित मुद्दे काढून धागा हायजॅक करण्याचा प्रयत्न करता.
देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे.
उघड उघड देशविरोधी घोषणा देणारे आणि गुपचूप चुना लावणारे यांच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत नाही का?
बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज आपल्याच करातून उद्योगपतींच्या घशात गुपचुप घातलेत. तेव्हा आपण आपल्या बोलण्याचा हक्क बजावला की नाही?
माझ्या अल्पज्ञानानुसार भ्रष्टाचार हा गुन्हा जरूर आहे,यामुळे देशाचे नुकसान होते.पण ते देशद्रोह या क्याटॅगिरीत मोडत नाही. भंकसबाबांनी देशविरोधी घोषणा देण्यार्यांना कुत्रे संबोधले आहे,पण तुम्ही परत उद्योगपतींना कर्ज देणे वगैरे असंबंधित मुद्दा उपस्थित केलात.आणि त्यांनासुद्धा कुत्रे म्हणण्याचा हक्क बजावलात का? म्हणून विचारलं. देशद्रोही घटनांची इतर घटनांबरोबर तुलना करू नये सरकारचे धोरण,दुटप्पीपणा,भ्रष्टाचार वगैरे मुद्दे मांडण्यासाठी दुसरे धागे आहेत,किंवा तुम्ही दुसरा धागा काढा. पटलं तर घ्या नाहीतर द्या सोडून.

In reply to by आनन्दा

मानधन वैगेरे मिळते का हो शेंचुरीला? माझा हेतु उद्योगपतिची पाठराखण करण्याचा नव्हता. हे देशद्रोही गोबेल्स तंत्रानुसार प्रचार करत आहे. काही काळाने हे टीनपाट बोलतील तेच सत्य असा समज पसरायला वेळ लागणार नाही. कदाचित माझा पोरगा (वय वर्षे 5) दहा वर्षानी मला विचारेल की शिवाजी महाराजांनी अफझलखानाला का मारले? जर तो दुष्ट होता तर मग त्याच्या नावाने दर्गा का आहे? तिथे मन्नत का मागितली जाते?

In reply to by आनन्दा

करू द्या हो. नाहीतर माझी शेंच्युरी कशी होणार?
हे नाही आवडलं ! आपण केवळ टीआरपी मिळावी म्हणून का असले धागे काढता ? एकदा आपण विचार करा हा मुद्दा किती गंभीर आहे याबाबतीत .

In reply to by उगा काहितरीच

थोडीशी थट्टा चालते, नाही का? मी वरच लिहिले की हा विषय मी मोरेकाकांच्या धाग्यात काढला होता, पण त्याचे धागामूल्य लक्षात घेऊन मी वेगळा धागा काढला. नाहीतर त्यांचा धागा हाय्जॅक व्हायचा. मी टीआरपी साठी धागे काढतो का हे आपण माझ्या इथल्या इतिहासावरून ठरवावे. मी काय बोलणार?

In reply to by आनन्दा

थोडीशी थट्टा चालते, नाही का?
सहमत , चालावीच थोडीफार थट्टा . पण त्यासाठी भरपूर इतर धागे आहेत ना . हे असे सिरीयस धागे मिपाच्या सदस्व्ययांतीरीक्तही इतर लोकही वाचतात. कदाचित त्यामुळे मिपाची प्रतिमा "कोणत्याही धाग्यावर थट्टामस्करी करणारे संस्थळ" असे होउ शकते.
मी वरच लिहिले की हा विषय मी मोरेकाकांच्या धाग्यात काढला होता, पण त्याचे धागामूल्य लक्षात घेऊन मी वेगळा धागा काढला. नाहीतर त्यांचा धागा हाय्जॅक व्हायचा.
होय, ते आलं लक्षात आणी हे योग्यच केलेत. धन्यवाद !
मी टीआरपी साठी धागे काढतो का हे आपण माझ्या इथल्या इतिहासावरून ठरवावे. मी काय बोलणार?
बिलकुल नाही! तुमचे धागे चांगलेच असतात उगाच गैरसमज नको. पण त्याचं काय आहे ना, मी सहसा लेखावर प्रतिक्रिया देताना लेखकाचा पुर्वेतिहास बघत नाही. लेखकावर नाही तर लेखावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो. . बहुत काय लिहीणे , आपण सुज्ञ आहात. काही चुकलं असेल तर क्षमा असावी . -आपला नम्र उका .

In reply to by आनन्दा

साठीच धागा काढत असतो. तो लोकांनी वाचावा आणि प्रतिक्रिया द्याव्यात हा प्रत्येकाचाच उद्देश असतो. त्यात चुकीचं काहीच नाही. टीआरपीचा हाच अर्थ लावतात ना? का काही वेगळा मिपीय अर्थ आहे? (कवितेत जसे कोडाईक‌नाल आणि भुछत्री हे खास मिपावरचे काव्यरस आहेत तसं).

In reply to by बोका-ए-आझम

सवंग लोकप्रियता म्हणजे टी आर पी असा मिपीय अर्थ आहे. ह्यामध्ये धाग्याचा विषय काय निवडला आहे ह्यावरुन धागालेखकाचा उद्देश बरेच्दा कळून येतो. प्रतिसादांतूनही दिसुन येतं. काही लेख कितीही सुंदर, चर्चेस पोषक बीज देणारे असले तरी पब्लिक इग्नोर मारते असेही दिसून येते. काही विशिष्ट विषय जसे शाकाहारी-मांसाहारी, आध्यात्म-विज्ञान, स्त्री-पुरुष, आरक्षण इत्यादी विषय ट्यार्पी विषय म्हणून ओळखले जातात. धागालेखकांचे पुर्वकर्म बघूनही धाग्याचा उद्देश हा ट्यार्पीचाच आहे असेही सुज्ञ मिपाकर ओळखून घेतात. दुर्दैवाने लांडगा आला रे आला सारखे कधी कधी चांगले धागे ट्यार्पीच्या नादात बट्ट्याबोळ होऊन जातात.

In reply to by तर्राट जोकर

काही लेख कितीही सुंदर, चर्चेस पोषक बीज देणारे असले तरी पब्लिक इग्नोर मारते असेही दिसून येते.
दुर्दैवाने लांडगा आला रे आला सारखे कधी कधी चांगले धागे ट्यार्पीच्या नादात बट्ट्याबोळ होऊन जातात.
तुमच्या "राष्ट्रपाव" या धाग्याच्या अनुभवावरून सांगताय का?

In reply to by श्रीगुरुजी

साहेब, मी माहितगार यांच्या धाग्यांबद्दल बोलतोय, असे अनेक आहेत. राष्ट्रपाव हा धागा तद्दन टाइमपाससाठी होता, ट्यार्पीसाठी नाही. जितके प्रतिसाद आले त्याबद्दल ना दुख ना आनंद. स्वतःच पाचशे प्रतिसाद टाकून धागे हजारी करण्याइतकं निर्ढावलेलं मन नाहीये माझ्याकडे.

In reply to by तर्राट जोकर

मग ठीक आहे. तुम्ही सर्वत्र इतक्या पोटतिडीकीने आणि गांभिर्याने प्रतिसाद देता, त्यामुळे मला वाटलं की तो धागा सुद्द्धा तसाच असेल.
स्वतःच पाचशे प्रतिसाद टाकून धागे हजारी करण्याइतकं निर्ढावलेलं मन नाहीये माझ्याकडे.
पेला अर्धा रिकामा आहे का अर्धा भरलेला आहे हे ज्याच्यात्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे.