✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बिलिंदर राणी

व — विवेकपटाईत, Wed, 02/24/2016 - 13:27
लेक लेकीची बिलिंदर राणी पंधरा दिवसाची छकुली शोभते सर्वांची नानी. मोठे-मोठे डोळे तिचे पोपटासारखे नाक हिमाचली चेहरा तिचा गोरे गोरे गाल. सकाळी सकाळी गोड-गोड झोपते आपल्या नानाला किसी किसी देते. आत्या म्हणते गुडीया प्यारी मावशी म्हणते बाळ गुणी. शेजारी म्हणती किती-किती शांत लोभस गोंडस पटाईतांची नात. डिप्लोमेट राणी गालात हसते सर्वांना अशी मूर्ख बनविते . रात्र झाली कि खरे दात दाखविते आईला आपल्या रातभर जागविते . कुशीत नानीच्या घरभर फिरते जरा थांबता टाहो फोडते. मला पाहून ती डोळा मारते माय लेकींची कशी जिरवली. लबाड आमची बिलिंदर राणी नानांची तिची गट्टी जमली.

प्रतिक्रिया द्या
2985 वाचन

💬 प्रतिसाद (11)

अभिनंदन

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 02/24/2016 - 15:32 नवीन
मन:पूर्वक अभिनंदन पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

क्यूट कविता..!

खेडूत
Wed, 02/24/2016 - 15:36 नवीन
क्यूट कविता..! बाळाला शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

अरेव्वा!

चांदणे संदीप
Wed, 02/24/2016 - 15:53 नवीन
अभिनंदन पटाईत काका! Sandy
  • Log in or register to post comments

अरे वा!

पैसा
Wed, 02/24/2016 - 17:15 नवीन
आवडली तुमची राणी! आजोबा झाल्याबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments

:)

यशोधरा
Wed, 02/24/2016 - 17:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments

'पटाईत'आजोबा, अभिनंदन!

भिंगरी
Wed, 02/24/2016 - 17:29 नवीन
'पटाईत'आजोबा, अभिनंदन!
  • Log in or register to post comments

:-)

एस
Wed, 02/24/2016 - 17:59 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

राणीची मज्जाय !पंधरा दिवसाची

अजया
Wed, 02/24/2016 - 18:02 नवीन
राणीची मज्जाय !पंधरा दिवसाची होत नाही तर नाना कविता करतात तिच्यावर:) अभिनंदन नाना झाल्याबद्दल!
  • Log in or register to post comments

अरे वा! किती गोड! वेगळ्याच

रातराणी
गुरुवार, 02/25/2016 - 00:13 नवीन
अरे वा! किती गोड! वेगळ्याच जगात असाल आता तुम्ही! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन हो!

बहुगुणी
गुरुवार, 02/25/2016 - 01:19 नवीन
राणीगीत आवडलंच.
  • Log in or register to post comments

अभिनंदन पटाईत काका!!!

राघवेंद्र
गुरुवार, 02/25/2016 - 01:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा