Skip to main content

हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले कि..

लेखक निशांत_खाडे यांनी बुधवार, 24/02/2016 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले की स्मृतीतला गाव दिसू लागतो त्या गाव वेशी उभा मीच मजला पाहून अनोळखी हसू लागतो दशकान्तुनी उभ्या तिथल्या विक्राळ वटाच्या सावलीत जरासा बसू पाहतो स्मरणे ती जुनी अन बदलांच्या खुणा उद्विग्न नास्तिकासम तपासू पाहतो. पोपटी तृणांचा जुन्हा तो जिव्हाळा बदलाच्या भ्रांती फसू लागतो लोभस ते जग कधीचे संपले खरा भावनांचा उन्हाळा पुन्हा दिसू लागतो.. (कविता अपूर्णच आहे. अकरावीत असताना केव्हातरी लिहिली होती. बऱ्याच वेळा पूर्ण करण्याच्या प्रयत्न केला पण हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न होता आणि त्यात तो इतका भव्य वाटणारा पण आशयाने जवळपास शुन्य होता कि ते कधीच जमले नाही. आणि हि कविता माझ्या हिशेबाप्रमाणे कडव्या-कडव्यात ट्युनिंग बदलत जाते त्यामुळे कदाचित या अशा कन्फ्युज्ड व बालिश आशयाला साजेशे स्पष्टीकरण करण्यासाठी माझ्या बुद्धीतले काव्यात्मक शब्द अपुरे पडत जातात. आलोय आता मिपावर असे जुने-नवे प्रयोग दाखवत जाइल! सर्व मंडळींना रामराम! मिपावर आज पहिलाच दिवस.. मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडेल)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4792
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

११वीत लिहिलेली? शब्दांची निवड बघून वाटतंय खरं. शिवाय वृत्तात लिहावे का मुक्तछंदात यातही गोंधळ झालेला दिसतोय.

सुंदर रे भावा... तुझा अगोदरचा पण लेख वाचलाय... अतिशय हुंदर भावविश्व आहे तुझं... माझ्यासारखंच आहे ते... मी पण पाऊस, कृष्णमेघ, गावचा पार, भुरभुर पाऊस पाहिला आहे गावचा... I just love it....

मला कवितेच्या बाबतीत कडव्या कडव्यात जे ट्यूनिंग बदलत जाते आणि तो आशयही जेव्हा अधिक आशयघन होत जातो ते मला खुप आवडतं. राग येऊ द्या हवं तर. आपण बोलायला घाबरत नाही. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब, आपण एक चांगले समीक्षक आहात.. आपणाला माहित आहे? काय मोजक्या शब्दात समीक्षण करता राव प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे साहेब तुम्ही! बायदवे, पाऊस, मानवी मन, आणि भावना यांच्यात काहीच संबंध नसतो असे आपण समजता म्हणून मी आपला हा 'आशयाविशयीचा' प्रतिसाद तेवढासा सिरीयसली घेत नाहीये!

लिहित रहा नि.खा... कुणाला राग येऊचा तर येऊ दे... सुंदर अप्रतिम लिहीता... हे भावविश्व फार दुर्मिळ आहे... गावची आठवण देणारे भावविश्व... लिहित रहा....