✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा

स
सनईचौघडा यांनी
Wed, 02/17/2016 - 13:19  ·  लेख
लेख
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.
तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
97858 वाचन

💬 प्रतिसाद (362)

प्रतिक्रिया

चलू दे

श्रीरंग_जोशी
Sat, 02/20/2016 - 10:59 नवीन
चलू दे तुमचे निरर्थक अत्मकुजन. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तो

नाखु
Sat, 02/20/2016 - 11:01 नवीन
तुमचा भ्रम आहे हे ही चिटकवा त्यात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

ते चालु ते तुमचं निरर्थक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/20/2016 - 11:13 नवीन
ते चालु ते तुमचं निरर्थक अत्मकुंथन असं आहे रंगाण्णा. असो. चालु द्या तुमचं निरर्थक भ्रमयुक्तअत्मकुंथन रंगाण्णा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

रंगाण्णांनी कुंथन असा

प्रचेतस
Sat, 02/20/2016 - 11:23 नवीन
रंगाण्णांनी कुंथन असा असांसदीय शब्द वापरण्याऐवजी कुजन असा सांसदीय शब्द वापरला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कुजन हा

नाखु
Sat, 02/20/2016 - 11:27 नवीन
नक्की सांसदीय शब्द आहे का ? असल्यास पुरावा द्या. इथे प्रेमीकांना कुजन करण्यास मनाई आहे असा फलक वाचला नसावा तुम्ही कुठल्याही लेण्यात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कुजनाचे डीग्रेडेशन केले म्हणा

यशोधरा
Sat, 02/20/2016 - 11:28 नवीन
कुजनाचे डीग्रेडेशन केले म्हणा की =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मिपकर?

श्रीरंग_जोशी
Fri, 02/19/2016 - 21:58 नवीन
धाग्याची संकल्पना खूपच आवडली. प्रतिसादांनी चार चंद्र लावले आहेत. पण शीर्षकात मिपकर असा उल्लेख आहे मिपाकर नाही ;-) .
  • Log in or register to post comments

बुवांचां अत्तरांचा सुद्धा गाढा अभ्यास आहे त्यांनि अत्तरायण

होबासराव
Sat, 02/20/2016 - 15:17 नवीन
हि लिहिलेलि मालिका आज हि मिपावर आपला हिना आणि कस्तुरि चा सुगंध पसरवत आहे.
  • Log in or register to post comments

होबासराव

अभ्या..
Sat, 02/20/2016 - 16:16 नवीन
होबासराव आता बासराव. बुवा आपल्याला पत्ते शोधून हाणतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

बुवा आपल्याला पत्ते शोधून

गवि
Sat, 02/20/2016 - 16:29 नवीन
बुवा आपल्याला पत्ते शोधून हाणतील. ;)
बुवांना पत्त्यांचाही नाद आहे असं म्हणताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छे छे , तसले काही नाही,

अभ्या..
Sat, 02/20/2016 - 16:35 नवीन
छे छे , तसले काही नाही, उगी आपले चार दोस्त भेटले तर......... . . बाकी लडका हिरा है हिरा (अभ्याबच्चन, ठाकूरकी हवेलीके सामने वाली कोठीका ऑर्गन बजाने के लिये बनाया पोर्च, मु. पो. रामगढ.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मिपाकर.......................

अभ्या..
Sat, 02/20/2016 - 16:38 नवीन
मिपाकर............................. व्हाटस योर प्रोफेशन????? Image removed. आहूऊऊऊऊऊऊऊऊ. आहूऊऊऊऊऊऊऊऊ. आहूऊऊऊऊऊऊऊऊ. आहूऊऊऊऊऊऊऊऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आहूऊऊऊऊऊऊऊऊ वरून आठवले,

प्रचेतस
Sat, 02/20/2016 - 16:50 नवीन
आहूऊऊऊऊऊऊऊऊ वरून आठवले, बुवाही ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ करत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

देशी ३००.

अभ्या..
Sat, 02/20/2016 - 16:53 नवीन
Image removed. देशी ३००.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे व्वा तुमचा फोटो का???

चेक आणि मेट
Sat, 02/20/2016 - 17:07 नवीन
अरे व्वा तुमचा फोटो का???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तलवारीच्या पातीला अजिबात धार

सतिश गावडे
Sun, 02/21/2016 - 22:32 नवीन
तलवारीच्या पातीला अजिबात धार नाय काय? जल्ला नाय तं श्टाईल मारताना बुवांचा हात कापून रगात आला आस्ता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

स्वारि बुवा...तुम्हाला तरवारबाजि चे सुद्धा ज्ञान आहे हे विसरलो

होबासराव
Mon, 02/22/2016 - 17:24 नवीन
स्वारि बुवा...तुम्हाला तरवारबाजि चे सुद्धा ज्ञान आहे हे विसरलो होतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ढिशक्लेमर

माहितगार
Sun, 02/21/2016 - 11:38 नवीन
आमच्या आयडीचा या धागा लेखात नंबर पाहून डोळे प्वाणावले, ढिशक्लेमर जोडण्याची आणि पहिल्या पानावर यावा हे जरूरी वाटल्यामुळे प्रतिसाद येथे नोंदवत असून आमचा संक्षी. आणि वि. ठाकुर या आयडींशी कै पण संबंध नाही. संक्षी हा आयडी दिसला की आम्ही आंक्षीsss करून दूर जात असतो ;) (संक्षी ह. घ्या.) * दुसरे, वय कमी करुन मिळण्यासाठी सनई किंवा चौघडा काय आणि कसे वाजवावे ? (आयडीचे तुकडे केल्या बद्दल क्षमा मागून) * चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला म्हंजे काय र्‍हातय ? कसे दिसतात हे चेहरे काही फोटू सारखे उदाहरण द्यालका नाई काही. * आम्ही बरीक अधिक स्थुल कसे व्हावे याची पुस्तके बाजारात नित्याने शोधत असतो, स्थुल होण्याचा आनंद मिळवून दिल्या बद्दल धागा लेखकाचे धन्यवाद आणि __/\__ :) आता संक्षी/ठाकूर समजून कोन काय कामेंट दिलय का बघतो आणि तेथे पण ढिसक्लेमर चिटकवितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जव्हेरगंज

तुषार काळभोर
Sat, 02/20/2016 - 17:11 नवीन
ही व्यक्ती मध्यम बांधा, मध्यम उंची (५.६ - ५.१०) , गव्हाळ वर्ण, टीशर्ट-जीन्स
  • Log in or register to post comments

नाहीतर मग

तुषार काळभोर
Sat, 02/20/2016 - 17:12 नवीन
Image removed. जव्हेरभौ, हघ्या हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

बादवे, किती मिपापुरुष हे

एस
Sat, 02/20/2016 - 17:37 नवीन
बादवे, किती मिपापुरुष हे दाढीधारी असावेत?
  • Log in or register to post comments

मी आहे!! =))

सूड
Sun, 02/21/2016 - 22:29 नवीन
मी आहे!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मी पण!

आदूबाळ
Sun, 02/21/2016 - 23:54 नवीन
मी पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हमका भूल गये का? अभी २० दिनकी

अभ्या..
Sun, 02/21/2016 - 23:58 नवीन
हमका भूल गये का? अभी २० दिनकी है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

उपप्रश्न

तुषार काळभोर
Mon, 02/22/2016 - 10:23 नवीन
किती पुरुष मिपाकर परमनंट दाढीधारी/सध्या दाढीधारी/परमनंट मिशीधारी/सध्या मिशीधारी/खुंटधारी इ आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आम्ही कायम खुंटधारीच असतो,

सूड
Mon, 02/22/2016 - 14:12 नवीन
आम्ही कायम खुंटधारीच असतो, आताशा फिलिप्सचा ग्रूमिंग कीट नीट वापरता येऊ लागल्याने दाढीचे वेगवेगळे प्रयोग करत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

बाकी

सूड
Mon, 02/22/2016 - 14:13 नवीन
दाढीधारी पुर्षांचा विदा गोळा करण्यामागचे कारण कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

तसंही मिपावर

नाखु
Mon, 02/22/2016 - 14:16 नवीन
गेलाबाजार वर्षाभरातील घेतलेल्या विदा/कौलाचा पुढे काय "उजेड्/दिवा-बत्ती" पडला ते कळलं नाहीच त्यात आणखी एक भर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मग कोणाचा करणार?

पैसा
Mon, 02/22/2016 - 14:19 नवीन
दाढीधारी पुर्षांचा विदा
मग कोणाचा करणार? दाढीधारी बायका काय मी तरी पाह्यल्या नाहीत! माईसाहेब असल्या तर नकळे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

दाढीशिवायच्या बायका-पुर्षांचा

सूड
Mon, 02/22/2016 - 17:54 नवीन
दाढीशिवायच्या बायका-पुर्षांचा पण विचारु शकतात की!! गरीब बिचार्‍या दाढीधार्‍यांनी काय घोडं मारलंय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी दाढीधारी आणि दाढीप्रेमी

बॅटमॅन
Mon, 02/22/2016 - 12:12 नवीन
मी दाढीधारी आणि दाढीप्रेमी आहे! निव्वळ दाढी पाहून म्लेच्छ ठरवणारे लोक्स आसपास असले तरी दाढी आपल्याला प्रिय आहे. स्वयमेव महाराज, रामदास आणि गुरू नानक वगैरे लोकांनी केलेली स्टाईल ज्यांना हिंदू फ्रेंडली वगैरे वाटत नाही त्यांचेबद्दल अता काय बोलावे ब्रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

धाग्याचे ३०० झाल्याबद्दल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 02/21/2016 - 10:46 नवीन
धाग्याचे ३०० झाल्याबद्दल प्रमोद देर्देकरांना समस्तं मिपाकरांचा गृप फोटो देउन सत्कार करण्यात येत आहे. ह्या व्यतिरिक्त्त मिपाचे सेलेब्रिटी मोगाखान, नानामाई, हितेश ह्यांची शेप्रेट ऑईल पोस्टर्स देण्यात येत आहेत. -अखिल मिपा मापंकाढेसमिती जेपीसंचालित चिमणहटेला पुस्करुत-
  • Log in or register to post comments

एक शांत मिपाकर

अबोली२१५
Mon, 02/22/2016 - 13:06 नवीन
आमच्या बद्दल काहीच नाही बुआ :{ -एक शांत मिपाकर
  • Log in or register to post comments

आप्ली ओळख आपणच करून देत असतो बॉ!

ए ए वाघमारे
Mon, 02/22/2016 - 18:01 नवीन
आप्ली ओळख आपणच करून देत असतो बॉ! तर आमच्याबद्द्ल‌‌ सांगायचं तर...जब मिलोगे तो खुद जान जाओगे!:) बाकी स्वस्तुती करणं आम्हाला आवडत नाही. -एक सायलेंट ऑब्झर्वर
  • Log in or register to post comments

माई ....

मिनेश
गुरुवार, 06/16/2016 - 12:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मु वि बद्दल

अजय देशपांडे
Mon, 06/20/2016 - 17:50 नवीन
अतिशय छान व्यक्तिमत्व ..... अभ्यासू योग्य सव्वाद साधणारा माझी आणि त्यांची भेट होता होता राहिली बोलणे झाले ते फोनवरच
  • Log in or register to post comments

मुवि साहेब, तुम्ही म्हणता

चौथा कोनाडा
Mon, 01/25/2021 - 17:44 नवीन
मुवि साहेब, तुम्ही म्हणता तसेच आहेत. पाच मिनिटांत आपलेसे करुन टाकतात. पाच वर्षांपुर्वी प्राधिकरण कट्टा इथे त्यांना भेटलो होतो. कट्ट्याला उपस्थित राहून केलेली धमाल या संबंधी आमची कमेंट इथे वाचा नंतर फारसे कट्टे झाल्याचं आठवत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय देशपांडे

सार्वजनिक कट्टे

कपिलमुनी
Mon, 01/25/2021 - 17:58 नवीन
व्हाट्सएप आल्यावर सार्वजनिक कट्टे कमी होऊन खासगी गुप्त कट्टे वाढले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

खरंय !

चौथा कोनाडा
Fri, 01/29/2021 - 13:14 नवीन
खरंय ! २०१५-१६ फेसबुक, व्हॉटसप्पने सर्वदुर पोहचत क्रान्ती केली अन आंजा वरील कट्ट्यांची संख्या रोडवत गेली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

माझे काही अंदाज.

बाप्पू
Mon, 01/25/2021 - 19:43 नवीन
माझे काही अंदाज. मुवि.. अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व. माझी आणि त्यांची ओळख फार थोडी आहे. प्रत्यक्ष भेट नाही झाली पण फोन वर गपा झालेत. पण अत्यंत मनमोकळे मदत करणारे. शेतीतील बरीचशी माहिती आवड आणि अनुभवी आहेत. दिलीप बिरुटे - 50 च्या आसपास. सडपातळ आणि चौकनी फ्रेम असणारा चष्मा. कडक आणि शिस्तबद्ध आणि आपलेच खरे म्हणणारे प्राध्यापक. विद्यार्थी यांना टरकून असणार. सुबोध खरे - 55 च्या आसपास आणि किंचित उंच आणि धिप्पाड शरीरयष्टी. थोडेसे पोट पुढे आलेलं. पांढरे केस आणि गोल फ्रेम चा चष्मा. बोलायला लागल्यावर थांबवणे अवघड ( डिबेट च्या बाबतीत ).. पण सहसा शांत दिसणारे. लोकं पाहिल्यावर शांत म्हणतात पण जवळच्या लोकांना माहिती की अंगात किती किडे आहेत.. क्लीन शेव आणि स्मार्ट राहणारे. .. हजरजबाबी आणि नेहमी मित्रमंडळीच्या घोळक्यात. कोलेज काळामध्ये तरुणींमध्ये पॉप्युलर.. कुमार 1 = 35-40 च्या आसपास वय. एकदम शहरी आणि सॉफ्ट स्पिकिंग. घरी पुस्तकांचा ढीग असावा. क्लासिकल गाणी, आणि शास्त्रीय संगीत ऐकणारे. हॉस्पिटल मध्ये ही केबीन मध्ये कदाचित मंद आवाजात गाणी सुरु ठेवणारे. प्रत्येक गोष्टीची माहिती शोधून काढून मगच बोलणार. कुठेही अंदाज किंवा गृहीतक मांडणार नाहीत. कदाचित बऱ्यचश्या पेशंट नी डॉक्टर खूप टेस्ट करायला लावतात असा गैरसमज करून घेतला असणार.. सहना = 40-45 वय.. पण एकदम फिट. अत्यंत हट्टी आणि आपल्या मुद्दा लावून धरणाऱ्या. यांची चंद्र रास सिंह असावी असा एक अंदाज. घरीही सर्वांवर लक्ष ठेवून जिथे कोणी चूक किंवा मनाविरुद्ध वागले तर तिथल्या तिथे बोलून दाखवणाऱ्यां. कुठलीही वस्तु फुकट कोणाला न देणाऱ्या.. मोगा / काळी मांजर / आणि त्यांचे इतर बरेच उडवलेले ID - झब्बा टाईप पायजमा घातलेला व्यक्ती. अंदाजे 40 चेहऱ्यावर हनुवटी खाली अमिताभ बच्चन स्टाईल दाढी. मिश्या बारीक ट्रिम केलेल्या. वाचनाची आवड. किंचित मजेशीर किंवा मित्रांसोबत चेष्टा मस्करी करणारा व्यक्ती. हसत खेळत निवांत राहणारा आणि उद्याची जास्त चिंता न करणारा. दुर्गविहारी = 30-35 वय. तब्येत जेमतेम पण चपळ. नेहमी फिरतीवर असणारा.. सायकलिंग आणि बाईक रायडींग आवडणारा व्यक्ती. कायम थ्री फोर्थ आणि T शर्ट . घरच्यांनी पोरग वाया गेलं असं म्हणून टेंशन घेणं सोडून दिलेले असावे. मुलींच्यामध्ये इंटरेस्ट नाही ( वेगळा अर्थ काढू नका !!! ) आणि मुलीसुद्धा भाव देत नसाव्यात. कॅट eye फ्रेम चष्मा आणि वाचनाची जबरदस्त आवड. अजुन बऱ्याच ID बद्दल मनात एक विशिष्ट इमेज आहे. नंतर कधीतरी लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

व्वा, भारी ओ बाप्पू !

चौथा कोनाडा
Tue, 01/26/2021 - 12:38 नवीन
व्वा, भारी ओ बाप्पू !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

सुबोध खरे - 55 च्या आसपास आणि

सुबोध खरे
गुरुवार, 01/28/2021 - 20:06 नवीन
सुबोध खरे - 55 च्या आसपास आणि किंचित उंच आणि धिप्पाड शरीरयष्टी. थोडेसे पोट पुढे आलेलं. पांढरे केस आणि गोल फ्रेम चा चष्मा. बोलायला लागल्यावर थांबवणे अवघड ( डिबेट च्या बाबतीत ).. पण सहसा शांत दिसणारे. लोकं पाहिल्यावर शांत म्हणतात पण जवळच्या लोकांना माहिती की अंगात किती किडे आहेत.. क्लीन शेव आणि स्मार्ट राहणारे. .. हजरजबाबी आणि नेहमी मित्रमंडळीच्या घोळक्यात. कोलेज काळामध्ये तरुणींमध्ये पॉप्युलर.. वय ५५ - बरोबर उंची ५' १०" भारदस्त -- नाही. ( १९९२ सालच्या लग्नाचा सूट अजूनही फिट येतो ) पांढरे केस आणि गोल फ्रेम चा चष्मा.-- केस विरळ झाले आहेत पण अजून काळे आहेत. चष्मा (फक्त वाचायचा) आहे (जवळचा --१०० रुपयात मिळणारा) बाकी इतरांनी सांगावं. मी काय सांगणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

क्लीन शेव आणि स्मार्ट राहणारे

सौंदाळा
गुरुवार, 01/28/2021 - 20:12 नवीन
क्लीन शेव आणि स्मार्ट राहणारे. .. हजरजबाबी आणि नेहमी मित्रमंडळीच्या घोळक्यात. सहमत, कोणत्याही कट्ट्याचे फोटो काढून बघा हजरजबाबीपणा साठी डॉक्टरांचे प्रतिसाद बघा कोलेज काळामध्ये तरुणींमध्ये पॉप्युलर.. हे मात्र स्वतः डॉक्टरच सांगू शकतील, डॉक एक लेख होऊन जाऊ दे यावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बाप्पू,

हेमंतकुमार
Tue, 01/26/2021 - 07:55 नवीन
बाप्पू, तुमच्या वरील 'अंदाज'पत्रकात माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद ! मात्र दोन गोष्टी वगळता तुमचे बाकी अंदाज चुकलेले आहेत हे नमूद करतो . बाकी तुमच्या लेखनाने खरोखरीच तरुण झालो बुवा 😀 😀 😀 त्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

तूर्त

हेमंतकुमार
Tue, 01/26/2021 - 09:31 नवीन
पोच म्हणून बाप्पू यांच्याबद्दल लिहितो. वय तीस ते पस्तीस. तडफदार व्यक्तिमत्व - नावाप्रमाणेच लढ बाप्पू ! नोकरीत असल्यास तिथल्या संघटनेचे पुढारी असावेत. यासंबंधीच्या कायदेकानूनची बारीक-सारीक माहिती असावी. फारसे कोणाचे काही ऐकून घेत नसावेत. तत्वनिष्ठ. आत्ता जरी नोकरीत असले तरी कधीतरी तिचा त्याग करून व्यवसायात प्रवेश करायची खुमखुमी असावी........
  • Log in or register to post comments

@कुमार 1 सर..

बाप्पू
Tue, 01/26/2021 - 22:13 नवीन
@कुमार 1 सर.. खूप क्लोज गेस.. पण मी संघटनेचा पुढारी वगैरे नाही.. माझ्या टीम चा पुढारी मात्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

भलतेच लिहून येण्याआधी दक्षता म्हणून...!

शशिकांत ओक
Tue, 01/26/2021 - 11:38 नवीन

मित्रांनो, मी हा असा... पासपोर्टवरील फोटोत जितका भुक्कड दिसतो तितका नाही.

Image removed.

आणि रेमंड्सच्या जाहिरातीत दिसतात इतका रुबाबदारही नाही!

Image removed.
  • Log in or register to post comments

तुमची प्रकाशचित्रे साठवणी केंद्रास आवडली नाहीत...

सतिश गावडे
Tue, 01/26/2021 - 13:02 नवीन
काका, तुमची प्रकाशचित्रे साठवणी केंद्रास आवडली नाहीत बहुतेक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

O m g.

बाप्पू
Tue, 01/26/2021 - 22:22 नवीन
O m g. शशिकांत ओक.. खरं सांगायचं तर ते तुमची अफजलखान आणि प्रतापगडची लेखमाला आणि इतर बरेच डिफेन्स संबंधित लेख वाचून तुम्ही एकदम कुडमुडे, पिळदार मिशीवाले आणि जाड भिंगाचा चष्मा घातलेले शास्त्रज्ञ टाईप व्यक्ती असताल असे वाटले होते. पण तुम्ही भलतेच स्मार्ट निघालात राव.. दुसरा फोटो जबरदस्त. पाहिला फोटो पोलिस स्टेशन मधल्या रेकॉर्ड वरचा असल्यासारखा वाटतो. हाहाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

खरे आहे... तो भुक्कड फोटो पाहून

शशिकांत ओक
गुरुवार, 01/28/2021 - 11:46 नवीन
पासपोर्टवरचा भामटा प्रत्यक्षात असा असू शकणार नाही म्हणून म्हटलं तर ते चुकीचे होणार नाही! अपेक्षाभंगाचे सूख काही विरळाच असते! माझ्याकडे पाहून ते आपल्याला मिळाले असेल तर मलाही आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा