✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शृँगार ३

अ
अनाहूत यांनी
Fri, 02/19/2016 - 18:09  ·  लेख
लेख
उठतो तर रोजच पण आज उठलो ते जरा लवकरच . एवढ्या सकाळी , सॉरी पहाटे उठायच म्हणजे थोडे श्रम पडलेच . नुसत गजर लावून चालत नाही , तो वाजल्यावर जाग यायलाही हवी आणि नुसती जाग येऊन भागत नाही तर नाईलाजाने का होईना अंथरूणातून बाहेर याव लागत . मोठ्या प्रयासाने या गोष्टी करून एकदाचा तयार झालो . आजपासून जिम सुरू करायची थोडी फिटणेस पाहिजे ना राव . स्वतःच आवरल्यावर बायकोपाशी गेलो . तिला कालच सांगितल होत जिमला सोबत येण्याबद्दल . तिनेही जिम केली तर लवकर फरक पडणार होता , म्हणून हा सगळा खटाटोप .तिला आवाज दिला आणि उठवण्याचा प्रयत्न केला . ती अशी काही वसकन अंगावर आली की मी घाबरून मागे सरकलो . मी स्वतःकडे पाहिल , मी पोटात लाथ बसु नये म्हणून माणूस ज्या पोझीशनमधे असतो त्या पोझीशनमधे होतो . ती लाथ मारणार होती , छे उगाचच काहीही . तिने नुसता असा काही अविर्भाव केला कि कृतीची गरजच नाही पडली . आणि मी घाबरलो , छे ती नुसती प्रतीक्षिप्त क्रिया होती . जाऊदे दमते बिचारी काम करून . आज झोपूदे उद्यापासुन येईल ना ती . बाहेर पडलो तर रस्त्यावर दोन - तीन कुत्री आणि मीच होतो . जिममधे पोहोचलो तिथ एक कुत्रा , आपल ट्रेनर वाटच पहात होता . तिथ गेल्यावर मात्र माझ्याकडून मनातल्या मनात का होईना त्याला कुत्रा संबोधन माझ्यावरच उलटल होत , तिथ मलाच कुत्र्यासारख पळाव लागत होत . छे याच्यासारखा दुसरा उद्योग नाही दुसरा . लोकांनी मेहनत करायची , घाम गाळायचा आणि पैसे याला द्यायचे , हे आपल चांगल आहे . शेवटी ते सगळ उरकुन घरी आलो . घरात आता बरीच धावपळ सुरू झाली होती त्यात सामील झालो आणि सगळ आटोपून ऑफिसमध्ये पोहोचलो . दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो . आणि स्वतःच आवरल . बायकोपाशी गेलो आणि तिला उठवणार तेवढयात कालची आठवण आली . मग सुरक्षित अंतर ठेवूनच तिला उठवण्याचा प्रयत्न केला , पण काही उपयोग झाला नाही . थोडा पुढे जाऊन प्रयत्न केला तर कालच्याच अनुभवाचा पुनःप्रत्यय आला . मग गेलो एकटाच जिमला . अस आता रोजचच झाल होत . ती काही जिमला येईल अस वाटत नव्हत . तरीही माझ्यातील फरक बघुन ती नक्की येईल याची खात्री होती मला . मी मात्र माझे प्रयत्न सुरू ठेवले . महिना झाला असाच दिनक्रम सुरू होता . आता जरा चांगल वाटू लागल होत . फिटनेस चांगला वाटत होता . शरीर कस हलक-हलक वाटत होत . उत्साह वाढला होता . सगळ सभोवतालच जगच सुंदर झाल होत . ऑफिसमध्ये वातावरण तसच होत पण त्याच आजकाल काही विशेष वाटत नव्हत . काहीही झाल तरी विशेष अस वाईट वाटत नव्हत . एक आनंद पसरून राहिला होता आयुष्यात आणि चेहऱ्यावरही . पण थोडीफार कंट्रोल आला होता स्वतःवर . बॉससमोर जाताना सुतकी चेहरा करून जायला विसरत नव्हतो . त्यामुळे ऑफिस सुसह्य झाल होत . शेवटी नुसती वर्क इफिशियंसी असून पुरत नाही तर ज्या लोकांमध्ये काम करायच आहे त्यांच्याशी डील करायलाही यायला हव . लोकलमधे चढण्यापूर्वी युद्धासारखी तयारी करत होतो आधीही हे करायचो पण कधीकधी गाफिल राहायचो तो गाफिलपणा सोडला होता आणि त्यानंतरही जर थोडाफार त्रास झालाच तर त्यासाठी शारीरिक आणि मानसिक कणखरपणा आला होता . घरी होता तेवढा वेळ सत्कारणी लावण्याचा प्रयत्न होता . नो मोबाईल , नो टिव्ही ओन्ली बिबी , या स्ट्रँटर्जीनुसार काम सुरू होत . तिने जिमला यायला अजूनही सुरूवात केली नव्हती . पण मला खात्री होती ती लवकरच यायला लागेल . इथे वर्क इफिशियंसी वाढविणे सुरू होत . स्वतःला स्वतःमधे थोडी इंप्रूवमेंट वाटत होती पण असली मजा अभी दूर है . आणि संवाद तसा फार नाही पण थोडाफार सुधारला होता . हं आली आपली ऑफिस बिल्डिंग . ओह who is she ? she is so beautiful . वा काय सौंदर्य आहे ! ओह married आहे . क्या बात है ! खरच इंडियन लूक मधेच मुली / स्रिया जास्त सुंदर दिसतात . ओके चला जाऊया आली लिफ्ट . ती सुद्धा आली लिफ्टमधे . माझ्या शेजारीच उभी होती . काय मस्त परफ्युम होता तिचा . यार फार छान वाटला हा परफ्युम . आपणपण घेऊया एक मस्त परफ्युम मंजूसाठी , आवडेल तिला . आज संध्याकाळी घरी जाताना घेऊनच जाऊया , आवडेल तिला . चला पाहूया काय म्हणतय आपल ऑफिस ? नेहमीप्रमाणे थंड . No its cool . अरे या इथही . मघाशी दिसलेली सुंदरी माझ्या समोरच उभी होती अगदी काही क्षणच . सहजच लक्ष तिच्या कटीवर गेल . कटी म्हणतात कि कटीप्रदेश . छे कटीप्रदेश म्हणजे काहीतरी डोंगराळ द-यांचा प्रदेश , जंगल प्रदेश सारख वाटत . आणि हे म्हणजे... चिकनी या शब्दाचा अर्थ गुळगुळीत , सुंदर आणि ज्यामुळे कोणीही घसरेल असा होतो ना . त्यामुळे हाच शब्द त्या कटीला चपखल बसेल . बाकी सोनाली कुलकर्णीलाही या बाबतीत ती कुठल्या कुठे सोडून देईल . माझा विचार सुरू होता तेवढयात ती सुंदरी बॉसच्या केबिनमधे शिरली . नंतर समजल ती बॉसची बॉस होती . बॉसच पण घरातली . काय पण नशीब असत एखाद्याच ? पण इतकी सुंदर वाइफ असेल तो माणूस इतका कसा रखरखीत . इतका राग , इतका वैताग कसा असू शकतो . अशी सुंदर बायको असलेला माणूस कायमस्वरूपी चेहऱ्यावर हसू घेऊन फिरायला हवा . असो ज्याच त्याच आयुष्य त्यात काय प्रॉब्लेम आहेत त्याच त्याला माहित . असो आज घरी जाताना मस्त परफ्युम घेऊन जाऊ . शेवटी आपली बायकोच जगात सर्वात सुंदर वाटते .... .... क्रमशः भाग १ http://www.misalpav.com/node/34867 भाग २ http://www.misalpav.com/node/34922

Book traversal links for शृँगार ३

  • ‹ शृँगार २
  • Up
  • शृँगार ४ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
7910 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

मी पहिला

सुबोध खरे
Fri, 02/19/2016 - 18:36 नवीन
मी पहिला
  • Log in or register to post comments

NEVER ENVY SOMEONE'S NEW

सुबोध खरे
Fri, 02/19/2016 - 18:40 नवीन
NEVER ENVY SOMEONE'S NEW SHOES BECAUSE YOU DONT KNOW WHERE THEY PINCH AND NEVER ENVY SOMEONES BEAUTIFUL WIFE BECAUSE YOU DONT KNOW HOW SHE IS IN BEDROOM
  • Log in or register to post comments

म्हणूनच

अनाहूत
Tue, 02/23/2016 - 22:13 नवीन
आपली बायकोच जगात सर्वात सुंदर वाटते ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हायला भारी लिहिता ओ तुम्ही.

अभ्या..
Fri, 02/19/2016 - 18:43 नवीन
हायला भारी लिहिता ओ तुम्ही. मज्जा मज्जा. लिव्हा पटापटा. येउद्या अजून.
  • Log in or register to post comments

आभारी आहे

अनाहूत
Tue, 02/23/2016 - 22:17 नवीन
आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लई भारी

राहूल.
Fri, 02/19/2016 - 22:45 नवीन
लई भारी
  • Log in or register to post comments

साठ मारी धाग्याच्या

नाखु
Sat, 02/20/2016 - 09:51 नवीन
धगीत अशी शब्दफुले यावीत ही मिपा वाचकांची गरज आहे.. सामन्य वाचक चळवळ
  • Log in or register to post comments

+११११११

जेपी
Sat, 02/20/2016 - 09:57 नवीन
+११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

+११११११११११

शित्रेउमेश
Tue, 02/23/2016 - 11:29 नवीन
+११११११११११ येवुदेत हो पट्पट... इथे आमची बायको पण सुंदर वाटायला लागलिये.... :)
  • Log in or register to post comments

माझं लेखन

अनाहूत
Tue, 02/23/2016 - 22:10 नवीन
माझं लेखन सत्कारणी लागलं म्हणायच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शित्रेउमेश

एक नंबर!!!!

बॅटमॅन
Tue, 02/23/2016 - 14:56 नवीन
एक नंबर!!!!
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार

अनाहूत
Tue, 02/23/2016 - 22:23 नवीन
सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments

भाग ४ http://www.misalpav.com

अनाहूत
Tue, 02/23/2016 - 22:25 नवीन
भाग ४ http://www.misalpav.com/node/35040
  • Log in or register to post comments

फारच भारी दादा! फारच मजेशीर!

असंका
गुरुवार, 02/25/2016 - 11:19 नवीन
फारच भारी दादा! फारच मजेशीर!
  • Log in or register to post comments

आभारी आहे

अनाहूत
गुरुवार, 02/25/2016 - 17:38 नवीन
आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा