✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार, शिक्षक आणि शिक्षणाची भूमिका

म
माहितगार यांनी
Wed, 02/17/2016 - 16:42  ·  लेख
लेख
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ चौकशी आणि चर्चेत असतानाच काल कलकत्यातील जादवपूर विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या मोर्चातून दिल्या गेलेल्या राष्ट्रविरोधी घोषणा बातमीत आल्या आहेत, सुभाषचंद्र बोसांबद्दल भावूक होणारा बंगाली विद्यार्थी असा दुसर्‍या टोकाच्या वर्तणूकीला सोबत कशी काय देतो ? वस्तुतः सहसा प्रत्येक व्यक्तीला स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेणे आवडत असावे तरीही विपरीत वर्तन का घडत असते ? स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवणारा माणूसही सोने खरीदीवरचे प्रेम सोडत नाही- सोने आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कितीही ताण पडला तरीही-, दुकानात कच्चे बील पण मागत नाही, स्वदेशी आणि विदेशी दोन्ही समोर ठेवले तर विदेशी पाहीजे म्हणतो म्हणजे आपली प्रत्येक कृती देशप्रेमाच्या तराजूने मोजतोच असे नाही तरी तो तेवढ्यावरच थांबतो, सर्वसामान्य माणुस अतिरेकी, शत्रुराष्ट्रे अथवा देश विघटनाचे समर्थन करण्याचे अथवा त्यास सहानुभूती दर्शवणारे टोक सहसा गाठणार नाही अशी आपली सर्वांची अपेक्षा असते. महात्मा गांधीबद्दलचे जे काही इतर आक्षेप क्षणभर बाजूला ठेवले तर भारतासाठी राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह धरताना स्वांतंत्र्यासाठी स्वातंत्र्य अशी भूमिका न घेता रयतेसाठी स्वातंत्र्य आणि म्हणून त्यासाठी समता, लोकशाही इत्यादी मुल्ये अध्यार्‍हुत असावीत ; त्याच प्रमाणे जवाहरलाल नेहरुंबद्द्लच आक्षेप क्षणभर बाजूला ठेवले तर संपूर्ण भारताचे विवीधतेत असलेली सांस्कृतीक एकात्मता; देश छोट्या छोट्या तुकड्यात विभागला असेल तर बलाढ्य शत्रुंचे फावते म्हणून एकसंघ राष्ट्राचा आग्रह धरतानाच स्थानिक संस्कृती आणि आर्थिक आकाक्षांना पुरेसे विसृत अवकाश देणारी राज्ये, आणि हि सर्व राजकीय संस्कृती इतपत मोकळी असावी की आदिवासी बहुल पुर्वोत्तर राज्यांना संस्कृतीसही विकासाचे सहभागाचे समान अवकाश मिळावे. शंभर अपराधी सुटले तरी चालतील एका निरपराधावर अन्याय होऊ नये या तत्वावर उभारलेली तसेच एक न्यायाधीश चुकला तर उच्चन्यायालय तिथे तुम्हाला समाधान झाले नाही तर सर्वोच्च न्यायालय अशी त्रिस्तरीय न्यायालय व्यवस्था. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाने भारताला एका पुरेशा समतोल सक्षम राज्यघटनेचा लाभ झाला आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ ज्या व्यक्तीच्या नावावर उभारले आहे त्या विद्यापीठातून राष्ट्रीय एकात्मतेची संस्कृती देशभर पोहोचावी ही अपेक्षा असताना विघटनवादी विचार घेऊन कुणी वावरते आहे, त्याही पेक्षा खेदाची बाब अशा विघटनवादी विचारांचे खंडन करण्या एवजी सहानुभीतीचे प्रदर्शन करुन त्यास अकॅडेमिक फ्रिडमचे नाव देऊन दिशाभूल केली जाते आहे ? आणि त्याही पेक्षा खेदकारक हि अशी दिशाभूल होऊ देण्यात तेथिल शिक्षक गणांचा आणि तथाकथित विचारवंतांचा सहभाग असावा ? विद्यार्थ्यांनी अगदी कोणत्याही प्रकारची शंका मोकळेपणाने विचारावी आणि शिक्षकाने त्याच्या शंकांचे निरसन करावे हा अकॅडेमीक फ्रिडमचा भाग असू शकतो, वक्तृत्व स्पर्धा, वावविवाद स्पर्धा, राऊंड टेबल चर्चा या निश्चितपणे अकॅडेमीक फ्रिडमचा भाग असू शकतात. आमच्या विद्यापिठातील विचारवंतांच्या विचारांचा दर्जा खरेच उत्तम असेल तर त्यांच्या समोर अतिरेकी जरी आला तरी विचारवंतांच्या विचाराने भारावून जाऊन त्याने स्वतःची शस्त्रे बाजूला ठेवावीत - विघटनाचा विचार शिक्षकाच्या भेटी सरशी विरुन जावयास हवा अशी अपेक्षा महावीर, बुद्ध आणि गांधींच्या भूमीने करू नये काय ? ठिक आहे विद्यार्थी चुकू शकतात पण शिक्षक आणि विचारवंत त्यांच्या कर्तव्य बजावणीत कुठे अपयशी होत आहेत का ? ते आपल्या कर्तव्यात अपयशी होत असतील तर त्यांनी एकतर स्वतःचे आत्मपरीक्षण करावयास हवे आत्मपरी़क्षणात अपयश येत असेल तर स्वतःच्या कर्तव्यात कुचराई झाल्याचे प्रायशित्त सुद्धा घ्यावयास नको काय ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
शिक्षण

प्रतिक्रिया द्या
10449 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

बापरे!

नाना स्कॉच
गुरुवार, 02/18/2016 - 15:16 नवीन
बापरे! हे काम माझ्या अवाक्या बाहेरचे आहे ! तरीही, गोषवारा म्हणले तर १. थोडीफार जेएनयुची भलामण आहे, काही असामाजिक तत्वांमुळे 'शट डाउन जेएनयु' करणाऱ्यांवर शरसंधान आहे २. राज्यशास्त्राच्या अनुषंगाने राष्ट्रवाद ह्या वादाची 'इझम' म्हणून उत्पत्ती अन प्रवास ३. राष्ट्रवादाची एक अशी फिक्स डेफिनिशन नाही अन ती करणाऱ्या लोकांचा उद्देश्य हा बहुतकरुन एकछत्री अंमल कायम करण्याकडे असणे हा एक मुद्दा इतके काही ठळक मुद्दे आठवले सद्ध्यातरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

३.१

माहितगार
गुरुवार, 02/18/2016 - 16:33 नवीन
ठिक आहे, तसा विषय मोठा आहे, तुर्तास आपण लिहिलेल्या तिनच मुद्यांची चर्चा करू मी केवळ उलट्या क्रमाने जमेल तेवढ्या संक्षेपाने लिहितो. काही अपवाद गृहीत धरून जर मानवी समाजाचा प्रत्येक शंभर वर्षांचा कालावधी घेऊन आढावा घेतला मानव प्रगती पथावर आहे असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल का ? अराजका शिवाय राष्ट्र ही संकल्पना नसलेल्या मला दोनच स्थिती दिसतात -अधिक तुम्हाला/ इतर कुणाला सुचल्या तर स्वागत आहे - एक जंगलात राहणारा आदीम मानव आणि दुसरे वसुधैव कुटूंबम - जंगलात राहणार्‍या स्थितीला मानव वापस जाण्याची नजिकच्या काळात तर शक्यता दिसत नाही, राष्ट्राशिवाय असलेले अराजक जे कधी मधी सोमालीया- येमेन अशा प्रसंगातून पुढे येते आणि राष्ट्रवादाने केलेले अराजक यात उजवा कोण त्यामुळे राष्ट्र नसलेल्या अराजकाचे समर्थन व्यक्तीशः मला जड जाते - राष्ट्रवाद आणि वसुधैव कुटूंबक हे पर्याय उरतात यात वसुधैव कुटूंबम अशी सर्वांसाठी न्याय्य व्यवस्था भविष्यात येऊ शकेल जागतिक व्यापार करारा सारखे करार अस्तीत्वात येत आहेत पण वसुधैव कुटूंबकमसाठी सर्वांच्या हिताची न्याय्य निश्चिती करून वैचारिक दृष्ट्या एकाच पातळीवर येणे विश्व हे एकच राष्ट्र ही संकल्पना घडवणे हे भविष्यात होऊ शकेल पण हा बराच लांबचा टप्पा आहे. सर्व विश्व हे एकच राष्ट्र हा टप्पा गाठताना प्रत्येक व्यक्ति आणि समुहाच्या हिताचे प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी तुर्तास तरी राष्ट्र या घटकावर आहे. आता आपण भारतीय राष्ट्रवादाकडे येऊ भारतीय राष्ट्रवाद वसुधैव कुटूंबकम या संकल्पनेसाठी वैचारीक दृष्ट्या ओपन आहे का ? तर तसा तो ओपन आहे. दुसर्‍या राष्ट्रांना जिंकुन घेऊन अथवा जबरदस्तीने कह्यात करुन स्वतःचा राष्ट्रवाद थोपवणे हि संकल्पना भारतात आजतरी असावी असे वाटत नाही. भारतीय उपमहाद्वीपांतर्गत भारतीय संघराज्यात जे घटक प्रदेश समाविष्ट आहेत त्यांच्या दृष्टीने भारतीय राज्यघटना आणि लोकशाही त्यांच्या अस्मिता आणि विकास विषयक पुरेसा समतोल आणि संधी उपलब्ध करते. अडचणी असतील अडचणी आहेत म्हणून बाळाचे नाहु घातलेल्या पाण्यासोबत बाळही फेकुन देणे श्रेयस्कर असेल का ? जेव्हा -केव्हा युरोपियन युनियन राजकीय दृष्ट्या एक होईल तेव्हा स्कॉटलंड सुद्धा युकेचा भाग म्हणून युरोपियन युनियन मध्ये पोहोचते मग गरज नसताना केवळ भावनिक प्रदर्शनासाठी ब्रिटनपासून स्कॉटलंडने तुटून वेगळे होण्याचे समर्थन होते का ? पाणी हे एक उदाहरण म्हणून घेतो : गोदावरी नदीच्या पाण्यासाठी नाशिक आणि औरंगाबादेत हितसंघर्ष होईल पण ती वावटळ त्या कपापुरतीच मर्यादीत राहील तेच तेलंगाणा आणि आंध्र वेगळे झाले की पाण्यावरून (स्रोतांसाठी) अधिक भांडतील, बांग्लादेशाला सार्वभौमत्व असल्यामुळे त्याच पाण्यासाठी प.बंगालचा वैरी होण्यास आणि कदाचित शक्य झाल्यास युद्धही करण्यास तयार होईल तेच बांग्लादेश साऊथ एशियन राज्य म्हणुन असेल तर युद्धाचा प्रसंग शक्यता कमी होईल. एक मोठ्या आकाराचे राष्ट्र राष्ट्रवादी आहे म्हणून त्याचे तुकडे पाडले तर त्यातून अधिक राष्ट्रे अधिक संघर्ष उद्भवतात. दिल्लीचा एक आमदार गेल्या दोनचार दिवसात म्हणाला माझ्या हातात बंदुक असती तर मी त्यांना ठार केल असत आता त्याला वेगळ राष्ट्र दिल तर तो रणगाडा घेऊन युद्धावर निघेल अराजक माजवेल हे सांगण्यासाठी भविष्य वेत्त्याची आवश्यकता नसावी. जर आमच्या देशात काश्मिर असो की अरुणाचल तामिळनाडू असो वा महाराष्ट्र काही राजकीय तडजोडी सोडल्या अस्मितांना ओंजारणे गोंजारणे सोडले तर सर्व प्रदेशांना सर्व साधारणपणे राज्यघटनेत विकासाच्या समान संधी उपलब्ध होतच आहेत वसुधैव कुटूंबम न्याय्य तत्वावर असेल तर भारत त्यात सहभागी होण्यास तयार आहेच. त्यामुळे भारताच्या कोणत्याही राज्याने फुटीरतावाद बाळगण्यात काही पॉइंट उरतो का ? उलट पक्षी सर्वोच्च न्यायालयासारखी व्यवस्था उपलब्ध होते, राज्यस्तरावर भ्रष्टाचार झाला किंवा अन्याय झाला तर अधिक वरची अजून एक स्तरप्रणाली भारतीय राज्यघटनेत/राज्यव्यवस्थेत उपलब्ध होते वचक खूप नसेल पण अंशतःतरी समतोल सांभाळला जातो. मालदीव, श्रीलंका अथवा पाकीस्तानात चिन ने नाविक तळ उभारला की चिंतापडते पण मोठ्या आकाराचे राष्ट्र म्हणून आपण किमान स्तराचा आत्मविश्वास आणि विपरीत वेळ येता तोंड देण्याची क्षमता ठेऊ शकतो. भारतीय व्यवस्थेत राज्यांना न्याय्य वाटा मिळावा किंवा राज्यांची पुर्नरचना व्हावी म्हणून सुयोग्य बदल सुचवणारी कायम स्वरुपी व्यवस्था असावयास हरकत नाही. पण सरसकट राष्ट्र या संकल्पनेवर प्रश्न चिन्ह उपस्थीत करून अराजकास वाट मोकळी करुन देणार्‍या पर्यायांचा विचार प्रशस्त आणि सयुक्तीक वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

३.२

माहितगार
गुरुवार, 02/18/2016 - 16:52 नवीन
आता प्रश्न भाजपा सारख्या राष्ट्रवादाची आग्रही प्रतिपादन करणारा पक्ष केंद्रात सत्तेत आला आहे; पण भातीय लोकव्यवस्थेचे, लोकशाहीच्या प्रगल्भतेचे आणि राज्यघटनेतील समतोलाचे स्वरुप पाहता अनचॅलेंज्ड एकछत्री अंमल/राज्य करणे सहज साध्य नसावे. लोकसभेच्या निवडणुकीत एकाच पक्षाची पूर्ण देशव्यापी लाट आली तरीही राज्यसभेतले गणित बदलण्यासाठी अर्ध्याच्यावरून राज्यातील निवडणूका सलग सहा वर्षे जिंकाव्या लागतात इथे वर्षभर दोन-चार राज्यातील निवडणूका सलग जिंकणे शक्य होत नाही हे प्रत्यक्ष आहे. न्यायालयातील सर्व न्यायाधीश तुमच्या मर्जीचे आणण्यासाठी पुढची दहावर्षे जातात म्हणजे अन चॅलेंज्ड एकछत्री अंमल आणण्यासाठी किमान विसवर्षांचा कालावधी गरजेचा असावा कुणीही तिस्मारखा आलातरी जे शंभर कोटीच्या भारतात सहज साध्य नसावे. उलटपक्षी छोटे प्रदेश/राज्ये आहेत त्यात एकछत्रि राज्य टिकवणे भारताततील राज्य अथवा प्रदेशांना अधिक सहज होते, बांग्लादेश पाकीस्तान ह्यांचा समावेश एकसंघ भारतात असता तर एकाधिकार शाहीशी त्यांना कमी सामना करावा लागला असता. त्यांना आमेरीकेपुढे जसे नाक धरुन उभे टाकावे लागते तेवढे आमेरीकेस सोपे गेले नसते. हे त्यांचे नुकसान असो. प्रदेश स्तरावर अथवा आमदार खासदार या स्तरावर एकच एक व्यक्ती किती वेळा निवडून येऊ शकते किंवा मुख्यमंत्री अथवा पंतप्रधानपदावर अधिकतम किती काळ राहु शकेल यावर मर्यादेची कदाचित गरज असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

राष्ट्रप्रेम - उजवी डावी आणि मध्यम विचार धारा

नितीनचंद्र
गुरुवार, 02/18/2016 - 17:34 नवीन
माझ्या मते शिक्षण हा विषय राज्यांच्या अखत्यारीत देऊन आपण हे गोंधळ ओढवुन घेतले आहेत. टोकाचा विचार करणारे राजकीय पक्ष ज्या घरांच्या मधे घुसतात तिथे शालेय शिक्षणाचा प्रभाव संपुन राजकीय नेत्यांच्या टोकाच्या भुमीका किंवा टो काची विचारधारा जपली जाते. जर सर्वोच्च न्यायालयाने आपला बचाव करण्याची मुभा दिलेली असताना गुरु अफजल च्या फाशीवर संवाद कसा होऊ शकतो यावर शालेय शिक्षणातच विद्यार्थ्यांची मनोभुमिका पक्की व्हायला हवी. असे न होता मग स्वातंत्र्यावर चर्चा होते हे गैर आहे आणि पक्षीय राजकारण म्हणुन सुध्दा सर्व पक्षांचे एकमत होणारे शिक्षणाचा अभाव आहे. डिफेन्स मधला माणुस यावर टोकाची भुमिका कधीच घेत नाही इतकी तिथली कार्यपध्दती चांगली आहे. तशीच ती शाळा आणि महाविद्यालयात हवी आहे. अमेरीकेसारख्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक असलेल्या देशात सुध्दा शिक्षण उत्तम असल्यामुळे टोकाच्या भुमिका असलेले पक्ष नांदताना दिसत नाहीत. परीणामी देशविघातक शक्तीचे फावते. जर गुरु अफजल याला कोंग्रेसच्या काळात फाशी झाली होती तर किमान काँग्रेस व भाजप यात या विषयावर एकमत असायला हरकत नव्हती. आजचा भाजप हा कालचा जनसंघ आहे जो एके काळी कॉग्रेसचे नेते असलेले डॉ शामाप्रसाद मुखर्जी यांनी निर्माण केलेला आहे. सबब किमान राष्ट्रप्रेमाच्या संकल्पनेत या दिन पक्षात अंतर नको अशी अपेक्षा किमान मला आहे. स्तानिक पक्षांची जडण घडण स्वार्थाची आहे. रशीया आणि चायनाकडुन धडे घेतलेल्या डाव्यांच्या मुजोरीवर भारतात निर्माण झालेले हे उजवे पक्ष एकत्र यावेत अशी भुमिका कधी काळी सत्तेवर असताना अटलबिहारी यांनी मांडली होती. खास करुन पं बंगाल मधल्या निवडणुकात डावे विरुध्द भाजप काँग्रेस एकत्र यावेत असा त्यांचा प्रयत्न होता. पण जेव्हा काँग्रेस कमजोर असते तेव्हा डावे त्यांचे सरकार तारुन नेतात हा इतिहास असल्यामुळे असे घडले नाही. जगातुन क्म्युनिझम त्याच्या टोकदार पणामुळे संपला. भारतातुन तो पुर्ण संपेल तेव्हा सुदीन उजाडेल. तोवर विद्यार्थी आणि दलीत किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना खतपाणी घालुन हा विनाकारण संघर्ष हे डावे घडवणार. भाजप आणि डावे यात दरी जास्त असल्याने तो वाढता असणार आणि काँग्रेस सारखा मध्यममार्गी पक्ष मुग गिळुन गंमत पहाणार
  • Log in or register to post comments

Agreed

पगला गजोधर
गुरुवार, 02/18/2016 - 18:08 नवीन
लोकसभेच्या निवडणुकीत एकाच पक्षाची पूर्ण देशव्यापी लाट आली तरीही राज्यसभेतले गणित बदलण्यासाठी अर्ध्याच्यावरून राज्यातील निवडणूका सलग सहा वर्षे जिंकाव्या लागतात इथे वर्षभर दोन-चार राज्यातील निवडणूका सलग जिंकणे शक्य होत नाही हे प्रत्यक्ष आहे. न्यायालयातील सर्व न्यायाधीश तुमच्या मर्जीचे आणण्यासाठी पुढची दहावर्षे जातात म्हणजे अन चॅलेंज्ड एकछत्री अंमल आणण्यासाठी किमान विसवर्षांचा कालावधी गरजेचा असावा कुणीही तिस्मारखा आलातरी जे शंभर कोटीच्या भारतात सहज साध्य नसावे.
Correct, One can Fool, all the people, some time. Some people all the time. But not all the people all the time.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा