✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कट्टा औरंगाबाद

अ
अत्रन्गि पाउस यांनी
Tue, 02/16/2016 - 13:30  ·  लेख
लेख
२२ तारखेला औरंगाबाद मध्ये आहे .... संध्याकाळी साधारण ४-७ वेळ मोकळा आहे ...एखादा छोटा कट्टा होऊ शकेल किंवा कसे ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18720 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

२ दिवसांचा मुक्कामी कट्टा

प्रचेतस
Tue, 02/16/2016 - 13:54 नवीन
२ दिवसांचा मुक्कामी कट्टा करण्यास आवडेल.
  • Log in or register to post comments

नोंद घेतलेली आहे....

मुक्त विहारि
Wed, 02/17/2016 - 09:00 नवीन
संभाजीनगरला तुम्ही जाणार ते फक्त दर्पण सुंदरींना बघायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाय ओ. तिथे फ़क्त एकच दर्पणा

प्रचेतस
Wed, 02/17/2016 - 09:47 नवीन
नाय ओ. तिथे फ़क्त एकच दर्पणा आहे. आमची आहे ती भुलेश्वरला. बाकी आम्ही संभाजीनगर न म्हणता कटकी (खडकी) म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

च्यामारी ...२५३ वाचने

अत्रन्गि पाउस
Tue, 02/16/2016 - 23:58 नवीन
आणि एकच प्रतिसाद ?? असो
  • Log in or register to post comments

आधी तिथले एक सर आमचे मित्र

अभ्या..
Wed, 02/17/2016 - 00:03 नवीन
आधी तिथले एक सर आमचे मित्र होते. आवडले असते यायला. सध्या ते आमचे मित्र नाहीत तस्मात औरंगाबादेत काही नाही. करा तुमचे तुम्ही. शुभेच्छा. ;)
  • Log in or register to post comments

चलो चिंचवड

नाखु
Wed, 02/17/2016 - 09:03 नवीन
तिथले एक सर आमचे मित्र आहेतच आणि तुम्हीही आहात त्या न्यायाने ते तुमचे मित्र आहेतच (मित्राचा मित्र). तेव्हा सोलापुर आणि औरंगाबाद भेट चिंचवडला व्हावी ही तर श्रींची इच्छा !! सर आल्यास धन्या+वल्ली+प्रगो भेट हा बोनसही मिळेल ते वेगळेच. दोघांनाही स्वतंत्र भेटलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

स्वागत आहे.

बाबा योगिराज
Wed, 02/17/2016 - 00:35 नवीन
या भेटता येईल.
  • Log in or register to post comments

औरंगाबादला खूप काही आहे

समीर शिन्दे
Wed, 02/17/2016 - 01:21 नवीन
औरंगाबादला खूप काही आहे पाहण्यासारख. मी औरंगाबादलाच राहतो कधी येता सांगा ?
  • Log in or register to post comments

संभाजी नगराला माझीही धावती

मदनबाण
Wed, 02/17/2016 - 07:27 नवीन
संभाजी नगराला माझीही धावती भेट होणार आहे, २०-२१ ला संभाजी नगरात आहे, कितपत वेळ मिळेल ते आत्ता सांगता येत नाही,पण वेळ मिळालाच तिथल्या मिपाकर मंडळींना भेटण्याची इच्छा नक्कीच आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari
  • Log in or register to post comments

मी २२ फेब्रुवारी

अत्रन्गि पाउस
Wed, 02/17/2016 - 07:34 नवीन
२२ फेब्रुवारी संध्याकाळी सुमारे ४-७ मध्ये काही वेळ म्हणतोय ...रात्री ९३० ची परतीची गाडी पकडायची आहे
  • Log in or register to post comments

स्वागत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/17/2016 - 08:03 नवीन
स्वागत. मी जर त्या दिवशी औरंगाबादेत असलो तर आणि माझा जर मुड असेल तर खालील गोष्टी होऊ शकतात. १) मी तुम्हाला भेटेन, मला मिपाकरान्ना भेटायला आवडतं औरंगाबादेत आणखी कोणीही मिपाकर नाही. आणि गप्पा मारेन. ( तुम्ही गप्पीष्ट असलं पाहिजे, उगं तुम्ही शांत, गंभीर, वैचारिक, कसं होईल देशाचं या वाहतुकीचे नियम, इत्यादी विषयावर बोलणार असाल तर मला बोर होतं) २) मी तुम्हाला बीबी का मकबरा, पानचक्की माझ्या गाडीत फिरवून दाखवू शकतो. ३) मी तुम्हाला 'थाळी' प्रकारातलं उत्तम जेवण देईन. मटन, मच्छी, मला चालत नाही. ४) औरंगाबादेत तुम्ही काही खरेदी करनार असाल तर तुम्ही एकट्याने खरेदी करावी. ५) बरोबर सात वाजता मी तुम्हाला स्टेशनवर सोडेन. उड्डान पुलांची वर्षानुवर्ष कामं चालु असल्यामुळे ट्राफिक वाढलेली आहे, ड्रायव्हिंगला कन्टाळा येतो. सध्या इतकंच. आंघोळीला जायचं आहे, अजुन काही सुच्ल्यास इथे लिहिनचं. वरील नियम अटी मान्य असल्यास प्रतिसादाखाली 'हो' असं लिहावं. नसल्यास तसं स्पष्ट लिहावं. प्रतिसादाखाली हो असं लिहिल्यास व्य नि ने फोन नंबर पाठविण्यात येईल त्या नंबरचा वापर फक्त एकदाच आणि कट्ट्यापुरताच करायचा. धन्यवाद;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पॉइंट्स नोटेड.....

मुक्त विहारि
Wed, 02/17/2016 - 08:47 नवीन
यदा कदाचित संभाजीनगरला येणे झालेच तर.... १. मी तुम्हाला भेटेन, मला मिपाकरान्ना भेटायला आवडतं औरंगाबादेत आणखी कोणीही मिपाकर नाही. आणि गप्पा मारेन. ( तुम्ही गप्पीष्ट असलं पाहिजे, उगं तुम्ही शांत, गंभीर, वैचारिक, कसं होईल देशाचं या वाहतुकीचे नियम, इत्यादी विषयावर बोलणार असाल तर मला बोर होतं) आणि २. व्य नि ने फोन नंबर पाठविण्यात येईल त्या नंबरचा वापर फक्त एकदाच आणि कट्ट्यापुरताच करायचा. हे २ मुद्दे ध्यानात घेतलेले आहेत. अर्थात आम्ही येणार ते फक्त, वेरूळची लेणी बघायला (आणि त्या वेळी तुम्ही असालच, असे वाटते.वल्लीं बरोबर लेणी बघायचा चानस कोण सोडेल?) तुम्हाला भेटणे हा बोनस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, आम्ही तुम्हाला डीसेंबर १२

सतिश गावडे
Wed, 02/17/2016 - 10:25 नवीन
सर, आम्ही तुम्हाला डीसेंबर १२, १३ आणि १४ असे सलग तीन वर्ष औरंगाबादला भेटलोय. तर प्रश्न असा आहे की या पाच निकषांपैकी कोणते निकष आम्ही पाळले आणि कोणते नाही हे सांगू शकाल का? जर काही निकषांमध्ये आम्ही बसत नसू तर आम्हाला कोणत्या गोष्टीत सुधारणा करायला हवी ते कळेल आणि तशी सुधारणा आम्ही करूही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला भेटला होता ?;

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/17/2016 - 11:57 नवीन
आपण भेटलो होतो, मला तर काहीच आठवत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हो ना, फक्त डिसेंबर लिहिले

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/17/2016 - 13:46 नवीन
हो ना, फक्त डिसेंबर लिहिले आहे, त्याचा इसवीसन(पूर्व) लिहिला नाही. अशी अर्धवट माहिती फाऊल धरली तर दोष नाही ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो

अत्रन्गि पाउस
Wed, 02/17/2016 - 11:28 नवीन
खालील अटी माझ्या कडून सुद्धा व्य नि ने फोन नंबर पाठविण्यात येईल त्या नंबरचा वापर फक्त एकदाच आणि कट्ट्यापुरताच करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमचे एक मित्र आहेत चिंचवडचे.

सतिश गावडे
Wed, 02/17/2016 - 10:22 नवीन
आमचे एक मित्र आहेत चिंचवडचे. निवासी कट्टा केलात आणि कार्यक्रमामध्ये वेरूळ-दर्शन ठेवलंत तर ते धावत येतील.
  • Log in or register to post comments

संभाजीनगरात चांगली अत्तरे

मदनबाण
Wed, 02/17/2016 - 11:38 नवीन
संभाजीनगरात चांगली अत्तरे मिळतात काय ? मिळत असल्यास कुठे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

  • Log in or register to post comments

मला वाटतं गुलमंडीत मिळतात.

पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 11:59 नवीन
मला वाटतं गुलमंडीत मिळतात. तिथे एक गल्लीच आहे अत्तरांची.. (पण माझे ज्ञान यथातथाच आहे..!) पाणीपुरी आवडते मला फार औ.बादची.. क्रांती चौकात एक पापुवाला आहे, त्याची आवडते. बाकी खुप ठिकाणी मिळते. काहींना गुलमंडीतलीही आवडते. किंवा कॅनॉट प्लेसची. क्रांती चौकात गायत्रीचे दुकान आहे, तिथे पावभाजीचेही एक हॉटेल आहे. तिथे जा.. आणि त्या हॉटेलात नाही, त्याच्या समोरच्या खोपचीत गाड्यावर पाभा मिळते, ती खा. मला तर खुपच आवडली. औ.बाद मध्ये शाली सुद्धा सुंदरच मिळतात. त्याचे चांगले दुकान मला आत्ता आठवत नाही. माहिती काढुन सांगु शकेन. क्रांती चौकातच गार्डन वरेलीचे ही दुकान आहे. चांगले ड्रेस मटेरियल मिळते. बीड बायपास साईडच्या धाब्यांची सुद्धा माहिती देता येईल.. हवी असल्यास. बघायला... बीबी का मकबरा, लेण्या, पाणचक्की वगैरे आहेच. प्रोझोन मॉल वगैरे पण आहे. एकंदरित औरंगाबाद हे एक चांगले शहर आहे. फक्त माझे सासर असल्याने..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

धन्यवाद पिरा मोलाची माहिती

मदनबाण
Wed, 02/17/2016 - 12:04 नवीन
धन्यवाद पिरा मोलाची माहिती दिल्या बद्धल ! :) @ प्रॉ.डॉ... अहो तुम्ही सुद्धा काही तरी सांगा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

जरा वेळ असेल तर बीबी का मकबरा

पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 12:12 नवीन
जरा वेळ असेल तर बीबी का मकबरा वगैरे पेक्षाही मी म्हणेन की देवगिरी किल्ला, अजिंठा - वेरुळ पहा. मला ते जास्त आवडतं. बहुदा शनिवारी असणार आहात तिथे रात्री, तर जमल्यास भद्रा मारुतीला जाऊ शकता. लोक रात्री चालत जातात वर. मी जर एवढी माहिती देऊ शकते तर प्राडॉ तुम्हाला पार गल्ली बोळातले पत्ते देऊ शकतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आणि हो.. औ.बादहुन पुण्याला

पिलीयन रायडर
Wed, 02/17/2016 - 12:17 नवीन
आणि हो.. औ.बादहुन पुण्याला परत येणार असाल तर पांढरी पुलाला भेळ खायला थांबा नक्की.. सरहदवाडीसुद्धा चांगला पर्याय आहे, पण मला पांढरीपुल जास्त आवडतो. एस.टीने येणार असाल तर गाडी लिलीयम पार्क (किंवा गांगासागर किंवा वडाळ्याचा फुडमॉल) नावाच्या भिकार हॉटलला थांबेल. नावावर जाऊ नकात. फार बेक्कार हॉटेल आहे. नगरला "जलाराम बेकरी" नावाची बेकरी ऑन द वे आहे. तिथे तोंडात टाकताच विरघळेल अशी खारी.. आणि टाळुला चिटकुन रसभंग करणार नाही अशा क्रिमचा क्रिमरोल मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

औ.बादहुन पुण्याला परत येणार

मदनबाण
Wed, 02/17/2016 - 12:22 नवीन
औ.बादहुन पुण्याला परत येणार असाल तर पांढरी पुलाला भेळ खायला थांबा नक्की.. संभाजीनगरातुन जालन्याकडे प्रस्थान करणार आहे.संभाजीनगरात माझे नातेवाईक आहेत, त्यामुळे मुक्काम त्यांचेकडेच आहे.पहिल्यांदाच या भागात येत असल्याने विशेष उत्सुकता आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

बीबी का मकबरा वगैरे पेक्षाही

मदनबाण
Wed, 02/17/2016 - 12:18 नवीन
बीबी का मकबरा वगैरे पेक्षाही मी म्हणेन की देवगिरी किल्ला, अजिंठा - वेरुळ पहा. मला ते जास्त आवडतं. ओक्के. :) जमल्यास भद्रा मारुतीला जाऊ शकता. ओक्के. ठांकु. :) प्राडॉ... अहो सांगा लवकर सांगा काही तरी... एस्प्येशली उत्तम अत्तर मिळणारे ठिकाण. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मी काय सांगू ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/17/2016 - 12:28 नवीन
माझ्या आयडीत घुसून पिराने सर्व लिहिलंच आहे, गुलमंडीत उत्तम मीठाई उपहार गृहाच्या पाठीमागे खुप अत्तर वाले आहेत. डोकं त्या भड़क वासांनी भनभन करतं. तिथेच काय ते मिळेल बाकी कुठे ख़ास नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

गुलमंडीत उत्तम मीठाई उपहार

मदनबाण
Wed, 02/17/2016 - 13:29 नवीन
गुलमंडीत उत्तम मीठाई उपहार गृहाच्या पाठीमागे खुप अत्तर वाले आहेत. ओक्के. धन्स.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्या गल्लीस अत्तर गल्ली हेच

बाबा योगिराज
Wed, 02/17/2016 - 18:25 नवीन
त्या गल्लीस अत्तर गल्ली हेच नाव आहे. सकाळी 6 वाजता भरणारा फुलांचा बाजार आणि अत्तर ची दुकाने हि तिथली खासियत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ओक्के. धन्यवाद. :)

मदनबाण
गुरुवार, 02/18/2016 - 06:46 नवीन
ओक्के. धन्यवाद. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

बाब्बो

बाबा योगिराज
Wed, 02/17/2016 - 18:31 नवीन
तुम्ही अजूनही औरंगाबादला राहता का ओ. जबरदस्त माहिती आहे तुम्हाला. क्रांती चौकात गायत्रीचे दुकान आहे, तिथे पावभाजीचेही एक हॉटेल आहे. तिथे जा.. आणि त्या हॉटेलात नाही, त्याच्या समोरच्या खोपचीत गाड्यावर पाभा मिळते, ती खा. मला तर खुपच आवडली. मानलं भौ... पाव भाजी खाऊन झाली कि, बाजूच्या गाडीवर एक फ्रुट स्लाड(सलाड चा अपभ्रंश) राजभोग किंवा गुलकंद आईस्क्रीम टाकून खावा. अहाहा सुख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

चला ठरलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/17/2016 - 12:33 नवीन
समीर, बाबा योगिराज, मी आणि तुम्ही. बाबा योगिराज आणि समीर कसं जमेल ते सांगा, कुठे भेटू ते सांगा. दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ठिकाण तुम्ही सांगा

अत्रन्गि पाउस
Wed, 02/17/2016 - 13:54 नवीन
सुमारे ४ वाजता मी तिथे पोहोचेन....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा डॉ.

बाबा योगिराज
Wed, 02/17/2016 - 18:23 नवीन
सर तुम्ही सांगा तिथे येईन मी. माझं दुकान त्रिमूर्ती चौकात आहे. मला कुठेही यायला जवळच पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/17/2016 - 18:27 नवीन
फोन नंबर सेंडवा. त्रिमूर्ती चौकात कशाचं दूकान आहे तुमचं ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

औरंगाबादवरील चर्चा पाहून आनंदित

आकाश खोत
Wed, 02/17/2016 - 16:07 नवीन
मिपावर मी आल्यापासून पहिल्यांदाच औरंगाबादविषयी चर्चा पाहतोय. आनंद झाला. माझे लक्ष नसताना काही धागे झाले असतील, पण मी पाहिलेला पहिलाच. मी औरंगाबादचा आहे पण सध्या तिथे राहत नाही. त्यामुळे यावेळी कट्ट्यात सहभागी नसेन. पण धागा पाहून उत्साह आला आहे, त्यामुळे औरंगाबादविषयी माहिती पुरवतोय. औरंगाबाद शहरात आणि जवळपास पाहण्यासारख्या गोष्टी : पाणचक्की, बिवी का मकबरा, औरंगाबाद लेणी (वेरूळइतक्या प्रसिद्ध किंवा छान नाहीत) गोगाबाबा टेकडी : हे काही टिपिकल प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतले ठिकाण नाही. पण शहराचा मकबऱ्यासकट छान व्ह्यू मिळतो. आणि शहराबाहेर छान हवेशीर जागा आहे. औरंगाबाद हे दरवाजांचे शहर म्हणूनसुद्धा ओळखले जाते. जुने शहर तटबंदी आणि ५२ दरवाजे यांनी बंदिस्त होते. तुम्हाला शहरात फिरताना हे दरवाजे आणि तटबंदीचे काही अवशेष दिसू शकतात. कलेक्टर ऑफिसजवळ एक संग्रहालय आहे. अजिंठा वेरूळ सर्वांना माहित आहेच. वेरूळ येथे लेणी तर आहेतच. पण घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगसुद्धा आहे. गणपतीचे एक जुने मंदिर आहे. वेरूळ येथे शिवाजीराजे यांचे पूर्वज शहाजीराजे आणि मालोजीराजे यांचे वतन होते. त्यांचे स्मारक अशातच बांधण्यात आले आहे. खुलताबाद येथे निद्रिस्त मारुतीचे मंदिर आहे. औरंगजेबाची कबर आहे. म्हैसमाळ हे औरंगाबादचे हिल स्टेशन. तिथे छान बालाजी मंदिर आहे. बालाजीचे इतके शांत मंदिर दुसरे नाही. म्हैसमाळच्या रस्त्यावर एक लहान फाटा आहे. पटकन लक्षात येत नाही. तिथून गेल्यावर मार्लेश्वर हे गुहेतले शिव मंदिर आहे. खूप मोठे शिवलिंग पाहायला मिळेल. जटवाडा आणि कचनेर आणि येथे जैन मंदिरे आहेत. जटवाडा येथे भव्य मूर्ती आहेत. पैठणला जायकवाडी धरण आहे. बागेत संगीत कारंजी आहेत. आणि संत एकनाथ यांची समाधी आहे. औरंगाबादपासून लोणार सरोवरसुद्धा जवळ आहे. खरेदी औरंगाबादमध्ये पैठणी आणि हिमरूशाली छान मिळतात. बऱ्याच दुकानात मिळतात. पण पर्यटक औरंगाबाद वेरूळ रस्त्यावरच्या दुकानात जास्त जातात. सिडकोमध्ये लोकमत भवनच्या बाजूलासुद्धा एक छान दुकान आहे. पण ह्यावर महिलांनी जास्त माहिती द्यावी. गुलमंडी, औरंगपुरा, गोमटेश मार्केट, सराफा, सिटी चौक हे सर्व एकमेकांना लागून असलेले भाग खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत. कपडे, पुस्तके, दागिने, अत्तरे, पूजा साहित्य, इलेक्ट्रोनिक्स अशा सर्व गोष्टींची दुकाने ओळीने आहेत. खादाडगिरी गायत्री चाट भांडार : गुलमंडी आणि क्रांती चौक. कचोरी समोसा आणि मुंगभजी गरम आणि मस्त मिळतात. वर्षानुवर्षे पासून उत्कृष्ट चव. उत्तम, गुलमंडी : गरम गरम जिलेबी आणि इमरती, आणि बरेच काही. बाजूला एक छोटे दुकान आहे तिथे मसाला दुध छान मिळते. ओमकार पावभाजी क्रांती चौक लक्ष्मी सँडविच क्रांती चौक पूर्णानंद औरंगपुरा : हे माझ्या शाळेतल्या भागातले मुलांचे आवडते दुकान. इथली वडापाव, मसाला पाव, सामोसा, दाबेली यांची चव इतक्या वर्षात बदललेली नाही. औरंगाबादला गेलो आणि तिथे नाही गेलो तर चुकल्यासारखे वाटते. पाणीपुरी : पुणे आणि मुंबईला बहुत करून रगडावाली पाणीपुरी देतात. पण औरंगाबादला बटाटावाली जास्त मिळते. चांगले पाणीपुरी वाले : दयावान गारखेडा, पंकज कुमार एन ४, गुरुकृपा सिडको समोर मथुरावासी : भल्ला आणि गुजीया हि इथली खासियत. बाकी सर्व प्रकारची चाट मस्त मिळते. पाणीपुरी अगदी वेगळ्या प्रकारची. घट्ट आणि तिखट पाणी असते, आणि त्यात डाळिंब आणि अंगूरसुद्धा टाकतात. तिथून जवळच पैठण गेटला लक्की आणि पॅरिस हि ज्युसेसची मस्त सेन्टर्स आहेत. गुरुकृपा सूतगिरणी चौक जवळ : चाट आणि मिठाईचे चांगले दुकान. गोधुली दाबेली : कनॉट प्लेस. दाबेली सोबत भेलसुद्धा छान आहे. कनॉटच्याच कोपर्यात एक मस्त भेळवाला आहे. तारा पान सेंटर : पान खाण्याचे शौकीन असणार्यांना हे नाव माहित असतेच. इथल्या पानाची सर पुणे मुंबईला खाल्लेल्या एका हि पानाला नाही. अगदी पुणेकर जिथे गर्दी करतात त्या शौकीन, नाद वगैरेसारख्या ठिकाणीसुद्धा नाही. मी औरंगाबादला गेलो कि ऑफिसमध्ये लोक इथला पान आणण्याची वाट पाहतात. उत्साहाच्या भरात जे आठवेल ते लिहिले आहे. खादाडगिरीवर किती लिहिले आहे त्यावरून आणखी माहिती हवी असल्यास विचारावे. जाणकारांनी आणखी माहिती पुरवावी.
  • Log in or register to post comments

नवीन धागा

आकाश खोत
Wed, 02/17/2016 - 16:15 नवीन
ह्या प्रतिसादाची लांबी पाहून एक नवीनच धागा उघडला. औरंगाबाद च्या माहिती साठी. ह्या धाग्यावर तुमचे कट्ट्याचे बेत चालू द्यात. बाकी इतक्या पूर्वअटी लादून औरंगाबादचे लोक भेटताना पाहिले नाहीत. तिथे चल जरा जाऊन येऊ म्हणताच आगापिच्छा माहित नसताना कुठेही सोबत फिरणारे लोक जास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकाश खोत

बाकी इतक्या पूर्वअटी लादून औरंगाबादचे लोक भेटताना पाहिले नाहीत.

मुक्त विहारि
Wed, 02/17/2016 - 16:27 नवीन
खूद्द संभाजीनगर मध्ये राहणार्‍या लोकांसाठी ह्या अटी नसाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकाश खोत

काय म्हणता ? असं आहे औरंगाबाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/17/2016 - 16:33 नवीन
बाकी इतक्या पूर्वअटी ंगाबादचे लोक भेटताना पाहिले नाहीत. =)) आता औरंगाबाद बदललं आहे आणि औरंगाबादचे लोकही. मीसळपाव वर वावरणा-यां औरंगाबाद वाल्यांचं तर आणखीनच वेगळ काही तरी असतं. -दिलीप बिरुटे -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकाश खोत

आता औरंगाबाद बदललं आहे आणि औरंगाबादचे लोकही.

मुक्त विहारि
Tue, 02/23/2016 - 21:55 नवीन
संभाजीनगर कितीही बदलले तरी, तिथली माणसे पाहुण्याचा पाहूणचार व्यवस्थित करतात. थोडा शिष्ठपणाचा आव आणतात पण...त्यांना नाहीच जमत. आता हेच बघाना, ह्या धाग्याच्या निमित्ताने, बिरुटे सर आणि बाबा योगीराज भेटलेच की नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही असाल तर

अत्रन्गि पाउस
Wed, 02/17/2016 - 17:02 नवीन
व्हा कि जोइन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकाश खोत

चांगलं संकलन

मन१
Wed, 02/17/2016 - 16:16 नवीन
ह्या निमित्तानं औरंगाबादबद्दलच्या माहितीचं चांगलं संकलन होतय. बाकी... धागा वाचून आता काही गोष्टींची लिंक लागते आहे. बरं झालं धागा काढलात ते.
  • Log in or register to post comments

निघालात काय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/17/2016 - 19:08 नवीन
मी आणि बाबा योगी आमचं कच्च प्लानिंग झालं आहे, आम्ही आपली वाट पाहात आहोत. समीरचा अजुन काही रिप्लाय नाही. अजुन कोणी मिपाकर आम्हाला आणि अत्रिंगला भेटू इच्छित असेल तर बाबा किंवा माझ्याशी संपर्क करावा. भेटीसाठीच्या अटी सैल केल्या आहेत. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

या

नाखु
गुरुवार, 02/18/2016 - 09:20 नवीन
अटी-तटीच्या कट्ट्याला शुभेच्छा !!!! स्वगत :कप्तान या धाग्यावर का नाही आला अजून ????
  • Log in or register to post comments

कुणाला कशाचं तर तुम्हाला चिमण

प्रचेतस
गुरुवार, 02/18/2016 - 09:49 नवीन
कुणाला कशाचं तर तुम्हाला चिमण (आणि बुवांचंही)...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अहो अत्तरचे नाव काढलंय मग

सनईचौघडा
गुरुवार, 02/18/2016 - 10:18 नवीन
अहो अत्तरचे नाव काढलंय मग बुवा नक्की जातील.
  • Log in or register to post comments

कट्टा अपडेट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/22/2016 - 16:03 नवीन
मंडळी, औरंगाबाद कट्ट्यासाठी मी अन बाबा तयार होतो, आम्ही दोघं एकमेकांना पहिल्यांन्दाच भेटलोही पण धागा कर्ते कामात असल्यामुळे कट्टा भेट सायंकाळी साडेसहानंतर होणार आहे.अत्रन्गि (लिहायला अवघड नाव आहे चोप्य पस्ते केलं) जर साडे सहाला अत्रन्गि पाउस भेटले नै तर बाबाचा अन माझाच कट्टा होणार आहे. दोघंच बसू गप्पा मारत कुठं जाणार नै अन कै नै. बाबाला भेटून कसं वाटलं वगैरे साठी पढ़ते रहीहे औरंगाबाद कट्टा सबसे आगे सबसे तेज. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सर,

बाबा योगिराज
Mon, 02/22/2016 - 16:09 नवीन
सर, त्ये मदनबाण भौ पण जालन्याला येणार होते. त्यांचं काही कळलंय काय.
  • Log in or register to post comments

नै फोन बिन कै नै

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/22/2016 - 16:18 नवीन
चिट्ठी ना कोयी संदेश न जाने कौनसा देश जहा वो चले गये. (मरतय आज बानाकडून मी) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

आभार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/22/2016 - 20:31 नवीन
धागा काढला आणि आपणच पसार झालात बाबा योगीराज आणि मी आपलं मनापासून आभार मानतो. यानंतर आम्हाला कोणी कट्टा करू असे म्हनू नये. आपण नियोजन करावं आणि आम्ही पाहुण्या सारखे येण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. प्राडॉ आणि बाबा (आभारी)
  • Log in or register to post comments

प्राडॉशी बाडीस.

बाबा योगिराज
Mon, 02/22/2016 - 20:32 नवीन
प्राडॉशी बाडीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय झाल? आलेच नाहीत का ते?

पिलीयन रायडर
Mon, 02/22/2016 - 20:33 नवीन
काय झाल? आलेच नाहीत का ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा