रात्रीस भेळ चाले ही मूठ कुरमुर्याची
संपेल ना कधीही ही भेळ पण्डीतान्ची
हा कन्द (बटाटा) ना दग्दभू, मिठा-तिखा (रस) वाहतो हा
मिश्रणात रगड्याच्या अभिशाप भोगतो (डास) हा
पुरीस होई साक्षी हा दूत चिलटान्चा
खाण्यास पाणीपुरी ही असते खरी चटक
जे सत्य भासती ते नसते खरे टोपात
पुसतात बुडवूनी ते बोट धोतराला
या साजिर्या भैयाला का गाठावे खिण्डीत
मिटतील सर्व शंका (पाहून ) न्हाऊन या मिठीत (मिठी नदी :फिदी:)
परतेल का तरीही आजार हा क्षणाचा
चु भू द्या घ्या
मूळ गीत
रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा चंद्र ना स्वयंभू, रवी-तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा
आभास सावली हा असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते असती नितांत भास
हसतात सावलीला हा दोष आंधळयांचा
या साजिर्या क्षणाला का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत
गवसेल सूर अपुल्या या धूंद जीवनाचा
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3481
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
याक कविता!
ओके
;)
In reply to ओके by स्पा
विडम्बन छान आवडलय
:D
रायता फैल गया...
धन्यवाद :)
झकास,मस्त, आवडलं
ओरीजनल गाणं क्लास आहे राव!
झी मराठीवर