काही दिवसांपूर्वी वीणा वर्ल्ड बरोबर ईशान्य भारताची एक्स्प्लोरर सहल केली. तिथे एक परदेशी पर्यटकाच्या पँटने लक्ष वेधुन घेतले. कार्गो पँट होती. लई खिशे होते. कंबरेला विलॅश्टिक व शिवाय एक सॉफ्ट बेल्ट होता. मला अगदी हवी तशी पँट होती. आपल्या मनाप्रमाणे रिलॅक्स अनुभव देणारे फिटिंग करणारा टेलर मिळणे किंवा तसे रेडीमेड कपडे मिळ्णे हे आमचे जुने स्वप्न आहे.या पूर्वी आम्ही यावर लिहिल होत पण ते तत्कालीन संदर्भाने होते त्याची वाच्यता आत्ता नको.
घरी आल्यावर फ्लिपकार्ट अॅमेझॉन इंडिया यावर तसे काही कपडे मिळतात का हे पाहिले पण तसे काही आढळल नाही. माझी गरज म्हणजे Hidden Expandable Waistband for Comfort
The Modern Comfort waistband is designed to expand by up to 2 inches at the waist, so you can sit comfortably as you go about your day
गुगलल्यावर मला अशा कपड्यांचा व्हिडिओ मिळाला तसे अॅमेझॉनवर डॉलर मधे किमती असलेले पँटी मिळाल्या. पण आपल्या भारतीय मार्केट मधे अस मिळाल पाहिजे का नाही? ऑन लाईन शॉपिंग मधे एक तोटा असतो स्पर्श गंध चव वगैरे गोष्टींचा फील येत नाही.
कपडे विशेषतः प्यांट म्हणजे कशी रिलॅक्स पाहिजे. आपल्यासाठी कपडे आहेत की कपड्यासाठी आपण? जेवण झाल्यावर टाईट वाटता कामा नये व भूक लागली तरी लूज होता कामा नये. तसे ऋतूमानाप्रमाणे आपल्या आहारात बदल होतात त्यामुळे पोट कमी जास्त होत असते. त्यामुळे दोन इंचा पर्यंत फ्लेक्सिबिलिटी हवीच. एवढ फॅशन डिझाईनिंग तंत्रज्ञानामुळे पुढे गेले आहे तर मला हवे तशी पँट का मिळू नये? किमान तसे शिवून देणार टेलर तरी पुण्यात मिळायला पाहिजे कि नको? चला या क्षेत्रातील तज्ञांनी आपापले विचार मांडा.
वाचने
3125
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
जेवण झाल्यावर टाईट वाटता कामा
जेवण झाल्यावर टाईट वाटता कामा नये व भूक लागली तरी लूज होता कामा नये. तसे ऋतूमानाप्रमाणे आपल्या आहारात बदल होतात त्यामुळे पोट कमी जास्त होत असते. त्यामुळे दोन इंचा पर्यंत फ्लेक्सिबिलिटी हवीच.यासाठी कापड स्र्टेचेबल आणि चान्गल्या प्रतीचे असावे लागते. तसेच टेलरकडुन शिवुन घेतले की तो दान्ही बाजुने दिड-दिड म्हणजे एकुण ३" मार्जिन ठेवतोच म्हणजे कुठलाही ड्रेस घट्ट झाला की एक्सट्रा शिलाई उसवुन कपडे घालता येतात.उसवून लूज केले की रंगाच्या
In reply to जेवण झाल्यावर टाईट वाटता कामा by कविता१९७८
डेकॅथलॉन वाघोली इथे जाऊन
तुमच्या स्पेसिफिकेशन्ससाठी :
खरं आहे राव फॕशन म्हणजे
बकले
धोतर
त्यापेक्षा लुंगी आणखी चांगली.
In reply to धोतर by सुनील
आता प्रकरण हळू हळू
In reply to त्यापेक्षा लुंगी आणखी चांगली. by टवाळ कार्टा
लायक्रा वापरा. ते लेगीन्स
घाटपांडे
Hidden Expandable Waistband
कार्गो पण मिळते. हाफ इलॅस्टिक
In reply to Hidden Expandable Waistband by आदूबाळ
पुणे सेंट्रल म्हंजी नेमक कुठं
In reply to Hidden Expandable Waistband by आदूबाळ
१. गणेशखिंड रस्त्यावर
In reply to पुणे सेंट्रल म्हंजी नेमक कुठं by प्रकाश घाटपांडे
ओके.ट्राय करतो. पन हवा तस
In reply to १. गणेशखिंड रस्त्यावर by आदूबाळ
ही बघा विल्याश्टिक ची पँट