Skip to main content

डिझाईन

कल्पक टेलर हवा आहे

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 15/02/2016 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी वीणा वर्ल्ड बरोबर ईशान्य भारताची एक्स्प्लोरर सहल केली. तिथे एक परदेशी पर्यटकाच्या पँटने लक्ष वेधुन घेतले. कार्गो पँट होती. लई खिशे होते. कंबरेला विलॅश्टिक व शिवाय एक सॉफ्ट बेल्ट होता. मला अगदी हवी तशी पँट होती. आपल्या मनाप्रमाणे रिलॅक्स अनुभव देणारे फिटिंग करणारा टेलर मिळणे किंवा तसे रेडीमेड कपडे मिळ्णे हे आमचे जुने स्वप्न आहे.या पूर्वी आम्ही यावर लिहिल होत पण ते तत्कालीन संदर्भाने होते त्याची वाच्यता आत्ता नको. घरी आल्यावर फ्लिपकार्ट अ‍ॅमेझॉन इंडिया यावर तसे काही कपडे मिळतात का हे पाहिले पण तसे काही आढळल नाही.