१. देहभार
भोजन हा देहभाराशी कमालीचा निगडीत पैलू आहे. त्या नित्यक्रमाचा उत्सव कसा करावा, याविषयी लेखमालेतला हा दुसरा लेख सादर करत आहे.
आहार, विहार, निद्रा, उत्सर्ग आणि प्रणय हे निसर्गानं सर्वांना बहाल केलेले पाच आनंद आहेत. नैसर्गिक याचा अर्थ, ते मिळवायला कोणत्याही शिक्षणाची किंवा कौशल्याची गरज नाही. ते आपल्याला जन्मतःच प्राप्त आहेत आणि सदैव उपलब्ध आहेत.
हे सर्व आनंद एकमेकांशी निगडित आहेत. विहारानं शरीर दमलं नाही तर आहाराचा आनंद मिळणार नाही. मनसोक्त विहार आणि तृप्त करणारा आहार यात निद्रेचं सौख्य लपलंय. आणि उत्सर्गाच्या आनंदाची, 'आहार, विहार आणि निद्रा' त्रिसूत्री आहे.... आणि सरते शेवटी प्रणयासाठी लागणारी ऊर्जा या चारही प्रक्रियांवर अवलंबून आहे.
त्यामुळे भोजनाचा विचार हा (प्रणय वगळता) इतर तीन आनंदांशी संबंधीत आहे.
____________________
भोजनाचा आनंद दुर्लभ होण्याचं मुख्य कारण भूक लागल्यावर न जेवता, `वेळ झाल्यावर' जेवण्याची लावून घेतलेली सवय आहे. मुळात वेळ ही कल्पना आहे आणि भूक ही संवेदना आहे त्यामुळे भोजनासाठी भूक लागणं महत्त्वाचं आहे. सर्व मानवी जीवनाची मुख्य दिशा अर्थप्राप्ती असल्यामुळे, भोजनाचा आधार भूकेऐवजी वेळ झालाय. भूक लागो न लागो, सर्वांनी एकाच लंच टाइमला जेवणं, यामुळे भोजन केवळ उपचार राहिला आहे. त्यात आनंद वगैरे उरला असेल तर तो फक्त सुट्टीच्या दिवशी किंवा मग सणासुदीला!
भुकेची संवेदना प्रखर होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट विहार आहे. काय वाटेल ते झालं तरी सकाळी सहाच्या आत उठून तीन प्रकारच्या शारीरिक हालचाली झाल्या पाहिजेत.
एक) पोटावर दाब येईल अशी योगासनं. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे वज्रासनात बसून, कपाळ समोर जमिनीला टेकवणं आणि ते करत असताना हाताच्या मुठी क्रमाक्रमानं, नाभी जवळ, पोटाच्या मध्य भागी आणि मांडीवर ठेवल्या तर पोटाला उत्तम मसाज होऊन पचन क्रियेत कमालीची सुधारणा होते.
कपाळ जमिनीवर टेकवताना श्वास सोडणं आणि वर येताना श्वास घेणं या क्रिया इतक्या सहजतेनं होतात की त्यामुळे श्वसनाचा जोम वाढून तो पोटापर्यंत पोहोचायला लागतो. उत्तम श्वसन आणि पोटाची लवचीकता हे भूक, उत्सर्ग आणि सर्वांगीण शरीर स्वास्थ्य एकाच वेळी साधतात.
दोन) सुप्त वज्रासनात झोपून, ओटीपोटापासून ते छातीपर्यंत, दोन्ही हातानी केला मसाज.
त्याचबरोबर, नाभीच्या चार बोटं खाली ते छातीच्या मध्यापर्यंत अशी सरळ रेष कल्पिली, तर त्या रेषेवर दोन्ही हातांच्या चारही बोटांनी दिलेला दाब. यामुळे पँकरियाज सक्रिय होतात, पाठीचा कणा लवचिक होतो आणि हृदयक्रिया नियमीत होते.
तीन) दोन्ही पायांची लवचीकता आणि स्नायूंचा जोम यावर शारीरिक चापल्य आणि उत्साह अवलंबून आहे. त्यासाठी सर्वांगासन आणि हलासन ही दोन आसनं अत्यंत उपयोगी आहेत.
एकदा शरीरात पुरेशी लवचीकता आली की टेकडी चढणं किंवा टेबल टेनिस सारखा खेळ खेळणं ही संपूर्ण दिवसाची अत्यंत विधायक सुरुवात आहे.
उत्तम उत्सर्गासाठी सर्वात महत्त्वाची पण संपूर्ण दुर्लक्षित गोष्ट म्हणजे उत्छ्वासाचा जोम आहे. प्राणायामाच्या पाच महत्त्वाच्या प्रक्रियांवर या लेखमालेत पुन्हा केंव्हा लिहीन पण भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोम-विलोम या प्राणायामांचा श्वसनाचा जोम वाढायला आणि डिटॉक्सिकेशनसाठी अपरिमित उपयोग आहे.
__________________________
उत्तम भुकेचं एकमेव लक्षण म्हणजे काय खावं ते आतनं उमगणं आहे. भूकच तुम्हाला शरीराला काय हवंय ते सांगते. ही संवेदना रस स्वरूप असते म्हणजे : आंबट, गोड, तिखट या तीन प्रमुख आणि तुरट, खारट आणि कडू या दुय्यम रसांपैकी नक्की कोणता रस किती प्रमाणात सेवन करावा हे तुम्हाला कळतं.
सुरुवाती सुरुवातीला जरी आवेगानं जे समोर येईल ते खावं असं वाटलं तरी सकाळी लवकर उठण्याचा दिनक्रम जसजसा नियमित होत जाईल तशी रस संवेदना प्रगल्भ होत जाईल आणि नेमका आहार घेण्याकडे कल होत जाईल.
कोणीही दिग्गजानं या विषयावर काहीही लिहिलं असलं तरी, अन्नाच्या घटक पदार्थांच्या विश्लेषणापेक्षा, 'स्वाद' हा भोजनातला नि:संशय निर्णायक घटक आहे. स्वाद म्हणजे चव आणि गंध यांचा संयुक्त परिणाम. सर्व सजीव सृष्टी स्वाद हीच संवेदना, अन्न ग्रहणासाठी प्रमाण मानते.
अन्नाच्या घटक पदार्थांचं विश्लेषण हे कितीही सायंटिफिक असलं तरी तृप्ती आणि शरीर स्वास्थ्य साधू शकत नाही. कारण स्वाद ही संवेदना आहे आणि विश्लेषण निव्वळ वैचारिक आहे. भोजनाचा आनंद निष्कासित करणारं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वादाऐवजी विश्लेषणाला दिलेलं महत्त्व आहे
तस्मात, जेवण हे नेहमी रसपरिपोष करणारं हवं. जेवण रसपरिपोषक करतंय की नाही हे समजण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, जेवताना साधलेली तन्मयता (तुम्ही जेवताना बोलूच शकत नाही!). ते सुरू राहावं अशी चित्तदशा. आणि त्यानंतर येणारी तृप्ती आणि कृतज्ञता!
भुकेनं जेवताना येणारा एक अफलातून अनुभव म्हणजे जेवण कितीही रसपूर्ण असलं तरी केव्हा थांबावं याची होणारी जाणीव. ती जाणीव एका थ्रेशोल्ड पॉंईंट सारखी असते. तुम्ही तिच्याकडे सहज दुर्लक्ष करू शकता पण एकदा त्या पॉंईंटला थांबायची मजा कळली की तुम्हाला कोणतंही डाएट करावं लागत नाही. ती जाणीव हाच सर्वोत्तम डाएट पॉंईंट आहे.
_________________________
संपूर्ण शरीर हे अन्नाचं रूपांतरण आहे त्यामुळे उत्तम भोजन, उत्तम शरीर स्वास्थ्य, उत्तम निद्रा, उत्तम उत्सर्ग आणि उत्तम ऊर्जा अशी साखळी आहे.
आयुर्वेदाचं सूत्रंच असं आहे की योग्य आहार कोणताही शारीरिक दोष दूर करतो. त्यामुळे केव्हा खाऊ नये (उपवास) आणि नक्की कोणता आणि किती आहार घ्यावा हे एकदा साधलं की, कोणत्याही औषधाची जरूर नाही. अन्न हेच सर्वोत्तम औषध आहे.
________________________________
माझा असा व्यक्तीगत अनुभव आहे की पहाटे प्रसन्न चित्तदशेनं उठल्यावर, शरीराची लवचीकता आणि उत्साह साधलेला असताना, मनसोक्त विहार केल्यावर लागलेली भूक तुम्हाला काय खावं हे 'दाखवते'. तुम्हाला तो पदार्थ, ती रेसिपी 'दिसते'. सुरुवातीला मला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं पण मग नंतर लक्षात आलं, की ही निसर्गाची अंतर्निहित योजनाच आहे. माणूस सोडला तर सर्व सजीव सृष्टी आपलं अन्न याच पद्धतीनं शोधते. कारण निसर्गाशी एकरूप असल्यानं त्यांना एकाच वेळी अन्न, आणि ते कुठे आहे ती दिशा यांचा बोध होतो.
प्रगल्भ भुकेचा अत्यंत सहज आणि आपसूकपणे येणारा दुसरा पैलू म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या अन्नाची कमीतकमी प्रयासात होणारी उपलब्धता! याचं कारणही तितकंच नैसर्गिक आहे. निसर्गच भूक निर्माण करत असल्यानं तिच्या तृप्तीची योजना निसर्ग स्वयेच करत असतो.
इतर सजीव सृष्टीला जाणीवेची प्रगल्भता नसल्यामुळे भोजनाचा न गवसू शकणारा, पण मानवाला आनंदित करणारा तिसरा पैलू म्हणजे कृतज्ञता! आपण भूक, तिच्यामुळे होणारं अन्नाचं दर्शन (द व्हिज्युअल साईट ऑफ फूड), रसपरिपोष करणारं भोजन आणि त्यातून निर्माण होणारी तृप्ती यांनी इतके भारून जातो की अन्नाला ब्रह्म का म्हटलंय ते कळतं! भोजन केवळ नित्यक्रम न राहता उत्सव होतं आणि रोजच्या जगण्याला आनंदाचं एक नवं परिमाण उपलब्ध होतं.

वाचने
6106
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपयुक्त माहिती विठासर..
कबीरांविषयी ओशोंनी काय काय
घटा घटाचे रूप आगळे....
चिरोटा
In reply to घटा घटाचे रूप आगळे.... by मुक्त विहारि
चिरोट्याची रेसिपी टाका ओ !
In reply to चिरोटा by कपिलमुनी
डबा
In reply to चिरोट्याची रेसिपी टाका ओ ! by मुक्त विहारि
नशीब. मुविचाचा उसको डब्बा दे
In reply to डबा by कपिलमुनी
+१
In reply to घटा घटाचे रूप आगळे.... by मुक्त विहारि
मुविकाका एक कट्टा हमारे यहा
In reply to घटा घटाचे रूप आगळे.... by मुक्त विहारि
तुम्ही जर डोंबोलीच्या आसपास रहात असाल तर कधीही...
In reply to मुविकाका एक कट्टा हमारे यहा by विजय पुरोहित
करुया... :)
In reply to तुम्ही जर डोंबोलीच्या आसपास रहात असाल तर कधीही... by मुक्त विहारि
पुणे...होऊन जाऊ द्या !
In reply to करुया... :) by विजय पुरोहित
मुवी, तुम्ही विनोदानं लिहीलंय असं गृहित धरतो
का करे ठाकूरसा, ससुरा हमरा
In reply to मुवी, तुम्ही विनोदानं लिहीलंय असं गृहित धरतो by विवेक ठाकूर
तुमची भूकेची जाणीव तुम्हालाच कळेल
In reply to का करे ठाकूरसा, ससुरा हमरा by तर्राट जोकर
ओके.
In reply to तुमची भूकेची जाणीव तुम्हालाच कळेल by विवेक ठाकूर
ओशोंचं एक सुरेख वाक्य आहे :
In reply to मुवी, तुम्ही विनोदानं लिहीलंय असं गृहित धरतो by विवेक ठाकूर
ओशोंनी हे वाक्य कुठल्या संदर्भात म्हटलं आहे माहित नाहि...
In reply to ओशोंचं एक सुरेख वाक्य आहे : by स्पा
मिळाल्यावर त्याची किंमत राहत
In reply to ओशोंनी हे वाक्य कुठल्या संदर्भात म्हटलं आहे माहित नाहि... by अर्धवटराव
यावर एक मस्त ज्योक आहे
In reply to मिळाल्यावर त्याची किंमत राहत by तर्राट जोकर
मला संदर्भ माहित नाहि
In reply to मिळाल्यावर त्याची किंमत राहत by तर्राट जोकर
अहो त्यांना म्हणायचं आहे की ,
In reply to मला संदर्भ माहित नाहि by अर्धवटराव
उसे जो मिल गया, वह व्यर्थ हो जाता है.
In reply to अहो त्यांना म्हणायचं आहे की , by उगा काहितरीच
शिवाय...
In reply to उसे जो मिल गया, वह व्यर्थ हो जाता है. by अर्धवटराव
असं असतं तर वैवाहिक संबंधात तोचतोपणाची तक्रारच उरली नसती !
In reply to शिवाय... by अर्धवटराव
त्याच उदाहरणासंदर्भात
In reply to असं असतं तर वैवाहिक संबंधात तोचतोपणाची तक्रारच उरली नसती ! by विवेक ठाकूर
अपवाद नियम बनु शकत नाहि
In reply to असं असतं तर वैवाहिक संबंधात तोचतोपणाची तक्रारच उरली नसती ! by विवेक ठाकूर
उका,
In reply to अहो त्यांना म्हणायचं आहे की , by उगा काहितरीच
झोपेत पदार्थ दिसणं हे दिवसाच्या भोजनातली अतृप्ती दर्शवतं....
In reply to मुवी, तुम्ही विनोदानं लिहीलंय असं गृहित धरतो by विवेक ठाकूर
मनी वसे ते स्वप्नी दिसे हा बेसिक नियम आहे
In reply to झोपेत पदार्थ दिसणं हे दिवसाच्या भोजनातली अतृप्ती दर्शवतं.... by मुक्त विहारि
छान लेख.
पण जर खाणं हीच passion असली
In reply to छान लेख. by अर्धवटराव
खरं तर खाणं ही पॅशन असेल तरच
In reply to पण जर खाणं हीच passion असली by बोका-ए-आझम
खाणं हि पॅशन असु शकते.
In reply to पण जर खाणं हीच passion असली by बोका-ए-आझम
मस्तच लिहिलं आहे
वेळ भासमान आहे आणि
In reply to मस्तच लिहिलं आहे by स्पा
अरे विठोबा, वेळ भ्रम असेल तर
In reply to वेळ भासमान आहे आणि by विवेक ठाकूर
वाचतेय.आजचा लेख आवडला.
पुर्वग्रह न ठेवता वाचला तर
छान लिहीलय.
मेरेकू आवड्या जो भी लिखा है