राम राम मंडळी,
धाग्याच्या शिर्षकाबद्दल थोडं सांगतो,
'द सिक्रेट' हे नुकतच वाचनात आलेलं Rhonda Byrne या लेखकाचं पुस्तक.
बरं आता इथे मिपावर असणार्यांपैकी काही जणांनी ते पुस्तक वाचलय,नाही वाचलय ते मला माहित नाही.
तर सुरूवात लेखक कशी करतात पहा-
"A year ago,my life had collapsed around me.I'd worked myself into exhaustion,....... bla bla bla....
......आणि मला(लेखकाला) एक रहस्य कळालं."
ज्याने माझे आयुष्य सुखमय झालं.
तर अशी सुरूवात असली कि जरा मनात साशंकताच निर्माण होते,पुढे काय वाढून ठेवलं आहे याची.
पुढे लेखक म्हणतात कि असं एक रहस्य आहे,कि ते तुम्हाला आयुष्यात आनंद,आरोग्य,आणि संपत्ती मिळवून देईल.आणि म्हणतात"May The Secret bring you love and joy for your entire existence.
आणि प्रस्तावनेत सांगतात कि हे पुस्तक वाचून मला हजारो पत्रं आणि मेल्स आले,आणि त्या रहस्याचा लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसा फायदा झाला वगैरे.
मग मीही खुश झालो,रहस्य जाणून घेण्यासाठी.आधीच मी पैश्याला लै हावरा,त्यामुळे पुस्तक वाचायच्या आधीच करोडपती बनण्याची स्वप्ने पाहू लागलो.
पुढे वाचू लागलो तर रहस्याचा उलगढा काही केल्या होईच ना! वेगवेगळ्या तत्वज्ञांची/मानसोपचार तज्ञ/वैज्ञानिक यांची उदाहरणे दिलेली.ते काय म्हणतात या रहस्याबद्दल वगैरे वगैरे.
BOB PROCTOR: हे रहस्य तुम्हाला जे काही हवयं ते देईल. सुख,संपत्ती,आरोग्य.
DR.JOE VITALE:हे रहस्य जाणल्यावर तुम्हाला जे काही हवं आहे आयुष्यामध्ये ते मिळेल.
DR.JOHN DEMARTINI:हे जीवन जगण्याचे एक महान रहस्य आहे.
आणखीन बरीच उदा.दिलेली.
मला वैताग आला,थेट त्या रहस्याच्या पानावर जाऊन काय ते जाणून घेण्याची इच्छा झाली.
पण मग आणि कंट्रोलवर आलो.
आणि शेवटी एकदाचं त्या पानावर पोहचलो,
काय लिहलं होतं बघा.
ते रहस्य आहे,ते म्हणजे---
" आकर्षणाचा सिद्धांत"(law of attraction)
हे वाचून डोकं क्रॅकच झालं.म्हटलं यात आता काय नवीन?आकर्षणाचा सिद्धांत तर आपल्याला माहितच आहे.
पण पुढे वाचत गेलो तर वेगळच काहीतरी सांगितलं होतं,ते असं,
"विचारांना कंपने(vibration) असतात"
आणि आपण जसा विचार करू तसे त्या फ्रिक्वेन्सीची कंपने ब्रह्मांडात पसरतात आणि समान फ्रिक्वेन्सी असणार्या गोष्टींना,घटनांना,परिस्थितींना आकर्षित करतात.आणि तशाच प्रकारच्या व्यक्ती,घटना,परिस्थिती तुमच्या आयुष्यात साकार होतात.
"Everything that's coming into your life you are attracting into your life.And it's attracted to you by virtue of the images you're holding in your mind.IT'S WHAT YOU ARE THINKING.
whatever is going on your mind you are attracting to you."
"Thoughts become things" म्हणजे विचार वस्तू बनतात.
तर पुढे जाऊया आता,
मनामध्ये दिवसाला साठ हजार विचार येतात,असे संशोधक म्हणतात.
पुढे लेखक म्हणतात ज्या विचारावर तुम्हाला ठाम राहायचे आहे,ते आधी पक्कं करावं लागतं.आणि मग त्या विचारांची कंपने बाहेर पडतात आणि समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टींना आकर्षित करतात.
लेखक म्हणतात कि तुम्हाला ज्या गोष्टी आयुष्यात हव्या आहेत,त्याचाच विचार करा त्यामुळे त्या विचारांची कंपने विश्वात पसरायला काही अडचण येत नाही.पण विचार समिश्र झाले,आणि तुम्हाला त्याबद्दल शंका वाटली तर त्या विचारांची समिश्र कंपने तयार होतात आणि तसेच रिझल्ट आपल्याला मिळतात.
म्हणजे 'मला आजार नको','गरीबी नको','माझं शरीर निरोगी हवयं'
या हव्या असलेल्या गोष्टींचेच विचार मनात ठेवा.
थोडक्यात काय स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा,असे लेखकाचे म्हणणे आहे.
ते म्हणतात ना "power of positive thinking"
लेखक म्हणतात तुम्ही निसर्गाकडे ठाम मागणी करा,या वैश्विक शक्तीला समजू दे तुम्हाला काय हवं आहे.हे विश्व तुमच्या विचारांनुसार नक्कीच प्रतिक्रिया देईल आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळतील.ते पुढे असेही म्हणतात कि अवाजवी काही मागणी करू नका,कारण निसर्गाचेही काही नियम आहेत.
उदा- 1)उद्याच्या उद्या मला एक कोटी रूपये मिळू देते,
2) दिपिकासोबत माझं लग्न होऊ दे!
त्यामुळे हे शक्य नाही.
अणूपासून प्रत्येक गोष्ट बनलेली आहे,त्या अणूच्या हजारो/लाखो पट आत शिरल्यास "क्वार्क्स"नावाची गोष्ट दिसली,त्याच्याही हजारो पट आत शिरल्यावर एक गोष्ट सापडली ती म्हणजे फक्त "कंपन"
जगातील सजीव निर्जिव गोष्टी एक ठाराविक फ्रिक्वेन्सीला कंपन पावत आहे!
त्याचप्रमाणे क्वाॅन्टम फिजिक्सचे संशोधक असे सांगतात कि मानवी विचार,भावना या गोष्टींनाही एक प्रकारचे कंपन आहे.आणि चुंबकाप्रमाणे समान कंपनाच्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात.
लेखक म्हणतात तुमचे व्हिजन काय आहे हे निश्चित असले पाहिजे आणि सदैव अणि सदैव त्याच गोष्टींचा विचार करा,जेणेकरून तुमचे व्हिजन पूर्ण होईल,आणि त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करा./कृती करा.
"प्रयत्न करा" हा शब्द वाचल्यावर माझा थोडा मूडच खराब झाला,पण असो.
पुढे लेखकाने पैसा,नाती,आरोग्य,आनंदी जीवन या गोष्टींसाठी हे रहस्य वापरा असे सांगितले आहे.
वापनराव पै म्हणतात-"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार."
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात - "जो जे वांछिल तो ते लाहो"
तुकराम महाराज-"तुझे आहे तुजपाशी परि तूच जागा चुकलाशी"
विवेकानंद म्हणतात-"आता आपण जे आहोत ते आपल्या भूतकाळातील विचारांमुळेच.
तसेच पेरल्यानंतर शेकडोपटीने परत मिळणं हा निसर्गाचाच नियम आहे.तुम्ही कोणाहीपेक्षा कमी नाही,जी ऊर्जा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीकडे आहे,तीच तुमच्यात आहे,तुम्ही फक्त ऊर्जेला चांगलं स्वरूप द्या.
फक्त मनातले विचार मजबूत असले पाहिजेत,त्यांच्यात काही दम असला पाहिजे,नाहीतरी मला हे हवयं,ते हवयं म्हणून चालणार नाही.थोडक्यात काय हवयं ते प्राप्त करण्यासाठी झपाटून(वेडेपणा नव्हे) घ्यायला हवं.
या जगातल्या यशस्वी लोकांना ते रहस्य कळालं,म्हणून ते किर्तीच्या शिखरावर पोहचले,असे लेखक म्हणतात.
चार्ल्स हॅनेल म्हणतात:
"तुम्हाला विश्वाच्या आणि तुमच्या शक्तीची जाणीव येईल तेव्हा तुम्ही एक जिवंत विजेची तार बनलेला असता.ब्रह्मांडसुद्धा अशीच जिवंत विजेची तार आहे.जेव्हा वैयक्तिक मन वैश्विक मनाला स्पर्श करतं तेव्हा वैयक्तिक मनाला वैश्विक मनाच्या सर्व शक्ती प्राप्त होतात."
यामध्ये माझं काही नाही,फक्त मांडणी केली आहे,
तरीही काय म्हणता?
वाचने
17452
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
झक्कासच विषय मांडलात...
rhonda Byrne ही लेखिका आहे
.
In reply to rhonda Byrne ही लेखिका आहे by काकासाहेब केंजळे
हे पुस्तक ,what the bleep do
धन्यवाद काकासाहेब
"इतनी शिद्दत से मैनें तुमको
हा मूळ डायलाॅग बहुतेक
In reply to "इतनी शिद्दत से मैनें तुमको by जेपी
होय सर,डाॅयलाॅग असा आहे.
In reply to हा मूळ डायलाॅग बहुतेक by विजय पुरोहित
धन्यवाद...
In reply to होय सर,डाॅयलाॅग असा आहे. by चेक आणि मेट
badly वगैरे शब्द त्या वाक्यात
In reply to होय सर,डाॅयलाॅग असा आहे. by चेक आणि मेट
काहीही हां श्री!
एका माणसाच्या विचारांना कंपनं
In reply to काहीही हां श्री! by आदूबाळ
म्हणजे इच्छित ते घडलं की
In reply to एका माणसाच्या विचारांना कंपनं by चेक आणि मेट
खिक् ;-)
In reply to म्हणजे इच्छित ते घडलं की by आदूबाळ
अहो
In reply to म्हणजे इच्छित ते घडलं की by आदूबाळ
तुम्हाला कृष्णदर्व्या बद्दल
In reply to काहीही हां श्री! by आदूबाळ
धन्यवाद! NatGeo ची लिंक वाचली
In reply to तुम्हाला कृष्णदर्व्या बद्दल by काळा पहाड
आमचा एक पेपर विकणारा आणी mlm
.विवेकानंद म्हणतात-"आता आपण
सहमत
.
मानसशास्त्राचा मुद्दा पटला.
कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे.
मग लेखक काय म्हणताहेत? उगीच
In reply to कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. by राजेश घासकडवी
विजय भाऊ केव्हा पूर्ण करणार ?
In reply to मग लेखक काय म्हणताहेत? उगीच by विजय पुरोहित
मी पूर्ण करतो हो. तुम्ही
In reply to विजय भाऊ केव्हा पूर्ण करणार ? by मयुरMK
हेच म्हणतोय मी सर सहमत
In reply to कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. by राजेश घासकडवी
.
In reply to कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. by राजेश घासकडवी
कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे.
In reply to कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. by राजेश घासकडवी
पूर्ण प्रतिसादाशी सहमत!!
In reply to कंपनं वगैरे भंपक प्रकार आहे. by राजेश घासकडवी
याचे व्हिडीओ पाहिले होते.
सर्वोत्तम मत उ.का. काका...
In reply to याचे व्हिडीओ पाहिले होते. by उगा काहितरीच
धन्यवाद विपु आजोबा ! ;-)
In reply to सर्वोत्तम मत उ.का. काका... by विजय पुरोहित
थोडफार अवास्तव आहे. पण ठीक
In reply to याचे व्हिडीओ पाहिले होते. by उगा काहितरीच
लोकांचे काय घेऊन बसलात हो,
धन्यवाद
In reply to लोकांचे काय घेऊन बसलात हो, by सतिश गावडे
कंपनं...
कुछ तो दम है बॉस !
विचारांचा परिणाम पाण्यावर होत
डॉ. राजेंद्र बर्वे
हे पटतंय का बघा.
जबरदस्त प्रतिसाद! धन्यवाद!
In reply to हे पटतंय का बघा. by लॉरी टांगटूंगकर
छान प्रतिसाद,
In reply to हे पटतंय का बघा. by लॉरी टांगटूंगकर
An optimist is a person who
In reply to हे पटतंय का बघा. by लॉरी टांगटूंगकर
छान प्रतिसाद
In reply to हे पटतंय का बघा. by लॉरी टांगटूंगकर
धन्स :)
In reply to छान प्रतिसाद by सतिश गावडे
The Drunkard's Walk, Fooled
In reply to धन्स :) by लॉरी टांगटूंगकर
तुमची प्रतिक्रीया
In reply to हे पटतंय का बघा. by लॉरी टांगटूंगकर
वा!
In reply to हे पटतंय का बघा. by लॉरी टांगटूंगकर
काळं-पांढरं वेगळं करणं सोपं आहे,.....
काळं-पांढरं वेगळं करणं सोपं आहे,.....
चुकीची विचारसरणी आणि घोर अज्ञान
दणदणीत सहमती, अचुक मांडलेत
In reply to चुकीची विचारसरणी आणि घोर अज्ञान by विवेक ठाकूर
"मन करा रे प्रसन्न सर्व
Always be positive- unless it
खिक्क..!!
.
In reply to खिक्क..!! by राघव
माऊ, ते जरा सुप्त मनात ईच्छा
In reply to . by कवितानागेश
.
In reply to . by कवितानागेश