✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का ??????

क
काकासाहेब केंजळे यांनी
गुरुवार, 02/11/2016 - 20:08  ·  लेख
लेख
पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो,तसा मलाही तो समजायला लागल्यापासून पडत आलेला आहे.पुरुषाला जन्म देणारी स्त्री असूनही ति पुरुषप्रधान व्यवस्थेत कशी अडकली? जगभरात पुरुषप्रधान संस्कृतीच का आहे?.जग बदलणार्या विलक्षण घटना(breakthroughs) फक्त आणि फक्त पुरुषांकडून का घडल्या आहेत?.धर्म राजकारण ,विज्ञान तंत्रज्ञान, कला ,साहीत्य, साम्राज्ये यावर एक नजर टाकली तर हा विलक्षण योगायोग लक्षात येतो.जरा नजर टाकूयात विज्ञान तंत्रज्ञान---- आर्कीमिडीज ,पायथागोरस,सुश्रुत,गॅलिलिओ,न्युटन , डार्विन , जेम्स वॅट, एडीसन,बेंजामिन फ्रेंकलीन,मार्कोनी,मेंडेल,पास्कल, एडवर्ड जेन्नर, अलबर्ट आइनस्टाइन , राईट बंधू,वॅटसन् क्रीक(DNA) ,स्टीफन हॉकींग्ज, बिलगेट्स , हेन्री फोर्ड , स्टीव जोब्ज. ......... ईत्यादी अनेक तत्वज्ञान-----ॲरीस्टोटल, सॉक्रॅटीस , प्लेटो,रेने देकार्त,डार्विन ,चाणक्य ईत्यादी अनेक धर्म------ येशु ख्रिस्त,मोहंमद पैगंबर, आद्य शंकराचार्य,भगवान गौतम बुद्ध,भगवान महाविर, गुरु गोविंदसिंग ईत्यादी अनेक कला--- लिओनार्दो दा व्हीन्ची , पाब्लो पिकासो, शेक्सपिअर,रविंद्रनाथ टागोर, राजा रविवर्मा ,बिटल्स,एम एफ हुसेन...ईत्यादी अनेक साम्राज्ये------ अलेक्झांडर द ग्रेट,नेपोलियन बोनापार्ट,चंगेजखान,सम्राट अशोक,मुघल साम्रट बाबर, शिवाजी महाराज, पेशवे इत्यादी अनेक प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले नाहित? याचा सरळ अर्थ असा निघतो का की पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार असतात? मागच्या पन्नास वर्षात युरोप अमेरीकेत व भारतात स्त्रीयांना समान संधी आहे तरीही विज्ञान ,तंत्रज्ञान, कला , साहित्य ,क्रिडा यात स्त्रीया पुरुषांपेक्षा बर्याच पिछाडीवर आहेत.या सामाजिक चमत्काराचे कारण काय असू शके? आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या युगात मिपासारख्या खुल्या व अभिव्यक्तीची मोकळीक असणार्या संकेतस्थळावर यावर काथ्याकूट व्हायला काहीच अडचण नाही
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33942 वाचन

💬 प्रतिसाद (175)

प्रतिक्रिया

आँ ??

नीलमोहर
Fri, 02/12/2016 - 00:20 नवीन
५ कोणते हो, फक्त तांदूळ सांडले तेही आईने रुमालात गुंडाळून न दिसतील असे ठेवले होते म्हणून, आणि शेवया जळाल्या कारण १५ सेकंद ठेवायचं तर २५ ठेवलं. आता कुकर परत लावला कारण ती महागातली तूर डाळ लौकर शिजतच नाही कधी. आता उठल्यापासून हापिसात जाईपर्यंत पळापळ करायची, मग दिवसभर पीसीवर डोकेफोड केल्यावर परत घरी कामं करायची म्हणजे थोडं फार होणारच कि हो इकडे तिकडे, काय बाई एवढं मरमर करून परत हे असं ऐकायला लागावं ना :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

आणि,

नीलमोहर
Fri, 02/12/2016 - 00:25 नवीन
सकाळ वाचू शकत नाही कारण एकमेव मटाच ठेवलाय ते पण वर्गणी आगाऊ भरलीय म्हणून ;) बाकी सगळे पेपर फक्त संडे टू संडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

माफ करा काकासाहेब

अन्नू
Fri, 02/12/2016 - 00:34 नवीन
पण तुमचा प्रश्न नै आवडला. हे म्हणजे पुरुष श्रेष्ठत्त्वाचा मुद्दा डिबेटच्या ऐवजी इथे ठासून सांगितल्यासारखे वाटले! सॉरी! पण जगात एक असा देश सांगा, जिथे पुर्वीपासून फक्त आणि फक्त स्त्रीप्रधान संस्कृतीच अस्तित्त्वात आहे? असो त्या वादात नाही पडायचं मला. कारण, कारणं द्यायला गेलं कि रडतराव घोड्यावर असा समज करुन घेतला जातो! तर- तुंम्हाला हे म्हणायचं आहे कि इतकं स्वातंत्र्य असताना स्त्रीया मागे का राहिल्या? बरोबर ना? म्हणजे थोडक्यात, त्यांच्या कर्तुत्त्व आणि बुद्धिमतेचाच इथे प्रश्न आहे ना? तर असं आहे साहेब- तुमच्या समोर टीव्ही आहे, हातात पुस्तक आहे, फोन आहे, कंप्युटर आहे, नेट आहे, गुगल आहे, वर्तमानपत्र आहे, जरा बघा ना नीट डोळे उघडून. भ्रम लगेच फुटून जाईल तुमचा! आज संशोधनापासून कला क्षेत्रापर्यंत आणि कॉर्पोरेट क्षेत्रापासून समाज कार्याच्या क्षेत्रापर्यंत सर्व ठिकाणी स्त्रीया वरच्या हुद्द्यावर पाहायला मिळतील तुंम्हाला. घरात होममिनिस्टर(गृहीणी) म्हणून घरात बडबड करणारी बाई दिसते तुंम्हाला पण तिथेच प्राईम मिनिस्टर म्हणून देशाचा कारभार पाहणारी इंदिरा किंवा प्रेसिडेंट म्हणून अख्या देशाचे प्रतिनिधित्त्व करणारी प्रतिभाताई तुंम्हाला दिसत नाही! वा! अनेक वर्षे बारावी दहावीचे रिझल्ट बघता ना? कोण असतं सगळ्यात पुढं? मुली कि मुलं? एकिकडे मदर टेरेसा किंव सिंधूताई सपकाळ बनून- भरभरुन आईचे प्रेम वात्सल्य देणारी स्त्री दुसरीकडे मेरि कॉम किंवा कल्पना चावला म्हणून जागतिक पातळीवर नाव कमवतानाही दिसेल! अनेक इतिहासातले योद्धांची नावे वर सांगतानाच आपले लहान मुल पाठीवर बांधून शत्रूंची दोन हात करणारी झाशीची राणी नै आठवली तुंम्हाला? कमाल आहे! शिवाय वर सांगितलेले शिवाजी महाराज- कोणी घडवलं हो शिवाजींना? महाशय, खरा इतिहास वाचला नसेल तर वाचा. इतिहासाची निम्मी अर्धी पाने स्त्रीयांच्या नावाने भरलेली दिसतील तुंम्हाला!
  • Log in or register to post comments

प्रेसिडेंट म्हणून अख्या

टवाळ कार्टा
Fri, 02/12/2016 - 12:06 नवीन
प्रेसिडेंट म्हणून अख्या देशाचे प्रतिनिधित्त्व करणारी प्रतिभाताई तुंम्हाला दिसत नाही!
यांना बाकीच्या स्त्रीयांच्या यादीत बसवले??? तुम्च्या चरणकमलांचा फटू पाठवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

आ?

अन्नू
Fri, 02/12/2016 - 13:12 नवीन
बाकीच्या स्त्रीयांच्या यादीत म्हण्जे? :/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

काकासाहेबांचा विजय असो

अगम्य
Fri, 02/12/2016 - 02:21 नवीन
लैंगिकता हे एक अत्यंत शक्तिशाली बल आहे. लैंगिकतेच्या प्रेरणेमुळे पुरुष अचाट कामे करून जातात. तो पुरुषांच्या बुद्धीमागाचा एक प्रचंड impetus आहे. काकासाहेबांच्या स्त्रीविषयक पहिल्या नियमानुसार संदर्भ "स्त्रीची लैंगिक इच्छा खूप कमी असते ,जवळपास नसल्यात जमा". तस्मात स्त्रियांच्या बुद्धीला चालना देणारे बलच नसल्यामुळे त्यांची बुद्धी चालतच नाही. अशा प्रकारे काकासाहेबांच्या स्त्रीविषयक (जगप्रसिद्ध व जगन्मान्य) पहिल्या नियमाच्या आधारे हा दुसरा नियम सिद्ध केला गेला आहे. QED.
  • Log in or register to post comments

पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार

खटपट्या
Fri, 02/12/2016 - 03:02 नवीन
पुरुष स्त्रीयांपेक्षा हुशार आहेत का ??????
आत्तापर्यंत ऐकलेला सर्वात फालतू प्रश्न. उत्तराची लायकी नसलेला. संतापलेली स्मायली
  • Log in or register to post comments

ठंड पाओ जी.. कुणाला महत्त्व

स्रुजा
Fri, 02/12/2016 - 03:08 नवीन
ठंड पाओ जी.. कुणाला महत्त्व देताय उगाच (काहीतरी साहेब नाहीत);) ) ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

काका साहेब नमस्कार,

प्रमोद देर्देकर
Fri, 02/12/2016 - 09:05 नवीन
काका साहेब नमस्कार, वर अन्नूजींनी जी नावे दिली आहेत त्यात अजुन काही नावे जोडतो. लोपमुद्रा, गार्गी, पासुन ते जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, ते शामची आई पर्यंत किती नावे देवु. मादम दाम मेरी क्युरी, तिची मुलगी इरोन जोलीएट क्युरी, दोघींना रसायनशास्त्र, भौतीक शास्त्रात नोबेल मिळालेले आहे. अहो जरा डोळे उघडे नीट बघा. अजुनही काही महिला साईंटीस्ट हवे असतील खाली दिलेली लिन्क नजरे खालुन घाला. ज्या मध्ये २० व्या शतकाच्या पहिले कोण कोण महिला शास्त्रज्ञ होत्या त्याची माहिती मिळेल. https://en.wikipedia.org/wiki/List_of_female_scientists_before_the_20th_century उगा आपलं किती प्रतिसाद येत आहेत या करिता जर मिपा वजर धागा काढला असाल तर संपा कडे जावुन तो काढुन टाका. तुमच्या सारख्या जेष्ठ मिपाकरांनी असं वागल्यास नवमिपाकरांना कसे मार्गदर्शन मिळणार बरे.
  • Log in or register to post comments

गरम गरम दोसे केलेत... Anybody

पिलीयन रायडर
Fri, 02/12/2016 - 09:26 नवीन
गरम गरम दोसे केलेत... Anybody? चटणी आपापली आणावी.
  • Log in or register to post comments

डोश्यासोबत कवठाची चटणी जरा

माहितगार
Fri, 02/12/2016 - 12:22 नवीन
डोश्यासोबत कवठाची चटणी जरा अनपेक्षित वाटेलपण मला कवठाचीच चटणी आवडते म्हणून विकिमिडीया कॉमन्सवरच्या सुलभाताईंकडनं आणलीए. यारे सर्व जण कवठाची चटणी घ्या जरा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तोंपासु

भिंगरी
Fri, 02/12/2016 - 17:12 नवीन
तोंपासु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

ही घ्या चटणी

_मनश्री_
Fri, 02/12/2016 - 12:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हे घ्या डोसे...

पिलीयन रायडर
Fri, 02/12/2016 - 13:47 नवीन
हे घ्या डोसे... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

thank you

_मनश्री_
Fri, 02/12/2016 - 14:01 नवीन
thank you मस्त आहेत डोसे तशीही मी हुशार नसल्याने मला चांगले डोसे बनवता येत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आजच्या मेन्युत....

मुक्त विहारि
Fri, 02/12/2016 - 10:13 नवीन
जिलबी अ‍ॅड करावी का?
  • Log in or register to post comments

प्रत्येक

सिरुसेरि
Fri, 02/12/2016 - 10:13 नवीन
'प्रत्येक हुशार , कर्तबगार पुरुषाच्या यशामागे मागे एक स्त्री असते ' असे जाणती पुरुष मंडळी सांगतात .
  • Log in or register to post comments

सिरुसेरी, तेच तर के. के. काका

यशोधरा
Fri, 02/12/2016 - 10:18 नवीन
सिरुसेरी, तेच तर के. के. काका कळकळीने सांगताहेत की मागे का रहाता, पुढे चला, असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

प्रत्येक हुशार , कर्तबगार

प्रमोद देर्देकर
Fri, 02/12/2016 - 12:59 नवीन
प्रत्येक हुशार , कर्तबगार पुरुषाच्या यशामागे मागे एक स्त्री असते>>>> आणि अयशस्वी पुरुषाच्या मागे कीती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

याला म्हणतात अस्सल काडी =))

टवाळ कार्टा
Fri, 02/12/2016 - 13:13 नवीन
याला म्हणतात अस्सल काडी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

वक्त आ गया है ...

ब़जरबट्टू
Fri, 02/12/2016 - 10:20 नवीन
वक्त आ गया है संपादक मनडळो, कूच करो, नाही तर धागो का ऐसा रतीब गिरता रहेगा.. व्यक्तीस्वातंत्र वैगरे ठिक आहे, सर्वाना त्यांचे विचार प्रकट करायचे, लिहायची मुभा नक्की असावी, पण मग कायच्या कै टायपातले धागे निघायला लागते तर कसे चालेलं. वर डांगे साहेबांचा सुटला तसा सयंम कदाचित इतरांचा सुटेल. मिपा लुजिंग इट्स क्वालिटी. हळुहळु चर्चा सुटतात व गोंधळ, गलगलाट सुरु होतो. एक कचरा धागा आला, की त्याला उत्तर देणारे अनेक घागे निघतात. कोणता धागा नविन लेखकाचा आहे, किती उथळ , किती खोल हे सर्वाप्रमाणे संम ला पण नक्की कळते. याबाबत नविन धोरण आत्ता नसावे का ?. अगदीच नाही, पण (-१) असे २५ प्रतिसाद आले, तर धागा उडवू , असे काही नियम का नसावे ?
  • Log in or register to post comments

..........

_मनश्री_
Fri, 02/12/2016 - 10:31 नवीन
............ Image removed.
  • Log in or register to post comments

सोबत फापडा किंवा मुगाची भजी

माहितगार
Fri, 02/12/2016 - 16:53 नवीन
सोबत फापडा किंवा मुगाची भजी हवीत, ढोकळाही चालेल मस्त लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

बाबा, महाराज, देव देव करून

हेमंत लाटकर
Fri, 02/12/2016 - 10:38 नवीन
बाबा, महाराज, देव देव करून अंधश्रद्धा पाळणार्या सुशिक्षित स्ञियासुद्धा असतात.
  • Log in or register to post comments

धाग्यावर

गवि
Fri, 02/12/2016 - 11:11 नवीन
धाग्यावर पुरुष* आयडींचे ३५% स्त्री* आयडींचे ५०% जेंडर न्यूट्रल* आयडींचे १५% या प्रमाणात प्रतिसाद आहेत. धागा शतकी करण्यात स्त्रियांचा मुख्य सहभाग आहे हे रोचक. ;-) *आयडीनाम आणि जालीय व्यक्तिमत्वाच्या अंदाजाने.
  • Log in or register to post comments

प्रश्न असा आहे की हे सगळे

_मनश्री_
Fri, 02/12/2016 - 11:19 नवीन
प्रश्न असा आहे की हे सगळे पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या? त्यांनी का शोध लावले नाहित?
माफ़ करा काकासाहेब चुक झाली खरच काय बर करत होते मी ? काही नाही हो खायचं प्यायचं लोळायचं ,मराठी संस्थळांवर मनसोक्त टाईम पास करायचा या सगळ्यात शोध लावायला वेळच मिळाला नाही शिवाय मी बाळबोध ,चिडकी ,पळकाढू आणि सगळ्यात महत्वाच पुरुषांइतकी हुशार नसल्याने ह्या शोध वगैरे लावायच्या फंदात पडले नाही तसा शाळेत असताना वर्गात कायम पहिला दुसरा नंबर यायचा माझा तेसुद्धा चक्क आमच्या वर्गात मुलगे असताना ,कॉलेजमध्ये सुद्धा बरे मार्क्स पडत होते पण तरीही मी कधी स्वतःला पुरुषांपेक्षा हुशार वगैरे समजण्याची चूक केली नाही बर का !
  • Log in or register to post comments

अगं जातीचा हुशार स्वतः दवंडी

कविता१९७८
Fri, 02/12/2016 - 14:28 नवीन
अगं जातीचा हुशार स्वतः दवंडी पिटवत नाही गं, उथळ पाण्यालाच फार खळखळाट असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

स्त्रिया हुशार आहेत हे

sagarpdy
Fri, 02/12/2016 - 11:27 नवीन
स्त्रिया हुशार आहेत हे त्यांनी यशस्वीरीत्या स्वतंत्र दालनाची गरज मालकांना पटवून देऊन आणि ते उघडून सिद्ध केले आहे. मिपावरील सर्व तथाकथित हुशार-कर्तबगार पुरुष मंडळीना कोनाड्याची गरज मालकांना पटवून देता नाही आली हेच खरे.
  • Log in or register to post comments

का हो मीठ लावताय ;) बिच्चारे

माहितगार
Fri, 02/12/2016 - 12:53 नवीन
का हो मीठ लावताय ;) बिच्चारे कोनाडावादी पुरुष !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

बिच्चारे कोनाडावादी पुरुष !

अन्नू
Fri, 02/12/2016 - 13:08 नवीन
बिच्चारे कोनाडावादी पुरुष ! खी: खी: खी:.. बाकी ते काकासाहेब जिलबी टाकून कुठे अदृश्य झाले? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

मिपा बायका आहेतच हुशार हो पण

इशा१२३
Fri, 02/12/2016 - 13:28 नवीन
मिपा बायका आहेतच हुशार हो पण इतर स्त्रियांच काय? त्या आहेत का हुशार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

काका छाएब... अचं काई नछत ओ...

पक्षी
Fri, 02/12/2016 - 13:11 नवीन
काका छाएब... अचं काई नछत ओ....
  • Log in or register to post comments

मला वाटतं स्त्रीयांची प्रगती

मराठी कथालेखक
Fri, 02/12/2016 - 13:59 नवीन
मला वाटतं स्त्रीयांची प्रगती कमी असण्यामागे २ कारणे आहेत १) सर्वात महत्वाचे - मानवात पुरषाकडे स्त्रीवर बलात्कार करण्याची क्षमता आहे (जशी इतर कोणत्याच प्राण्यात नाही असे मी वाचले आहे) २) पुरुषाची शारिरिक शक्ती (फक्त स्नायूंची शक्ती अभिप्रेत आहे, सहनशक्तीबद्दल बोलत नाही) स्त्रीपेक्षा काहीशी जास्त असणे [धागाकर्त्याचा धागा काढण्याचा खरा उद्देश अगदी स्पष्ट आहेच (!!) पण तरी चुकून माकून कुणी धागा गंभीरपणे घेत असेल आणि एखादा जेन्यूईन (म्हणजे त्याच्या मते कारण , तो/ती धागा गंभीरपणे घेत आहे) प्रतिसाद शोधत असेल तर त्याकरिता हा माझा प्रतिसाद, बाकी माझ्या मते इतर प्रतिसाद जेन्यूईनच आहेत कारण ते धाग्याच्या खर्‍या उद्देशाला अनुसरुन आहेत ]
  • Log in or register to post comments

जगात घडलेल्या किंवा घडत

चिनार
Fri, 02/12/2016 - 14:12 नवीन
जगात घडलेल्या किंवा घडत असलेल्या बलात्कारांच्या घटनांचा इतिहास बघितला तर त्यातही पुरुष आघाडीवर आहेत. स्त्री ने पुरुषावर बलात्कार केल्याचे ऐकिवात नाही किंवा असेल तर नगण्य प्रमाण आहे. ह्याचा अर्थ पुरुष स्त्रीयांपेक्षा जास्त नालायक आहेत का ? प्रतिसाद सगळ्यांनी द्यावेत पण उत्तर फक्त काकासाहेब केंजळे यांच्याकडून अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments

ह्याचा अर्थ पुरुष

कविता१९७८
Fri, 02/12/2016 - 14:24 नवीन
<<<<जगात घडलेल्या किंवा घडत असलेल्या बलात्कारांच्या घटनांचा इतिहास बघितला तर त्यातही पुरुष आघाडीवर आहेत. स्त्री ने पुरुषावर बलात्कार केल्याचे ऐकिवात नाही किंवा असेल तर नगण्य प्रमाण आहे. ह्याचा अर्थ पुरुष स्त्रीयांपेक्षा जास्त नालायक आहेत का ? >>>>
भारी प्रतिसाद
  • Log in or register to post comments

जगात घडलेल्या किंवा घडत

कविता१९७८
Fri, 02/12/2016 - 14:25 नवीन
जगात घडलेल्या किंवा घडत असलेल्या बलात्कारांच्या घटनांचा इतिहास बघितला तर त्यातही पुरुष आघाडीवर आहेत. स्त्री ने पुरुषावर बलात्कार केल्याचे ऐकिवात नाही किंवा असेल तर नगण्य प्रमाण आहे. ह्याचा अर्थ पुरुष स्त्रीयांपेक्षा जास्त नालायक आहेत का ? भारी प्रतिसाद
  • Log in or register to post comments

नानासाहेब,

श्रीगुरुजी
Fri, 02/12/2016 - 14:49 नवीन
नानासाहेब, हा धागा लिहिण्यापूर्वी माईसाहेबांची परवानगी घेतली होती का? निदान माईंना हा धागा दाखविला आहे का? आता तुमच्या आणि माईंच्या कर्तृत्वाची तुलना केली तर माईसाहेबांनी आपला आयडी सुरवातीपासून आजतगायत टिकविला आहे. याच काळात तुमचे किमान डझनभर डूआयडी झाले. आता सांगा बरे तुमच्या दोघात कोण जास्त कर्तृत्ववान?
  • Log in or register to post comments

मला माई फार आवडते.. कसलं

पिलीयन रायडर
Fri, 02/12/2016 - 15:08 नवीन
मला माई फार आवडते.. कसलं बेअरिंग आहे तिचं.. माईचा आयडी कध्धी कध्धी उडवु नका संमुडी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

संमुडी>>>>>>>अरारारा =)) =))

बॅटमॅन
Fri, 02/12/2016 - 15:38 नवीन
संमुडी>>>>>>>अरारारा =)) =)) =)) बाकी बंद पडलेले घ ड्याळही दिवसातून दोनवेळा योग्य वेळ दाखवते म्हणतात त्याची प्रचिती आली बा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

माईसाहेबांनी जेवण दिलं नाही

अदि
Sat, 02/13/2016 - 12:45 नवीन
माईसाहेबांनी जेवण दिलं नाही वाट्टे.. म्हणून हे सगळं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काय रोचक धागा आहे राव = ))

पियुशा
Fri, 02/12/2016 - 15:53 नवीन
काय रोचक धागा आहे राव = )) इतने दिन कहा थे ते सद्पुरुश लेखक ;) एक निरागस मिपा बापुडी ;)
  • Log in or register to post comments

मिपा बापुडी की मिपा बायको??

कविता१९७८
Fri, 02/12/2016 - 15:55 नवीन
मिपा बापुडी की मिपा बायको??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

बायको नाही ग बायका बायका !

पियुशा
Fri, 02/12/2016 - 16:51 नवीन
बायको नाही ग बायका बायका ! लिहुन आन आता १०० वेळा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

बायका + ९९

कविता१९७८
Fri, 02/12/2016 - 16:56 नवीन
बायका + ९९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

बायका + ९९ बायका

कविता१९७८
Fri, 02/12/2016 - 16:58 नवीन
बायका + ९९ बायका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

बायका + ९९ बायका

कविता१९७८
Fri, 02/12/2016 - 16:58 नवीन
बायका + ९९ बायका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

काय पिवशे

अभ्या..
Fri, 02/12/2016 - 17:00 नवीन
काय पिवशे मिपागांधी, मिपाकट्टप्पा सारखा मिपा बायको पण पुरस्कार सुरु झालाय काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

काय माहित नाही राव मला , काहि

पियुशा
Fri, 02/12/2016 - 17:14 नवीन
काय माहित नाही राव मला , काहि क्ल्पना नाहि मी तर निरागस बापुडी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

निरागस पियुडी

विशाखा राऊत
Fri, 02/12/2016 - 16:41 नवीन
निरागस पियुडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

स्त्रिया काय करत होत्या

महासंग्राम
Fri, 02/12/2016 - 17:16 नवीन
मुळात हा चुकीचा आहे. आजच्या समानतेच्या जगात हा प्रश्न अजूनही पडावा याचं नवल आणि खेद दोनीही वाटतो.
पुरुष जगाचा तोंडवळा बदलत असताना स्त्रीया काय करत होत्या?
या प्रश्नाच उत्तर द्यायला बसलो तर लिस्ट फार होईल काकेसाहेब तरीही वानगी दाखल उदा सांगतो. मेरी क्युरी डॉ आनंदीबाई जोशी सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ मांसाहेब झाशीची राणी लक्ष्मीबाई सरोजिनी नायडू चंदा कोचर इंद्र नुई
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा