Skip to main content

उचक्या साठीमदत करा

लेखक जेपी यांनी बुधवार, 10/02/2016 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, लोकहो, मला सध्या उचक्या लागण्याचा त्रास चालु आहे. यावर उपायास्तव. 1) कोणी माझी आठवण काढत आहे का ?हे आठवणतील सगळ्यांन फोन करुन विचारल. 1)मुंडी वर करुन पण उच्क्या थांबल्या ना हीत.. ~ तर आता काय

वाचने 11134
प्रतिक्रिया 59

प्रतिक्रिया

माझ्या वडिलांना एकदा सलग दोन दिवस उचकी लागली होती डॉक्टरांनी दीर्घ श्वसन करायला सांगितलं त्यानंतर उचकी थांबली होती

In reply to by _मनश्री_

श्वास रोखुन धरा...रोखलेला श्वास सोडायला विसरु नका ! ;) बाकी याचा १४ तारखेशी काही संबंध आहे का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008

In reply to by _मनश्री_

दीर्घ श्वसन करुन पाहिल..फार श्वास कोंडेपर्यंत ..पण उचक्या थांबत नाहीत!.

In reply to by जेपी

जर कुठल्याच उपायाने उचकी थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जाणच श्रेयस्कर आहे

In reply to by _मनश्री_

जर कुठल्याच उपायाने उचकी थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जाणच श्रेयस्कर आहे आय होप उचकी लागण्याच काही गंभीर कारण नसाव डॉक्टरांकडे जाण्याची टाळाटाळ करू नये

In reply to by विजय पुरोहित

आता दंगा होणार धाग्यावर... दू दू जेपी व मनरंग... मला तिसरा ढकलला...

मुंडी वर करून उचक्या थांबल्या नाहीत,?? मग इतरही बरेच अवयव आहेत ते वर करून बघा नक्की फरक पडेल. दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः तर तुमची आठवण काढत नाही आहात ना?याची खात्री करून घ्या.

सर्वांचे आभार!. आताच 4-5 विलायची(ईलायची) तोंडात टाकुन चघळ्यावर उचक्या थांबल्या.. संपादक धागा काढला तर बरे होईल.. उपाया साठी सर्वांचे आभार

In reply to by जेपी

वेलदोडे पण शीतल आणि मूत्रल आहेत. तुम्हाला उष्णता, आम्लपित्त झालेय. खाली मी दिलेले उपाय पण अनुसरा...

रोज रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण एक चमचा कोमट पाण्यातून घ्या. शरीरातील टाॅक्सिन्स बाहेर काढायचा उत्तम उपाय. सध्या युनायटेड फार्मसी, पुणे हे सर्वात शुद्ध त्रिफळा बनवतात. रोज काळे मनुके खात जा... आम्लपित्त कमी होईल... सकाळी उठल्यावर रात्रभर भिजवलेल्या चमचाभर हिरव्या धण्यांचे पाणी ग्लासभर प्या... अंगातली उष्णता कमी होईल...

खडी साखर खाऊन बघा.... अवांतर ....मानसिक धक्का बसवून घ्या.... सगळं बंद होईल !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

मामलेदारबुवा जबर सेन्स ऑफ ह्यूमर... अगदी निरागस असतो तुमचा विनोद... म्हणून तर फार आवडतो...

In reply to by माम्लेदारचा पन्खा

खडीसाखरेवरुण ती प्रसिद्ध आर्या आठवली.

In reply to by भिकापाटील

स्वस्त्री घरात नसता कण्डु शमनार्थ रण्डिरा खावी | तीही घरात नसता स्वहस्ते चिबुल्ली दाबावी. रण्डिरा - साखर चिबुल्ली= कण्ठाचा उंचवटा- पडजीभ कण्डु = खोकला -दिलीप बिरुटे

In reply to by माम्लेदारचा पन्खा

मानसिक धक्का बसवून घ्या यावरुन जुन्या पिच्चरांमधले याददाश्त खो जाने पर सांगितल्या जाणारा जालिम उपाय आठवला. 'इन्हे उसी हादसे से फिर से गुजरना होगा, शायद इनकी याददाश्त वापस आ जाये.'

In reply to by माम्लेदारचा पन्खा

बहुधा जेपीची संपादकपदी नियुक्ती झाल्यास त्याला मानसिक धक्का बसेल =)) .

मलाही वरचेवर उचक्यांनचा त्रास होतो, यावर रामबाण उपाय म्हणजे , उभे राहचे,पाणी तोंडात भरुन घ्यायचे, कंबरेत पुर्ण वाकायचे व तोंड जमिनिच्या दिशेनेकरुन पाणि गिळायचे.उचकी थांबली नाही तर् प्रोसिजर रिपीट करायची.

In reply to by काकासाहेब केंजळे

छ्या! असं थोडी असतं काका. कायतरी अमेरिकन-युरोपियन उचकीवाद सांगा ज्यामुले जेपीला अशी फसलेल्या उचकीसारखी उचकी येतेय. दोन्तीन संशोधनं जोडा. कसं वजन आलं पायजेल प्रतिसादात.

धागा विनोदासाठी काढलेला नाही असे गृहित धरून उपाय सांगतो. उचक्या अजिबात थांबत नसतील तर एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या. त्यात नाक पूर्णपणे जाईल अशा तर्‍हेने नाकाभोवती धरून ठेवा. पिशवीच्या आतील हवा बाहेर जाऊ शकणार नाही व बाहेरील हवा आत येऊ शकणार नाही अशा पद्धतीने पिशवी नाकाभोवती हाताने दाबून धरावी. नंतर पिशवीतच नाकाने जोरजोरात दीर्घ श्वास घ्या. पिशवीतील हवा आतबाहेर जाऊ शकत नसल्याने पिशवितील प्राणवायू कमी होऊ लागतो व पिशवीत कर्बवायू वाढू लागतो. १०-१२ दीर्घ श्वासानंतर गुदमरल्यासारखे होऊ लागते. शक्य तेवढा वेळ ही क्रिया सुरू ठेवा. श्वास घेणे अगदीच अशक्य होईल तेव्हा पिशवी थोडी मोकळी करून पिशवीत थोडी बाहेरची हवा येऊ द्या व नंतर परत हीच क्रिया करा. साधारणपणे १-२ वेळा असे केल्यावर उचकी पूर्ण थांबते. दुसरा काहिसा संथ उपाय म्हणजे डोक्यावरून जाड पांघरूण घेऊन झोपा. काही वेळाने पांघरूणाच्या आत प्राणवायू कमी होऊन कर्बवायू वाढतो व गुदमरल्यासारखे वाटू लागते व काही वेळाने उचकी थांबते. तरीसुद्धा उचही थांबत नसल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या.

In reply to by श्रीगुरुजी

ह्या उपायातले लॉजिक काय? (श्रीगुरुजी तुम्हाला माहीतीय मी तर सिरीयसली प्रश्न विचारणारा आयडी आहे सो धिस इज नो चेष्टा हं)

In reply to by अभ्या..

हा एका डॉक्टरांनीच सांगितलेला उपाय आहे. यामागचे नक्की लॉजिक डॉक्टरच सांगू शकतील. श्वास रोखून धरणे हा उचक्या थांबविण्याचा एक उपाय असतो. म्हणजे शरीराला प्राणवायूचा पुरवठा तोडणे हे त्यामागचे लॉजिक असावे. मला डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायात सुद्धा प्राणवायूचा पुरवठा कमी होऊ लागते व त्यामुळे उचकी थांबते. परंतु नक्की लॉजिक एखादा डॉक्टरच सांगू शकेल.

माझा एक मित्र इस्रायलमधे असतो. सत्तर हजार रुपये लागतील इस्रायलहून औषध आणायला. सांगू का त्याला? A

तरी वाटलंच होतं मला जेपींची उचकी थांबून तीन तास उलटले तरी प्रतिक्रिया काय बंद होईनात! ;) आता घ्या म्हणावं- काढा अजुन धागा उचकीचा... ;) ;)

In reply to by रानडेंचा ओंकार

मग खोकला येईल असं काहीतरी करायचं. उदा. बसस्टॉपला जाऊन उभे राहणे. तिथे आपोआप खोकला येईलच. मग उचकीला लागायचा कंटाळा येईल. मग ती तुमचा नाद सोडून देईल. अर्थात हा उपाय गालांसाठी अंमळ रिस्की आहे. स्वजबाबदारीवर करणे.

कुणीतरी अचानक जाऊन जोरात ओरडा जेपी समोर.. मग तो दचकेल.. मग उचक्या थांबतील..! पुढल्या वेळेसाठी सांगुन ठेवलाय उपाय!

50 पूर्ण झाल्याबद्दल जेपी यांचा सत्कार खडीसाखर, विलायची, त्रिफळा चूर्ण पुडी देऊन करण्यात येत आहे.

खफ युग प्रवर्तक्,जिल्बी धाग्यांना घाम फोडणारे, सन्माननीय जेपी यांचा धाग्याला ५० टिचक्या माफ करा उचक्या आल्याबद्दल एक "मला लागली कुणाची उचकी " ही अस्सल गाण्याची सीडी,असोल्या नारळ आणि २१ सुपार्यांचे पाकीट देऊन सत्कार करण्यात येत आहे. तात्पुरता सचिव जेपी सत्कार समीती आणि अखिल मिपा हातासरशी सत्कार संघ, अभ्या मिप्त्र परीवार यांचा संयुक्त उपक्रम

In reply to by जेपी

हो ना. काल रात्री मला पण उचक्या सुरु झाल्या. उपाय शोधायला म्हणून हा धागा उघडला. वाचता-वाचता हास्याच्या तुषारात, उचक्या कधी थांबल्या ते कळले पण नाही. थोडक्यात काय? तर, उचक्या लागल्या की आधी हा धागा उघडायचा.