नमस्कार,
लोकहो,
मला सध्या उचक्या लागण्याचा त्रास चालु आहे.
यावर उपायास्तव.
1) कोणी माझी आठवण काढत आहे का ?हे आठवणतील सगळ्यांन फोन करुन विचारल.
1)मुंडी वर करुन पण उच्क्या थांबल्या ना हीत..
~ तर आता काय
वाचने
11231
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागा उडला तरी काय हरकत नै पण
धागा उडला तरी काय हरकत नै पण उचक्या थांबणे महत्वाते!!
..
आणी मी पयला!!
जातो का काय ? येर्वाळीच...
In reply to धागा उडला तरी काय हरकत नै पण by जेपी
;)
माझ्या वडिलांना एकदा सलग दोन
माझ्या वडिलांना एकदा सलग दोन दिवस उचकी लागली होती
डॉक्टरांनी दीर्घ श्वसन करायला सांगितलं त्यानंतर उचकी थांबली होती
हा विनोदी धागा आहे का ?
In reply to माझ्या वडिलांना एकदा सलग दोन by _मनश्री_
हा विनोदी धागा आहे का ?

विनोदी धागा नाही..
In reply to हा विनोदी धागा आहे का ? by _मनश्री_
विनोदी धागा नाही..
पारंपारीक उपाय करुन पाहिले पण फायदा नाही!.
पारंपारीक काय. ते लिवा की...
In reply to विनोदी धागा नाही.. by जेपी
पारंपारीक काय. ते लिवा की...
श्वास रोखुन धरा...रोखलेला
In reply to माझ्या वडिलांना एकदा सलग दोन by _मनश्री_
श्वास रोखुन धरा...रोखलेला श्वास सोडायला विसरु नका ! ;)
बाकी याचा १४ तारखेशी काही संबंध आहे का ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008
दीर्घ श्वसन करुन पाहिल..फार
In reply to माझ्या वडिलांना एकदा सलग दोन by _मनश्री_
दीर्घ श्वसन करुन पाहिल..फार श्वास कोंडेपर्यंत ..पण उचक्या थांबत नाहीत!.
जर कुठल्याच उपायाने उचकी
In reply to दीर्घ श्वसन करुन पाहिल..फार by जेपी
जर कुठल्याच उपायाने उचकी थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जाणच श्रेयस्कर आहे
जर कुठल्याच उपायाने उचकी
In reply to जर कुठल्याच उपायाने उचकी by _मनश्री_
जर कुठल्याच उपायाने उचकी थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जाणच श्रेयस्कर आहे
आय होप उचकी लागण्याच काही गंभीर कारण नसाव डॉक्टरांकडे जाण्याची टाळाटाळ करू नये
कदाचित आम्लपित्त असेल?
कदाचित आम्लपित्त असेल?
आता दंगा होणार धाग्यावर...
In reply to कदाचित आम्लपित्त असेल? by विजय पुरोहित
आता दंगा होणार धाग्यावर...
दू दू जेपी व मनरंग...
मला तिसरा ढकलला...
तारक मेहता चा एक छान एपिसोड होता ह्यावर
तारक मेहता चा एक छान एपिसोड होता ह्यावर त्यामध्ये उपाय सुद्धा एक से एक होते ;)
गंभीर विषय.
मुंडी वर करून उचक्या थांबल्या नाहीत,??
मग इतरही बरेच अवयव आहेत ते वर करून बघा नक्की फरक पडेल.
दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः तर तुमची आठवण काढत नाही आहात ना?याची खात्री करून घ्या.
शाळा कॉलेजात काही प्रकरण
शाळा कॉलेजात काही प्रकरण वेगैरे?
नाही म्हणजे ते valentine का काय ते जवळ आलाय न...
खुर्चीवर बसा व एका झटक्यात
खुर्चीवर बसा व एका झटक्यात उभा रहा. सर्वात उत्तम उपाय....
सर्वांचे आभार!.
सर्वांचे आभार!.
आताच 4-5 विलायची(ईलायची) तोंडात टाकुन चघळ्यावर उचक्या थांबल्या..
संपादक धागा काढला तर बरे होईल..
उपाया साठी सर्वांचे आभार
वेलदोडे पण शीतल आणि मूत्रल
In reply to सर्वांचे आभार!. by जेपी
वेलदोडे पण शीतल आणि मूत्रल आहेत. तुम्हाला उष्णता, आम्लपित्त झालेय. खाली मी दिलेले उपाय पण अनुसरा...
रोज रात्री झोपताना त्रिफळा
रोज रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण एक चमचा कोमट पाण्यातून घ्या. शरीरातील टाॅक्सिन्स बाहेर काढायचा उत्तम उपाय. सध्या युनायटेड फार्मसी, पुणे हे सर्वात शुद्ध त्रिफळा बनवतात.
रोज काळे मनुके खात जा... आम्लपित्त कमी होईल...
सकाळी उठल्यावर रात्रभर भिजवलेल्या चमचाभर हिरव्या धण्यांचे पाणी ग्लासभर प्या...
अंगातली उष्णता कमी होईल...
लिहिताना उक् उक् असे न लिहिल्याने शंकेला वाव आहे...
खडी साखर खाऊन बघा....
अवांतर ....मानसिक धक्का बसवून घ्या.... सगळं बंद होईल !
मामलेदारबुवा जबर सेन्स ऑफ
In reply to लिहिताना उक् उक् असे न लिहिल्याने शंकेला वाव आहे... by माम्लेदारचा पन्खा
मामलेदारबुवा जबर सेन्स ऑफ ह्यूमर...
अगदी निरागस असतो तुमचा विनोद...
म्हणून तर फार आवडतो...
खडीसाखरेवरुण ती प्रसिद्ध
In reply to लिहिताना उक् उक् असे न लिहिल्याने शंकेला वाव आहे... by माम्लेदारचा पन्खा
खडीसाखरेवरुण ती प्रसिद्ध आर्या आठवली.
प्रचेतस
In reply to खडीसाखरेवरुण ती प्रसिद्ध by प्रचेतस
"स्वहस्तेच दाबावी बुल्ली" का
काय हे असं :(
In reply to प्रचेतस by भिकापाटील
स्वस्त्री घरात नसता कण्डु शमनार्थ रण्डिरा खावी | तीही घरात नसता स्वहस्ते चिबुल्ली दाबावी.
रण्डिरा - साखर
चिबुल्ली= कण्ठाचा उंचवटा- पडजीभ
कण्डु = खोकला
-दिलीप बिरुटे
=))
In reply to काय हे असं :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
काय?
In reply to काय हे असं :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय?
रण्ड.... नको ते आपलं साखरंच बरं वाटतंय!
अहो....तो शब्द वेगळा आहे हो...
In reply to प्रचेतस by भिकापाटील
तुम्ही विविक्षित शब्द वापरलात !
मानसिक धक्का बसवून घ्या
In reply to लिहिताना उक् उक् असे न लिहिल्याने शंकेला वाव आहे... by माम्लेदारचा पन्खा
मानसिक धक्का बसवून घ्या
यावरुन जुन्या पिच्चरांमधले याददाश्त खो जाने पर सांगितल्या जाणारा जालिम उपाय आठवला. 'इन्हे उसी हादसे से फिर से गुजरना होगा, शायद इनकी याददाश्त वापस आ जाये.'
मानसिक धक्का
In reply to लिहिताना उक् उक् असे न लिहिल्याने शंकेला वाव आहे... by माम्लेदारचा पन्खा
बहुधा जेपीची संपादकपदी नियुक्ती झाल्यास त्याला मानसिक धक्का बसेल =)) .
जुना संत आठवण काढत असेल
जुना संत आठवण काढत असेल
=))
=)) =)) =)) तुझा फेसबुक अकाउंट बंद कशाला केलास?
मलाही वरचेवर उचक्यांनचा त्रास
मलाही वरचेवर उचक्यांनचा त्रास होतो, यावर रामबाण उपाय म्हणजे , उभे राहचे,पाणी तोंडात भरुन घ्यायचे, कंबरेत पुर्ण वाकायचे व तोंड जमिनिच्या दिशेनेकरुन पाणि गिळायचे.उचकी थांबली नाही तर् प्रोसिजर रिपीट करायची.
छ्या! असं थोडी असतं काका.
In reply to मलाही वरचेवर उचक्यांनचा त्रास by काकासाहेब केंजळे
छ्या! असं थोडी असतं काका. कायतरी अमेरिकन-युरोपियन उचकीवाद सांगा ज्यामुले जेपीला अशी फसलेल्या उचकीसारखी उचकी येतेय. दोन्तीन संशोधनं जोडा. कसं वजन आलं पायजेल प्रतिसादात.
धागा विनोदासाठी काढलेला नाही
धागा विनोदासाठी काढलेला नाही असे गृहित धरून उपाय सांगतो.
उचक्या अजिबात थांबत नसतील तर एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या. त्यात नाक पूर्णपणे जाईल अशा तर्हेने नाकाभोवती धरून ठेवा. पिशवीच्या आतील हवा बाहेर जाऊ शकणार नाही व बाहेरील हवा आत येऊ शकणार नाही अशा पद्धतीने पिशवी नाकाभोवती हाताने दाबून धरावी. नंतर पिशवीतच नाकाने जोरजोरात दीर्घ श्वास घ्या. पिशवीतील हवा आतबाहेर जाऊ शकत नसल्याने पिशवितील प्राणवायू कमी होऊ लागतो व पिशवीत कर्बवायू वाढू लागतो. १०-१२ दीर्घ श्वासानंतर गुदमरल्यासारखे होऊ लागते. शक्य तेवढा वेळ ही क्रिया सुरू ठेवा. श्वास घेणे अगदीच अशक्य होईल तेव्हा पिशवी थोडी मोकळी करून पिशवीत थोडी बाहेरची हवा येऊ द्या व नंतर परत हीच क्रिया करा. साधारणपणे १-२ वेळा असे केल्यावर उचकी पूर्ण थांबते.
दुसरा काहिसा संथ उपाय म्हणजे डोक्यावरून जाड पांघरूण घेऊन झोपा. काही वेळाने पांघरूणाच्या आत प्राणवायू कमी होऊन कर्बवायू वाढतो व गुदमरल्यासारखे वाटू लागते व काही वेळाने उचकी थांबते.
तरीसुद्धा उचही थांबत नसल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या.
ह्या उपायातले लॉजिक काय?
In reply to धागा विनोदासाठी काढलेला नाही by श्रीगुरुजी
ह्या उपायातले लॉजिक काय?
(श्रीगुरुजी तुम्हाला माहीतीय मी तर सिरीयसली प्रश्न विचारणारा आयडी आहे सो धिस इज नो चेष्टा हं)
हा एका डॉक्टरांनीच सांगितलेला
In reply to ह्या उपायातले लॉजिक काय? by अभ्या..
हा एका डॉक्टरांनीच सांगितलेला उपाय आहे. यामागचे नक्की लॉजिक डॉक्टरच सांगू शकतील. श्वास रोखून धरणे हा उचक्या थांबविण्याचा एक उपाय असतो. म्हणजे शरीराला प्राणवायूचा पुरवठा तोडणे हे त्यामागचे लॉजिक असावे. मला डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायात सुद्धा प्राणवायूचा पुरवठा कमी होऊ लागते व त्यामुळे उचकी थांबते. परंतु नक्की लॉजिक एखादा डॉक्टरच सांगू शकेल.
उचक्या ना?
माझा एक मित्र इस्रायलमधे असतो. सत्तर हजार रुपये लागतील इस्रायलहून औषध आणायला.
सांगू का त्याला?
अहो पण ते ७० रुपये वारले ना?
In reply to उचक्या ना? by गवि
अहो पण ते ७० रुपये वारले ना?
माने हा शुद्ध हलकटपणा आहे.
चिमणचा!
In reply to अहो पण ते ७० रुपये वारले ना? by कॅप्टन जॅक स्पॅरो
चिमणचा!
खी खी खी..!!
In reply to अहो पण ते ७० रुपये वारले ना? by कॅप्टन जॅक स्पॅरो
खी खी खी..!!
हा हा हा..
तरी वाटलंच होतं मला
जेपींची उचकी थांबून तीन तास उलटले तरी प्रतिक्रिया काय बंद होईनात! ;)
आता घ्या म्हणावं- काढा अजुन धागा उचकीचा... ;) ;)
आजच केलेला उपाय -
आजच केलेला उपाय -
खोकल्यावरचं औषध असतेच घरात. ते दहा एमएल इतकं घ्यायचं. उचकी बंद होते.
आजच केलेला उपाय -
आजच केलेला उपाय -
खोकल्यावरचं औषध असतेच घरात. ते दहा एमएल इतकं घ्यायचं. उचकी बंद होते.
द्विरुक्तीबद्दल मोबाइल
In reply to आजच केलेला उपाय - by एस
द्विरुक्तीबद्दल मोबाइल क्षमस्व आहे.
उचकीच कारणच ते असेल तर?
In reply to आजच केलेला उपाय - by एस
समजा उचकीच कारणच तेच औषध असेल तर?
मग खोकला येईल असं काहीतरी
In reply to उचकीच कारणच ते असेल तर? by रानडेंचा ओंकार
मग खोकला येईल असं काहीतरी करायचं. उदा. बसस्टॉपला जाऊन उभे राहणे. तिथे आपोआप खोकला येईलच. मग उचकीला लागायचा कंटाळा येईल. मग ती तुमचा नाद सोडून देईल. अर्थात हा उपाय गालांसाठी अंमळ रिस्की आहे. स्वजबाबदारीवर करणे.
उचक्या
थांबल्या का?
जेपीच्या उचक्या कधीच थांबल्या
In reply to उचक्या by सुनील
आता प्रतिसाद चालू आहेत.
लोकांना
In reply to जेपीच्या उचक्या कधीच थांबल्या by मुक्त विहारि
उगा सौंशय आहे हा धागा उचकवायला आहे काय ते ?
कुणीतरी अचानक जाऊन जोरात ओरडा
कुणीतरी अचानक जाऊन जोरात ओरडा जेपी समोर.. मग तो दचकेल.. मग उचक्या थांबतील..!
पुढल्या वेळेसाठी सांगुन ठेवलाय उपाय!
"मला लागली कुणाची उचकी" हे
"मला लागली कुणाची उचकी" हे गाणे शनिवार वाड्यावर जोरजोरात म्हणणे .उचकी बंद होण्याचा रामबाण उपाय .
50 पूर्ण झाल्याबद्दल जेपी
50 पूर्ण झाल्याबद्दल जेपी यांचा सत्कार खडीसाखर, विलायची, त्रिफळा चूर्ण पुडी देऊन करण्यात येत आहे.
सत्कारमुर्ती
खफ युग प्रवर्तक्,जिल्बी धाग्यांना घाम फोडणारे, सन्माननीय जेपी यांचा धाग्याला ५० टिचक्या माफ करा उचक्या आल्याबद्दल एक "मला लागली कुणाची उचकी " ही अस्सल गाण्याची सीडी,असोल्या नारळ आणि २१ सुपार्यांचे पाकीट देऊन सत्कार करण्यात येत आहे.
तात्पुरता सचिव
जेपी सत्कार समीती आणि अखिल मिपा हातासरशी सत्कार संघ, अभ्या मिप्त्र परीवार यांचा संयुक्त उपक्रम
दोनदा सत्कारा आभार..
In reply to सत्कारमुर्ती by नाखु
दोनदा सत्कारा आभार..
धागा माहितीपुर्ण झाला आहे.
धागा माहितीपुर्ण झाला आहे.
In reply to दोनदा सत्कारा आभार.. by जेपी
हो ना.
काल रात्री मला पण उचक्या सुरु झाल्या.
उपाय शोधायला म्हणून हा धागा उघडला.
वाचता-वाचता हास्याच्या तुषारात, उचक्या कधी थांबल्या ते कळले पण नाही.
थोडक्यात काय? तर, उचक्या लागल्या की आधी हा धागा उघडायचा.
चक्क बीयर सोडून जेपीचा धागा??
In reply to धागा माहितीपुर्ण झाला आहे. by मुक्त विहारि
चक्क बीयर सोडून जेपीचा धागा???
काल गुरुवार असेल..
In reply to चक्क बीयर सोडून जेपीचा धागा?? by टवाळ कार्टा
काल गुरुवार असेल..
गुरुवार आणि
In reply to काल गुरुवार असेल.. by जेपी
गणेश जयंती...
दत्तगुरुंच्या बरोबर गणपती असल्यानेच, असे झाले असेल.
आयला
जेप्स,
उचक्या थांबल्या का ?