Skip to main content

उपाय सुचवाल ?

लेखक उगा काहितरीच यांनी शुक्रवार, 11/03/2011 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
मी सरकारी निवासस्थानात राहतो. (क्वॉर्टर) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो. रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो. त्यामुळे गाडीच्या सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहिच उपयोग नाही. त्या बोक्याला मारायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब) यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 54313
प्रतिक्रिया 154

प्रतिक्रिया

टक्या-त्या बोक्याच्या मालकाला एखादी मुलगी आहे का ?असल्यास सुत जुळवा .problem slove. चिमणराव/काळा पहाड-बोक्याला गोळी घाला. श्रीरंग_जोशी-बोक्याच्या मालकाला मी मनपा कडे तक्रार करेन अशी विनंती करा.

उकाकाका उपाय ब्रेच आहेत त्यातले २-४ सांगतो. १. गाडी घरात लावा आणि तुम्ही पार्किंग मधे झोपत चला. (बोका माझ्या ढेरीवर झोपतो वगैरे धागा काढाल म्हणुन आधीचं काठी घेउन झोपा. २. ह्या धाग्याची आणि ह्यावरच्या प्रतिसादांची एक एन्लार्ज्ड प्रिंटाउट काढा आणि गाडीच्या सीटला पिन करुन ठेवा. बोका १०१% येत नाही बघा. (दुसर्‍या दिवशी गाडी चालु करायच्या आधी काढायला विसरु नका नाहीतर मुळव्याधीवर उपाय सुचवा वा तत्सम धागा काढायची वेळ येउ शकते) ३. बोक्याच्या मालकाला पोत्यात घालुन गावाबाहेर सोडुन या नैतर इथे खातं उघडायला भाग पाडा, उरलेलं काम आम्ही कंत्राटावर पुर्ण करु. ४. गाडीवरुन २४*७ हलु नका.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

उकाकाका
पाया पडतो मालक काका वगैरे म्हणू नका. तिशी गाठायलाही अजून ५-६ वर्ष बाकीच आहेत राव ! उका , उक्या , आन्न्या , काय वाटेल ते म्हणा पण काका म्हणु नका .

In reply to by उगा काहितरीच

च्यामारी उक्या, लका वयाच्या विसाव्या वर्शी घोरमेंट क्वार्टर आन होंडा ट्विस्टर देणारी कंची नोकरी मिळवलीस तू? असूदे. पिताश्रीसुध्दा असू शकतेत सरकारात म्हणा. ;) एनीवे बोक्याला सरळ इचार तू नास्तिक हायेस का आस्तिक, नास्तिक ला म्यांव केला की मांत्रिक नायतर तुडतुडीकडं सोड. आस्तिक म्यांव केला की हायेतच यनावाला. बोका शाणा बनून गप्प जरी बसला तरी डांगेआण्णाचा पत्ता दे. अंगावर आला तर पिराताई हायेतच. . . फिनीस.

वेड्या सारखा ह्सतोय यार ऑफिस्मध्ये.. हा तुमचा प्रतिसाद मात्र सगळ्या प्रतिसादात जबरा आहे :))

In reply to by चेक आणि मेट

वर्षभरात आणखी एका धाग्याची भर पडेल ( अत्ताच तो धागा ताजा आहे). बोका-मांजर (पाळत) नसलेला पण सावध नाखु

कहर बोका.. त्याहून कहर प्रतिसाद !!