✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

उपाय सुचवाल ?

उ
उगा काहितरीच यांनी
Fri, 03/11/2011 - 16:26  ·  लेख
लेख
मी सरकारी निवासस्थानात राहतो. (क्वॉर्टर) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो. रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो. त्यामुळे गाडीच्या सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहिच उपयोग नाही. त्या बोक्याला मारायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब) यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
राहणी
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
सल्ला
मदत

प्रतिक्रिया द्या
53880 वाचन

💬 प्रतिसाद (154)

प्रतिक्रिया

बोक्यावरती नीर्व्याज प्रेम करा

आत्मशून्य
Fri, 03/11/2011 - 23:13 नवीन
त्याची परफेड तो तूम्हाला त्रास न देण्यात नक्की करेल
  • Log in or register to post comments

वैदाला हजर करा. झिरो मिन्टात

भीमाईचा पिपळ्या.
Fri, 03/11/2011 - 23:25 नवीन
वैदाला हजर करा. झिरो मिन्टात बोका पिंजर्‍यात. तुम्ही तुमच्या घरात. हाय का नाही बेस आयड्या.
  • Log in or register to post comments

'शुक शुक मन्या जातोस का नाही'

५० फक्त
Sat, 03/12/2011 - 00:11 नवीन
'शुक शुक मन्या जातोस का नाही' हे भयाण गाणं त्या बोक्याला ऐकवायची सोय करा. जमलं तर व्हिडोची पण सोय करा.
  • Log in or register to post comments

व्हिडोची पण सोय करा.

कुंदन
Sat, 03/12/2011 - 00:26 नवीन
व्हिडोची लिंक मदनबाण देईल. त्याने न दिल्यास सहजरावांशी संपर्क साधावा. सहजरावांचा नंबर ईंट्याकडे मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हॅ हॅ हॅ

शिल्पा ब
Sat, 03/12/2011 - 00:27 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

खात्रिशिर इलाज

वेदनयन
Sat, 03/12/2011 - 01:20 नवीन
१. कव्हरवर टार्‍याचा फोटो छापा २. एक सिडी प्लेयर घ्या. चुचुच्या अस्सल मराठीत कोदांचा किंवा युयुत्सुंचा लेख रेकार्ड करुन गाडीजवळ रात्रभर वाजवा. ३. इथे फुकट नाडी बघुन मिळेल असा बोर्ड लावा अजुनही फरक पडत नसेल तर मास्तरांना भेटा...
  • Log in or register to post comments

कव्हरवर टार्‍याचा फोटो छापा

वपाडाव
Mon, 03/14/2011 - 13:48 नवीन
कव्हरवर टार्‍याचा फोटो छापा
कहरावर कहर आहेत सगळी मिपाकर मंडळी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदनयन

नि३.--->>आणि समजा जर कव्हरला

अरुण मनोहर
Sat, 03/12/2011 - 02:07 नवीन
नि३.--->>आणि समजा जर कव्हरला कुलूप असेल तर बोका कसा आत घुसु शकतो??<< उगा काहीतरी च, पाहिले कव्हर घालून चोरी थांबवायला टाकले कुलूप लावून खादाडमाऊला आपल्या बरोबर बोलावून उपाशी बोका घुसला आत कव्हर खालून
  • Log in or register to post comments

मस्त..

योगी९००
Mon, 03/14/2011 - 16:17 नवीन
मस्त हॅ हॅ हॅ.. आयला माझे जुने नाव का ओढले आहे यात? मी तर उपयोग होईल असा प्रतिसाद दिला आहे.. (खालती पहा)...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

फक्त मनोरंजन म्हणून याकडे

अरुण मनोहर
Mon, 03/14/2011 - 18:42 नवीन
फक्त मनोरंजन म्हणून याकडे पहा! बोक्याशी संबंधीत मिपावरच्या आय डींना एकत्र आणले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

लीमाउजेट उरली ना मग मागे....

वपाडाव
Wed, 03/16/2011 - 15:36 नवीन
लीमाउजेट उरली ना मग मागे.... तिचं काय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

aho boka bika kay

गुंड्या बावळा
Sat, 03/12/2011 - 09:56 नवीन
aho boka bika kay nay..,. hyanchyakad honda chi 'twister' gadi hay he te sangayla lagle, an tumhi kas kay bolaylayt. saral ghas tondat takusa vatat nay mhanun asa lambun takaylet..
  • Log in or register to post comments

खात्रीचा उपाय

योगी९००
Sat, 03/12/2011 - 12:51 नवीन
जोक्स अपार्ट.. आम्हालाही हाच प्रोब्लेम होता..नव्या स्कुटीच्या सीटवर बोका यायचा.. शेवटी उपाय म्हणून रोज सीटवर एक पेपर ठेवायचो आणि त्यावर मोठ्ठा दगड ठेवायचो. त्यामुळे बोका यायचा बंद झाला.
  • Log in or register to post comments

आपणास मासलेवाईक प्रतिक्रिया

निनाद मुक्काम …
Sat, 03/12/2011 - 16:25 नवीन
आपणास मासलेवाईक प्रतिक्रिया हवी आहे . तर .. बोक्याला गोणपाटात घाला . हत्या करू नका ( अहिंसा परमो धर्म ) त्याला दूरवर सोडून येऊ नका. ( एक तर तो परत येईन किंवा दुसऱ्या कोणाला त्रास देईन .) त्याला जंगलात सोडा . बिबळा किंवा एखादा हिंस्त्र प्राणी आपली क्षुधा शांत करतील . ह्याने तुम्हास पाप न लागता पुण्य लागेन बिबळ्याचे कुटुंबीय तुम्हाला दुवा देतील (त्यांना भक्ष्याच्या अभावी मनुष्य वस्तीत जावे लागणार नाही .) बोका आपला देह कारणी लागला म्हणून दधि ऋषींच्या पंक्तीत जाऊन बसेल . तुम्ही निसर्ग चक्र सुरळीत चालवायला खारीचा.... नव्हे नव्हे बोक्याचा वाटा उचलला म्हणून पंचमहाभूते तुमच्यावर प्रसन्न राहतील . बोका आख्यान संपले की शहरातील भटकी कुत्री ...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

धन्यवाद!!!

उगा काहितरीच
Sat, 03/12/2011 - 18:39 नवीन
धन्यवाद बुवा ९० पैकी १ कामाला आलेला उपाय :) वाईट नाही !!( पेपर ऐवजी ताडपत्री घालतोय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

सध्या असाच एक बोका भारी

सस्नेह
Tue, 02/28/2017 - 15:29 नवीन
सध्या असाच एक बोका भारी पिडतो आहे. प्लेजरच्या सीटची चाळणी करून ठेवलीय त्यानं . प्रॉब्लेम असा की मला स्कूटरचं सेन्ट्रल स्टँड लावता येत नाही आणि साईड स्टँड लावल्यावर गाडीची सीट तिरकी होते त्यामुळे मोठा दगड त्यावर बसत नाही... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

औषध

इंटरनेटस्नेही
Mon, 03/14/2011 - 01:02 नवीन
तुम्ही माझ्याकडे या.. मी तुम्हाला एक औषध देतो.. गंमत म्हणजे हे औषध एका बाटलीतुन दिवसातुन तीन वेळा घ्यायचे नसुन, एक बाटली एकदा असं दिवसातुन तीन वेळा करायच आहे. हे औषध १:३ या प्रमाणातुन पाण्यातुन घ्यायचे आहे. एका वेळेस १८० मिली इतके हे औषध पिले पाहिजे. नंतर सुमारे तासाभराने तुम्ही शेजार्‍यांशी चर्चा करायला जा. शक्यतो हातात एक छोटी काठी अथवा हातोडी असु द्या... त्यांनी जरा जरी टोलवाटोलवी केली की हातातली काठी वापरायची. 'विशेष' अवयांवर वार केलात तर उत्तम! आणि 'अरे ला कारे' करणं मस्ट! लवकरच तो बोका गायब होईल, आणि कदाचित शेजारी सुद्धा! - डॉ. इंट्या माहितीगार, युनिवर्सीटी ऑफ ड्रिंकॉलॉजी, स्टेट ऑफ बेवडा, युनायटेड स्टेट्स ऑफ अ‍ॅंटीक्वीटी. . . . विशेष सुचना: हा प्रतिसाद केवळ गंम्म्त म्हणुन वाचावा, अंमल करु नये. अन्यथा होणार्‍या परिणामांस मी जबाबदार राहणार नाही.
  • Log in or register to post comments

इतक्या कमी वेळात प्रतिसादांची

मृगनयनी
Mon, 03/14/2011 - 15:16 नवीन
इतक्या कमी वेळात प्रतिसादांची सेन्च्युरी गाठल्याबद्द्ल अभिनन्दन! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

मागच्या काही दिवसांपासुन

गणामास्तर
गुरुवार, 08/30/2012 - 18:16 नवीन
मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो.
आयला, काही लोक्स बोका बांधून ठेवतात की काय? बिबट्या बांधून फिरतात हे पाहिले होते. ;)
  • Log in or register to post comments

बोका

बरखा
गुरुवार, 10/11/2012 - 19:16 नवीन
मि एक उपाय सा॑गते.... या उपायाचि खात्रि देत नाहि,पण आम्च्याकडे एक कुत्रा पिसाळ्लेला रोज पार्किन्ग मधे येउन बसायचा आणि घाण करायचा, मग मझ्या बाबा॑नि एकदा डेटोल मिसळ्लेले पाणि त्याच्या बसायच्या जागेवर टाकले, त्या दिवसा पासुन तो कुत्रा आता तिथे दिसत नाहि. तुम्हि पण असे करुन बघु शकता.
  • Log in or register to post comments

बिचारा कुत्रा....

मोदक
Fri, 10/12/2012 - 01:07 नवीन
>>>मग मझ्या बाबा॑नि एकदा डेटोल मिसळ्लेले पाणि त्याच्या बसायच्या जागेवर टाकले कृपया या प्रोसेसची अधिक माहिती देता का..? अवांतर - बिचारा कुत्रा.... :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बरखा

हा हा हा.................. ह

निवेदिता-ताई
Fri, 10/12/2012 - 13:59 नवीन
हा हा हा.................. ह . ह. पु. वा. धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हा हा...

दादा कोंडके
Fri, 10/12/2012 - 14:21 नवीन
कुणी सांगावं तो बोका वैयक्तीक स्वच्छतेबाबतीत जागरूक असेल तर का प्रयोग केल्यावर 'शी' करून झाल्यावर रोज दारात येउन उभा राहील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बघा जमलं तर !!!

चेतन माने
Fri, 10/12/2012 - 14:06 नवीन
१) बहुतेक नव्या गाड्यांची सीट काढता येते, रोज रात्री ती घरातच घेऊन जा. २) तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांना बोक्याशी खेळायला सांगा, लहान मुलं बोक्याचा जीव गळ्यात आणतील. ३) कधी तो बोका दिसलाच तर चांगलीच एक पेकाटात लाथ हाणा! वाटत नाही परत येईल तो.
  • Log in or register to post comments

गायबलेले प्रतिसाद परत

किसन शिंदे
Fri, 10/12/2012 - 14:33 नवीन
गायबलेले प्रतिसाद परत आणण्यासाठी योग्य तो धागा वर काढला आहे. ;)
  • Log in or register to post comments

असंच गायबलेले बोके आणि मांजरी

५० फक्त
Fri, 10/12/2012 - 17:38 नवीन
असंच गायबलेले बोके आणि मांजरी परत आणण्यासाठी काय करता येईल ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

डेटोल मिसळ्लेले पाणि त्याच्या किबोर्द वर ताकूया?

मोदक
Sat, 10/13/2012 - 03:45 नवीन
डेटोल मिसळ्लेले पाणि त्याच्या किबोर्द वर ताकूया? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आतल्या गोटातल्या खबरीनुसार

इरसाल
Fri, 10/12/2012 - 17:57 नवीन
"उगा काहीतरीच" करायच म्हणुन लेखकाने काही प्रतिसाद्यांनी सुचविल्याप्रमाणे एक बोकीण आणुन काही रात्र तिला गाडीला बांधुन पाहीली. त्यामुळे बोक्याने गाडीवर बसणे बंद केले, पण नंतर मार्जारकुळ बोकाळल्याने आता इतक्या मांजरांचे करायचे काय असा प्रश्न असलेला धागा काढायच्या विचारात होते पण धोरण आणी मिपाचे उर्ध्वकरण आडवे आले.
  • Log in or register to post comments

=))

अद्द्या
Fri, 11/29/2013 - 12:49 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

हे काय आहे?!!!!

पिलीयन रायडर
Tue, 05/13/2014 - 18:17 नवीन
हे काय आहे?!!!! हसुन हसुन मेले... *lol* *ROFL*
  • Log in or register to post comments

हे बहुतेक जुने मिपा आणी

जेपी
Tue, 05/13/2014 - 18:28 नवीन
हे बहुतेक जुने मिपा आणी हरवलेले मिपाकर असतील.
  • Log in or register to post comments

अगगगगगगगगगगगग!!!! मोदकानी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/29/2015 - 06:56 नवीन
अगगगगगगगगगगगग!!!! मोदकानी लिंक दिली हसुन फुटलोय!!! उचला रे.
  • Log in or register to post comments

गाडी विकली असेल बहुतेक.

लालगरूड
Fri, 05/29/2015 - 07:12 नवीन
गाडी विकली असेल बहुतेक.
  • Log in or register to post comments

ह.ह.पु.झा.

नूतन सावंत
Fri, 05/29/2015 - 17:11 नवीन
ह.ह.पु.झा.
  • Log in or register to post comments

काय झालं ओ?

पैसा
Tue, 02/09/2016 - 17:05 नवीन
काय झालं ओ शेवट?
  • Log in or register to post comments

मधल्या काळात बरंच पाणी गेलं

उगा काहितरीच
Tue, 02/09/2016 - 17:50 नवीन
मधल्या काळात बरंच पाणी गेलं पुलाखालून. ते कुटुंब सरकारी निवासस्थान सोडून गेलं . आमचे पण घर झाले आम्ही पण सरकारी निवासस्थान सोडलं. मी आता पुण्यात असतो. पण अजूनही ती गाडी आहे माझ्याकडे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काय कहर धागा आहे हा ....

मीता
Tue, 02/09/2016 - 17:18 नवीन
काय कहर धागा आहे हा ....
  • Log in or register to post comments

+१

चांदणे संदीप
Tue, 02/09/2016 - 18:16 नवीन
+१ परत एकदा सगळे परतिसाद वाचून काढले.... लोल तर काही महालोल आहेत! =)) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता

मग मझ्या बाबा॑नि एकदा डेटोल

होबासराव
Tue, 02/09/2016 - 17:20 नवीन
मग मझ्या बाबा॑नि एकदा डेटोल मिसळ्लेले पाणि त्याच्या बसायच्या जागेवर टाकले पेट्रोल, झंडुबाम डेटॉल पेक्षा भारि उपाय आहेत..
  • Log in or register to post comments

आताच्या मिपाकरांची

जेपी
Tue, 02/09/2016 - 18:21 नवीन
प्रतिक्रीया(माफी मागुन) सुबोध खरे सर-मी नौदलात असताना मला असा त्रास झालता.मी त्या बोक्याला आणी त्याचा मालकाला समुद्रात फेकायची धमकी दिली.दोघे सरळ झाले.
  • Log in or register to post comments

टक्या-त्या बोक्याच्या मालकाला

जेपी
Tue, 02/09/2016 - 18:25 नवीन
टक्या-त्या बोक्याच्या मालकाला एखादी मुलगी आहे का ?असल्यास सुत जुळवा .problem slove. चिमणराव/काळा पहाड-बोक्याला गोळी घाला. श्रीरंग_जोशी-बोक्याच्या मालकाला मी मनपा कडे तक्रार करेन अशी विनंती करा.
  • Log in or register to post comments

मुवी-बोक्याला कट्याला आणा.

जेपी
Tue, 02/09/2016 - 18:32 नवीन
मुवी-बोक्याला कट्याला आणा. संदिप डांगे-मेगाबायटी प्रतिसाद. .. . . . . जेपी-मला संपादक करा.त्रास संपवु
  • Log in or register to post comments

हा हा हा

श्रीरंग_जोशी
Tue, 02/09/2016 - 21:26 नवीन
<जेपी> बोक्याला माझ्याकडे पाठवा, त्याला संन्यास घ्यायला शिकवतो.. </जेपी>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

उकाकाका उपाय ब्रेच आहेत

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/09/2016 - 22:12 नवीन
उकाकाका उपाय ब्रेच आहेत त्यातले २-४ सांगतो. १. गाडी घरात लावा आणि तुम्ही पार्किंग मधे झोपत चला. (बोका माझ्या ढेरीवर झोपतो वगैरे धागा काढाल म्हणुन आधीचं काठी घेउन झोपा. २. ह्या धाग्याची आणि ह्यावरच्या प्रतिसादांची एक एन्लार्ज्ड प्रिंटाउट काढा आणि गाडीच्या सीटला पिन करुन ठेवा. बोका १०१% येत नाही बघा. (दुसर्‍या दिवशी गाडी चालु करायच्या आधी काढायला विसरु नका नाहीतर मुळव्याधीवर उपाय सुचवा वा तत्सम धागा काढायची वेळ येउ शकते) ३. बोक्याच्या मालकाला पोत्यात घालुन गावाबाहेर सोडुन या नैतर इथे खातं उघडायला भाग पाडा, उरलेलं काम आम्ही कंत्राटावर पुर्ण करु. ४. गाडीवरुन २४*७ हलु नका.
  • Log in or register to post comments

उकाकाका

उगा काहितरीच
Tue, 02/09/2016 - 22:27 नवीन
उकाकाका
पाया पडतो मालक काका वगैरे म्हणू नका. तिशी गाठायलाही अजून ५-६ वर्ष बाकीच आहेत राव ! उका , उक्या , आन्न्या , काय वाटेल ते म्हणा पण काका म्हणु नका .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

गंमत करतोय =))

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/09/2016 - 22:29 नवीन
गंमत करतोय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

च्यामारी उक्या, लका वयाच्या

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 22:40 नवीन
च्यामारी उक्या, लका वयाच्या विसाव्या वर्शी घोरमेंट क्वार्टर आन होंडा ट्विस्टर देणारी कंची नोकरी मिळवलीस तू? असूदे. पिताश्रीसुध्दा असू शकतेत सरकारात म्हणा. ;) एनीवे बोक्याला सरळ इचार तू नास्तिक हायेस का आस्तिक, नास्तिक ला म्यांव केला की मांत्रिक नायतर तुडतुडीकडं सोड. आस्तिक म्यांव केला की हायेतच यनावाला. बोका शाणा बनून गप्प जरी बसला तरी डांगेआण्णाचा पत्ता दे. अंगावर आला तर पिराताई हायेतच. . . फिनीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

च्यामारी उक्या,

उगा काहितरीच
Wed, 02/10/2016 - 01:00 नवीन
च्यामारी उक्या,
हे असं बोललं की बरं वाटते बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चिमण

होबासराव
Tue, 02/09/2016 - 22:17 नवीन
वेड्या सारखा ह्सतोय यार ऑफिस्मध्ये.. हा तुमचा प्रतिसाद मात्र सगळ्या प्रतिसादात जबरा आहे :))
  • Log in or register to post comments

यावर एक रामबाण उपाय आहे,

चेक आणि मेट
Tue, 02/09/2016 - 23:03 नवीन
यावर एक रामबाण उपाय आहे, तुम्ही मांजरीण पाळा,बोका कंट्रोलमध्ये येईल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा