मित्रांनो!! तुमच्या सगळ्या शिव्या-शाप मंजुर पण माझ्या ह्या पापात जरा सहकार्य करा.
लवकरच आमच्या माजी विद्यार्थ्यांचा योगा कॅम्प होऊ घातलाय. कॅम्प उत्तर काही मनोरंजन कार्यक्रम आहेत त्यात मला 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे विडंबन सादर करायचं आहे.… काही यमक चालीत बसत नाहीयेत… वेळ कमी आहे म्हणून मिपादारी गाऱ्हाणं घालायला आलोय. कृपया मदत करावी.
काटा हालेना, काटा चालेना,
आम्ही खंत करी, काही केल्या खाली सरकेना.
पाहिल्या शिल्पाच्या सिडी,
म्हंटली तिजसवें गाणी,
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे.
गेलो प्रत्येक जिमच्या दारी,
हर्ष दरवळला मनी,
घामासवें गळाले अवसान रे.
चल ये रे, ये रे गड्या,
धावू जरा मारू बैठक्या,
पाया गोळे येवूनि, झालो हैराण रे,
हे पोटाचे अंगण,
आम्हां दिले आहे आंदण,
उणे करू आपण सारेजण रे.
योग करण्याचे किडे,
ह्यांची धाव आरोग्याकडे,
आपण करू फक्त पेयपान रे.
काटा हालेना, काटा चालेना
आम्ही खंत करी, काही केल्या खाली सरकेना
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2831
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
काटा हालेना, काटा डुलेना
परफेक्ट
In reply to काटा हालेना, काटा डुलेना by एस
हे पोटाचे अंगण ऐवजी हा पोटाचा
=))
In reply to हे पोटाचे अंगण ऐवजी हा पोटाचा by एस
परफेक्ट
In reply to हे पोटाचे अंगण ऐवजी हा पोटाचा by एस
एससाहेब अप्रतिम विडंबन कराल..
In reply to हे पोटाचे अंगण ऐवजी हा पोटाचा by एस
जोर लगाके!
२ ऱ्या कडव्यात एक करेक्शन केलंय
कुंथलीऐवजी तिंबली करा.
In reply to २ ऱ्या कडव्यात एक करेक्शन केलंय by बाजीप्रभू
मंजूर
In reply to कुंथलीऐवजी तिंबली करा. by एस
आम्ही खंत करी, काही केल्या
हे कसे वाटते बघा....
ॠतुजाचे डाएटचे सल्ले,शिप्लाचे
In reply to हे कसे वाटते बघा.... by ज्ञानोबाचे पैजार
शिप्लाचेयोगाचे हल्ले दमलो अस्था चॅनेल पाहुनी रे ऐवजी ॠतुजाचे डाएटचे सल्ले, शिल्पा चे योगाचे हल्ले दमलो अस्था चॅनेल पाहुनी रे असे वाचावे पैजारबुवा,एकदम मस्त…
In reply to हे कसे वाटते बघा.... by ज्ञानोबाचे पैजार