कसा आणू शब्दामध्ये
सुगंधी दर्वळ.....
"आई " म्हणजे वात्सल्याची
श्रावणी हिर्वळ.....
"आई" तुझ्या आठवणी
चांदण्यातले कोवळे ऊन.....
तुझ्या मायेचा स्पर्श
माझ्या पाठीवर अजुन...
"आई" तुझे स्वरुप
कसे शब्दरंगात चिता रु.....
तू वात्सल्याचे आकाश
माझे शब्द इवले पाखरू...
"आई" संस्काराची शिदोरी
"आई" त्यागाचे प्रमाण.....
"आई" प्रेमाची मूर्ती
"आई" त्या ईश्वरा समान....
"आई" तुझ्या आठवणीने
आज मन हेलावते....
पण तूच दिलेल्या मायेने
दु:ख माझे सावरते....
हीच प्रार्थना माझी
त्या दयाळु ईश्वराला.....
तुझ्याकडे नेऊ नको
कधी कुणाच्या आईला.....
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2070
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
मनाला भिडणारी....
शिदोरी
In reply to मनाला भिडणारी.... by प्रभाकर पेठकर
खरं आहे...
In reply to शिदोरी by आनंदयात्री
ह्म्म मान्य
In reply to खरं आहे... by प्रभाकर पेठकर