✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ब्रिटीश महासत्तेचा आधार, लंडनच्या मनोर्‍यातील द्रोण कावळे !!

म
माहितगार यांनी
Sun, 02/07/2016 - 19:42  ·  लेख
लेख
एकेकाळी ज्यांच्या सत्तेच्या प्रदेशात म्हणे सूर्य मावळत नसे आजही जागतीक पाच मोठ्या महासत्तात ज्या देशाचे नाव घेतले जाते त्या ब्रिटीश महासत्तेचा आधार कोणता ? आधार म्हणून प्रत्येकजण ब्रिटीशांची वेगवेगळी सामर्थ्यस्थाने सांगेल ज्यात त्यांची पंक्च्युआलिटी ते त्यांचे उत्कृष्ट आरमार इत्यादी पण जर कुणी लंडनच्या मनोर्‍याची माहिती घेतली तर हे सर्व खोटे आहे. भारतीयांची मुर्तीपूजा, त्यांच्या गणपतीचे दूध पिणे ते कावळ्याच्या रूपात येऊन मृतात्म्यांनी पिंड खाणे अशा अंधश्रद्धांवर केवळ भारतीयांचीच मोनोपॉली आहे असा दोष दिला जातो. नाही म्हणावयास रोमचा पोप संतपद हवे असेल तर चमत्कार करून दाखवायला सांगतो अथवा अलिकडचा फूटबॉलका काय मॅचेसचे भवितव्य ठरवणारा ऑक्टोपस. अशीच एक अंधश्रद्धा ब्रिटीशांची ज्यानुसार ब्रिटीशांचे साम्राज्य लंडनच्या मनोर्‍यातील या द्रोणकावळ्यांमुळे अस्तीत्वात आहे. raven या कैक शतकांपासूनच्या ब्रिटीश अंधश्रद्धेनुसार लंडनच्या मनोर्‍यातील हे द्रोणकावळे ज्या दिवशी निघून जातील अथवा नामशेष होतील त्या दिवशी ब्रिटीश महासत्ता आणि साम्राज्य लयास जाईल. या अंधश्रद्धेपायी या द्रोणकावळ्यांची अत्युत्तम बडदास्त ब्रिटीश सरकार ठेवत असते हे वरचे छायाचित्र पाहिल्या नंतर वेगळे सांगावे लागू नये * कावळ्यांबद्दलचे जगभरातल्या विवीध संस्कृतीतील विश्वास * या निमीत्ताने आमची एक धागा जाहीरात
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
15658 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 16:28 नवीन
शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन हात पसरुन भीक मागताहेत असे वाटतेय चित्रात. दे माय, वाढ माय करुन. खालच्या नमुन्याने तर नीट डोस्क्याला हात लावायची टिपीकल पोज पण दिलीय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

=))

माहितगार
Tue, 02/09/2016 - 17:13 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लोल!

चांदणे संदीप
Tue, 02/09/2016 - 18:09 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हाण्ण्ण तेजायला अभ्या. =)) =)

बॅटमॅन
Tue, 02/09/2016 - 18:15 नवीन
हाण्ण्ण तेजायला अभ्या. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अगदी अगदी =))

प्रचेतस
Tue, 02/09/2016 - 18:29 नवीन
अगदी अगदी =)) मायला लैच बारीक लक्ष बे तुझं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सहमत

गामा पैलवान
Wed, 02/10/2016 - 02:39 नवीन
प्रचेतस, तुमच्याशी अगदी सहमत! अचूक वर्णन आहे. भिकेस लागलेली सिंहावळ जणू! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ही सिंहावळ आपल्या कर्माने

बॅटमॅन
Fri, 02/12/2016 - 14:22 नवीन
ही सिंहावळ आपल्या कर्माने भिकेस लागेल तो सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

=))

यशोधरा
Tue, 02/09/2016 - 20:40 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा