✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सकाळची मुंबै

स
संदीप डांगे यांनी
गुरुवार, 02/04/2016 - 13:07  ·  लेख
लेख
तीन वर्षांआधी एका सकाळी माझा कॅमेरा कॅनन १०००डी आणि किट लेन्स १८-५५ घेऊन सकाळची मुंबई कशी असते हे शोधायला निघालो. निमित्त होते परदेशी पर्यटकांना मुंबईचं पर्यटन वेगळ्या पद्धतीने घडवणार्‍या एका कंपनीच्या वेबसाईटचं. त्याची डीझाईन व डेवलपमेंट मीच करत होतो. (काही कारणाने ती अजुन पुर्ण झालेली नाही.) फोटोही मीच काढावे असे ठरले. त्यानुसार त्या सकाळी दोन विषय निश्चित केले. जे त्यांच्या दोन टूरवर आधारित होते. मुंबई बाय मॉर्निंग आणि दादर फ्लावर मार्केट. ह्यातले काही फोटो वेबसाईटवर वापरले गेलेत. सर्व फोटोंचे एक कलेक्शन म्हणून 'मुंबई मॉर्निंग : बाय संदिप डांगे' हा अल्बम बनवला. त्यातलेच काही निवडक फोटो. बाकीचे ह्या दुव्यावर बघता येतील. बरेच मिपाकर मोबाईलवर बघतात म्हणून ही काळजी. असो. १. मुखपृष्ठ 1 २. ताजा खबर 2 ३. मरिन ड्राईवच्या झाडांना पाणी 3 ४. मछली का पानी! 4 ५. सकाळ आणि संध्याकाळ 5 ६. डिवायडर 6 ७. बन मस्का अ‍ॅट गेटवेऑफइंडिया 7 ८. दान... 8 ९. दगडी शिल्प : फुले मंडई 9 १०. मटनमार्केट 10 ११. आकाशकंदिल 11 १२. पाण्याचा टँकर 12 १३. कामासाठी तयार अब्दुल रहमान स्ट्रीटवरचे कामगार. 13 १४. बोराबाजार, फोर्ट. 14 १५. गरमागरम पुरीभाजीची तयारी 15 १६. सुशेगाद 16 १७. आज किती मजूरी मिळणार? 17 १८. वादळापुर्वीची शांतता: अब्दुल रहमान स्ट्रीट. 18 (काही फोटोंना ट्रीटमेंट दिली आहे) धन्यवाद!

Book traversal links for सकाळची मुंबै

  • ‹ लदाख सायकल ने : जिंगजिंगबार ते सरचू (भाग ६)
  • Up
  • लदाख सायकल ने : व्हिस्की ओढा ते पांग (भाग ८) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18432 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

अरे वा... मस्तच डांगे अण्णा..

विजय पुरोहित
गुरुवार, 02/04/2016 - 13:09 नवीन
अरे वा... मस्तच डांगे अण्णा... एकदम क्लास फोटो...
  • Log in or register to post comments

मस्त !

sagarpdy
गुरुवार, 02/04/2016 - 13:10 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments

सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा

नंदन
गुरुवार, 02/04/2016 - 13:13 नवीन
अलीकडच्या काथ्याकूटकल्लोळाच्या पार्श्वभूमीवर हा धागा एकदम आवडून गेला. टार्गेट ऑड्यन्स हा परदेशी पर्यटकवर्ग असल्याने काही फोटोंत हुकमी टुरिष्टी क्षण/पोझेस जाणवणे स्वाभाविक आहे, मात्र तरीही छायाचित्रकाराचा वेगळेपणा जाणवतो.
  • Log in or register to post comments

हुकमी टुरिष्टी क्षण/पोझेस >

संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 16:26 नवीन
हुकमी टुरिष्टी क्षण/पोझेस > अचूक ओळखलेत. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अरे वा डांगे ब्वा

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 02/04/2016 - 13:19 नवीन
हे बी कलाकारी हाय नाही मंग अंगी!!! लैच ख़ास माहोल टिपला लेक!! ऑन अ सीरियस नोट, जेव्हा कधी जमेल आयुष्यात तेव्हा एक "फ़ूड वॉक" काढू अकोल्याचा! अन त्याचा एक जॉइंट धागा बनवु!! इथेच मिपावरच!! सगळे काही इंक्लूडेड राधास्वामी च्या ब्रेड वड्या पासुन राठीवाला, श्रीराम वडापाववाला, कलकत्ता ढाबा, बशीर भाई, मुहम्मद अली रोडचे हलाल मार्केट, जुन्या शहरातला राजस्थान दहिबडा सेंटर अन नुक्कड़ कचोरी सब्बन तुम्ही कॅमेरा मधे पकड़सान, अन खाऊ बी सोबतीनं!! क्या बोलते??
  • Log in or register to post comments

कलाकारीचं काय सांग्याचं

संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 13:29 नवीन
कलाकारीचं काय सांग्याचं बापुसायेब, आमची बायको मंते जॅक ऑफ ऑल ट्रेड, मास्टर ऑफ नन! ;-) आकोल्यातल्या फूड वॉकसाठी कवाबी तयार. तुम्ही टाईम काळा फक्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आन मि..मले ना घेसान्..झाबु देनार होते का हो गाववाले

होबासराव
गुरुवार, 02/04/2016 - 13:53 नवीन
संदिप भौ हरहुन्नरी आहेत. हरफनमौला हाईत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

नाई नाई थुमी बी चालसान अन

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 02/04/2016 - 13:56 नवीन
नाई नाई थुमी बी चालसान अन इकळे जितले इच्चक लेकरं हैत साऱ्याईले हेच खुल्ले निमंत्रण हाय न लेक!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

चाला इचिभिन एकदा माहौल करुच अकोल्यात

होबासराव
गुरुवार, 02/04/2016 - 14:01 नवीन
दिवसभराचि सारि खादाडि म्हंजे हानने भाइरच करु..बास राजा आपल्या सार्‍या कुचिनायचा टाइम मेळ खायले पायजे. तुम्हा दोघाइच म्हैत नाइ पन म्या लय कुचिन होतो लानपनि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

कदीबी तयार

महासंग्राम
Fri, 02/05/2016 - 09:13 नवीन
पुण्यात भरपूर वेळा फोटो काढत फिरलो आहे, पण अकोला कधीही एक्स्प्लोर केलं नाही. बहुतेक अकोल्यात आल्यावर मी किती भारी हा सगळा गर्व गळून पडत असावा. पण अकोल्यात फोटू काढायला कधीबी तयार. नेहरू पार्क जवळ प्रकाश TVS समोर एक चहा वाला बसतो, त्याच्या कडच्या पाट्या पाहण्यासारख्या असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

क्या बात , सर्व प्र.चि. आवडली

स्पा
गुरुवार, 02/04/2016 - 13:46 नवीन
क्या बात , सर्व प्र.चि. आवडली
  • Log in or register to post comments

भारीच

याॅर्कर
गुरुवार, 02/04/2016 - 13:52 नवीन
.
  • Log in or register to post comments

मस्त....

पगला गजोधर
गुरुवार, 02/04/2016 - 14:17 नवीन
फोटो आवडले
  • Log in or register to post comments

भारी!!

सूड
गुरुवार, 02/04/2016 - 14:25 नवीन
भारी!!
  • Log in or register to post comments

सुंदर!!!

प्रीत-मोहर
गुरुवार, 02/04/2016 - 14:29 नवीन
सुंदर!!!
  • Log in or register to post comments

वाह, मस्तं!

पद्मावति
गुरुवार, 02/04/2016 - 14:34 नवीन
वाह, मस्तं!
  • Log in or register to post comments

चांगलेत फोटो.

कंजूस
गुरुवार, 02/04/2016 - 14:45 नवीन
चांगलेत फोटो. फेसबुकावरच्या सर्व फोटोंना एकच मथळा -mumbai ------पडलाय/दिलाय. (कुंभमेळा नाशिकचा संपून उज्जैनचा आला तरी नाशिकची क्षणचित्रे आलीच नाहीत.)
  • Log in or register to post comments

धन्यवाद काका!

संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 16:30 नवीन
धन्यवाद काका! नाशिकमधे पोलिसांनी घातलेल्या गोंधळाचा राग अजून गेला नाही काका, फोटो आहेत पण अजून सॉर्टींग केले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सर्वच छायाचित्रे अतिशय आवडली.

प्रचेतस
गुरुवार, 02/04/2016 - 14:47 नवीन
सर्वच छायाचित्रे अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments

सर्वच छायाचित्रे अतिशय आवडली.

प्रचेतस
गुरुवार, 02/04/2016 - 14:47 नवीन
सर्वच छायाचित्रे अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

अनुप७१८१
गुरुवार, 02/04/2016 - 15:02 नवीन
झका्स फोटो आहेत ... थिम मधे रेल्वे स्थानक बस स्थानक- चहाचि टपरी - जोगिन्ग-मोर्निग वोक करणारि लोक ... कचरा साफ करनारे आप्ले बि एम सि चे लोक पण दखवा
  • Log in or register to post comments

धन्यवाद! फोटोग्राफीची पहिलीच

संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 16:31 नवीन
धन्यवाद! फोटोग्राफीची पहिलीच फेरी होती. नंतर सगळं थांबलं क्लायंट कडून. तुम्ही म्हणताय ते फोटोज आवश्यक आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप७१८१

छान फोटो!

उगा काहितरीच
गुरुवार, 02/04/2016 - 15:20 नवीन
छान फोटो!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

पैसा
गुरुवार, 02/04/2016 - 15:26 नवीन
सगळेच फोटो आवडले!!
  • Log in or register to post comments

छानच!

शान्तिप्रिय
गुरुवार, 02/04/2016 - 15:29 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments

संदीप,

विवेक ठाकूर
गुरुवार, 02/04/2016 - 15:34 नवीन
सुरेख फोटो!
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो आवडले पण

अजया
गुरुवार, 02/04/2016 - 15:42 नवीन
सगळेच फोटो आवडले पण बोराबझारचा रस्ता थेट काॅलेजच्या दिवसात घेऊन गेला..
  • Log in or register to post comments

छान फोटो आहेत आता घेतोच मी पण

मयुरMK
गुरुवार, 02/04/2016 - 15:42 नवीन
छान फोटो आहेत आता घेतोच मी पण एक कॅमेरा :P
  • Log in or register to post comments

१०/१८

नाखु
गुरुवार, 02/04/2016 - 15:47 नवीन
नाही हे मार्क नाहीत मला दिसलेले फोटो. ही पण कला आहे तर !!! बाकी प्रवासाच्या पुढच्या भागाची वाट पहात आहे. आरक्षण (त्याच त्या) दळणाने वैतागलेला वाचक नाखु
  • Log in or register to post comments

स्टीरीओटाईप होण्याच्या

संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 16:35 नवीन
स्टीरीओटाईप होण्याच्या धोक्याची जाणीव झाली म्हणून इतर रंगही दाखवावे म्हणतो ;-) पुढचा भाग येईलच लवकर आणि पुढचा प्रवासही बदलणार मिपावरचा... आगे आगे देखो होता है क्या! ;-) - (स्टीरीओटाईप होण्यास अतिशय घाबरणारा) संदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अच्छी बात है संदीपभौ.

अभ्या..
गुरुवार, 02/04/2016 - 20:28 नवीन
अच्छी बात है संदीपभौ. लगे रहो. (आपण आपल्याला वाटतं तस बदलायचं, पण लोकांच्या अपेक्षेनं कधीच नाही. काय???? ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बादवे जवळपास सगळे फोटो आवडले

अभ्या..
गुरुवार, 02/04/2016 - 20:29 नवीन
बादवे जवळपास सगळे फोटो आवडले बर्का. ;) ही कला माझ्यापासून लै म्हणजे लैच लांब है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

झकास पकडली आहे मुंबई.

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 02/04/2016 - 15:56 नवीन
झकास पकडली आहे मुंबई. डिवायडर तर मास्टर पिस आहे. किप इट अप :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद! जाणकारांकडून कौतुक

संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 16:36 नवीन
धन्यवाद! जाणकारांकडून कौतुक विशेष असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

जाणकार वगैरे नाही हो. शिकतोय

पॉइंट ब्लँक
गुरुवार, 02/04/2016 - 17:38 नवीन
जाणकार वगैरे नाही हो. शिकतोय अजूनही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

वाहवा

चित्रगुप्त
गुरुवार, 02/04/2016 - 16:05 नवीन
व्वा. मस्तच.
  • Log in or register to post comments

सगळे फ़ोटो आवडले

एक एकटा एकटाच
गुरुवार, 02/04/2016 - 16:26 नवीन
सगळे फ़ोटो आवडले
  • Log in or register to post comments

सगळे फोटो आवडले...

मुक्त विहारि
गुरुवार, 02/04/2016 - 16:38 नवीन
मस्त,,, (स्वगत : आमच्या हातात आमच्या घरातले लोक कॅमेरा देत नाहीत....)
  • Log in or register to post comments

अप्रतिम! !!!

मितभाषी
गुरुवार, 02/04/2016 - 16:39 नवीन
अप्रतिम! !!!
  • Log in or register to post comments

एक नंबर!

आदूबाळ
गुरुवार, 02/04/2016 - 16:40 नवीन
एक नंबर! हे कसं नाही आठवलं अजून कोणाला?
न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा कवी - बा. सी. मर्ढेकर
  • Log in or register to post comments

इथे वर पहा...

चांदणे संदीप
गुरुवार, 02/04/2016 - 17:17 नवीन
http://www.misalpav.com/comment/799600#comment-799600
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सुंदर प्रतिसाद !

चौथा कोनाडा
Sat, 02/06/2016 - 20:11 नवीन
सुंदर प्रतिसाद ! हे पुसटसे आठवत होते. तुम्ही लिहिल्यामुळे उजाळा मिळाला. कोणत्या ही ठिकाणची सकाळ ही भन्नाटच असते. मग ते शहर असो, खेडे असो अथवा जंगल ! ह्या लेखात सकाळची मुंबइ परफेकट पकडलीय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सुंदर प्रतिसाद !

चौथा कोनाडा
Sat, 02/06/2016 - 20:11 नवीन
सुंदर प्रतिसाद ! हे पुसटसे आठवत होते. तुम्ही लिहिल्यामुळे उजाळा मिळाला. कोणत्या ही ठिकाणची सकाळ ही भन्नाटच असते. मग ते शहर असो, खेडे असो अथवा जंगल ! ह्या लेखात सकाळची मुंबइ परफेकट पकडलीय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

डांगे अण्णा फोटो मस्त!

बोका-ए-आझम
गुरुवार, 02/04/2016 - 16:45 नवीन
पुरीभाजी पंचमपुरी का? आणि तो आजच्या मजुरीच्या चिंतेत असलेल्या माणसाचा चेहरा परफेक्ट पकडलेला आहे. आणि डिव्हायडर नावाच्या फोटोला b/w केल्यामुळे एकदम तो अंगावर येतो. त्या फोटोतला रिकामा भकासपणा कलरमध्ये आला नसता. रच्याकने कधी सिनेमॅटोग्राफी करायचा प्रयत्न नाही केला का?
  • Log in or register to post comments

धन्यवाद बोकाशेठ!

संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 17:29 नवीन
धन्यवाद बोकाशेठ! ती पंचमपुरी नाही. अब्दुल रहमान स्ट्रीटवर रस्त्याच्या बाजुलाच एक कुटूंब पुरीभाजी बनवत होतं. सिनेमॅटोग्राफीची आठवण नका काढु राव! लै दुकतं. नको तिथे स्वाभिमान नडला अन् संधी असून सही वक्त पे सही जगह नव्हतो आम्ही, नै तो दुनिया कुछ अलग होती हमारी! असो. दिग्दर्शन आणि सिनेमेटोग्राफी आपलं डाय-हार्ड ड्रीम. ते करायचं आहेच. उससे पैले मरने का नै :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

प्रतिक्रिया देणार्‍या

संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 16:46 नवीन
प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे मनःपुर्वक आभार! धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments

मस्त कॅच केलेय मुंबई कॅमेरॅत.

अन्नू
गुरुवार, 02/04/2016 - 16:53 नवीन
मस्त कॅच केलेय मुंबई कॅमेरॅत. त्यात "मछली का पानी!" फुटुत- कडेला ठेवलेल्या टोपलीतून डोकावणार्‍या माशांच्या शेपटांकडे बघून, ती तशीच टोपली उचलून घरी आणावी आणि ताजी-ताजी मछली मसाला लावून- गरम-गरम तेलात फ्राय करुन खावी, असं वाटतंय!! ;) -माशाला हावरट अन्नू!! ;)
  • Log in or register to post comments

मस्त फ़ोटो...

चांदणे संदीप
गुरुवार, 02/04/2016 - 17:18 नवीन
आवडले! Sandy
  • Log in or register to post comments

मस्त!

नगरीनिरंजन
गुरुवार, 02/04/2016 - 17:20 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

मस्त

विलासराव
गुरुवार, 02/04/2016 - 17:39 नवीन
बोरा बाजार संपतो तिकडे जवळच माझे ऑफिस होते,आणि नंतर ठाकुरद्वारला. तेव्हा रोजची संध्याकाळ मरीन ड्राइव्हला असायची. पण असे फोटो काही आम्हाला काढायला आले नाहीत.देणार्याने कोणतीच कला मला दिली नाही समजत नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा