Skip to main content

विरजनातली साय

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी गुरुवार, 04/02/2016 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
संध्यासमयी पक्षी डोंगरापार गेले पिसे ठेवुनी बोडकेच आले ! बोडके कोणी नदीकाठी रडती उष्ट्या पत्रावळी कुत्री हुंगती ! ओलेती कोणी नग्न प्रदक्षीणेत ओला गर्भ दर्भाच्या प्रतीक्षेत ! रांड बाजारात रात्रीस दिवाळी अंधाराचे झापड दिवसाच्या भाळी ! जन्मास आला झाला सोहळा मरुनी सा-याना करे मोकळा ! माती वा राख मेल्यास काय ? आयुष्य म्हणजे विरजनातली साय ! विजयकुमार कणसे......... २१ नोव्हेंबर २००९
लेखनविषय:

वाचने 912
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कधी विरजण नीट लागून छान दही होते. कधी अदमुरं, कधी चोथापाणी तर कधी आंबटढाण.

जन्मास आला झाला सोहळा मरुनी सा-याना करे मोकळा! वाह!