Skip to main content

रोहिथ वेमुला

लेखक अविनाश लोंढे. यांनी रविवार, 31/01/2016 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
रोहिथ,आपण आधी कधी एकमेकांना भेटलो आहे का ? पण काल तू स्वप्नात आलास ,अन आपण बोललो,हे कस काय ? काय बोललो हे तुलाही माहितेय अन मलाही पण तेच आज लिहावास वाटतंय - मी - तू जगलास काय किंवा मेलास काय इथं कुणाला काही 'घंटा' फरक पडणार नाही .काही दिवस तुझी चर्चा होईल TV आणी वर्तमानपत्रात वर अन पुन्हा 'जैसे थे' तू आत्महत्या करायला नको होतीस ! स्वत जीव देऊन युद्ध नाहीत जिंकता येत मित्रा ! रणांगणात दुसऱ्याकडून लढता लढता मेलं तर ते वेगळ पण असा जीव देण मनाला हुरहूर करून सोडणार आहे . तू - I would not be around when you read this letter. Don’t get angry on me. I know some of you truly cared for me, loved me and treated me very well. I have no complaints on anyone. It was always with myself I had problems. I feel a growing gap between my soul and my body. And I have become a monster. I always wanted to be a writer. A writer of science, like Carl Sagan. At last, this is the only letter I am getting to write. मी- तू किती 'परिस्थितीमुळे विस्कटलेला' आहेस हे ह्यावरून कळते ! तुझी स्वप्न तू पूर्ण करायला हवी होतीस ! कदाचित तुझं हे शेवटच पत्र खूप प्रसिद्ध होईल ,जर तू पुस्तकं लिहिली असतीस तर त्याच्या पेक्षा जास्त ! पण खरच आत्महत्येचा हा निर्णय योग्य आहे का ? तू - I loved Science, Stars, Nature, but then I loved people without knowing that people have long since divorced from nature. Our feelings are second handed. Our love is constructed. Our beliefs colored. Our originality valid through artificial art. मी- अन तेच प्रेम साध्य करण्यासाठी तू निसर्गाकडे गेलास का ? अरे इथं जनावरांच्या जीवाची काळजी माणसाच्या जिवापेक्षा जास्त होते ,हे ठाऊक नव्हत का तुला ? तू -It has become truly difficult to love without getting hurt.The value of a man was reduced to his immediate identity and nearest possibility. To a vote. To a number. To a thing. Never was a man treated as a mind. As a glorious thing made up of star dust. In very field, in studies, in streets, in politics, and in dying and living.I am writing this kind of letter for the first time. My first time of a final letter. Forgive me if I fail to make sense. मी- आता मात्र मी शांत आहे ,इथं माझ्याकडे तुझ्यासाठी उत्तर नाही , 'माणसाचा जीव' हा फक्त स्वार्थासाठी आहे ! तू - May be I was wrong, all the while, in understanding world. In understanding love, pain, life, death. There was no urgency. But I always was rushing. Desperate to start a life. All the while, some people, for them, life itself is curse. My birth is my fatal accident. I can never recover from my childhood loneliness. The unappreciated child from my past.[ I myself strike these words off.] मी- दलित कुटुंबात जन्म घेण ह्याचा अर्थ तुझ्याकडे संघर्ष करण्याची ताकद जास्त आहे ! अरे दलितांचा जन्म हा फक्त संघर्ष करण्यासाठी झाला आहे .क्षेत्र कोणतही असो जर तू दलित आहेस तर संघर्ष आलाच ! तू - I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That’s pathetic. And that’s why I am doing this. मी- .............! तू - People may dub me as a coward. And selfish, or stupid once I am gone. I am not bothered about what I am called. I don’t believe in after-death stories, ghosts, or spirits. If there is anything at all I believe, I believe that I can travel to the stars. And know about the other worlds. मी- तेच तर मी म्हणतोय , आत्महत्या हा पर्याय नव्हे ! तू - If you, who is reading this letter can do anything for me, I have to get 7 months of my fellowship, one lakh and seventy five thousand rupees. Please see to it that my family is paid that. I have to give some 40 thousand to Ramji. He never asked them back. But please pay that to him from that मी- समजतंय ,तुझी तुझ्या घरच्याबद्दल ची काळजी ! तुझे वडील security guard अन आई टेलर , ह्यात तुझ्या शिक्षणाचा खर्च ! चूक आपलीच आहे यार की आपल्यात स्वाभिमान एवढा भरलाय की घरून पैसे मागायला ही लाज वाटते ! घरी गेलो की सगळे विचारतात 'किती ताप देनारेस अजून आईबापांना नोकरी कर कोणतीतरी , मरेपर्यंत त्यांना काम करू देणार आहेस का ? शेवटी पर्याय म्हणून तू तुझ्या मित्राकडून पैसे घ्यायला सुरुवात केलीस …पण 'भीक' मागणे अन स्वार्थासाठी झुकणे हे आपल्या स्वभावात नाही , तू एवढा तुटला होतास का ह्या जाती -व्यवस्थेमुळे ? तू - Let my funeral be silent and smooth. Behave like I just appeared and gone. Do not shed tears for me. Know that I am happy dead than being alive. मी- हे कसं शक्य आहे ? तुझं मरण हे एका माणसाचा मरण म्हणून नाही तर एका दलित माणसाच मरण म्हणून कितीतरी दिवस चालेल इथं . राजकारणी आपापले तवे घेऊन पोळ्या भाजायला तुझ्या चितेवर येतील ! “From shadows to the stars.” Bye. मी- नको ! तू - Uma anna, sorry for using your room for this thing. To ASA family, sorry for disappointing all of you. You loved me very much. I wish all the very best for the future. For one last time, Jai Bheem मी- जय भीम आत्महत्या करताना शोभत नाही ! तू - I forgot to write the formalities. No one is responsible for my this act of killing myself. No one has instigated me, whether by their acts or by their words to this act. This is my decision and I am the only one responsible for this. Do not trouble my friends and enemies on this after I am gone. मी- ही शेवटी formalities आहे . सर्वाना माहितेय कि तू का आत्महत्या करत आहेस ! पण त्याने काही फरक पडेल का ? आपलेच नेते सत्तेसाठी स्वताला विकत आहेत तिथं दुसऱ्याकडून काय अपेक्षा ठेवावी ? तू जातोयेस कदाचित तुझी मानसिकता मला कळायला वेळ लागेल किंवा ज्याची जळते त्यालाच कळते असाही असेल , पण एक लाख सत्तर हजारात तुझे आई -वडील बाकीच आयुष्य कस काय सारतील ? त्यांची जबाबदारी कुणाची ? तुझ्या विद्यापीठान तुझी हक्काची जबाबदरी स्वीकारली नाही तर ती तुझ्या घरच्यांची तरी कशी स्वीकारतील !!!! रोहिथ , तुझी वाढलेली दाढी , विस्कटलेले केस , डोळ्यात system बरोबर लढताना हरल्याचा निरागस भाव कितीतरी रात्री मला नीट झोपू नाही देणार !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14577
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

माहितगार, भाजपने एके काळी आपला अध्यक्ष जो मुळचाच दलित आहे असा निवडला होता. बंगारु लक्ष्मण अस त्यांचे नाव आहे. दुरदैवाने स्टीईंग ऑपरेशमधे लाच घेताना सापडल्याने त्यांना हे पद आणि पक्षही गमवावा लागला होता. या शिवाय ही सन्माननीय सदस्यांची यादी. http://bjpscmorcha.blogspot.in/2011/07/list-of-members-national-executi… काँग्रेसने गांधी घराणे सोडुन कधी अध्यक्ष निवडला आहे का ?

In reply to by गॅरी शोमन

हम्म गूड आयडीया सर्वच भारतीय राजकीय पक्षांनी दर दहा वर्षात तीन वर्षेतरी दलित अध्यक्ष निवडावा आणि १/३ राज्यातील राज्यस्तराचे अध्यक्षपद दलित नेत्याकडे देण्याचे २५ वर्षेतरी करावे. बिहार मध्ये शो साठी दलित मुख्यमंत्री आणला आणि सोईचे नाही पाहून काढून टाकला तो सोईचा नाही तर बिहार मध्ये अजून दलित मुख्यमंत्रिपदावर बसवण्यासाठी उपलब्ध नव्हते का काय ? किंवा अगदी एखादा मुस्लीम मुख्यमंत्री द्यायचा पण त्याने खुर्च्या स्वतःच्या आणि स्वकुटूंबीयांपाशी राखता येत नाहीत हि मोठी अडचण असते.

In reply to by माहितगार

बिहार मध्ये शो साठी दलित मुख्यमंत्री आणला आणि सोईचे नाही पाहून काढून टाकला >>> सोईचा नाही तर त्याला भाजपाने फितवले आणि त्याने रंग बदलले म्हणून काढून टाकला. आणि नितिशकुमार ने कामच इतके केले होते की त्याला या "जातपातिची" गरजच नव्हती. त्याने काढले म्हणून "विकास विकास फक्त विकास" म्हणणार्‍यांनी लगेच बरे घेतले. ;)

In reply to by उदय८२

उदयराव भाजपा आणि भाजपेतर हा विचार डोक्यात ठेऊन आम्ही मांडणी करत नाही; स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची उभ्या भारतातील सर्व राजकीय पक्षांची सर्व राज्य सरकारे घ्या किती मुख्यमंत्री, किती अर्थमंत्री, किती गृहमंत्री, किती कालावधीसाठी दलित समाजातून निवडले गेले याचा आलेख मांंडल्यावर काय चित्र दिसते सांगा. महाराष्ट्राच्या बाबतीत किती साखर कारखान्यांचे अध्यक्ष संचालक दलित आहेत ? किती जिल्हा सहकारी बँकाचे अध्यक्ष दलित राहीले आहेत याचा आलेख मांडावा. दलितांना राजकारणात स्थान देण्यात हयगय करण्याबद्दल मी भाजपाचेही कौतुक करत नाही, काँग्रेसचे करत नाही, कम्युनीस्टांचे करत नाही, जनता पक्षातून फुटलेल्या विवीध गटांचेही करत नाही, त्या प्रमाणे नितीशकुमार असोत अथवा लालू प्रसाद यादवही टीकेस तेवढेच पात्र का असू नयेत ? जिथपर्यंत नितीशकुमारांची गोष्ट आहे जर त्यांच्या पक्षातील एक दलित भाजपाने फितवला, त्यांच्या पक्षात दुसरे कुणीही दलित व्यक्ती जागा भरून काढण्यासाठी नव्हती किंवा कसे ? समजा त्यांच्या पक्षात नसेल बिहार मध्ये स्वतःच्या पक्षाचा राजकारणात नसलेला पण दलित आणि हुशार असलेला एखादा माणूस आणता आला नसता काय ? लालू प्रसादांना स्वतःची बायको मुख्यमंत्री बनवता येते अनेक नातेवाईक मंत्री पदावर बसवता येतात जेवढे त्यांचे नातेवाईक मंत्रिमंडळात आहेत तेवढे दलित मंत्रि त्यांनी मंत्रिमंडळात ठेवले होते/आहेत का ? हा संशोधनाचा विषय नसावा का ?

In reply to by उदय८२

नितिशकुमार ने कामच इतके केले होते की त्याला या "जातपातिची" गरजच नव्हती.
प्रश्न काम किती केले याचा नाही, दलितांना इतर समाजाच्या बरोबरीने स्थान देण्याचा आहे. बिहार मध्ये अथवा इतर कोणत्याही राज्यात राजकारणातही द्लितांना मंत्रिपदांवर महत्वपूर्ण स्थान असावयास हवे, सर्व पक्षीय राजकीय पक्षांमध्ये दलितांना बरोबरीचे सामाजिक आणि राजकीय स्थान प्राप्त झालेले असेल तर दलितांची आरक्षणाची गरज कमी व्हावयास हवी ती तशी झालेली नाही म्हणजे समाजात त्यांना अद्याप बरोबरीचे स्थान नाही आणि समाजात बरोबरीचे स्थान अद्याप मिळाले नसेल तर राजकारणात मंत्रिपदांमध्ये दलितांना बरोबरीने आणि महत्वपूर्ण स्थान मिळावयास नको किंवा कसे ?

In reply to by गॅरी शोमन

काँग्रेसने गांधी घराणे सोडुन कधी अध्यक्ष निवडला आहे का ? >> जशी इतर माहिती गुगल केली तशी काँग्रेसची पण करून बघावे . उत्तर मिळतील

In reply to by उदय८२

की विकिपिडियाचं पेज उघडतं आणि विकिपिडियावर कोणीही सोम्यागोम्या किंवा ८१-८२ जाऊन माहिती बदलू शकतो हो साहेब. गूगलशिवाय इतर माहितीचे स्त्रोत माहित नसतील - पुस्तकं वगैरे, तर सांगा. संकोच करु नका. मोठे व्हा. वाढदिवसाच्या शुभेच्छा!

In reply to by बोका-ए-आझम

अहो मी कधी बोललो का तुम्ही विकिपिडीयावर जाऊन माहीती बदलतात ? गुगल शिवाय माहीतीचे स्त्रोत हवे असल्यास काँग्रेसने माहीतीचा अधिकार पास करून दिला आहे. त्याचा वापर करून बघा. मोदी सरकार असे ही आरटीआयमधे माहीती देण्यास जगप्रसिध्द आहे. तुम्हाला ही दिले जाईल.

In reply to by उदय८२

@ बोका-ए-आझम प्रतिसादास व्यक्तिगत स्वरुप का येत आहे ? @ उदय८२ काँग्रेसमध्ये दलित अध्यक्ष होऊन गेले यात तथ्य असावे, -१) ती नावे माझ्या ओठावर आहेत, तुम्हा दोघांची चर्चा कोठे जाते आहे हे बघतो आहे; आपण जर काँग्रेस आणि दलितांचे समर्थक असाल आपल्याला माहित असेल तर संदर्भ दुव्यासहीत देऊन का टाकत नाही - २) काँग्रेसने दलितांना अध्यक्षपद दिले तो कालावधी काँग्रेसच्या १३० वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत दिड टक्क्याच्या पुढे जाणार नाही - ३) काँग्रेसने अध्यक्ष पद दलितांना दिले आता लोक्सभेतील विरोधीपक्षनेतेपद दिले आहे पण त्या सर्व कालावधीत खरी सूत्रे नेहरु-गांधी घराण्याकडे राहीली आहेत - ४) काँग्रेस एक दलितांना सहभागी आणि समान सामाजिक आणि राजकीय दर्जा देण्या बाबत आग्रही असेल तर - काँग्रेसकडून इतर राजकीय पक्षांपेक्षा अधिक अपेक्षा असणे सहाजिक असावे- काँग्रेस कडून दलितांनी रिमोटकंट्रोल शिवायच्या पंतप्रधान पदाची अपेक्षा ठेवावयास आणि काँग्रेसने या पुर्वीच ती न मागता पुर्ण करावयास नको होती का ? शिवाय खालील मुद्दे मी आधीच्या प्रतिसादातून नमुद केले आहेतच. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची उभ्या भारतातील सर्व राजकीय पक्षांची सर्व राज्य सरकारे घ्या किती मुख्यमंत्री, किती अर्थमंत्री, किती गृहमंत्री, किती कालावधीसाठी दलित समाजातून निवडले गेले याचा आलेख मांंडल्यावर काय चित्र दिसते सांगा. महाराष्ट्राच्या बाबतीत किती साखर कारखान्यांचे अध्यक्ष संचालक दलित आहेत ? किती जिल्हा सहकारी बँकाचे अध्यक्ष दलित राहीले आहेत याचा आलेख मांडावा.

In reply to by माहितगार

येस. आम्हा दोघांतली चर्चा दुर्दैवाने वैयक्तिक पातळीवर गेली. अर्थात सुरुवात उदयजींनी केली होती. पण तो मुद्दा नाहीये. असं केल्याने परिस्थितीचं गांभीर्य नष्ट होतं. क्षमस्व!

अंदमान व निकोबार बेटांचे क्षेत्रफळ किती आहे ? त्यावर जास्तीत जास्त किती लोक राहू शकतील ? पिण्याचे पाणी , वीज , रस्ते या सुविधांची तेथे काय परिस्थिती आहे ? कोणास माहिती असल्यास कळवावे . ता .क. - मिपावर नवीन असल्याने फारशी माहिती नाही .

In reply to by नुस्त्या उचापती

@ नुस्त्या उचापती, आपला माझ्या खालील मुद्द्यांवरचा विनोद असेल तर तो एक चांगला प्रयत्न म्हणून स्विकारतो. आपण रोहीत वेमुला विषयक मागच्या धागा चर्चेत सहभागी झाला आहात म्हणजे एवढे पण नवे नक्कीच नाही आहात. आपला विनोद माझ्या खालील मुद्द्यांचे कितपत निरसन करतो या बाबत साशंक आहे ..... २) काँग्रेसने दलितांना अध्यक्षपद दिले तो कालावधी काँग्रेसच्या १३० वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत दिड टक्क्याच्या पुढे जाणार नाही - ३) काँग्रेसने अध्यक्ष पद दलितांना दिले आता लोक्सभेतील विरोधीपक्षनेतेपद दिले आहे पण त्या सर्व कालावधीत खरी सूत्रे नेहरु-गांधी घराण्याकडे राहीली आहेत - ४) काँग्रेस एक दलितांना सहभागी आणि समान सामाजिक आणि राजकीय दर्जा देण्या बाबत आग्रही असेल तर - काँग्रेसकडून इतर राजकीय पक्षांपेक्षा अधिक अपेक्षा असणे सहाजिक असावे- काँग्रेस कडून दलितांनी रिमोटकंट्रोल शिवायच्या पंतप्रधान पदाची अपेक्षा ठेवावयास आणि काँग्रेसने या पुर्वीच ती न मागता पुर्ण करावयास नको होती का ? शिवाय खालील मुद्दे मी आधीच्या प्रतिसादातून नमुद केले आहेतच. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची उभ्या भारतातील सर्व राजकीय पक्षांची सर्व राज्य सरकारे घ्या किती मुख्यमंत्री, किती अर्थमंत्री, किती गृहमंत्री, किती कालावधीसाठी दलित समाजातून निवडले गेले याचा आलेख मांंडल्यावर काय चित्र दिसते सांगा. महाराष्ट्राच्या बाबतीत किती साखर कारखान्यांचे अध्यक्ष संचालक दलित आहेत ? किती जिल्हा सहकारी बँकाचे अध्यक्ष दलित राहीले आहेत याचा आलेख मांडावा.

माहितगार साहेब , आपला गैरसमज झालेला दिसतोय. माझी प्रतिक्रिया तुमच्यासाठी नव्हती . मला माहित नसलेली माहिती मिळवण्यासाठीची ती चौकशी आहे .बरेच धागे शोधले पण माझ्या प्रश्नांना मांडण्यासाठी जागा सापडत नव्हती . हा धागा बरा वाटला म्हणून इथे प्रश्न टाकले . बाकी तुमच्यासारख्यांना आडवं लावून कसं चालेल. आम्हालाही इथे दिवस (आणि रात्री ) काढायच्यात. _ आपला नुस्त्या .

In reply to by नुस्त्या उचापती

हा धागा बरा वाटला म्हणून इथे प्रश्न टाकले .
;)
बाकी तुमच्यासारख्यांना आडवं लावून कसं चालेल. आम्हालाही इथे दिवस (आणि रात्री ) काढायच्यात.
=)) सॉरी एवढा मागे लागतो का हो मी ? कॉलींगी भटकंतीप्रेमी मिसळाअवकर्स आपले नवे मित्र नु.उ.ंना अंदमान व निकोबारची माहिती आणि अंदमान व निकोबारबद्दल धागे असल्यास धागा आणि विभाग दर्शन करवा बरे जरा.

ho pan tyach vidyapithamadhey ya adhi 10 mullani atmhatya kelelya congress chya kalamadhe.

In reply to by viraj thale

ठाले काका एक तर मराठीत टाईपाकी जरा आणि आपल्या माहितीसाठी मागच्याच धागा लेखचर्चेत हा मुद्दा चघळून झाला आहे मिसळपाव वर.

लोकहो, याकूब मेमनची फाशी आणि रोहित वेमुलाची आत्महत्या या दोन घटनांतून व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न मनात उभे राहिले आहेत. दोन्ही प्रकरणांत ढोंगी पुरोगाम्यांकडून व्यवस्थेला दोष देण्यात आला आहे. याकूबची फाशी रीतसर खटला चालवून दिली गेली होती. त्याकरिता त्याला बचावाचे सर्व मार्ग धुंडाळण्याची मुभा होती. फार काय रात्री अडीच वाजता सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ बसलं होतं. एव्हढ्या काटेकोरपणे प्रक्रिया राबवूनही ढोंगी पुरोगामी व्यवस्थेला दोष देत आहेत. याचाच अर्थ ढोंपुंना शासकीय व्यवस्था वेठीस धरायची सवय लागली आहे. रोहित वेमुलाच्या बाबतीत बंदारू दत्तात्रेय आणि स्मृती इराणी यांनी आपापल्या पदांची कर्तव्ये बजावली तरी ढोंपु कल्लोळ करताहेत. एकंदरीत चालू लोकशाही व्यवस्था वेठीस धरता आली पाहिजे अन्यथा ती विसर्जित केली पाहिजे हे त्यांचे लक्ष्य आहे. नक्षल आणि माओवाद्यांचेही नेमके हेच लक्ष्य आहे. त्यांना शासकीय यंत्रणा उलथून टाकायची आहे. ढोंपु नक्षल्यांचे हस्तक आहेत एव्हढंच सांगण्यासाठी हा संदेश टाकला आहे. आ.न., -गा.पै.

सर्व प्रतिसाद वाचून असे वाटते की आपला समाज, कुठल्याही घटनेकडे १०० टक्के निरपेक्षपणे पाहूच शकत नाही. कुणाला काँग्रेसची तर कुणाला भाजपाची, कम्युनिस्टांची कावीळ झालेली असते. प्रत्येक व्यक्ति घडलेल्या घटनेकडे, कुठल्यातरी चष्म्यातूनच पहात असते. शिवाय, प्रसारमाध्यमे जे सांगतात तेच अंतिम सत्य, अशी कित्येकांची भाबडी समजूत असते.असे हे चर्वितचर्वण अनंतकाळ चालू शकते. पण होते काय की, तेवढ्यांत दुसरी एखादी घटना घडते आणि जुनी घटना विसरली जाते.

In reply to by तिमा

@ तिमा निषक्ष माणूस कुणाचाच नसतो सर्वांच्याच टिकेचा लक्ष होतो -जावे त्यांच्या वंशा असे असते-, मी कोणताही चष्मा टाळून सर्वांवर सारख्याच प्रमाणात (बर्‍याचदा कठोर) टिका करत असतो तरीही नको असलेले मुद्दे दिसले की माझ्यावरही पक्षपाताचा आरोप होतो त्यापेक्षा कधी कधी चष्मा लावलेले लोक सुखी असतात असे वाटते किमान त्यांना त्यांच्या त्यांच्या गटाचे लोक येऊन समर्थन करतात चष्मा न लावणार्‍याचे दुर्दैवाने दुसरा चष्मा न लावणाराही समर्थन करत नाही. या धाग्यावर बरेच प्रतिसाद माझे आहेत आपण 'सर्व' प्रतिसादांना एकाच मापाने तोलत तर नाही आहात ना असे वाटून जरासा खेद वाटला.

In reply to by तिमा

@ तिमा, तटस्थतेचे समर्थक असाल तर आमच्या आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान या धाग्यास सवडीने भेट द्यावीत हि विनंती

mi kaka nahi tumchya peksha 15- 20 varshani lahanch asen ani dusar mhanje mazya adnavacha chukicha ucchar.

संपूर्ण लेखातील फक्त खालील वाक्य सर्वार्थाने खरे आहे.
तू जगलास काय किंवा मेलास काय इथं कुणाला काही 'घंटा' फरक पडणार नाही .

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी एखाद्या शब्दास किंवा वाक्यास एका पेक्षा अधिक अर्थछटा असू शकतात, दुसर्‍या व्यक्तीचे वाक्य तोडून उधृत करताना आणि विशेषतः जेव्हाकी 'सर्वार्थाने' हा शब्द उपयोजीत करत आहात तेव्हा या बद्दल अधिक काळजी घ्यावयास हवी किंवा कसे हे सवडीनुसार रिव्हीजीट करावे. जी व्यक्ति गेली तिने त्याचा इतरांना काही फरक पडावा असे अपेक्षीले असेलच असे नव्हे. आता चर्चा होत आहेत हा योगा योग आहे, आपल्याला अपेक्षीत नसलेली चर्चा होत आहे म्हणून मूळ लेखकालाही अपेक्षीत नसावे असे तोडून उधृत केलेजाणे स्पृहणीय वाटले नाही. क्षमस्व.