माझी दंतकथा (अर्थात My Experiments with Tooth)
सध्या बायकोला , पत्रिका वाचन आणि त्यांचा अभ्यास करणे हा एक छंद जडलेला आहे. त्यामुळेच, मिळेल त्याची पत्रिका घेवून तिचं ती dissection करत असते. अर्थात माझी पत्रिका हि किती किचकट आहे, आणि माझा स्वभाव देखील, हे ती मला दिवसातून चार वेळेला तरी नक्कीच ऐकविते , आणि त्यात तिचे ग्रह-तारे माझ्या ग्रह-तार्यांची कशी युती ठेवून आहेत, हे देखील सांगायला विसरत नाही!
अगदी उदहरण द्यायचा झालाच तर, माझ्या पत्रिकेत म्हणे माझा लफडं होऊ शकतं असे काही योग आहेत (एक सुखद वाऱ्याची झुळूक अंगावरून जावी तोच, तिच्या पहिल्या का ११व्या घरातला शनि का गुरु कसा माझ्यावर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे ती तसा काहीही होवू देणार नाही, असा एक रुक्ष निदान तिने केले. त्यामुळे आयुषातल्या एकमेव लफड्या ने होणार्या गुददुल्या, तिच्या शनि मूळे विरून जाताना मला दिसतात.
माझ्या पत्रिकेत माझ्या चेहेर्यावर गंभीर इज्जा होण्याचे योग आहेत, हे निदान तिने एकदा मला ऐकविले, आणि मग अचानक "अरे हो कि रे, तू नाही का शाळेत असताना तोंडावर पडलेलास आणि तुझी पुढचे दोन्हीही दात आता खोटे आहेत" हे सुद्धा ऐकविले! आता हे वाचून, मला ओळखणाऱ्या बर्याच लोकांच्या मनात "तरीच हा असा डोक्यावर पडल्या सारखं वागतो" अशी खोचक शंका नं आली तर नवल!
तर मंडळी मी शाळेत चौथीत असताना, एका मुलाने जिना चढताना केलेल्या वात्रटपणा मुळे मी तोंडावर आपटलो. समोरच्या दोन्ही दातांचे तुकडे तेवढे तोंडात राहिले. नंतर प्रचंड वेदना, रडारड आणि बोंबाबोंब करून मी घरी पोचलो. घरी आल्यावर मात्र , दुधाच्या दातांनी कधीच हाय खाल्याने, आपल्याला आता नवीन दात येणार नाहीत हि एक नवीन माहिती मिळाली आणि मग ओळखीच्या दंतवैद्यांकडे माझी हजेरी लागली.
दंतवैद्या ने मात्र "हा १२ वर्षाचा होईस्तोवर root canal आणि caps नाही बसवता येणार…. " असे निदान करून टाकले. मग काय, दरवर्षी शाळेत होणार्या वैद्यकीय तपासणीत "Needs root canal and caps" असा शेरा मिळे. एकदाचा मी ७वीत पोचल्यावर, ती प्राणांतिक वेदना देणारी root canal procedure सुरु केली आणि असंख्य "seatings" नंतर माझ्या त्या समोरील दोन दाताना cap लागली, आणि खर्या अर्थाने माझ्या दंतकथेची सुरुवात झाली.
हे नवीन नकली दात काही मला मानवेच ना. कधी एक महिन्यात तर कधी एक आठवड्यात हे नकली दात निघून येत. जेवताना, अचानक दाताखाली खडा यावा तसे माझ्या दाताखाली दात येत. खेळताना अचानक पडलेले हे दात मी दगड माती जीवाच्या आकांताने उपसून उपसून शोधून काढीत असे. "मेल्या २००० र चे आहेत ते दात, नीट वापर …. ", हि घरून मिळालेली तंबी ह्याला कारणीभूत असे.
मग दर दोन दिवसांनी मी दंतवैद्याच्या दारात उभा राहत असे. तोंडाच बोळक उघडून आणि हातात ते नकली दात घेऊन. आधी कसनुसं हसून आमचे दंतवैद्य माझे स्वागत करीत असे. हळूहळू मात्र माझी ती बिन दातांची smile बहुदा त्यांना फारशी रुचत नसावी. का कोणास ठाऊक, मला बघून ते फारसे खुश दिसत नसत. इतर patients बरोबर हसता हसता मला दारात उभा राहिलेला पाहून अचानक ते गंभीर होऊन जात. (बहुदा त्यांच्या काळजात धस्स होत असेल). कधी कधी मला दाट शंका येई कि माझी cycle खाली दारात लावलेली दिसली, कि बहुतेक ते वरच येत नसे किंवा धडधडत्या छातीने आणि पडलेल्या चेहेर्याने वर येत. मग मी देखील माझी cycle कधी लपवून तर कधी मागे पुढे लावून येत असे. बहुदा इतर धंद्या प्रमाणे जसे पहिलच गिर्राहिक शुभ मानला जाते असा काही अलिखित नियम आहे तसा त्यांचा देखील असावा. आधी फुकट कॅप बसून देणारे नंतर नंतर मात्र मजल दर मजल १०, २० आणि ५० रुंपये घेऊ लागले (ह्या मागे कदाचित हे केल्याने मी त्यांच्या कडे जाण्याचे थांबेन, किंवा घाबरून येणारच नाही, हा देखील हेतू असावा)
शेवटी एकदा त्या दोन दातांवर त्या cap ला पुरेसा support मिळत नाही अशी उपरती त्यांना झाली. (क्रिकेट मध्ये कस कधी कधी २ umpires ना third umpire ची गरज भासते, अगदी तसेच). मग ह्या दातांच्या शेजारच्या दाताचा बळी देऊन ३ दातांवर cap बसवण्यात आली. हि कवळी मात्र आजतागायत शाबूत आहे. इतकी, कि कोणी दात पाडेन म्हंटल तरी त्याला जोरात सांगावासा वाटत "दाखवच पाडून … "
अश्या रीतीने माझ्या दंतकथेचा सुखद अंत एकदाचा झाला!
"आई दंतकथा म्हणजे काय ग?" आमच्या चिरंजीवांच्या प्रश्नाने मी भानावर आलो. "बाबाला विचार! ". मी आपला माझेच दात-ओठ खाऊन गप्प राहिलो!
याद्या
8866
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
हाहाहा! दंतकथा आवडली. :-)
:) मस्तं!
छान छान.
अरेरे..! पण छान लिहीलंय..
:)
धन्यवाद!
In reply to :) by मन१
सुरेख!
छान लिहिलंय! आधी मला वाटलं
हे
In reply to छान लिहिलंय! आधी मला वाटलं by अजया
=)))) महालोल किस्सा आहे हा :)
In reply to छान लिहिलंय! आधी मला वाटलं by अजया
=))
In reply to छान लिहिलंय! आधी मला वाटलं by अजया
बादवे,
In reply to =)) by मन१
अशक्य!!!! -)) -)) -))
In reply to छान लिहिलंय! आधी मला वाटलं by अजया
धमाल किस्सा आहे हा! डोळ्या
In reply to छान लिहिलंय! आधी मला वाटलं by अजया
आवरा...खत्रा किस्सा
In reply to छान लिहिलंय! आधी मला वाटलं by अजया
हा हा हा
In reply to छान लिहिलंय! आधी मला वाटलं by अजया
वेदनारहीत असते हो रुटकॅनाल हल्ली!हा ज्योक आहे ना ?जोक नाही काका.रुट कॅनाल
In reply to हा हा हा by विटेकर
+1
In reply to जोक नाही काका.रुट कॅनाल by अजया
+1
In reply to जोक नाही काका.रुट कॅनाल by अजया
=)) कहर!
In reply to छान लिहिलंय! आधी मला वाटलं by अजया
प्रियदर्शनच्या सिनेमाचा शेवट
In reply to =)) कहर! by अनुप ढेरे
+१०००
In reply to प्रियदर्शनच्या सिनेमाचा शेवट by अनुप ढेरे
ऑफिसात हे वाचताना हसताही
In reply to छान लिहिलंय! आधी मला वाटलं by अजया
!!!!!!!!!!
In reply to छान लिहिलंय! आधी मला वाटलं by अजया
देवा रे
हाहाहा
मस्त लिहीलयं!!
हॅ हॅ हॅ
खुमासदार
हाहा! दोन्ही किस्से भारी!
+1
In reply to हाहा! दोन्ही किस्से भारी! by रातराणी
अभिप्राया बद्दल धन्यवाद
च्यामारी केदारराव. तुम्ही
आता त्या पाचाचीही काही ष्टुरी
In reply to च्यामारी केदारराव. तुम्ही by अभ्या..
:)
In reply to आता त्या पाचाचीही काही ष्टुरी by संदीप डांगे
हाय का आता? ह्याला आमच्या
In reply to आता त्या पाचाचीही काही ष्टुरी by संदीप डांगे
बायोटेकने दात मिळणं आता दूर
या संक्रातीला वाण म्हणून दात
In reply to बायोटेकने दात मिळणं आता दूर by अजया
लहानपणापासुन वारसाहक्काने
हायला! वर्णनावरुन आमची
In reply to लहानपणापासुन वारसाहक्काने by पियू परी
लो यु यशो ;)
इ लोवे यु आठवले! =))
In reply to लो यु यशो ;) by अजया