सह्याद्री वाहिनी वरील नाटकांच्या कार्यक्रमाबाबत
१. फार पुर्वी सह्याद्री वाहिनीवर रात्री एक नाटक लागले होते. त्यात नीना कुलकर्णी आईच्या भुमीकेत होत्या. त्यात या आईच्या व्यक्तिरेखेचा आपल्या अंध मुलावरील प्रेमापोटी आंधळे होऊन व अती सुरक्षीत ठेवण्यासाठी त्याला त्याची स्पेस न देणे असा काहीसा प्लॉट होता.
हे नाटक कोणते आहे? कुठे मिळेल?
२. हे आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपुर्वी सह्याद्री वाहिनीवर असेच एक नाटक लागले होते. तुषार दळवी आणि किशोरी शहाणे होते त्यात. एका लाडावलेल्या आणि उद्धट व्यक्तीची स्मॄती गेल्यानंतर त्याला नवे आयुष्य मिळते, जुने लोक त्याला खुप आठवुन द्यायचा प्रयत्न करतात, अनेक अनोळखी कुटुंब त्याच्यावर संपत्तीच्या लालसेपोटी हक्क सांगायला येतात व शेवटी एका अनाथ लहान मुलासोबत तो जातो असे कथानक आहे.
हे नाटक कोणते? आणखी माहिती कुठे मिळेल?
३. सह्याद्री वाहिनीवर हे असे रात्री उशीरा पर्यंत चालणारे नाटकं कधी लागतात? डीडीसह्याद्री.ईन वर काही मिळाले नाही, किंवा मीच नीट बघितले नसेल. ते पहिले नीना कुलकर्णी वाले नाटक रात्री १:३० पर्यंत चालले होते.
या दोन्ही नाटकांचे कथानक, अभिनय आणि ईतर गोष्टी खुपच चांगल्या होत्या.
सह्याद्रीवरील या नाटकांच्या कार्यक्रमाचे याचे वेळापत्रक आणि ही सगळी जुनी नाटकं कुठे मिळेतील?
धन्यवाद.
वर्गीकरण
माहित नाही
In reply to माहित नाही by पैसा
http://ddsahyadri.in/ वर
तोच प्रॅाब्लेम आहे ना.कोणता
In reply to तोच प्रॅाब्लेम आहे ना.कोणता by कंजूस
भिमसेनांचे तीस
In reply to भिमसेनांचे तीस by आदूबाळ
नाही हो. सुधिर फडके,सुरेश भट
लहानपणा पासून मराठी दूरदर्शन
लीना भागवत व प्रदीप वेलणकर
सह्याद्री वाहिनीवर