शेवग्याच्या शेंगाना डांबेही म्हणतात. शेवग्याच्या पानांची, फुलांचीही भाजी करतात. शेवग्याच्या शेंगा पिठलं, आमटी यात वापरतात पण आज मी तुम्हाला खास थंडीत करण्यासारख्या साराची कृती सांगतेय.
फोटो आंतर्जालावरून साभार
साहित्यः १० शेवग्याच्या शेंगा, अर्ध्या ओल्या नारळाचे खोबरे, एक चमचा आमचुर, मीठ, साखर, दोन चमचे तूप, जीरे, हिंग चिमुटभर, ओल्या मिरच्या दोन तीन, कढीलिंबाची ७/८ पाने.
कृती: शेंगांचे बोटभर लांबीचे तुकडे करून त्यात थोडे पाणी घालून शिजवून घ्यावेत. गार झाल्यावर चमच्याने त्यातील गर, बीया काढून घ्याव्या. शेवग्याच्या बिया टणक असतील तर त्या घेऊ नयेत. काढलेल्या गरात शिजवताना घातलेले पाणी आणि एक चमचा आमचूर घालून मिक्सरला फिरवून घ्यावे. ओल्या खोबय्रात एक वाटीभर पाणी घालून दूध काढून घ्यावे, दोन तीन वेळा खोबरे पाणी घालून फिरवून सर्व दूध गाळून शेवग्याच्या गरात मिसळावे. त्यात कढीलिंबाची पाने घालावीत. कढीइतपत पातळ करावे, लागल्यास थोडे पाणी घालावे. चवीनुसार मीठ, साखर घालावे. तूपाची हिंग, जीरे आणि मिरच्या तुकडे घालून फोडणी करावी आणि साराला द्यावी. हे सार उकळले तरीही फुटत नाही. शेवग्याचा वास आवडणाय्राना नक्की आवडेल. थंडीत गरमागरम प्यायला मस्त वाटते.
साधारणपणे एक वाटी गरासाठी अर्ध्या नारळाचे दूध लागते. आवडत असल्यास वरून कोथिंबीर घालावी.
वाचने
26118
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
आई शपथ शेवग्याचा सुहास दरवळला
+१
In reply to आई शपथ शेवग्याचा सुहास दरवळला by कैलासवासी सोन्याबापु
मस्त रेसिपी
वाह
मी हेच करणार होते. बरं झालं
In reply to वाह by दिपक.कुवेत
डाळींबदाण्याची पण पावडर मिळते का?
In reply to वाह by दिपक.कुवेत
हो अनारदाणा मिळतो ना.. खुप
In reply to डाळींबदाण्याची पण पावडर मिळते का? by अनन्न्या
करणार!
पहिल्यांदाच पाहिली ही पाककृती
करुन पाहिलं. फार म्हणजे फार
In reply to पहिल्यांदाच पाहिली ही पाककृती by गवि
धन्यवाद!
In reply to करुन पाहिलं. फार म्हणजे फार by गवि
गर काढण्याची आयडीया :- छोटे
In reply to करुन पाहिलं. फार म्हणजे फार by गवि
मस्त..
मस्त पाकृ आहे. शेवग्याच्या
मस्त पाकृ.तोंपासु.
हटके हय ये! मस्तच!
वेगळीच पाकृ ! शेवगा आवडता आहे
अगदी वेगळी पाकृ. फार आवडली.
किती छान प्रकार आहे हा.
कोकमही चालेल
सरस!
शेवग्याची भाजी अथवा वरण हेच
अनन्या ताई, आज करून पाहिली ही
In reply to शेवग्याची भाजी अथवा वरण हेच by उगा काहितरीच
धन्यवाद!
In reply to अनन्या ताई, आज करून पाहिली ही by उगा काहितरीच
मस्त ग एकदम. मागे मी आणि
आंबोशीचे लोणचेही येते करता
In reply to मस्त ग एकदम. मागे मी आणि by त्रिवेणी
आंबोशी म्हणजे काय गं?
In reply to आंबोशीचे लोणचेही येते करता by अनन्न्या
सुकवलेल्या कच्च्या आंब्याच्या फोडी म्हणजे आंबोशी
In reply to आंबोशी म्हणजे काय गं? by स्रुजा
ओह्ह... आमचूर चा हा कार्यकारण
In reply to सुकवलेल्या कच्च्या आंब्याच्या फोडी म्हणजे आंबोशी by अनन्न्या
झकास!!
..
१० शेंगांचे करून पहा
In reply to .. by मोगा
शेंगा आहेत घरात. कमी प्रमाणात
मस्त
भारी!!
सर्वांचे प्रतिसाद वाचून खूप छान वाटतेय
मस्त पाकृ!
जाम भारी लागत असेल हे सार.
खल्लास!
मस्त पाकृ! इथे फ्रोजन शेंगा
चविष्ट.
वेगळीच पाककृती कळली.सोपी आहे
छान पाक्रु
करून पाहणार नक्कीच.
करून पहावी लागेल
In reply to करून पाहणार नक्कीच. by पिशी अबोली
आहाहा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangramक्लास!!!!!
केली गं केली..खूपच अप्रतिम चव
खरंच मस्त लागतं. ही ओरिजिनल
In reply to केली गं केली..खूपच अप्रतिम चव by पिशी अबोली
थॅंक्स!
अनन्न्या
रेशिपी तर एकच नंबर....
शेवग्याच्या पानांची भाजी
In reply to रेशिपी तर एकच नंबर.... by बॅटमॅन
क्या बात है
आज हे सार करुन पाहिले...फक्त
वा ! भातावर ओतून ओरपायला मजा
In reply to आज हे सार करुन पाहिले...फक्त by जेपी
वा ही पण मस्त आहे कृती
थंड शेवगा सार