Skip to main content

मिसळपाव संबधी चौकशी

लेखक लाडू. यांनी शुक्रवार, 22/01/2016 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी या संस्थळा वर नवीन आहे .इथे बऱ्याच धाग्यांवरील प्रतिक्रिया वाचून न कळलेल्या काही गोष्टी म्हणजे स्कोर सेटलींग किंवा काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे, म्हणजे काय कोणी सांगू शकेल का? इंटरेस्टिंग वाटते आहे

वाचने 20230
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

इंटरेस्टिंग विषयच आहे हा;) -पाॅपकाॅर्न घेऊन फांदीवर आधीच जाऊन बसलेली,चिवड्याचा इंतजार असणारी चकली :)

In reply to by पैसा

अरे अरे, जुन्या जाणत्यांकडून हि अपेक्षा नव्हती. आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)

In reply to by नीलमोहर

चुकलंच माझे ती संस्कृती बहिण नाही तर जाव आहे असे म्हणायला पाहिजे. ह्म्म आता कुठे त्यावर हवा तेव्हढा काथ्याकुट करता येईल. चला नाश्त्याच्या ऑर्डरीवाल्या मिपा बायकांनो झारा हाती धरा बघु. एवढासा नाश्ता पुरणार नै. आणि स्वीट डिश म्हणुन गुरुजींकडुन एक जिल्बी.

In reply to by प्रमोद देर्देकर

लिहीणार्‍याने काय तो शब्द शोधलेला आहे, आहाहा !! याला म्हणतात अति कु.. शा.. ग्र बुध्दि, मिपा शब्दभांडारात पडलेली एक अमूल्य भर आहे ती. दर वेळी वाचला की एक वेगळीच अनुभूति मिळते.. कसं गोड गोड वाटतं.. मन प्रसन्न होतं.. हरी ओम..!!

In reply to by नीलमोहर

लिहीणार्याने काय तो शब्द शोधलेला आहे, आहाहा !! लिहीणार्याने च्या ऐवजी लाटकरांनी असे पाहिजे.

In reply to by पैसा

ही घ्या दोघींसाठी मुडाखी विथ ब्राउन राईस , वॉटरमार्क्स पाहुन डोळे पाणावु नका बरं .

In reply to by कविता१९७८

सगळी रेसिपी टाकाल का? नाव बरेचं वेळा ऐकलय पदार्थाचं पण कधी खाण्यात आलेला नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मुग डाळ खिचडी (मुडाखि) सगळीकडेच बनते,बनवण्याची पध्दत वेगळी असते एवढच

In reply to by कविता१९७८

भात शिक्षा म्हणुन खातो त्यामुळे खाण्यात आली नसावी. मला मुडाखि म्हणजे खिचड्यासारखा प्रकार वाटलेला.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

भात शिक्षा म्हणुन खातो
व्हेयर विल यू फेड धिस पाप आय डोंट नो...

In reply to by आदूबाळ

अता अवडत नै त्याला मी काय करणार पामर. पोटात जायला हवा म्हणुन अमच्याकडे आठवड्यातुन एक संध्याकाळ मातोश्री फक्तं भात करतात. आजची काळरात्रही भातावरचं होती तशीही. :(!!! एकतर भात खा नाहीतर उपास कर म्हणुन. उपास काय आपल्या काकाच्यानी होणार नाही. Q_Q!!!

काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे >> वैगरे वरुन थोडीफार आयडिया आली. तर मोजून प्रतिसाद कसे करायचे ह्याची कृती. एक १०० पाने वही घ्या. त्यात आपल्याला येतील तितके अंक लिहा. प्रत्येक प्रतिसादागणिक एकेका अंकावर काट मारा. अशा तर्‍हेने वहे भरली की ती रद्दीसाठी साठवून ठेवा. अशा अनेक वह्या भरा. तरबेज झालात की वही आधी भरतेय की अंक अधिक होतायत असं होईल. अशा तर्‍हेने मज्जानू लाईफ जगा. स्कोअर सेटलींगबद्दल वरील प्रकारात तरबेज झालात की सांगूया :) शुभेच्छा!!!

In reply to by पैसा

अय्यो! एक सांगायचं रैलंच! अशा रद्दी जमवून ठेवलेल्या वह्या जमल्या की रद्दी विका! फायदाच फायदा!

In reply to by यशोधरा

स्कोअर सेटलिंगबद्दल कोण्णी काही सांगतंच नाही.जा बाबा:( -एक निरागस मिपाकर

In reply to by अजया

हां! म्हंजे ढगांमध्ये काही न दिसून कुठे पाय वगैरे अडकून पडायला झाले की मी पडणार नैका! मुळ्ळीच आगे बिगे चालणार नै! सांगून ठेवते!

In reply to by यशोधरा

रखना है कहीं पाँव तो रख्खो हो कहीं पाँव चलना जरा आया है तो इतराए चलो हो!

In reply to by बोका-ए-आझम

आजकल पाव जमीपर नही पडते मेरे.. मैने नव्या बास्केट लाव्या है स्कूटरपर अ

In reply to by बोका-ए-आझम

बेकरीतले पदार्थ खाउन तुमचे दात खराब झाले की ती तुमचे दात पाडणार पैसे घेउन अशी तीची ट्रीक आहे. :)

मिपासंबंधी माहिती जुने-जाणते लोक देतीलच, यानिमित्ताने आमचेही बरेच शंकानिरसन होईल ही आशा. तुमचं नाव वाचलं की एका मैत्रिणीची आठवण येते, ती जरा गोल गरगरीत असल्यामुळे तिला एक मित्र लाडू म्हणायचा :) तुमचा ब्लॉगही पाहिला, छान आहे. वर्डप्रेस मध्ये मराठी टेक्स्ट कसं दिलंत, त्यासाठी काय सोय आहे तिथे.

In reply to by नीलमोहर

एका मैत्रिणीची आठवण येते, ती जरा गोल गरगरीत असल्यामुळे तिला एक मित्र लाडू म्हणायचा :) फोटो टाका ना लाडूचा ! ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्सुकतेवर पाणी.. तिची उंची कमी, तब्येत हेल्दी असल्यामुळे तसं नाव मिळालं होतं, त्यात आता तिच्याकडे लौकरच छोटा पाहुणा येणार असल्यामुळे लाडू पेक्षा फुटबॉल जास्त सूट होतं. आता म्हणा फोटो टाका :p

In reply to by नीलमोहर

बाप रे ! आता काय पसारा पांगला असेल. आता फोटो नको. लाडूला तुमच्या आमच्या वतीने शुभेच्छा द्या. काळजी घे म्हणा बै. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कितीही पसारा असला तरी तुमचे विशाल मन सामावून घेऊ शकणार नाही असे काही आहे का या अखिल ब्रह्मांडात, आता मागे हटने नाही.. फोटू मांगा तो फोटू मिलेगा, ladoo

In reply to by नीलमोहर

मस्त ! आवडला लाडू. पण वर झुरळ आणि त्याचे मोड्लेले पाय का टाकले लाडूवर ;) असं नाय करायचं. द्यायचं तर मनापासून नाय तर द्यायचं नाय ना :( दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एवढा मनापासून लाडू दिला, वर महाग असूनही केशर पिस्ते टाकलेत तरी खुशाल त्याला झुरळ म्हणावे, हीच का ती सौंदर्यदृष्टी वगैरे..

In reply to by नीलमोहर

सौंदर्यशास्त्र आमच्या आवडीचा विषय आहे. तात्विक, दार्शनिक आणि त्याचं मार्मिक विवेचन आम्ही मर्ढेकरान्च्या सौन्दर्यशास्रात शिकलो आहोत. एखादी सुन्दर गोष्ट पाहिल्यानंतर त्या अनुभवाचं त्या आनंदाचं वर्णन आम्हाला भारी करता येतं. थांबा मला ज़रा वेळ मिळू द्या. धागाच काढतो. तुम्हाला म्हणुन सांगतो. ''उपर वाला भी अपना आशिक है, इसिलीये तो वह मुझे किसिका होने नही देता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'उपर वाला भी अपना आशिक है, इसिलीये तो वह मुझे किसिका होने नही देता.' - वाह वा !! त्या अनुभवाचं त्या आनंदाचं वर्णन आम्हाला भारी करता येतं. - असे काही हेवनीय विचार वाचलेत, आता तुमचेही विचार कळू द्या या निमित्ताने, काढाच धागा..

सेटल करायला अजून तुम्ही स्कोर केलाय कुठे? स्कोर केलात के मग सांगतो कोणाला तरी सेटल करायला.

साध्या सोप्या भाषेत स्कोअर सेटल म्हणजे बदला! Revenge !! आता ते नेमकं कसं ते कळण्यासाठी मिपावर वावरावे लागेल. मला जवळजवळ ५-६ वर्षे झालेत पण अजूनही पुरेसं "कळालेलं" नाही. -एक नम्र मिपाकर!

तुमच्या धाग्याचा विषय वाचून गंमत वाटली. जश्या जुन्या व्हाल तशी सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळुन जातील.पण मला सांगायच आहे ते वेगळंच. ब्लोगचा उल्लेख वाचून त्यावर जाउन तिन्ही लेख वाचले. सर्व आवडले. खूप छान.अशाच लिहित रहा. इथेही लिहा.

स्कोर सेटलिंग म्हणजे बहुधा प्रतिसादांच्या धावा काढून दमलेल्या मिपाकरांचा श्रमपरिहारार्थ मधु-मिलन-मेळावा असावा. नै का गं मिपा-बायकांनो ? मला पॉपकॉरण आवडत नसल्याने मी कॉरण चिवडा आणला आहे. हा घ्या. अ

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

तो चिवडा मिपा-बायकांसाठी आहे ! चाल्ले लगेच चकणा खायला !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमण्या, चिमण्या, अरे चिवडा खाणे म्हणजे कंपूबाजी ??? उद्या जिल्बी खाणे म्हणजे स्कोर सेटलिंग म्हणशील ! आण तुझे पोहे ! ते खाऊन आम्ही तुला ट्रोलभैरव म्हणू. मामोऑफ

पॉपकॉर्न, थंब्सअप, सामोसा, लाडू, चिवडा, मुडाखी विथ ब्राउन राईस... धाग्यावर आत्तापर्यंत मिपा बायकांनी एवढे पदार्थ जमा केलेत, अजूनही येऊ द्या. आणि हो, मिपा पुरूषही काही आणू शकतात, समानतेचा जमाना आहे म्हटलं.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तमाम मिपा पुरुषांच्या वाटचे पदार्थ आणलेत वाटतं, डोळ्यांतच माईनात, पोटात कधी मावायचे ;)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हाहाहा! पदार्थ कुठून मागवायचे - आपलं, डालो करायचे, त्या माहितीसकट!

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

बाटली सोडा आता.वाटी चमचा बरा.दातही किडणार नाहीत दुधाचे ;)

काय ते नाव दिलय आणि काय त्या वर्‍हाड कडच्या लोकांनि त्याचा अर्थ सांगितलाय ळॉळ

In reply to by हेमंत लाटकर

हेलाकाका धागा उडला तुमचा? मला पत्ताच नाही. अरेवा अरेरे

In reply to by अजया

हेलाकाका धागा उडला तुमचा? उडाला म्हणजे प्रतिसाद देता येत नाही. अंवातर: हेला लिहणार्यांचा राग येत नाही तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

In reply to by अजया

हेलाकाका म्हणु नका ओ त्यांना. उद्या जिलबीआचार्‍याच्या जागी त्यांच्या अंगात नाना पाटेकरांचा आत्मा शिरला तर मग अवघड होईल तुमचं. वो स्कॅल्पेल (उच्चार बरोबर आहे का माहित नाही) वाली मिपाबाई ठिक कहती थी वगैरे आवेशात खरडफळ्यावर लिहायला जातील आणि नंतर मग पंचाईत होइल सगळी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जिलबीआचार्‍याच्या जागी त्यांच्या अंगात नाना पाटेकरांचा आत्मा शिरला अरे बाप रे...

In reply to by हेमंत लाटकर

भाषा सुधारा लाटकर काका/आजोबा जे काय ते. सार्वजनिक संस्थळावर स्त्रियांशी बोलायची ही पद्धत नव्हे.

In reply to by किसन शिंदे

अय्या... किसनकाकांचा दरारा किती दिवसानी पाहायला मिळाला बै. अब रागवनेसे क्या होगा जब चिडीया चुग गयी खेत. ;)

In reply to by कट्टप्पा

संदर्भ देता का? कि आता संदर्भ देणं शक्य नाहीये?? नाही, लोकांच्या दोषांकडे लक्ष वेधलं की खेत चुगनेवाली चिडियाच वाटणार.

In reply to by किसन शिंदे

काय करणार सन्दर्भ घेऊन? थप्प्या लावनार का? तसे असेल तर मिळणार नाहीत. तुम्ही बसा दोष हुडकत.

In reply to by कट्टप्पा

तुमच्या आयडीचा कार्यकाल पाहता गेल्या पाच महिन्यात माझे दरारावाले प्रतिसाद(कि चिडियावाले) कुठे कुठे वाचायला मिळालेत याची उत्सूकता म्हणून हो, बाकी काही नाही!

In reply to by किसन शिंदे

कार्यकाल काय पाहता साहेब. तुम्ही इथे नव्हता तेव्हा पन मी होतो. तुम्ही नसता तेव्हा पन असतो. तुम्हि नसनार तेव्हा पन असनार. (आता पटकन आयपी हुडकायच्या मागे लागा बर माझा.)

In reply to by कट्टप्पा

जान्दे ना कटप्पाभौ. भावबलीने तुमको पयचाना नय.

In reply to by कट्टप्पा

सरळ प्रश्नाला सरळ उत्तर नाही हे पाहून एका जुन्या मित्राची आठवण झाली.

In reply to by किसन शिंदे

सरळ प्रश्नाला सरळ उत्तर नाही
होऊन जाऊ दया एक जंगी स्कोअर सेटलिंग.

In reply to by सतिश गावडे

लाडू.तैंना एकदम मिपाशिक्षित करणार तर तुम्ही!

In reply to by किसन शिंदे

भाषा सुधारा लाटकर काका किसन देवा, ते आमचे तो तू मै मै आहे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही दोघे शिक्रेट भाषेत बोलून का र्‍हायले? आँ?

:) तिकडे आरक्षण चा धागा लय गरम झाला होता म्हणुन तिकडे थोडि गम्मत केलि आन ह्या धाग्यावर तर मजाच मजा सुरु आहे. काउन बा तुम्हाले वाटल का चयलो अशीन म्हनुन.

जे सुरु आहे ते मस्त सुरु आहे पण हे सुरु काय आहे? माझ्यासारख्या नवीन लोकांना काही संदर्भ लागत नाहीये, कुणी सांगेल का?

स्कोअर सेटलिंग म्हणजे काय? मलाही काही शंका आहेत मिसळपावविषयी. कोणाला विचारु शंका? -शंकासुर-

आपल्या कडे एक काका आहेत त्यांच्या कडे मानवाच्या सगळ्या शंकाचे उत्तरे आहेत. लवकरच ते कक्काजी कहिन नावाने एक सदर सुरु करताहेत त्यात ते वाचकांच्या सगळ्या शंकांचे निरसन करतिल मग त्या शंका लघु असो क दिर्घ :)

In reply to by लाडू.

नक्की कळेल लाडू.. अशीच मिसळ मिळते इकडे. येत राहिलात की इ़कडून जावेसे वाटणार नाही.

शंभरी भरली धाग्याची.उतरु का फांदीवरुन? धागाकर्तीचा लाडूचिवडादडपेपोहेजिलबीभजी आणि स्कोअरसाठी दगडी पाटी देऊन सत्कार करण्यात येत आहे.

आता अगदी मनापासुन गंभीरपणे सांगतो लाटकर काकांवर आता जास्तं पडी नको. अति तिथं माती.


In reply to by नीलमोहर

आणि वाईस वर्सा. लाटकर तुम्ही थोडे दिवस काही दवणिय लिखाण टाकु नका बरं. त्यापेक्षा काहीतरी खरचं

चांगल्या

विषयावर लिहा.


In reply to by होबासराव

तुम्हाला हो म्हणालात लगेच बास करण्याला राव असा दिलदारपणा हवा !!!!! क्प्तान आणि तुमचाही स्नेही नाखु

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

करून हवी होती ,इथे लोकांनी (थेट) ओळख परेडच करून दिली. तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते पहात जावे ! चित्ती असो द्यावे समाधान ! नाखु याचकांची पत्रेवाला

आमच्या इथे स्कोअर सेटलिंग,डु आय डी ओळखणे ,काढणे,धाग्याचे काश्मिर करणे,मिपावरील खास शब्दांची ओळख करुन देणे याची ट्युशन घेतली जाईल. -मिपासेंटरफाॅरखोड्याएक्सलन्स कडून जनहितार्थ जारी