Skip to main content

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून म्हणजे दि.१५ जानेवारी २०१६ पासून सुरुवात होत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीपासून माध्यमांना खाद्य मिळायला सुरुवात झालेली असते आणि पुढे जे काही सुरु झालेले असते, होत असते, ते आपण सर्वच वाचत असतो. डॉ. श्रीपाल सबनीस हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आता त्यांच्या निवडीला आव्हान देणे, नाराज साहित्यिकांनी निवडणूक कशी अवैध आहे वगैरेसाठी पोलीसात तक्रार देणे इथपर्यंत आपण सर्वांनी माध्यमातून वाचलं आहे. आता या सर्व गोष्टींच्या पुढे साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज दुपारी ग्रंथदिंडी निघाली होती, त्यास काही जाता आले नाही, नंतर ध्वजवंदन झाले व त्यापाठोपाठ ५ वाजण्याच्या सुमारास ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्याला मात्र वेळेत पोचलो. ग्रंथप्रदर्शन प्रचंड मोठे आहे. जवळपास ४०० स्टॉल्स आहेत. नंतर एका मंडपात काही ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार मा. सुशिलकुमार शिंदे ह्यांच्या हस्ते झाला. मधु मंगेश कर्णिक, रा. ग. जाधव आदि साहित्यिकांना प्रत्यक्ष बघता आले. तिथे मात्र जास्त न थांबत ग्रंथप्रदर्शन बघण्यास प्राधान्य दिले. आता उद्यापासून परिसंवाद, निमंत्रितांचे कवीसंमेलन, बहुभाषिक कविसंमेलन, मुलाखती, अभिजात कथावाचन, कथाकथन, असा भरगच्च कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे. स्वागताध्यक्ष पी डी पाटील ह्यांनी प्रचंड खर्च केल्याचे जाणवते आहे. संमेलनस्थळाचे प्रवेशद्वार, मुख्यमंडप, उपमंडप, ग्रंथदालन, भोजनगृह सारेच काही नेत्रदीपक झाले आहे. मराठी साहित्यप्रेमीसाठी हा एक मोठा सोहळा असतो. आता अनेकांना अशा सोहळ्याबद्दल आक्षेप असेलही तो आपण सोडून देऊ. मिपाकरांसाठी हा सोहळा तितकाच मोठा असेल असे मला वाटते. अनेक मिपाकर या साहित्य संमेलनाला हजेरी लावतील. अनेक कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. दैनिकातून बर्‍याच गोष्टी वाचायला मिळतीलच परंतु थेट कार्यक्रमाला उपस्थित राहुन कोणता परिसंवाद चांगला झाला ? कोणाची कविता कशी होती ? मुलाखत कोणाची रंगली ? मराठी साहित्यातील विविध प्रवाहांची चर्चा कशी झडली ? अध्यक्षीय भाषण कसं होतं ? या आणि विविध साहित्यिक गोष्टींची चर्चा या निमित्ताने मिपावर व्हावी, श्रोता म्हणुन आपला अनुभव मिपाकर इथे लिहितील म्हणुन हा काथ्याकूट प्रपंच. तेव्हा उद्यापासून सुरु होणार्‍या सांस्कृतिक सोहळ्याबद्दल आपण या धाग्यावर लिहित राहू सर्वांना मकर संक्रातीच्या खुप खुप शुभेच्छा. अ.भा.साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळावर कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे. सोहळ्याची आज मी घेतलेली काही छायाचित्रे (भ्रमणध्वनीद्वारे घेतलेली असल्याने स्पष्टतेच्या मर्यादा आहेत) १. संमेलनस्थळाचा प्रमुख मार्ग a २. रसिकजनांची गर्दी a ३. ही दोन्ही ग्रंथदालने आहेत. a ४. बोधचिन्ह a ५. एक प्रतीकृती a ६. ज्ञानबा a ७. तुकाराम a ८. माझी ग्रंथप्रदर्शनातली आजची किरकोळ खरेदी a

वाचने 40705
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

हो, खरेच मज्जा आली =) श्यामची आई हे पुस्तक कोकणी भाषेत बघून मजा वाटली. त्या काकांनी काजू आणून दिले तसे मी लग्गेच मी गोव्याची होऊन, बघा आमच्या गोव्याकडे कसे कवतिक होते, तुमच्या पुण्यात असे आहे का, असे विचारून घेतले!! ते ऐकून शेजारी उभ्या असलेल्या एक मौशी खूप आश्चर्यचकित होऊन हसल्या! त्यांचे लक्ष काजूकडे होतेच पण तोवर मी पुणेरी बनले होते =))

In reply to by प्रचेतस

सुदैवाने धन्याला फार इजा झाली नाही. पण... समोरील बाजूने मंडपाचे आख्खे छतच वर वर उचलले जात असल्याचे दिसू लागले. म्हणजे नक्की काय झाले ?

In reply to by मितान

सदरहू स्थळी भेट दिली... पत्रे नक्की कश्याने उडाले असावेत यावर एक कौल काढावा काय असा कार्यकारीणीचा विचार चालू आहे! कार्यकारीणीत कोण आहे याची चौकशी थेट प्रचेतस याचेकडे करावी (आप्ल्या जबाबदारीवर) संमेलन वारकरी मिपाकर नाखु ता.कः आजही संध्याकाळी कंपनीतून जातान एक्डाव भेट देणार आहे संमेलनाला
अतिदूरवांतर : दिलखुलास बिरुटे सरांबरोबर एका ऐतीहासीक्,एका प्राचीन आणि एका वैज्ञानीक स्थळाला भेट दिली त्याबद्दल नंतर कधीतरी. ही धन्या-वल्लींसोबतच्या त्या मिनि कट्ट्याची जाहीरात आहे असे समजू नये असे नाही असे नाही.

#काय म्हणता धन्याला ब्रम्हास्त्र आपलं साहित्यास्त्र लागलं? धन्य आहे.संजिवनी सापडली का रुग्णालयात? #यशोधरा-गोवा स्टॅालपाशी मिपाकर साक्षीदार होते हे बरं झालं. आमच्या गोव्याच्या भूमीत घट फुटती-----हे गायन झालं का? #बाकी तो काजूचा हिशेब पैसाताई आणि चा (अमृततुल्य) पाजण्याचं पुणेकरांचं वचन एकदा पुरं करून टाका थिबाच्या ऐतिहासिक महालात.

छप्पर फाडके पुस्तकं मिळवली म्हणजे! @मितान ,आपण नुकतेच बाहेर पडलो असू त्यावेळात, त्याचा तर परिणाम नसेल ना;)

माझा रविवारचा वृत्तांत एकदम एकदिवशीय आत्मकथेतच रूपांतरित व्हायला लागलाय! ;-) त्यामुळे आज त्याला व्यवस्थित एडीट वगैरे करून फोटोसहित दुपारपर्यंत टाकतो! Sandy

In reply to by चांदणे संदीप

वाट पाहतोय. कवी कट्टा या मंचावर कवितांचा अखंड यज्ञ चालु होता तिथे मी धन्या वल्ली chandanesandeep यांना शोधायला गेलो. गर्दी खुपच होती. मी थेट संचलन करणार्‍याजवळ गेलो आणि संदीप चांदणे यांच्या नावाचा पुकारा करायला लावला. पण, कविता वाचन होऊन आपले कवी मठ्ठा प्यायला निघुन गेलेले होते. कवींची भेट झाली ते काय लिहितात त्या नंतर पुन्हा उपप्रतिसाद त्यांना लिहितोच. -दिलीप बिरुटे

तर मंडळी, आजही (रवी. दि. १७/१/२०१६) सकाळी साडेदहाला घरातून सौ.ना बरोबर घेऊन निघणे झाले. आज मात्र डी-मार्ट किंवा पडद्याञ्चा आधार घ्यावा लागला नाही! कारण मी सरळ सांगितले की माझे काव्यवाचन आहे आज अखिल भारतीय साहित्य संमेलनात! मग, घाबरतो का काय! असो. अकराच्या सुमाराला संमेलनस्थळी पोचलो. शनिवारच्या तुलनेत तिप्पट(अंदाजे) तरी गर्दी झालेली. काव्यकट्ट्याच्या ठिकाणी जाऊन माझी वेळ पाहून घेतली जी १२ ते १ च्या दरम्यान होती. मग पटापट फोन फिरवून मित्र, मैत्रिणी आणि घरची मंडळी यांना कळवून झाले. खोकला नरड्याचे दार ठोठावत असल्याने जरा काळजीत होतो. म्हणून मग एका मित्राला स्ट्रेप्सिल्स आणायला सांगितल्या. पण तो वेळेत'च' आल्याने गोळ्यांचा फायदा नाही झाला पण तो आल्याने व्हिडिओ करायचा मार्ग मोकळा झाला. :) वडीलही तितक्यात येऊन जागा पकडून बसलेच होते. इथे अगदी अनपेक्षितपणे माझे शाळेतील मराठीचे शिक्षक श्री. सूर्यवंशी सर आपल्या परिवारासोबत आलेले दिसले! संमेलनाने असा सुखद धक्का मला दिला आणि सुमारे पंधरा वर्षानंतर गुरू-शिष्याची भेट झाली! सरांचा आशीर्वाद घेऊन मी कविता वाचायला गेलो. कविता वाचत असताना a आयोजकांकडून सन्मान स्वीकारताना b काव्यवाचनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मंचावरून उतरून परत जागेवर जात असताना बऱ्याच जणांनी हस्तांदोलनं केली. दोन मिनिटे सेलिब्रिटी झाल्याचाच फील आला ;-) पुढे माझ्या सौ. ला माझ्या सोडून इतर कुणाच्याही कविता आवडत नसल्याने तिने उरलेल्या काव्यकट्टा कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे लगेच जाहीर केले. त्याला अनुमोदन देण्याशिवाय पर्याय नव्हता. :( मग मी सौ., वडील, सपत्निक व छोट्याला सोबत घेऊन आलेला मित्र व ऑफिसातला एक मित्र आम्ही बाहेर येताच भेटलेला असे सात फुल १ हाफ पुस्तक प्रदर्शनाकडे वळलो. आणि इथे लगेच तो वर्ल्ड फ़ेमस पत्रे उडायची घटना घडली! प्रदर्शनात माझ्यासाठी पुस्तके नाही घेऊ शकलो पण माझ्या छकुलीसाठी दोन मस्त भरपूर चित्र असलेली गोष्टींची पुस्तके घेतली. इथे ऑफिसमधली एक कलीग आणि तिची रूममेट येऊन मिळाली तसेच एक कॉलेजपासूनचा जीवश्च-कंठश्च मित्रही आला. आता इतके सगळे एकत्र फिरताना सारखे पुढेमागे होऊ म्हणून मग सर्वानुमते खाण्याकडे मोर्चा वळवण्याचे ठरवले. तिकडे आजमात्र कालच्यासारखी कुणाची हाकही आली नाही आणि आमच्या हिला साऱ्या दुकानदारांना समान श्रीमंत करायची संधीही मिळाली नाही. कारण अलोट भुकेलेला जनसागर! तिथे थोडंफार खाऊन झाल्यावर मठ्ठा पितच होतो की एका माणसाने माझा हातच पकडला! दुर्मिळ पण सत्य गोष्ट! खुणेनेच विचारता तो मला ओढत ओढत त्याच्या मित्रांच्या कंपूमध्ये घेऊन गेला आणि तिथे त्या सर्वांनी मला कविता आवडल्याचे सांगितले तसेच एक फोटोही काढून घेतला. साऱ्यानी छोटी मुलाखतही घेऊन टाकली. हा दुसरा सेलीब्रीटी झाल्याचा अनुभव! उरलेला मठ्ठा संपवतच होतो की एक कॉल आला. घेतला तर पलीकडून, 'प्रचेतस' एवढे ऐकल्यावर पाय ताबडतोब ते थांबलेले त्या ठिकाणी जायला निघाले. तिथवर जाईतो आमची पलटण विखुरली आणि मी, सौ., ऑफिसातली कलीग, तिची मैत्रीण आणि ऑफिसातला मित्र असे एवढेच जाऊन पोचलो. तिथे जाऊन पाहतो तर त्रिमुर्ती उन्हात उभी! अमर-अकबर-एंथनी आपलं ते प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, प्रचेतस आणि सतीश गावडे. तिघांना पाहून उर फुटेस्तोवर आनंद झाला! सगांना लागल्याचे पाहून अतिशय वाईट वाटले व त्याची नैतिक जबाबदारी वगैरे घेणार होतो पण माझ्यासोबतच्या मंडळींचा विचार करून तो विचार बाजूला सारला. प्रा.डॉ.नी भेदक नजरेनेच मला जाळून टाकले आणि असा एक हुकूम दिला की त्याची अंमलबजावणी होईस्तोवर मला त्यांचा लेखच काय, प्रतिसाद वाचायचीही भीती वाटेल! :-/ प्रचेतस यांना प्रत्यक्ष पाहून खूपच आनंद झाला. त्यांनी मला त्यांच्या चाहत्यामध्ये स्थाण द्यावं ही इथे यानिमित्ताने मी त्यांना विनंती करतो. मला सूचना कम हुकूम देताना प्रा.डॉ. दिलीप बिरुटे सर c हा अजून एक d त्रिमुर्तीना भेटून आम्ही पुढे.... . . . . . दमलो.... हा भाग-१ समजा वृत्तांताचा...भाग दुसरा नंतर टाकतो! धन्यवाद, Sandy

In reply to by चांदणे संदीप

फोटो नेहमीप्रमाणेच दिसत नाहीयेत! सं.मं. कृपया मदत करा. आणि कुणीतरी मला एकदाचे सांगा कुठल्या कुंडात अंघोळ करून यायला लागेल इथे फोटो पहिल्या प्रयत्नात चिकटवण्यासाठी? Sandy

In reply to by चांदणे संदीप

संदीप, पीकासा वेब वर तुम्हाला हवा असलेला फोटो राइट क्लिक करून कॉपी इमेज अड्रेस करा आणि ती लिंक मिपावर प्रतिसाद देतांना इनसर्ट लिंक मधे टाका. रुंदी आणि लांबी ( साधारण ६००, ५००) ठेवा.

In reply to by चांदणे संदीप

काव्यवाचनासाठी अभिनंदन संदीपजी !! वृत्तांतही छान. मिपाने इथे फोटो टाकण्यासाठी काहीतरी उपयुक्त सोय करावी ही यानिमित्ताने नम्र विनंती.

In reply to by चांदणे संदीप

गणेशा झालाय पण उपवृत्तांत आवडला. बाकी आमच्या आमच्या चाहत्यांमधे तुम्हास स्थाण आहेच तथापि खुद्द आम्हीच आमच्या गुरुजींच्या चाहत्यांच्या रांगेत केव्हापासून उभे आहोत पण ते काही स्थाणच देत नै ब्वा.

In reply to by प्रचेतस

___/\___ आता पुढच्या दर्पणसुंदरीला न्याहाळायला मीही सोबतीला असेन असे धरून चालतो. म्हणजे, तुम्ही निवांत न्याहाळा, मी हवं तर म्हसराकडं लक्ष ठेवतो! ;-) बाकी, गुरूजींच्या चाहत्यांच्या रांगेतून तुम्हांला ब्लॅकचे तिकीट मिळून लवकरात लवकर स्थाण मिळावे यांसाठी णिसोंचे नवग्रह आणि दिनुच्या काळ्या मावशीला साकडं घालतो! Sandy

In reply to by चांदणे संदीप

कविता वाचत असताना a आयोजकांकडून सन्मान स्वीकारताना b मला सूचना कम हुकूम देताना प्रा.डॉ. दिलीप बिरुटे सर c हा अजून एक d हुर्रे...ततर ततर ततर.... Sandy

In reply to by चांदणे संदीप

धन्याने फोटोसाठी खास छबीलकब (पोझ) दिल्याबद्दल कवतीक. नाखु चिंचवडकर स्व्गत : बिरुटेसर इंदीरा कॉन्ग्रेसचा प्रचार का करतायत ! पळालेला नाखु

In reply to by नाखु

>>>>> स्व्गत : बिरुटेसर इंदीरा कॉन्ग्रेसचा प्रचार का करतायत ! अच्छे दिन दिसत नाही म्हणून :) -दिलीप बिरुटे (नाखु काकांच्या गप्पांचा फ्यान)

आजही समारोपाचे दिवशी ग्रंथदालनात चक्कर मारली. शेवटचा दिवस असल्याने काही स्टॉलवर भरपूर सवलत जाहिर केली होती. खरेदी अशी केली नाही पण एक छोटेखानी दुर्मिळ पुस्तक अवघ्या १० ₹ ला मिळाले. "क्रिस्ताच्या वधस्तंभारोहण प्रसंगींचे विळाप" संपादक वि. वा. प्रभुदेसाई १७ व्या शतकातील फादर स्टीफन्सच्या क्रिस्तपुराणातील हा अप्रकाशित भाग. १९७१ साली हे साहित्य प्रथम प्रकाशित केले गेले. तोवर ह्या ओव्या लोप पावल्या होत्या. फादर स्टीफ़न्स तो हाच ह्याचा कर्ता हे निर्विवादपणे सांगता येत नाही पण हा किंवा फादर क्रुवा हा कर्ता असावा असे ओव्यांच्या क्रिस्तपुराणातील असलेल्या साधर्म्यामुळे असे संपादक प्रभुदेसाई सांगतात. मासल्यादाखल एक ओवी देतो. देखुनियां फार मार लोळे रक्ताचिया झरीं | सर्वांगिं जाहालासे जैसा कोस्टिय रोगिया सरीं || मकुटु कंटकांचा बिळिं (भाळीं) रौद्र वाहे बोंबाळिं | ते पगळे जाउनिं डोळिं; खांदि थपथपे ||

एकूणात आपल्याला मोठे उत्सव करून पोलीस, सार्वजनिक वहातुक यावर ताण आणायचा यात रस नाही. पण या उत्सवाला तरीही गेलो. कारण याचे यजमानपद कोणी एका पिवर उदद्योगपतीने स्वीकारले असते का याबाद्द्ल शंका आहे. डी वाय हे शिक्षण उद्योग पति असल्याने हे जमून आले. दारावरच साहित्यिक या शब्दाचे शुद्धलेखन चुकलेले पाहून मजा वाटली. दोन दिवस गेलो . पाहिल्या दिवशी बायको व मी हरवलो. दुसर्‍या दिवशी हरवलो तर काय करायचे हे ठरवून पुन्हा हरवलो. ग्रन्थ प्रदर्शन हा आता चिचवड कराना नाविन्याचा विषय राहिलेला नाही. तरीही हे ग्रन्थ वितरण पाहून हरखून गेलो. काही कविंच्या कविता ऐकल्या काही शष्प कळल्या नाहीत. आपल्याला परत मराठीच्या पहिल्या वर्गात कमल नमन कर , भैरूने कैरी खाल्ली असे शिकावयास हवे याची जाणीव झाली. शरद पवारांच्या भाषणातील एक उल्लेख आवडला तो असा की कादंबरी कथा याना स्पर्श करणे हेच खरे साहित्य. ( अगदी असे शब्द नाहीत ) .साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मग एखादा प्रकाशक का होउ नये असा मला प्रश्न पडला. कादंबरी कथा, नाटक व कविता हे चार प्रकार हाताळणे हे येरा गाबाळ्याचे काम नाही. गायक असणे वादक असणे व संगीतकार असणे यात जो फरक आहे तो इतर व हे चार प्रकार हाताळणारे यांच्यात असतो अलिकडे हे अध्यक्ष कोण? असा प्रश्न पडतो. तो का पडावा बरे ?

घराच्या एव्ढ्याजवळ अभा नाट्य संमेलन, अभा साहित्य संमेलन होते तरी उपस्थित राहू शकलो नाही. दोन्ही वेळा तातडीच्या कार्यालयीन कामांमुळे परस्थानी होते. काय माहीत कधी योग येतात ते !